आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
30 Jul 2009 - 12:23 pm
गाभा: 

हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.

सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉट ओन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफन विदाउट लँग्वेज" हे वाक्य लक्षात घेतले तर सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी आजच्या काळात टाकाऊ का आहे ते समजायला मदत होईल.

पुरातन काळापासून ते अगदी परवा-परवा पर्यंत म्हणजे चॅनेल संस्कृती आपल्यावर येउन आदळे पर्यंत "स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:" ही साक्षात्‌ अर्जुनाला पडलेली चिंता तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात घट्टपणे रुतून बसली होती. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे भगवंतानी "मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्‌" असे पुढे एके ठिकाणी म्हणून (पर्यायाने वर्णसंकर पण आपल्याच अध्यक्षतेखाली चालतो) अशी स्वत:च कबुली दिली आहे. सांगायचे तात्पर्य असे की, वर्णसंकराची आणि अनौरस प्रजेच्या जबाबदारीची भीति यामुळे सप्तपदीच्या वेळी घेतली जाणारी नातिचरामिची शपथ अस्तित्वात आली असावी असा सर्वसाधारण तर्काला पटणारा कयास आपल्याला बांधता येतो.
अधिक वाचण्या साठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/

प्रतिक्रिया

सन्दीप's picture

30 Jul 2009 - 3:08 pm | सन्दीप

लेखाचा उद्देश समजला नाही. लेखकाला काय म्हणायचे आहे नक्कि.

सन्दीप's picture

30 Jul 2009 - 3:09 pm | सन्दीप

लेखाचा उद्देश समजला नाही. लेखकाला काय म्हणायचे आहे नक्कि.

JAGOMOHANPYARE's picture

30 Jul 2009 - 3:38 pm | JAGOMOHANPYARE

१. नातिचरामि हा मन्त्र वेद कालातील आहे... त्यावेळी आर्यांच्या मध्ये एकच वर्ण होता.... मग वर्ण सन्कराच्या भीतीने त्यानी तो मन्त्र लिहिला हे म्हणणे गाढवपणाचे आहे... गीतेच्या काळात वर्ण होते, तेही चारही वर्ण.

२. नातिचरामि मध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे अतिचरण करणार नाही असे अपेक्षित आहे, कारण हे केले तर पत्नी कडे आपण जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि संसाराचे सन्तुलन बिघडू शकते...

३. कोर्टाच्या दृश्टीने लग्न हे लग्न असते... ते कोणत्या पद्धतीने लावले हा केवळ एक तपशीलाचा भाग असतो... म्हणजे उद्या कोर्ट मॅरेज केले, तर मी काही नातिचरामि म्हणून शपथ घेतली नाही, आता मी काहीही करेन असे म्हणून कोणीही अनिर्बन्ध स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही...
( तसा काही प्लॅन असेल तर तो डोक्यातून काढून टाका, कोर्टात तुम्हाला वाचवायला तो पुस्तक लिहिणारा येणार नाही !)

४. कायदे पुरुष विरोधी आहेत, हे मात्र अगदी मान्य आहे... या कायद्यांचा गैरवापर करणारा सासरा आणि सासू न गाठ पडणे हे पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय होऊच शकत नाही, हेही ठामपणाने सान्गू शकतो ! :(

५. रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग.... हे मात्र हास्यास्पद आहे... 'ब्रिटीश लॉ अ‍ॅन्ड गवर्न्मेन्ट- रुल्स विथ मिनिन्ग ' हे तरी कुठे खरे आहे?

तिकडे सलमान खानच्या धाग्यावर दुसर्‍या धर्माचे लोक कट्टरपणा करतात , म्हणून लोक गळा काढत बसले आहेत, हा कट्टरपणा नाही केला की धर्माचे काय होते याचे उदाहरण म्हणजे हा धागा आहे.. :) ही असली भिकार पुस्तके आणि भिकारडे विचार लोकांच्या गळी उतरवण्याचे प्रकार इतर धर्मामध्ये घडत नाही त आणि आपल्या धर्मात मात्र रोजच घडत असतात,

जगातला प्रत्येक धर्म निर्मितीच्या काळात धर्म प्रसारासाठी अ‍ॅग्रेसिव्ह असतो.... हिन्दु ( वैदिक ) धर्म, बौद्ध धर्मही याला अपवाद नाहीत... एकदा धर्मामध्ये जातीच्या/ वर्णाच्या/ गटांच्या पायर्‍या स्थापन झाल्या की धर्म प्रसार आपोआप मन्दावतो . कारण नव्या माणसाला कोणती जात / पायरी द्यायची, हा प्रश्न येऊ लागतो... त्यामुळेच सध्या नव्याने निर्माण झालेले धर्म हे जुन्या धर्माना पुसायला बघणार, हे स्वाभाविक आहे... हे ओळखून आपण राहिलो तरच आपण टिकणार...

विंजिनेर's picture

30 Jul 2009 - 6:10 pm | विंजिनेर

कोण कुठला उपटसुंभ परका, प्राचीन भारतातल्या मंत्रांची फोड करून "अच्चं आहे न् तच्चं आहे" हे भारतीयांनाच सांगणार आणि आपण लगेच धावणार त्याला डोक्यावर घेऊन नाचायला "कित्ती कित्ती हुशार नै"!! म्हणून ...
शिवाय कुणी असल्या सवंग प्रकाराला शिव्या घालण्या ऐवजी वाखाणणले की आहेच जाहिरात - "हिंदू धर्म क्षमाशील आहे होऽऽऽ..." म्हणून (मग परधर्मातले कुणी न का ढुंकुनही लक्ष देईना...)

(हिंदु धर्माचा जाज्वल्य अभिमान असलेला)विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

ऍडीजोशी's picture

30 Jul 2009 - 5:13 pm | ऍडीजोशी (not verified)

जे काही अधीक वाचायला द्यायचे ते इथेच द्या की. मिपा ची जागा वाचवू नका, ब्लॉग वरचा हिट काउंट वाढवू नका

विकास's picture

30 Jul 2009 - 7:51 pm | विकास

पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.

नक्की धोका काय? तसेच तो पुरूषांसाठीच का?

ज्यांच्या हा धोका लक्षात आला नाही त्यांनी आता काय करावे म्हणजे पुढचे संकट कमी होईल? (म्हणजे परत उलटे फिरणे वगैरे?) हे पण अवश्य सांगा - इथल्या पुरूष मंडळींना त्याचा फायदा होईल.

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2009 - 10:20 pm | पिवळा डांबिस

सप्तपदी हा विधी .... विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.
अहो पण तो धोका काय ते इथे सांगा की!! उगीच कोण फलाणा फ्रिट्स स्टाल आणि ढकाणा उपाध्ये यांच्या पुस्तकां-धाग्यांवर कशाला ढकलतांय आम्हा गरीब पुरुषांना?:)
फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे.
यासाठी त्या मोतीलालला फ्रिटसकडे जायची गरज भासली? भारतातले कोट्यावधी हिंदू काय मेले होते?
सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी
ह्या मूळ गृहितकाशीच असहमत!! आज स्वतंत्र भारतात सप्तपदी न करतासुद्धा लग्नाला कायदेशीर पूर्णत्व आणि अर्थ मिळू शकतं!!

(ह्या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे असे चारचौघात म्हणणारा)
-सार्वजनिक मिपाकर
:)

स्वाती२'s picture

31 Jul 2009 - 4:21 am | स्वाती२

>>विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.
म्हणजे स्त्रियांसाठी थोडे धोकादायक आहे असे समजायचे का?
आणि सप्तपदी शिवाय कायदेशीर लग्न करता येतं की. पण असे लग्न पुरुषांसाठी धोकादायक नाही याला काय पुरावा?
आणि इतर धर्मातील प्रथेनुसार लग्न केले तर कितपत धोकदायक आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2009 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्तपदी विधी धोकादायक कसा आहे, कृपया खुलासेवार सांगाच !

आमच्याकडील लग्नात, सप्तविधीचे विधी करतांना, यज्ञाभोवती फेरे मारतांना शंकर-पार्वतीच्या लग्नाच्या वेळेस शंकर पार्वतीने जी वचनं दिली घेतली, ती वचने आमच्याकडे म्हणवून घेतात. मी सुद्धा तशी वचनं दिली आहेत. आणि घेतली आहेत. असो,च्यायला पण हा विधी धोकादायक आहे, असं तुम्ही म्हणता. नेमका धोका कशात आहे, ते सांगा राव..!

-दिलीप बिरुटे
(सप्तविधी केल्याने अस्वस्थ असलेला)

युयुत्सु's picture

31 Jul 2009 - 10:06 am | युयुत्सु

धोका असा की सप्तपदीच्यावेळी दिलेली वचनं पुरुषाकडून पाळली गेली नाहीत तर कायदा पुरुषाला झोडपून काढतो. पण आधुनिक मुक्त स्त्रीने जर ही दिलेली वचनं जर पाळली नाहीत तर तिला मात्र कोणतीही शिक्षा नाही.

हिंदू विवाह कायदा आणि विधी याबद्दल किती अज्ञान अजून समाजात आहे हे वरील प्रतिक्रियांवरून समजले. सप्तपदी झाली की विवाह मोडता येत नाही. तो मोडायचा असेल तर कोर्टातच जावे लागते हे अजूनही बर्‍याच जणाना माहित नाही असे दिसते

विंजिनेर's picture

31 Jul 2009 - 10:18 am | विंजिनेर

सप्तपदी झाली की विवाह मोडता येत नाही. तो मोडायचा असेल तर कोर्टातच जावे

अहो पण लग्नाचे सूप वाजत नाही तर तुम्हाला ते मोडायची घाई का झालीये एव्व्ह्ढी? :?

आणि उरलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या की राव! उगाच पिल्लु सोडायचे प्रश्नाचे आणि वेळ आली की बगल द्यायची हे काही बरोबर नाही.

अजूनही बर्‍याच जणाना माहित नाही असे दिसते

आम्हाला काही ज्ञान नाही हे उघडच आहे हो म्हणून तर या धाग्यावर चकरा मारतोय केव्हाचा काही खुलासा होईल ह्या आशेने ;) पण कसचं काय.. निराशाच पदरी पडणार बहुदा.... :(

असो चालूद्या...

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2009 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख संपूर्ण वाचूनही सप्तविधी केल्याने माणूस कायद्यात कसा गुंतल्या जातो आणि त्यामुळे त्याला कायदा कसा झोडपतो अजूनही मला शप्पथ समजले नाही. पण सप्तपदी म्हणजे विवाहसंस्काराचा भाग संपन्न झाला म्हणजे त्याचे लग्न होते आणि मोडण्यासाठी म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात जावे लागते असेच असेल तर पुढील विवेचन वाचू नये. :)

हिंदू विवाह कायदा आणि विधी याबद्दल किती अज्ञान अजून समाजात आहे हे वरील प्रतिक्रियांवरून समजले.
खरं सांगू का ! मी वयक्तीक जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर उभा राहिलो तेव्हा हिंदू विवाह कायदा आणि विधी वाचून उभा राहिलो नाही. मुलगी पसंद पडली, तिला मी पसंद पडलो आणि भटजीने अग्नी, देव, ब्राह्मण, नातेवाईक,मित्र मैत्रीणी, पाहूणे, माझे महाविद्यालयीन सहकारी यांच्या साक्षीने माझे लग्न एकदाचे पार पडले. त्यामुळे हिंदू विवाह कायदा आणि विधी याबद्दल अज्ञान आहे, हे मात्र खरं आहे.

