लंटनची वारी ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
13 Aug 2009 - 10:22 am

लंडन आय जायंट व्हील ऑन थेम्स....

या जायंटव्हीलचा कारच्या साईड विंडोमधुन काचेआडुन काढलेला हा फोटोदेखील तेवढाच मस्त आला होता.

टॉवर ब्रिज....

उघडलेला टॉवर ब्रिज आणखी जवळुन...

थेम्सचा सुंदर किनारा...

मुक्कामाच्या ठिकाणाकडे परत येताना... on the way back to wallingford!

विशाल

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

13 Aug 2009 - 10:27 am | विंजिनेर

वा छान... जॉनराव भेटले का तुम्हाला...
-
विंजिनेर डस्ली
कार्लटन, लंटन -२
ओके

सुनील's picture

13 Aug 2009 - 10:34 am | सुनील

मस्त फोटो. लंडन आयमध्ये बसून उंचावरूनदेखिल एखादा फोटो काढला असतात तर बहार आली असती. निरभ्र दिवशी (हे लंडनमध्ये क्वचितच!) पार विंडसर कॅसलपर्यंतचा देखावा दिसतो.

अवांतर - ज्याला तुम्ही लंडन ब्रिज असे संबोधले आहे, त्याचे खरे नाव टॉवर ब्रिज असे आहे. लंडन ब्रिज निराळा (त्याच्या शेजारीच, अगदीच साधा ब्रिज आहे तो!)

(अधुन-मधुन लंडनकर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 10:48 am | विशाल कुलकर्णी

आयला ! हे माहीतच नव्हतं ! माहितीबद्दल धन्स ! बदल केला आहे !
खरं सांगायचं तर वर गेल्यावर आपल्याकडे कॅमेरा आहे हेच विसरुन गेलो होतो. {आजुबाजुला दिसणार्‍या सुंदर, नयनरम्य देखाव्यामुळे किं पोटात आलेल्या गोळ्यामुळे ते मात्र विचारु नका. ;-) }

सस्नेह
(अज्ञानी) विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

विसोबा खेचर's picture

13 Aug 2009 - 10:54 am | विसोबा खेचर

लंडन बाकी छानच आहे हो! :)

तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Aug 2009 - 10:56 am | ब्रिटिश टिंग्या

छान छायाचित्रे!

अवांतर : मादाम तुसाँला भेट दिली नाहीत? लॉर्डस, विम्बल्डन बघितले नाही? साउथहॉलला रस्त्याच्या कडेला टपरीवर मिळणारी गरमागरम जिलबी खाल्ली नाहीत? मग कसली लंटनवारी हो ही? ;)

विशाल कुलकर्णी's picture

13 Aug 2009 - 11:28 am | विशाल कुलकर्णी

समदं पायलं की देवा !

अवांतर : तेवडी भवानी तलवार बगायची रायली पगा. :-( {अर्थात ती खरोखर तिथे असेल तर म्हणा.}

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 11:31 am | मिसळभोक्ता

नॅशनल म्युझियम मध्ये, आणि कोहिनूर हिरा टॉवर ऑफ लंडन मध्ये आहे. छान आहे.

-- मिसळभोक्ता

विकास's picture

13 Aug 2009 - 4:40 pm | विकास

नॅशनल म्युझियम मध्ये, आणि कोहिनूर हिरा टॉवर ऑफ लंडन मध्ये आहे.

हे बघायला नक्कीच आवडेल... एक उत्सुकतेपोटी प्रश्नः ती त्याच नावाने सांगितले जाते का? (म्हणजे शिवाजीची भवानी तलवार असे).

बाकी जाता जाता प्रश्न पडतो भवानी तलवार ब्रिटन मधे आहे पण आज शिवाजी कुठे (कुणामधे) आहे?

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 11:11 pm | मिसळभोक्ता

ती त्याच नावाने सांगितले जाते का? (म्हणजे शिवाजीची भवानी तलवार असे).

नाही, स्र्वर्ड ऑफ मराठा वारियर सिवाजी, एवढाच बोर्ड लिहिलेला आठवतो.

बाकी जाता जाता प्रश्न पडतो भवानी तलवार ब्रिटन मधे आहे पण आज शिवाजी कुठे (कुणामधे) आहे?

मिसळपावावर नाही एवढे नक्की. इतर ठिकाणी माझे हल्ली येणे-जाणे नसते.

-- मिसळभोक्ता

विशाल कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 10:11 am | विशाल कुलकर्णी

मध्ये भारतात कुठल्यातरी भोसल्यांनी पण जाहीर केले होते की भवानी तलवार त्यांच्याकडेअ आहे, ब्रिटीशांनी नेली ती भवानीची प्रतिकृती होती.

अवांतरः राजांनी भवानीची पण प्रतिकृती करुन ठेवली होती काय?

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

मदनबाण's picture

13 Aug 2009 - 1:22 pm | मदनबाण

छान फोटो.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2009 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त फोटो! मला शेवटचा फोटो सगळ्यात जास्त आवडला. सायबाच्या देशातली खेडी जाम आवडतात ब्वॉ मला!!

मला कधीच नाही दिसला टॉवर ब्रिज उघडलेला ... अर्थात मी खूप कमी वेळा तिकडे गेले.

अदिती
(दोन वर्षापूर्वीचा पत्ता: SK11 9DH, UK)

ऋषिकेश's picture

13 Aug 2009 - 4:40 pm | ऋषिकेश

छान फोटो आले आहेत. मला पहिला जास्त आवडला

ऋषिकेश
------------------
दूपारचे ४ वाजून ३९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक ब्रिटीशकालीन गीत "धन्य भो भूप पंचम जॉर्ज...."

संदीप चित्रे's picture

13 Aug 2009 - 6:51 pm | संदीप चित्रे

खूप वर्षांपूर्वी लंटनवारी घडली होती त्या आठवणी ताज्या झाल्या :)

विशाल कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 2:53 pm | विशाल कुलकर्णी

सगळ्यांचे आभार ! हे दोन देखणे फोटो टाकायचे राहुनच गेले होते :-)

"

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

सोनम's picture

18 Sep 2009 - 12:03 pm | सोनम

सर्वच फोटु छान आहे. :) :)
विशेषत : सहावा फोटू खूपच छान
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

आशिष सुर्वे's picture

18 Sep 2009 - 12:33 pm | आशिष सुर्वे

व्वा विशाल भाऊ..
येल-कम बॅक!

तुमची मागील कथा अर्धीच रायलीय ओ!!
-
कोकणी फणस