1

स्पर्धा / मदत : क्युबिकल सजावट टिप्स ...

Primary tabs

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
4 Aug 2009 - 5:09 pm
गाभा: 

काय मंडळी कसे काय चालु आहे ?
थोडा विरंगुळा आणि टाईमपास ( ह्यालाच "टवाळक्या" असेही म्हणतात ) ह्या शुद्ध हेतुने एका स्पर्धेची घोषणा करत आहे ...

कसली स्पर्धा ???

रोज तुम्ही हापीसात जाऊन काम करत असालच ( किंवा हापीसात जाऊन काम केल्याचे नाटक करत असाल किंवा नुसतेच हापीसात जात असाल किंवा नुसतेच हापीसात गेल्याचे नाटक करत असाल, कसेही ) ना, मग ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही हापीसात ज्या ठिकाणी बसुन काम करता ( किंवा पर्यायाने मिपा मिपा खेळता ) त्या जागेला "क्युबिकल" असे म्हणण्याचा प्रघात आहे ( हा शब्द अमेरिकेतुन आला आहे का ह्याची मला खरोखर कल्पना नाही ).

तर तुम्हाला तुमचे क्युबिकल बोअरिंग, निरस, कंटाळवाणे झाले आहे असल्यास आणि तुम्हाला ह्यातुन मुक्ती मिळण्यासाठी त्याचा मेकओव्हर करण्याची परवानगी मिळाली तर तुम्ही नक्की काय कराल हा ह्या स्पर्धेचा विषय आहे.
आपल्या क्युबिकलमधल्या रोजच्या कंटाळवाण्या गोष्टी हटवुन ( ह्यात हापीसात बॉसचा समावेश नाही ह्याची नोंद घ्यावी ) काहितरी नवे करायचे असल्यास कसे कराल ?

कसल्याही सोवळ्या-ओवळ्यातल्या, देसी-विसेशी , निवासी-अनिवासी , हिन & हिडीस आयडिया असतील तर येऊद्यात ...
असो.

  • स्पर्धा विषय : क्युबिकलची सजावट कशी कराल ?
  • विस्तारित : एखाद्या "थिमवर" आधारीत क्युबिकलची सजावट करायची आहे, लागल्यास काही वस्तु आत ठेवायला परवानगी आहे, पोस्टर्स आणि रंगरंगोटी करायला परवानगी आहे, झिरमिळ्या किंवा पडदे वगैरेंचा वापर ग्राह्य धरला जाईल.
  • शक्यतो ह्या थिमला साजेसे असे छोटेसे प्रेझेंटेशन दिले तरीही हरकत नाही ...
    बाकी काही नियम मी प्रतिसादांच्या ओघाने सांगेनच ...

  • बक्षिस : ते मला मिळणार आहे, तुम्ही दिलेल्या आयडिया वापरुन. तुम्हाला फारफार तर मी "धन्यवाद" अशी खरड टाकेन ;)
  • जोक्स अपार्ट, देऊ काहितरी बक्षिस नक्की जर थीम आवडली तर ...

  • डेड-लाईन : शक्य तितक्या लवकर, तशी गडबड नाही पण किबोर्ड उशाला घेऊन झोपण्याइतपत वेळही नाही ...

येऊद्यात मग तुमच्या आयडिया ...

आणि हो, परिक्षक असेल सर्वसामान्य आम मिपाकर जनता, जे त्यांना आवडेल तोच विजेता म्हणुन घोषीत केला जाईल.
बाकी आम्हाला वैयक्तीक आवडलेल्या आयडियाधारकाशी ( मोबाईलवाला नव्हे , कल्पनेची आयडियावाला ) आम्ही स्वतः संपर्क साधुन अधिक माहितीची देवाणघेवाण करु ...

प्रतिक्रिया

दशानन's picture

4 Aug 2009 - 5:16 pm | दशानन

>>>क्युबिकलमधल्या रोजच्या कंटाळवाण्या गोष्टी हटवुन

:?

ह्म्म्म !

ओके ओके

१. मी आधी माझा किबोर्ड बदलेल व वायरलेस किबोर्ड घेईन म्हणतो... म्हणजे आरामात टेबलावर पाय टाकून काम करता येईल.