आपण दिलेल्या ब्लॉगवरील चिंतनिका तसेही माझ्या डोक्यावरुन गेली. काय म्हणायचे ते मला कळले नाही. अर्थात आकलनाच्या मर्यादेमुळे तसे झाले असावे.

बाय द वे, समाजात विवाहसंस्थाच अस्तित्वात नव्हती तेव्हा सप्तपदी वगैरे काही भानगड नव्हती हे आपल्याला ठाऊक असेलच. स्त्री-पुरुषांचे व्यवहार स्वेच्छाप्रमाणे आणि अनिर्बंध चालत होते असे म्हटल्या जाते. म्हणजे स्त्रिया मनात येईल त्या पुरुषाचा त्याग करुन दुसर्‍याचे मागे जात असत. पुढे गृहस्थाश्रमाची कल्पना आली असावी. संतती, धर्माचरण आणि रति सुखासाठी त्यांना विवाहाच्या बंधनात अडकवले आणि धार्मिक विधींचा उद्देश हा पती-पत्नी यांची ताटातुट होऊ नये म्हणून केल्या गेली असावी, त्याचा एक उच्च हेतू होता असे मला वाटते.
विवाहाचे प्रकारांवर मागे घाटपांडे साहेबांनी एक मालिका लिहिली होती त्यापलीकडे मात्र काही माहिती नाही. या व्यतिरिक्त अजूनही आपल्याला सप्तविधीच्या वेळी दिलेली वचनं मोडून काढली तर कायद कसे अडकवतो हे कळलेले नाही.

आमच्याकडे लग्नात जी काही वचनं दिली घेतली जातात त्यात 'दारु' पिऊ नये असे एक वचन दिल्या जाते आणि माणूस दारु पिलेल्या अवस्थेत असेल तर अशा माणसासमोर विवाहित स्त्रीने जाऊ नये, असे एक वचन दिल्या घेतल्या जाते. (असेच किंवा अशा आशयाचे उदाहरणासाठी हे सांगतोय) यामुळे कायद्यात तो कसा अडकल्या जातो ?
कदाचित मी दारु पिऊन असेन आणि पोलिसांच्या ताब्यात सापडलो तर कदाचित पोलिस सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मुंबई पोलिस ऐक्ट ११०,११२,१७७ किंवा ८५ ब नुसार कार्यवाही करतील पण सप्तविधीने माणूस कायद्यात कसा अडकतो ते सांगा. कदाचित विवाह सप्तपदी विधीने संपन्न होतो, म्हणून कायदेशीर रित्या त्यांचे लग्न झाले होते असे म्हणायचे का ? त्यामुळे तो माणूस कायदेशीर रित्या अडकतो असे म्हणायचे आहे ? आणि एकदा लग्न झाल्याचे सिद्ध झाले असल्यास त्याला लग्न मोडण्यासाठी म्हणजे घटस्फोटासाठी कोर्टात जावेच लागेल ना ?

अवांतर : विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धेत भाग घेताय ना ? :)

-दिलीप बिरुटे

वेदश्री's picture

1 Aug 2009 - 8:09 pm | वेदश्री

माफ करा पण तुमच्या प्रतिसादातील 'सप्तविधी' हा शब्द वाचून मला आधी कळलेच नाही की प्रत्यक्ष लग्नात नेमके हे कुठले सात 'विधी' करावे लागतात ते. हसून हसून मुरकुंडी वळलीय अक्षरशः.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2009 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता मलाच माझे हसू येत आहे, थँक्स..........! :)

(कोणाला कळले नाही ना, बस्स ! आपल्यापूर्तीच ठेवा ही 'सप्तविधीची' भानगड )

विजुभाऊ's picture

31 Jul 2009 - 9:53 am | विजुभाऊ

तसेही हल्ली विज्ञानामुळे नवीन तंत्रांचा /माहितीचा इतका मारा होत आहे की सगळ्या जगात बहुतेक संस्कृती कोलमडून पडत आहेत. सप्तपदी अथवा लाजाहोम हे विधी कालबाह्य ठरले आहेत. केवळ करायचे म्हणून केले जातात. तीन तीन दिवस चालणारे लग्नसंस्कार अर्ध्या दिवसात आटोपतात. सप्तपदी केली काय आणि न केली काय काय फरक पडतो?
मुंजीचे तसेच आहे. मुंजीमुळे हल्ली कोणते संस्कार होतात कोणजाणे. त्यापेक्षा कैक पटीने जास्त संस्कार ( सु आणि कु दोन्ही) टीव्ही मुळे होतात.
आणि संस्कार हे कालसापेक्ष आहेत. एका काळात योग्य असलेला संस्कार दुसर्‍या काळात योग्य ठरेल असे नाही.
उदा: मनुस्मृतीत सांगितलेली समुद्र लंघनावरील बंदी.
ज्ञान हे प्रवाही असेल तर ते ताजे रहाते. अन्यथा त्याचे सडक्या पाण्याचे डबके बनते. संस्कारही तसे आहेत.
मोठ्या व्यक्तीने सांगितलेले सर्व योग्य. त्याना उलट प्रश्न विचारु नयेत असते हा लहानपणी झालेला सुसंस्कार मोठेपणी ज्ञान मिळवायचे असेल तर अक्षरशः फेकून द्यावा लागतो अन्यथा प्रगतीच खुंटते.
संस्कार बदलत असतात.

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 11:27 am | युयुत्सु

आपले अज्ञान प्रगट केलेत. सप्तपदी झाली नसेल तर लग्न कायदेशीर व पूर्ण होऊ शकत नाही.

अनामिक's picture

2 Aug 2009 - 11:59 am | अनामिक

जे लोक कोर्ट मॅरेज करतात ते कुठे सप्तपदी करतात... पण ते कायदेशीर असते, आणि जे दोघे लग्न करतात त्यांच्यासाठी पुर्णपणे संपन्न झालेले असते (अशी माझी समजूत आहे). कायद्यात कुठे सप्तपदी पार पडल्याशिवाय लग्न पुर्ण होत नाही अशी अट आहे का? म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट मिळण्या आगोदर सप्तपदी पुर्ण केल्याचा दाखला द्यावा लागतो का?

- (अज्ञानी) अनामिक

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 2:01 pm | युयुत्सु

कोर्टात होणारे लग्न हे special marriage act खाली होते. मी हिंदू विवाह कायद्याबद्दल चर्चा करत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2009 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे छे, एक निमंत्रण पत्रिका, तीन साक्षीदार (यात भटजीचा अंतर्भाव होऊ शकतो) आणि नवरा-बायको (त्यांच्या वयाचे, पत्त्याचे दाखले) या गोष्टी असतील तरीही लग्न हिंदू विवाह कायद्याखाली रजिस्टर होऊ शकते.
लग्नानंतर सव्वीस वर्षांनी जेव्हा मॅरेज सर्टीफिकेट मिळेना, तेव्हा त्या काका-काकूंनी नवीन सर्टीफिकेट मिळवण्यासाठी अर्ज भरला. त्यावेळी उपरोल्लेखित गोष्टींची विचारणा झाली होती, तुम्ही सप्तपदी केलीत का नाही केलीत हा प्रश्न आधुनिक भटजी उर्फ सरकारी कार्यालयातील लेखनिकाने विचारला नाही. (नशीब, त्या साक्षीदारांमधे त्यांच्या सज्ञान मुलींच्या सह्या चालतील असं उत्तर दिलं नाही.)

स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली लग्नं केले तरीही वाडवडीलार्जित संपत्तीवरील वारसा हक्क हिंदूंच्या कायद्याप्रमाणेच रहातो. तेव्हा काय फरक पडतो सप्तपदी केली काय अन न केली काय? एला, ज्यांना सप्तपदी करून शेण खायचं असतं ते खातातच ना, ते काय सप्तपदीचा विचार करून थांबतात! असे अनेक घोडे पाहिले आहेत ज्यांच्यासाठी 'मुंह मे राम बगल मे छुरी' हे वर्णन तंतोतंत लागू पडतं!

