एक कोडं

विमुक्त's picture
विमुक्त in काथ्याकूट
12 Aug 2009 - 3:45 pm
गाभा: 

एक नळ, ५ वेळा संपुर्ण फिरवला की पुर्ण उघडतो आणि त्यातुन १० l/min ह्या रेटनं पाणी पडतं... नळ उघडताना/बंद करताना पाण्याच्या प्रवाहा मधे होणारी वाढ/घट constant आहे... मला जर १० liter पाणी हवं आहे... मला नळ एका constant angular velocity नं उघडायचा आणि बंद करायचाय... तर ती constant angular velocity किती?

***** मिपावर कोडी टाकलीतर चालतील ना?*****

प्रतिक्रिया

सूहास's picture

12 Aug 2009 - 3:55 pm | सूहास (not verified)

किती छान फोटो आहेत्...दुसर्‍या चित्रात झाडावर बसुन डोके खाजविण्यार्‍या माकडाचे फोटो तर के व ळ अ प्र ति म..

ट्या॑व अरे हे काय हा तर कोड्याचा धागा आहे व्हय !! अरे काय विमुक्त राव !! मला वाटल परत माझा कोळसा करताय का काय ?

ओके ..जोक्स अपार्ट...

कोडे सोडवता येणार नाही ..ईतका स्मार्ट असतो...तर आज ओबामा नसतो का?

सू हा स...

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 4:18 pm | विमुक्त

जमतं रे.... जरा वेडा वाकडा विचार करायचा....

टारझन's picture

12 Aug 2009 - 6:48 pm | टारझन

थोडा वेडा वाकडा विचार केल्यावर मला उत्तर मिळालं ... अँग्युलर व्हिलॉसिटी आहे ६१.६२ डिग्री/मिनीट

गोगोल's picture

12 Aug 2009 - 3:55 pm | गोगोल

४२

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 4:17 pm | विमुक्त

जरा समजवून सांगा की राव...

शैलेन्द्र's picture

12 Aug 2009 - 4:41 pm | शैलेन्द्र

कुठल्याही व्हेलॉसिटीने पुर्ण ऊघडा, कमित कमि १ मिनीट ऊघडा ठेवा, मग त्याच व्हेलॉसीटीने बंद करा..

तुम्ही म्हणाल, पाणी १० लि पेक्षा जास्त होइल, पण फक्त १०च लि पाणी हवे असे तुम्ही कुठे म्हणालात?

(ह घ्या. मला गणितात के टी होती.)

अवलिया's picture

12 Aug 2009 - 5:35 pm | अवलिया

आत्ता नळाला पाणी आहे का ?

--अवलिया

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 5:37 pm | विमुक्त

आहे असं समजून चला...

अवलिया's picture

12 Aug 2009 - 5:41 pm | अवलिया

मग तुम्हाला १० लिटरचे कोडे उलगडले की १०० लिटर मला पाठवुन द्या

--अवलिया

टारझन's picture

12 Aug 2009 - 6:56 pm | टारझन

कसं काय लोकं कोणत्याही अनोळखी णळाचं पाणी पितात ... देव जाणे !!

- चावलिया

अवलिया's picture

12 Aug 2009 - 7:04 pm | अवलिया

गाळणी (फिल्टर) लावुन पितो भौ....

--नारझन

टारझन's picture

12 Aug 2009 - 7:32 pm | टारझन

गाळणी ? छाण छाण ? कुठे लावता ? णळाला की तोंडाला ? ;)

- गाळणिया

अवलिया's picture

12 Aug 2009 - 7:35 pm | अवलिया

ते वेळेवर उपलब्ध होणा-या गाळणीवर अवलंबुन आहे भौ

-- सावरीया

विनायक प्रभू's picture

12 Aug 2009 - 7:38 pm | विनायक प्रभू

एकाच वेळी एक गाळ्णी दोन अ‍ॅक्सिस ला कशी लावता हो?

हर्षद आनंदी's picture

13 Aug 2009 - 5:09 pm | हर्षद आनंदी

गाळणी जाळीची का?
मग शेवया पण पडतील, पाणी संभाळुन गाळा ... शक्यतो स्वहस्ते ;)

नळाला फिल्टर लावुन पाणी शुध्द होते #:S

अवलिया's picture

12 Aug 2009 - 5:42 pm | अवलिया

मग तुम्हाला १० लिटरचे कोडे उलगडले की १०० लिटर मला पाठवुन द्या

--अवलिया

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2009 - 6:03 pm | कानडाऊ योगेशु

५ rpm.
समजा एका मिनिटात ५ वेळा नळ फिरवला.त्यामुळे नळाला येणार्या पाण्याचा वेग हा ० लि/मि पासुन १० लि/मि पर्यंत वाढतो.
सरासरी वेग = ५ लि/मि.
त्यामुळे एका मिनिटात ५ लिटर पाणी जमा होईल.(नळ पूर्णपणे चालु.)आणि तितकेच पाणी नळ बंद करताना जमा होईल.
म्हणुन ५ रिवोल्युशन/मिनिट हे उत्तर.

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 6:18 pm | विमुक्त

माझं उत्त्र पण येवढंच आलय....

चिरोटा's picture

12 Aug 2009 - 6:33 pm | चिरोटा

बरोबर आहे.
अवांतर्-सुरुवातीला हा fluid mechanics चा प्रॉब्लेम वाटला मला. (|: . Bernoulli principle वर आधारित हे कोडे आहे की काय असे वाटले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मुकेश's picture

12 Aug 2009 - 6:32 pm | मुकेश

३० अंश / सेकंद

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 6:34 pm | विमुक्त

म्हणजेच ५ rpm... पण उत्त्रा पर्यंत कसे पोचलात?

टारझन's picture

12 Aug 2009 - 6:52 pm | टारझन

गुगल करून ;)

हर्षद आनंदी's picture

13 Aug 2009 - 5:04 pm | हर्षद आनंदी

नळाला पाणीच नाही आले तर?
२ मिनिटात पाणी गेले तर?

मुकेश's picture

12 Aug 2009 - 6:46 pm | मुकेश

कानडाऊ योगेशु यांनी दिलेल्या उत्तराप्रमाणेच, बरोबर आहे ते .

विमुक्त's picture

12 Aug 2009 - 6:53 pm | विमुक्त

मी x-axis वर वेळ आणि y-axis वर flow rate घेऊन त्रिकोण काढला...मग उंची १० l/m मिळाली..मग त्रिकोणचा area १० लिटर घेतला.. त्या वरुन पाया २ min aalaa.. त्यावरुन मग ५ rpm उत्त्र आलं.... जरा जास्तच विचार केला मी...:-)

नितिन थत्ते's picture

12 Aug 2009 - 8:29 pm | नितिन थत्ते

हॅ हॅ हॅ. नळ पूर्ण उघडल्यावर तत्क्षणीच बंद करायला घ्यायचा की मध्ये थोडा वेळ पूर्ण उघडाच ठेवायचा? एकूण १० लीटर पाणी एका सेकंदात पडायला पाहिजे की अर्ध्या सेकंदात चालेल की पाऊण सेकंदात चालेल?

कोडे अपूर्ण आहे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 1:00 am | विजुभाऊ

नळ दुरुस्त करून घ्या.
गणीताच्या पेपरात एकदा गळक्या हौदासंदर्भात प्रश्न विचारला होत्ता.
एकाने हौद दुरुस्ट करून घ्या असा सल्ला दिला होता. मास्तरानी त्याला सर्वाम्समोरच दुरुस्त केले

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

कानडाऊ योगेशु's picture

13 Aug 2009 - 12:44 pm | कानडाऊ योगेशु

दुसरे उत्तर.
हे कोडे सनी देओलला घाला.
सनी देओल नळच उखडुन टाकेल.
ना रहेगा नळ और ना रहेगा पझल..!!!!

चिरोटा's picture

13 Aug 2009 - 12:57 pm | चिरोटा

नळाला उखडले तर दमयंती सनी देओलवर उखडेल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

रम्या's picture

14 Aug 2009 - 1:58 pm | रम्या

ज्या अर्थी प्रवाहामध्ये होणारी वाढ/घट स्थिर आहे. त्यामुळे नळ फक्त अर्धाच म्हणजे (२.५ रेव्हॉल्युशन) ५ rmp या वेगाने उघडल्यास अर्ध्या मिनिटामध्ये ५ लिटर पाणी नळातून आलेले असेल. बरोबर अर्ध्या मिनीटा नंतर नळ पुन्हा बंद ५ rmp केल्यास नळ पुर्ण बंद करेपर्यंत अजून ५ लिटर पाणी नळाने सोडलेले असेल. म्हणजे एकूण दहा लिटर पाणी जमा झालेलं असेल.
म्हणजे ५ rmp या वेगाने जर नळ अर्ध्या मिनिटासाठी उघडत राहून अर्ध्यामिनिटा नंतर त्याच वेगाने बंद केल्यास आपल्याला १० लिटर पाणी मिळालेलं असेल. हे माझा उत्तर.

आम्ही येथे पडीक असतो!

वि_जय's picture

14 Aug 2009 - 2:26 pm | वि_जय

'नळ 'फिरवता फिरवता.. पोटात 'कळ' आली राव. जाऊन येतो जरा...