२. ही फिरणारी खुर्ची नको आहे मला सरळ सरळ टू ईन वन सोपा ;) काम करायचे असेल की बसायला... कंटाळा आला की झोपायला मोकळे.

३. एक छोटासा बार फ्रीझ... खास बीयरसाठी... ;)

४. आजू बाजूला पडदे आहेतच सध्या.. पण तरी ही ते काढून रंगबीरंगी झालर असलेले पडदे लावावेत व डिस्को लाइट असावी...

५. टिव्हीची गरज नाही आहे पण तरी ही टाईप पास साठी पिसीवरच टिव्ही टुयुनर कार्ड लावावी ही इच्छा.

बाकी सविस्तर... नंतर लिहतो.

+++++++++++++++++++++++++++++

विजुभाऊ's picture

4 Aug 2009 - 10:20 pm | विजुभाऊ

धमाल मुलाला क्युबीकल मध्ये टेबलावर तंगड्या पसरून बसायला सांगावे. तंगड्यांमुळे क्युबीकला आपोआप शोभा येईल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

विशाल कुलकर्णी's picture

5 Aug 2009 - 9:18 am | विशाल कुलकर्णी

अ‍ॅडिशनली . फक्त ऑफीसची कामे करण्यासाठी एखादी सेक्रेटरी असली म्हणजे झाले ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2009 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार

१) क्युबीकलच्या एका कोपर्‍यात चपला ठेवल्या आहेत.

२)समोर भिंतीवर सावरकरांचा फोटो आहे.

३)खाली टेबलावर एक छोटासा अमेरीकन फ्लॅग फडफडत आहे.

४) मागे स्पीकरवर 'लाँग लीव्ह द क्वीन' चे म्युझीक मंद सुरात वाजत आहे.

अजुन काय पाहिजे सांगा.....

(डॉनश्रीचा) मित्र
©º°¨¨°º© परोबा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Aug 2009 - 5:56 pm | ब्रिटिश टिंग्या

स्टारबकच्या कॉफीचा उल्लेख राहिला बघ! :)

- (पर्‍याश्रीचा मित्र) टिंग्या

संबंधितांनी ह.घ्या.

छोटा डॉन's picture

4 Aug 2009 - 6:04 pm | छोटा डॉन

अवांतर गप्पांना अजिबात हरकत नाही, बिनधास्त चालु द्यात.

पण मित्रांनो, एक विनंती आहे.
मी हा काथ्याकुट खरोखर सिरीयसली टाकला आहे, तेव्हा ४ अवांतर गप्पा आणि टोमणे मारता मारता कमीत कमी १ तरी "व्हॅलिड / हापीसात शक्य असलेली / प्रॅक्टिकल " आयडिया येऊद्यात ...
आय होप तुम्ही समजुन घ्याल ...

वरवर मजेशीर आणि लै भारी वाटणार्‍या आयडिया आपल्या ऑफीसमध्ये वापरणे शक्य आहे का ह्याचाही विचार व्हावा ही विनंती.

बाकी चालु द्यात ...

------
(सिरीयस ) छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2009 - 6:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सावरकरांच्या फोटोवर वॉटरमार्कने लिहिलं आहे: सागरा प्राण तळमळला
क्यूबिकलच्या भिंतीवर अथवा सीपीयूला पान परागचं पोस्टर चिकटवा.
टेबलवर एक तुळशीचं झाड असलेली कुंडी ठेवा. (बिचारी तुळस तगली नाही तर मग काही लोकल इनडोर प्लँट लावा)
दुसर्‍या बाजूला शेखे आणि नवा अद्याप नाव न दिलेला, अद्याप अप्रकाशित लोगोचा प्रिंटआऊट लावा.
हातात बर्गर किंवा सब वे चं सँडविच पाहिजेच.

(ब्रिटश्रीची मैत्रिण) अदिती

कुंदन's picture

4 Aug 2009 - 6:16 pm | कुंदन

दुसर्‍या कोपर्‍यात नारळाच्या , नको नको त्यापेक्षा खजुराच्या २-४ झावळ्या आणि त्या बरोबर च एक उंटाची प्रतिकृती ही ठेवा.

--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

सहज's picture

4 Aug 2009 - 6:17 pm | सहज

१५ ऑगस्ट येत आहे, देशभक्तीसे ओतप्रोत थीम ठेवा!

तिरंगा स्क्रिनसेव्हर, जनगन मुझीक. डेस्क अर्धे ग्रामीन भारत व अर्धे इंडीया शायनिंग.

अर्थात सगळेच जण हेच करतील बहुतेक. :-)

दशानन's picture

4 Aug 2009 - 6:23 pm | दशानन

छ्या.... अरे डॉन्या तुने मीस किया... अभी तो ४ जुलै गया ना यार ;)

+++++++++++++++++++++++++++++

सूहास's picture

4 Aug 2009 - 6:22 pm | सूहास (not verified)

क्युबीकल

१) च्या शेजारी एक पाईप असावा,ज्याच एक तोंड सरळ बाहेरच्या दिशेला,ऊ॑च हवेत निघावा जेणे करुन सिगरेट ब्रेक तरी वाचेल..
२) च्या खाली किमान दोन बियर(कलीग्स आहेतच की) ठेवता येतील असा एक छोटासा फ्रीजर असावा.
३)च्या डाव्या बाजुला एक छोटासा त॑दुर असावा का ते वेगळ सा॑गाव का ?

बास बाकी काही गरज नाही..

असो मस्करी जरा दुर...
माझ्या क्युबीकल मध्ये दोन वेगळ्या-वेगळ्या बालका॑चे फोटो आहेत..छान वाटत..
आय.पी. फोनचा मात्र लई राग, नेमका कुठे ठेवावा कळत नाही...

पण सजावट म्हणाल तर..
एक डाव्या बाजुला भरभरुन गुलाब्स ठेवलेली फुलदाणी असावी..आणी जो पेपर्स ठेवायला रॅक आहे त्याच्या साठी वेगळी लॉकर रुम असेल तर बर होईल..
आणी सर्वात गरजेचे...
तो कॉमन प्रि॑टर नसावा आपल्या शेजारच्या क्युबीकलवर...
आपण मस्त टास्क मारत असतो कि॑वा मिपावर असे प्रतिसाद देत असतो की आलाच कोणाचा तरी प्रि॑ट,व्न्व्न्व्न्व्न्व्न्व्न्न्व्न्व न्व्न काय तो आवाज !!!त्याच्या पेक्षा धर्मेद्र बरा नाचतो..

सू हा स...

इनोबा म्हणे's picture

4 Aug 2009 - 6:23 pm | इनोबा म्हणे

डाव्या बाजूला चिरंजिवी आणि उजव्या बाजूला रजनीकांतचा फोटो पाहिजेच.
'अपडी पोडे पोडे' वाजत राह्यलं पायजे कंटीन्यू... किंवा रजनीअण्णांचं चंद्रमुखीमधलं 'लका लका लका' लावून ठेवा. त्याने आलेली संकटे (बॉससकट) पळून जातील.

श्रीलंका,तमीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणासह संयुक्त साऊथ झालाच पायजे.

चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2009 - 6:48 pm | निखिल देशपांडे

अरे डॉण्या आधी तुझ्या डेस्क वर जी पण घाण असेल ती सगळी साफ करुन टाक. सोबत डेस्कटॉप वर सुद्धा असलेले नको ते फोल्डर्स काढुन टाकावेत
सगळे कागदे ड्रावर मधे कोंबावेत....
मागच्या वेळेस आमचा डेस्क असा स्वच्छ झालेला असल्या मुळे फ्लोअर वरचे सगळे लोक पाहुन गेले होते आणि उत्तेजनार्थ बक्षिस पण मिळाले होते

निखिल
================================

सूहास's picture

4 Aug 2009 - 6:52 pm | सूहास (not verified)

अभिन॑दन...

आणी त्या वायर्स च काय कराव्...खाली घेतल्या की पाय अडकतात आणी वर ठेवल्या की सजावटीचा सत्यानाश होतो..

सू हा स...

छोटा डॉन's picture

4 Aug 2009 - 7:07 pm | छोटा डॉन

आयला भारी किस्सा आहे.
जोक्स अपार्ट, माझे क्युबिकल नेहमी स्वच्छच असते. कागदाचे कपटे, फोल्डर्स, सटरफटर अनावश्यक वस्तु नेहमीच हटवल्या असतात ...

इथे सजावट पाहिजे बॉस, डेकोरेशन ..!!!

अवांतर : पायात वारंवार येणार्‍या वायरींची सोय आता आमच्या अ‍ॅडमिननेच लावली आहे, त्याची काळजी नसावी ;)

------
छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

4 Aug 2009 - 7:35 pm | निखिल देशपांडे

जोक्स अपार्ट, माझे क्युबिकल नेहमी स्वच्छच असते. कागदाचे कपटे, फोल्डर्स, सटरफटर अनावश्यक वस्तु नेहमीच हटवल्या असतात ...

छे असे कसे रे तुझे क्युबिकल लोकांना वाटतच नसणार की तु काम करतोस ते... आता माझ्या डेस्क वर पहा डाव्या बाजुला सकाळ पासुन कॉफिचे सर्व ग्लास तसेच आहेत उजव्या बाजुला एक नोटपॅड एक मासिक आजचा पेपर...पेपर मधे आलेले पत्रक सगळे आहे मी मिपा वर प्रतिसाद टाकताना कोणी आले तर त्यांचे मनोरंजन तर व्हावे ना....

बरे आता तुला एक छानशी कल्पना देतो.... तुमच्या डेस्क वर गो ग्रिन ची थिम वापरा... सगळे काही हिरवेच पाहिजे काय लोक तुम्हाला हिरवट म्हणाले तरी चालेल. अजुन असेच संदेश लिहा की आम्ही घरुन कप घेउन येतो.... काय मॉनिटर बंद करतो अजुन काही तरी आणी गो ग्रिन म्हणजे नुसतेच हे नाही काही तुम्ही दोन चार हिरव्या नोटा पण ठेवा परिक्षकांसाठि झालेच तुम्ही जिकंलाच समजा

अवांतर :- आताच नोटपॅड वरुन एक किस्सा आठवला... तो सांगायचे राहवत नाहिये. एकदा आमचा एक मल्लु मित्र मिटिंगला जायच्या तयारीत होता. नेहमी प्रमाणे तो एक नोटपॅड शोधत होता. फारच परेशान झालेला दिसला तेव्हा आम्ही त्याला असेच म्हणालो " अरे नोट्पैड मिल नही रहा है तो प्रिंट कर लो" तर पठ्ठा खरेच windows मधले नोटपॅड उघडुन मला विचारतो इसको कैसे प्रिंट करेंगे???

निखिल
================================

टारझन's picture

4 Aug 2009 - 7:25 pm | टारझन

छान उहापोह चालू आहे डॉण शेट ... चालूंद्या !!
बाकी एक आयड्या आहे ... सांगतो रात्री .. चाट वर भेट ... इथं सांगण प्रस्तुत नाही ... लोकं पोरीबाळींबरोबर वाचत असतात !!!

- (विज्युश्रीचा मित्र) चप्पल फळ

धमाल मुलगा's picture

4 Aug 2009 - 7:54 pm | धमाल मुलगा

आमचं डेस्क हे असं असतं:
मस्त मार्ल्बोरोचं पाकीट, चकचकीत लायटर, मनगटी घड्याळ, मोबाईलं, पाण्यची बाटली, शेंगदाण्याचं अर्धं संपलेलं पाकीट, कॉफीचा डागाळलेला मग, (पाऊस चालु असेल तर भिजलेले सॉक्स काधून डेस्कावर वाळत टाकलेले..) हा असा मस्त जामानिमा असतो आपल्या डेस्कावर!
आता राजसाहेबांचा येक फुटु आणुन लावायचाय..

मायला, आपलं डेस्क आहे हे असं आहे, ज्याला आवडेल त्यानं यावं थांबावं, नाही तर चपला घालुन चालु पडावं..हाय काय नाय काय भांचोत?

त्यामुळे आम्ही आपली फारशी मदत करु शकणार नाही.
मिपावरच्या दोस्तांना विचारण्यात गैर काही नाही, पण ह्यापेक्षा उत्तम उपाय देऊ?

हापिसातली एखादी सुबक ठेंगणी (आपल्या मिपाकर नव्हेत!) पकड, तिला काऽऽपी प्यायला घेऊन जा, आणि गप्पा मारता मारता, 'च्यायला, हे डेस्क कसं सजवायचं काही समजेनाच बॉ!' असा वैत्तागपुर्ण शेरा मार....फिर देख कमाल मेरे दोस्त.....बक्षीस नको पण सजावट आवर म्हणायची येळ येती का न्हाय :P

ऋषिकेश's picture

4 Aug 2009 - 7:55 pm | ऋषिकेश

आम्ही एकदा नवरात्रीचा शिन केला होता. मध्यभागी घट बसवले होते
(अर्थात भोवती नाचलो नव्हतो)

पुढील वर्षी आमचे क्युब एका कोपर्‍यात होते त्याचा फायदा घेऊन आम्ही डार्क रूम तयार केली होती व सगळे जण काळे कपडे व विक्राळ चेहेरे लाऊन आलो होतो ;) हे जाम गाजले होते

त्यानंतर (मधे भारतात नसल्याने) थेट यावर्षी एक मोठ्ठी रिबिन एड्सच्या आकारात मधोमध लटकवणार आहोत. व दंडावरही रिबिनी बांधणार आहोत.

(कल्पक)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

आशिष सुर्वे's picture

4 Aug 2009 - 8:25 pm | आशिष सुर्वे

''बक्षीस नको पण सजावट आवर म्हणायची येळ येती का न्हाय ''

हा हा हा... मोगॅम्बो आनंदी झाला!! ;)

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

रामपुरी's picture

4 Aug 2009 - 11:36 pm | रामपुरी

आमचं एक बेष्ट सजेशन...
किल्ला करा. शिवाजी, मावळे, तोफा, सगळं पायजे. वर मोहरी, धणे टाकून झाडं पण... :)

जय शिवाजी

झकासराव's picture

5 Aug 2009 - 9:06 am | झकासराव

+१
डॉन तु मावळ्याच्या वेशात उभा रहा तिथे. गलमिश्या, कल्ले डॉक्यावर मावळी पगडी, कमरेला शेला आणि तलवार....
नायतर खरोखरच्या डॉन सारख जा.
जुन्या काळच्या फिल्लम मधील अजित व्हिलन असलेली कोणतीहि फिल्लम बघ आणि क्युबिकल तशी सजव.
..............
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शाहरुख's picture

6 Aug 2009 - 6:55 am | शाहरुख

ह्या फोटोंवर माझा मालकी हक्क नाही..चालत नसल्यास खुशाल प्रतिसाद उडवावा.

आशिष सुर्वे's picture

5 Aug 2009 - 9:26 am | आशिष सुर्वे

छायाचित्रे उघडत नाहियेत!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

ऍडीजोशी's picture

5 Aug 2009 - 11:14 am | ऍडीजोशी (not verified)

१) छोटा डॉन पान बिडी शॉप - झक्कस पैकी सिगारेटची पाकिटं, लिमलेटच्या गोळ्या, गुठख्याच्या पाकिटांच्या पट्ट्या असा सरंजाम जमव. सोबत एक चहाचा मोठ्ठा थर्मास पण ठेव, आणि मोठ्ठ्या आवाजात भोजपुरी गाणी वाजव.

२) छोटा डॉन सलून व मसाज पार्लर - खूर्ची आहेच, एक पांढरं फडकं, कात्री, कंगवे, नवरतन तेल असं सामान जमव. स्क्रीनवरच एक आरसा अडकव आणि आजूबाजूला मासिकातून वेगवेगळ्या हिरोंचे फोटो कापून चिकटव.

३) छोटा डॉन सरकारमान्य दारूचे दुकान - दारूच्या रिकाम्या बाटल्या (ह्या मोप असतीलच. नसतील तर माझ्याकडून घेऊन जा) त्यात चहाचे पाणी भरून मांडून ठेव. सोबत चणे, दाणे, लोकल वेफर्स असा स्वस्त चकना पण ठेव. आणि हो, आजू बाजूला झीनत अमान पासून ते बिपाशा पर्यंत सगळ्या आयटम गर्ल्सचे तंग कपड्यातले फोटो डकव (हे ही तुझ्याकडे मोप असतीलच. नसतील तर धम्या कडून घेऊन जा.)

४) संत डॉन बाबा बंगलोरी मठ - भगवा रंग दे क्युबिकलला, उदबत्त्या लाव आणि एक दक्षीणा पेटी ठेव. तेव्हढेच बिडी काडी ला पैसे सुटतील.

अजून काही टाळक्यात आलं तर सांगिनच.
सूचना - ह्या चिंतनाचा खर्च रुपये ६७५ फक्त पाठवून देणे

छोटा डॉन's picture

5 Aug 2009 - 11:43 am | छोटा डॉन

टिपीकल अ‍ॅडी जोशी ...
काही आयडिया अफाट आहेत, पाहु कसे जमतेय ते ...

बाय द वे, "सहजरावांची" आयडिया आवडली बर्‍यापैकी ...
त्यावरच आधारित "इंडिया : फ्युचर इज हियर" नावाच्या थीमचा विचार चालु आहे, थोडी खर्चीक आणि वेळखाऊ होईल पण भारी असेल, लेट्स सी ...

किल्ला वगैरे एकदम झानटामाटिक आहे पण ते करुन झाल्यावर आवरणे जिवावर येईल, तसेच माती आणि मावळे वगैरे जमवणे त्रासाचे आहे जरासे ...

शाहरुख भाई, फोटो दिसत नाहीत, कॄपया पुन्हा अपलोड करा ...

------
छोटा डॉन

शाहरुख's picture

6 Aug 2009 - 7:58 am | शाहरुख

( धागा वर आणण्यासाठीचा प्रतिसाद ;-) )
दुसर्‍या ठिकाणी अपलोड केलेत..

अवांतर - अपलोडची सुविधा देणारे काही सर्व्हर कसा चावटपणा करतात ते या निमित्ताने कळाले :-)

धमाल मुलगा's picture

5 Aug 2009 - 4:03 pm | धमाल मुलगा

अ‍ॅड्या हा मिपावरचा सर्वोच्च हलकट आणी भिकारचोट माणुस आहे ह्याची खात्रीच पटली!!!!
=)) =)) =))

४) संत डॉन बाबा बंगलोरी मठ - भगवा रंग दे क्युबिकलला, उदबत्त्या लाव आणि एक दक्षीणा पेटी ठेव. तेव्हढेच बिडी काडी ला पैसे सुटतील.

नको बे! ते डान्या पुरोगामी आहे.त्याला असलं काही चालत नाही ;)
(हाणतंय आता डान्या...पळाऽऽ)

आजू बाजूला झीनत अमान पासून ते बिपाशा पर्यंत सगळ्या आयटम गर्ल्सचे तंग कपड्यातले फोटो डकव (हे ही तुझ्याकडे मोप असतीलच. नसतील तर धम्या कडून घेऊन जा.)

=)) =))
ए बाबा...अरे असलं काही नसतं माझ्याकडे. गेल्या वर्षीपर्यंत म्हणाला असतास तर दिलेही असते, हल्ली मात्र गृहशोभिका, मधुरा इ.इ. प्रकार बक्कळ मिळतील!!!!

स्मिता श्रीपाद's picture

5 Aug 2009 - 4:11 pm | स्मिता श्रीपाद

दशानन's picture

5 Aug 2009 - 4:17 pm | दशानन

२ नंबरचा चांगला आहे आवडला... आमचाच कोणी तरी बंधू दिसतो ;)

डॉन्या तु हेच कर.. अ‍ॅडी कडे नाही भेटल्या बाटल्या तर सांग... कुरियर करतो एक दोन्-तीन डझन.... (तीन रुपयाच भाव आहे इकडे.. मोकळ्या बाटल्यांचा ; )