कोणत्या जमान्यात जगता, सप्तपदी काय अन काय काय ... सगळे मनाचे खेळ!

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

31 Jul 2009 - 9:54 am | विशाल कुलकर्णी

"मी कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही संकटात, कुठल्याही अवस्थेत तुझी साथ-सोबत सोडणार नाही " हे वचन देण्यात कुठला धोका आहे तेच मला कळत नाहीय. यात फक्त त्यांनाच धोका वाटेल ज्यांना extra maritals मध्ये स्वारस्य आहे. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

ऋषिकेश's picture

31 Jul 2009 - 10:54 am | ऋषिकेश

अरेच्या आपापल्या ब्लॉग्सच्या जाहिराती आधी फक्त स्वाक्षर्‍यांमधे दिसायच्या (जे मला काहि प्रमाणात योग्यही वाटते) आता आपल्या ब्लॉगच्या जाहिरातीसाठी वेगळे धागे? कमाल आहे

ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

विनायक प्रभू's picture

31 Jul 2009 - 5:04 pm | विनायक प्रभू

चा धोका कळला नाही.
तसे अति चरण्यात धोका असतोच की.

नितिन थत्ते's picture

31 Jul 2009 - 8:50 pm | नितिन थत्ते

>>धोका असा की सप्तपदीच्यावेळी दिलेली वचनं पुरुषाकडून पाळली गेली नाहीत तर कायदा पुरुषाला झोडपून काढतो. पण आधुनिक मुक्त स्त्रीने जर ही दिलेली वचनं जर पाळली नाहीत तर तिला मात्र कोणतीही शिक्षा नाही.

विवाह 'पूर्ण झाला' की तो मोडण्यासाठी कोर्टात जावे लागते. सप्तपदी हा विवाह 'पूर्ण झाल्याचा' (अनेक पुराव्यांपैकी एक) पुरावा असतो.
आपल्याला पूर्ण झालेला विवाह कोर्टात न जाता मोडण्याचे मार्ग असावेत असे वाटते काय?

दुसरे म्हणजे सप्तपदीत 'ती' वचने दिली आहेत की नाही हे कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असत नाही. ती वचने दिली नाहीत तरी आपण ज्याला 'झोडणे' म्हणता ते होणारच आहे.
सप्तपदीमध्ये स्त्रिया कोणती वचने देतात ते माहिती नाही. त्यामुळे त्यांनी वचने मोडली तरी त्या मुक्त राहतात यावर काही भाष्य करू शकत नाही.

समाजव्यवस्थेत निम्न स्तरावर ठेवल्या गेलेल्यांबाबत साधारणतः आधुनिक कायद्यामध्ये झुकते माप असते. ते योग्यच असते.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

स्त्री मुक्त झाली तरी निम्न स्तरावरच राह्ते का?

विंजिनेर's picture

1 Aug 2009 - 2:52 pm | विंजिनेर

ते नंतर बघू वो.. आधी बाकीची उत्तरं द्या की राव!
- (अपलायनवादाचा पुरस्कर्ता) विंजिनेर

स्वाती२'s picture

1 Aug 2009 - 4:54 pm | स्वाती२

तुमची मुक्त स्त्री ची व्याख्या काय?
दुसरे म्हणजे हिंदू लग्नामधे वधूपीता कन्यादान करतो. आता जिचे दान होते ती कसली वचनं द्यायला मुक्त असते? वधू फक्त सौभाग्य,आरोग्य,पतीला दीर्घायुष्य, संततीप्राप्ती ,धनप्राप्ती यासाठी प्रार्थना करते. तेव्हा वचन मोडण्याचा प्रश्नच येत नाही. तिने पतीला अनुकुल वागावे हे ग्रुहित घरले जाते.

स्वयंनिर्णयाचा हक्क बजावणारी प्रत्येक स्त्री मुक्त असते.

