लाँग ड्राईव्ह...........पुणे ते मुंबईदरम्यान!

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
4 Aug 2009 - 10:28 am

हा विकांत पुण्यात बहिणीकडे गेला. कालच्या रवीवारी सकाळी प्रचंड कंटाळा आला होता. कुलकर्णीबाई आणि आमच्या बहिणाबाई सकाळी सकाळी केतकावळ्याला श्री बालाजींच्या दर्शनाला गेल्या होत्या. भाऊजी नाशिकला गेलेले. एकटाच होतो, काय करावे ते सुचेना. मग सरळ भाऊजींची बाईक काढली आणि निघालो. चिंचवड क्रॉस करुन सोमाटणे फाट्यावरुन एक्सप्रेस हायवेच्या दिशेने निघालो. मधला छोटासा घाट ओलांडला आणि कॅम सरसावला.... वेगवेगळ्या घाटांचे फोटो आजपर्यंत खुप काढले होते. म्हणुन काहीतरी वेगळं शोधत होतो, तेवढ्यात आकाशाकडे लक्ष गेलं. पावसाअभावी भेगाळलेली जमीन पाहिली होती. पण आभाळ .........

पुढे एका ठिकाणी कबुतरे दिसली म्हणुन फोटो काढायला गेलो, तर एका कोपर्‍यात बसलेली , हिरमुसलेली ही ताई दिसली. नेहमी त्यांचेच काय फोटो काढता, माझा पण काढा की एकदा तरी..... असेच जणु विचारीत होती.

तिचा फोटो काढताना शेजारचेही काही फोटो टिपले.

ही फुले घाणेरीचीच आहेत ना? एवढ्या सुंदर फुलांना घाणेरी का म्हणत असावेत? :-(

इथेही कॅमेरा सरसावयाचा मोह मला आवरला नाही.

मी .............. !

विशाल.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मनिष's picture

4 Aug 2009 - 10:39 am | मनिष

आम्ही लहानपणी ह्या फुलांना हळदी-कुंकवाची फुले म्हणायचो, तेच नाव छान शोभून दिसते. ह्याची ती फळेही काळी झाल्यावर खायला छान लागतात, लहानपणी मनमुराद खाल्लीत.

विसोबा खेचर's picture

4 Aug 2009 - 10:42 am | विसोबा खेचर

किल्लास फोटू...

तात्या.

आनंदयात्री's picture

4 Aug 2009 - 2:26 pm | आनंदयात्री

चिमणी खासच ...

सहज's picture

4 Aug 2009 - 2:38 pm | सहज

ढगांचा भारी आहे.

पूजादीप's picture

4 Aug 2009 - 2:42 pm | पूजादीप

बर झाल विशाल चिमणीचा फोटो टाकलास, निदान फोटोत तरी बघायला मिळेल. सर्व फोटो छान आलेत.

लवंगी's picture

5 Aug 2009 - 12:16 am | लवंगी

चिमणाताई खूप दिवसांनी पाहिल्या.. छान आहेत फोटो.

सूहास's picture

4 Aug 2009 - 3:26 pm | सूहास (not verified)

झकास....झकास....झकास....झकास....झकास....

अवा॑तर : स्वत च्या फोटोत थोडतरी हसायच होत..

सुहास

टारझन's picture

4 Aug 2009 - 4:22 pm | टारझन

मस्तंच फोटू ... आम्ही तर दर पाच दिवसाला (विकांताला) बाईक पळवत पुणे-मुंबै करत असतो ... :) केवळ अप्रतिम रोड्स आहेत .. एक्स्प्रेस हायवे मुळे एन.एच.-४ पुर्ण रिकामा असतो .. आणि मनमुराद बाईकिंगचा आणंद लुटू शकतो !! १२२ किमी ताशी वेगाने वळण घेण्यासारखं दुसरं अ‍ॅण्ड्रेनॅलिन कष्षातुन मिळत नाही !! खोपोली ते खंडाळा घाटात तर फुटरेस्ट घासेपर्यंत टर्न घेताना हार्टबिट्स पिक वर असतात ... आणि अशी मजा घेत असताना आजुबाजुचं निसर्गसौंदर्य म्हणजे सोने पे सुहागा !!

सर्व फोटोज क्लास आहेत :)

- टारझन एफ्झीवाले
(पुणे-मुबै-पुणे)

टारझन's picture

4 Aug 2009 - 4:36 pm | टारझन

कोणी मला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला की त्याला मी हलकाच धक्का देतो :)
http://lh6.ggpht.com/_zq7YcjM8BvI/Sk-csVM1bPI/AAAAAAAAExA/HT5-GzKt2wY/s8...

पावसाळा - आणि लोणावळ्याचं ट्राफिक जाम !


विशाल कुलकर्णी's picture

4 Aug 2009 - 4:45 pm | विशाल कुलकर्णी

टारुभौ. लै लै भारी !

ठांकु बर्का! फटु मस्तच हायीत की आन तुमची बाईक...
Really I am feeling jelous ! I have an HONDA UNICORN!!

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

वेताळ's picture

4 Aug 2009 - 5:03 pm | वेताळ

पण एक विनंती आहे टर्न घेताना कोणतेही सौंदर्य पहाणे धोकादायक आहे.तेव्हा जरा जपुनच. बाकी यामहा एफझेड एकदम मस्तच आहे.

वेताळ

ज्ञानेश...'s picture

5 Aug 2009 - 12:04 am | ज्ञानेश...

विशाल आणि टारझणदादा.. मस्त फोटो बरंका!
आम्ही पण टारूदादासारखेच (त्याच्याइतकेच नसलो तरी) बाईकपंथी आहोत बरंका! (पण फोटो नाहीत इथे टाकायला)

एकदा मिपा बाईक रॅली काढूयात का? :?

(युनीकॉर्नर)
ज्ञानेश.

"Great Power Comes With Great Responsibilities"

संदीप चित्रे's picture

4 Aug 2009 - 8:42 pm | संदीप चित्रे

मस्त फोटो रे...
इथे बसल्या बसल्या सफर घडली

ऋषिकेश's picture

5 Aug 2009 - 1:09 am | ऋषिकेश

छान फोटो.. आकाशाला भिडणारी रोपटी विषेश आवडली
चिमणीत मात्र फोकस गंडला आहे तरीही चिपणी फारच (आमच्या शेजारच्या लहानगीच्या भाषेत) क्वीट (क्युट ;) ) दिसते आहे...

फक्त आकाशाचा फोटो तर लै लै लै भारी (फक्त त्यातील मधे एंबॉसकेलेलं नाव जरा कोपर्‍यात टाका असे सांगावेसे वाटले)

(भटक्या)ऋषिकेश
------------------
बरीच रात्र झालेली आहे. आता कोणतेही गाणे वाजणार नहि.. झोपा आता

विशाल कुलकर्णी's picture

5 Aug 2009 - 9:51 am | विशाल कुलकर्णी

धन्स ! अरे ती चिमणी खुप लांब होती आणि माझ्याकडे नेमका साधा ७.१ चा डिजी होता. अगदी १६X पर्यंत झुम केला तेव्हा एवढा स्पष्टपणा आला.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

झकासराव's picture

5 Aug 2009 - 9:32 am | झकासराव

विशाल् भौ.
फोटो चांगले आहेत. एवढ फिरायचा कंटाळा येत नाय काय?
त्या डोंगराच्या मालकीबद्दल हार्दीक शुभेच्छा. :)
टार्‍या तुझ्या बाइकचे फोटु भारी.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao