तिखट साबुदाणा खिचडी

मितालि's picture
मितालि in पाककृती
1 Aug 2009 - 12:03 pm

खिचडी साठी नेहमी प्रमाणे साबुदाणे भिजवुन घ्या. त्यात दाण्याचे कुट, मीठ मिसळा. तेलावर जीरे, मोहरी, कढीपत्ता घालुन फोडणी करुन घ्या. त्यात मिरचीपुड घाला आणी लगेचच फोडणी करपु न देता साबुदाण्याचे मिश्रण घाला. नीट परतुन शिजवुन घ्या. थोडी साखर घालुन परता. कोथिंबीर व खोबेरे घालुन व लिंबु पिळुन गरमा गरम खिचडी चा आस्वाद घ्या.

(ही खिचडी उपवासाल चालेल का याची कल्पना नाही.. कोथिंबीर वडी साठी सगळी कोथिंबीर वापरली गेली म्हणुन व नारळ फोडुन खोबरे किसण्याचा आळस या दोन कारणास्तव फोटोमधील खिचडिची सजावट नाही केलेली आहे.)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Aug 2009 - 12:14 pm | विसोबा खेचर

अरे वा! कोथमिर वडी, साबुदाणा खिचडी!

मितालि, आज काय जोरदार ब्यॅटिंग सुरू आहे तुझी! :)

त्यात मिरचीपुड घाला आणी लगेचच फोडणी करपु न देता साबुदाण्याचे मिश्रण घाला.

साबुदाणा खिचडीत बर्‍याचदा हिरवी मिर्ची घालतात परंतु लाल-तिखट मिरची पुड घातली असता साबुदाणा खिचडीला एक वेगळाच स्वाद येतो..

जियो...

तात्या.

मितालि's picture

1 Aug 2009 - 1:26 pm | मितालि

तात्या आज हायट्रीक मारली आहे मी.. ३ पाककृती सलग..

चकली's picture

2 Aug 2009 - 12:02 am | चकली

३ ही पाकृ बघितल्या. अंडे चालणार्‍या लोकांसाठी खरवसाची कृती छान आहे

चकली
http://chakali.blogspot.com

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 12:10 pm | JAGOMOHANPYARE

आजच्या डेस्क टॉप च्या चित्राचा प्रश्न मिटला... धन्यवाद..

वेदश्री's picture

2 Aug 2009 - 12:31 pm | वेदश्री

मिताली,

लाल मिरचीपूड फोडणीत न टाकता साखरेसोबत सरळ भिजवलेल्या साबुदाण्यातच मिसळवायची. मग नुसती जिर्‍याची फोडणी देऊन वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरली की झाली उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी तय्यार!

तात्या म्हणाला त्याप्रमाणे नुसती मिरची (ही खिचडी पांढर्‍या रंगाची होते) किंवा नुसती लाल मिरची पूड (ही खिचडी लाल रंगाची होते) खिचडी करता येतेच पण दोन्ही टाकून खिचडी करून/खाऊन पाहिली का कधी? झक्कास तर लागतेच एकदम पण तिचा तिखटपणा वर्णायला शब्दच नाहीत. तसे करायचे नसल्यास या खिचडीसोबत चवीला हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा! जिवंत तिखटाची लज्जतच काही और म्हणतात ते काही खोटे नाही.

वरच्या फोटोमध्ये जशी कोथिंबीर आणि खोबरे गायब आहे तसेच शेंगदाण्याच्या कुटाचेही प्रमाण अगदीच कमी आहे. सढळ हाताने टाकलेल्या कुटाशिवाय खिचडीला मजाच नाही.

सजावट करायची म्हटल्यास खिचडीला काही तुटवडाच नाही. दह्यात शेंगदाण्याचे कूट आणि बारीक चिरलेली काकडी टाकून केलेली चटणी, तळलेले बटाट्याचे पापड-कुरड्या आणि फराळ करताना तहान लागल्यास ताटाशेजारी ताकाने भरून ठेवलेला गडवा... हे सर्व पाहिजे!

विसोबा खेचर's picture

3 Aug 2009 - 8:33 am | विसोबा खेचर

पण दोन्ही टाकून खिचडी करून/खाऊन पाहिली का कधी?

सहमत आहे.. साबुदाण्यात मीठ-साखर-दाण्याचं कूट मिसळतांना स्वादापुरतं लाल तिखटही टाकावं आणि नंतर नेहमीच्या पद्धतीने तूप-जिरं-हिरव्या मिर्चीची फोडणी करून खिचडी करावी.

तैय्यार खिचडीला त्या लाल तिखटाचा लै भारी स्वाद येतो बॉस! :)

आणि हो, लाल तिखट फोडणीत टाकल्यास खिचडीची चव उग्र होण्याची शक्यता आहे...

आपला,
(बल्लवाचार्य) तात्या.

वेदश्री's picture

3 Aug 2009 - 6:43 pm | वेदश्री

क्या बात है, तात्या! तुझ्यासारखा बल्लवाचार्य म्हणजे धन्यच! :D

आम्ही मात्र शेंगदाण्याच्या तेलात करतो खिचडी. त्याचीही लज्जत काही वेगळीच लागते.

लाल तिखट फोडणीत टाकण्यातला आणखी एक धोका म्हणजे जर साबुदाण्याचे मिश्रण टाकायला थोडासाजरी उशीर झाला तरी ते करपून कडवट लागते.

विशाखा बहुलेकर's picture

21 Aug 2009 - 7:27 pm | विशाखा बहुलेकर

माय़कृओव्ह् न मध्ये खिचडी न कर्प् वता व अतिशय मऊ होते.

मितालि's picture

2 Aug 2009 - 7:39 pm | मितालि

वेदश्री ,
लाल तिखटामुळे लाल झालेल्या साबुदाण्यातुन लाल झालेले शेंगदाणे शोधणे कठीण आहे.. #:S सगळे काही कमी असले तरी चवीत जरा सुद्धा कमी नाही आहे . ;)

वेदश्री's picture

3 Aug 2009 - 6:37 pm | वेदश्री

मिताली,

तुझ्या पाककृतीवर टिका करण्याच्या हेतूने मी तो प्रतिसाद लिहिलेला नव्हता. आम्ही जशी खिचडी करतो ते सांगण्याचा तो प्रयत्न होता. असो.

लाल तिखटामुळे लाल झालेल्या साबुदाण्यातुन लाल झालेले शेंगदाणे शोधणे कठीण आहे..

अगं पण शेंगदाणे नाही तर शेंगदाण्याचे कूट टाकलेय ना? ते सहजी दिसते जर मी म्हणतेय तशा सढळ हाताने टाकलेले असेल तर.

सगळे काही कमी असले तरी चवीत जरा सुद्धा कमी नाही आहे .

हे वाचून बरे वाटले. :)

तुझ्या या पाककृतीला उत्तर देऊन मला साखिची इत्तकी भूक लागली की गुरूनानकमध्ये जाऊन भेसळयुक्त का असेना खिचडी खाल्ल्याशिवाय राहवले नाही. भेसळयुक्त म्हणजे उकडलेले बटाटे टाकलेली खिचडी!!! :D

पुढील पाककृतीस शुभेच्छा.

काजुकतली's picture

6 Aug 2009 - 1:43 pm | काजुकतली

मी पुण्याच्या एका नातलगाकडे गेले असता त्यांच्याकडे सेम अशीच दिसणारी, लाल झाल्याने न दिसणारे सढळ हस्ते दाणकुट घातलेली खिचडी उपासाला बनवली होती. फक्त अजुन थोडी फळफळीत होती. पहिला घास तोंडात घालताच पाण्याचा एक ग्लास रिकामा करावा लागला.. :).