माझ्या माहितीप्रमाणे आधुनिक हिंदू विवाह संस्कारानुसार कन्यादान वैकल्पिक आहे. लग्न कायदेशीर ठरायला कन्यादान आवश्यक नाही. सप्तपदी विवाह कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला विधी आहे.

स्वाती२'s picture

1 Aug 2009 - 7:52 pm | स्वाती२

>>स्वयंनिर्णयाचा हक्क बजावणारी प्रत्येक स्त्री मुक्त असते.
या प्रमाणे विचार केल्यास भारतातील बहूसंख्य हिंदू स्त्रिया मुक्त नाहीयेत.
बाकी कायद्याची माहीती मला नाही पण माझ्या नात्यात ३-४ घटस्फोटाच्या केसेस बघितल्या. त्यात कुठेच स्त्री म्हणून झुकते माप दिले गेले असे आढळले नाही. एका केस मधे पुरुष माझ्या नात्यातील असूनही मला स्त्रीला मिळालेला न्याय योग्य वाटला. दुसर्‍या केस मधे स्त्री माझ्या नात्यातली होती, निकाल पुरुषाच्या बाजूने लागला आणि तो योग्य होता. खरे तर कोर्टाची पायरी चढताना भक्कम पुरावे आणि चांगला वकिल बरोबर असणे हे स्त्री-पुरुष दोघांसाठी सारखेच महत्वाचे.
>>लग्न कायदेशीर ठरायला कन्यादान आवश्यक नाही
हे जरी मान्य केले तरीही हिंदू विवाहात एकंदरीतच वधूला ग्रुहित धरले जाते.

हिंदू विवाहात एकंदरीतच वधूला ग्रुहित धरले जाते.

वधूला गृहित धरले जाते तसे वरालाही गृहित धरले जाते. फक्त तपशीलात फरक पडतो.

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 2:31 pm | युयुत्सु

या प्रमाणे विचार केल्यास भारतातील बहूसंख्य हिंदू स्त्रिया मुक्त नाहीयेत.

आपले हे म्हणणे विवाद्य ठरेल. पण आपण असे नक्कीच म्हणू शकतो की बहूसंख्य भारतीय स्त्री अंशत: मुक्ती कधि ना कधि अनुभवतातच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आपण असे नक्कीच म्हणू शकतो की बहूसंख्य भारतीय स्त्री अंशत: मुक्ती कधि ना कधि अनुभवतातच.

बरं समजा, हिंदू स्त्रिया मुक्त नसतील किंवा त्या मुक्त नाहीत असे ग्रहीत धरले किंवा स्त्रियांनी विवाह केल्यामुळे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला धक्का पोहचतो असे म्हणायचे आहे का ? आणि समजा तसे म्हणायचे नसेल तर सप्तपदी विधीमुळे माणसास जो धोका पोहचतो, ते म्हणजे लग्न झाले असे सिद्ध होते तर स्त्रीचे सिद्ध होत नाही का ? ~X(

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 10:40 am | युयुत्सु

स्त्रियांनी विवाह केल्यामुळे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला धक्का पोहचतो

असा उच्चरवाने कंठशोष समस्त स्त्रीवादी करत असतात्च.

म्हणुन तर प्रत्येक पुरुष हा रेपिस्ट असतो असे मानण्यापर्यंत स्त्रीवादाची मजल गेली. काही पश्चिमेतील स्त्रीवाद्यांनी पुढे जाउन तर समागमाशिवाय अपत्य प्राप्तीचा आग्रह धरला.

विशाल कुलकर्णी's picture

3 Aug 2009 - 9:29 am | विशाल कुलकर्णी

कायद्याचाच जर विचार करायचा झाला तर माझ्या माहितीप्रमाणे लग्न कशाही प्रकारे झाले तरी त्यानंतर जोपर्यंत त्याची नोंदणी केली जात नाही तोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरले जात नाही. मग तुम्ही सप्तपदी करा अगर नका करु. चुभुदेघे.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

युयुत्सु's picture

1 Aug 2009 - 7:04 pm | युयुत्सु

सप्तपदीच्या वेळी वधू आणि वरांनी केलेल्या प्रार्थनांना शपथेचा दर्जा समाजाने आणि कायद्याने दिलेला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सप्तपदीच्या वेळी वधू आणि वरांनी केलेल्या प्रार्थनांना शपथेचा दर्जा समाजाने आणि कायद्याने दिलेला आहे.

बरं मग, त्याने फक्त पुरुषालाच कसा त्रास होतो ते सांगा ?

-दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 8:31 am | JAGOMOHANPYARE

आजचा सुविचार :

Behind every successful man there is a woman. Behind every unsuccessful man there is a woman with her parents.

:)

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 8:43 am | JAGOMOHANPYARE

१. लेखक महोदय आपण २५० रुपयात भविष्य सांगता म्हणे.... मग लग्न करण्याआधीच , सप्तपदी केली तर काय होइल आणि न केली तर काय होइल हे तुम्हाला जाणून घेता येत नाही का ?

२. सप्तपदी आणि नातिचरामि हे कायदेशीर वचन ठरत असल्यामुळे आपल्याला धोका होतो असे आपण म्हटले आहे... मग हल्ली लोक गम्मत म्हणून दुसर्‍या धर्माचेही विधी करतात... उदा. हिन्दु असताना मुस्लीम किंवा ख्रिशन पद्धतीनी लग्न करतात.... ... मग अशा लोकांची नातिचरामि मधून सुटका होऊ शकते का ? किंवा दुसर्‍या धर्माचे असताना साउथ इन्डियन पद्धतीने लग्न करणे, असे केल्यास एखादा मुस्लीम माणूस ( माणूस म्हणजे माणुसच, बाई माणूस नव्हे :) )नातिचरामि मध्ये अडकू शकेल काय ?

३. हिन्दु व्यक्तीसाठी द्विभार्या प्रतिबन्धक कायदा आहे... जन्माने हिन्दु असला की हा कायदा कागू होतो.. मग नातिचरामि ची शपथ घेतली नाही , या सबबीवर या कायद्यातून तुमची सुटका होऊ शकते का ? मुळात नातिचरामि मधून सुटण्याची एवढी तीव्र तळमळ कशासाठी आहे ?

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 10:25 am | युयुत्सु

सप्तपदी केली तर काय होइल आणि न केली तर काय होइल हे तुम्हाला जाणून घेता येत नाही का ?

जाणुन घेता नक्कीच येते. जे डोळे मिटून लग्न करतात त्यांच्या साठी ले़ख लिहीला आहे.

किंवा दुसर्‍या धर्माचे असताना साउथ इन्डियन पद्धतीने लग्न करणे, असे केल्यास एखादा मुस्लीम माणूस ( माणूस म्हणजे माणुसच, बाई माणूस नव्हे Smile )नातिचरामि मध्ये अडकू शकेल काय ?

मा़झ्या माहितीप्रमाणे अन्य धर्मियांना हिंदू विवाह कायद्याखाली लग्न लावायचे / करायचे असल्यास प्रथम हिंदू धर्म स्वीकारावा लागतो. एकदा हिंदू धर्म स्वीकारला की नातिचरामि त्या व्यक्तीला लागऊ होणार हे सामान्य बुद्धी सांगते.

नातिचरामितून सुटण्याची तळमळ हा अर्थ तुम्ही तुमच्या सोयीने काढला आहे. तरी प्रश्न विचारलात याचा आनंद झाला. माझी तळमळ वेगळ्या कारणासाठी आहे. कायदा मोडला जातो तेव्हा मुक्त स्त्री आणि आजचा पुरूष एकाच न्यायाने तोलला गेला पाहिजे. तसे होताना दिसत नाही, निदान भारतात तरी...

प्रकाश घाटपांडे's picture

2 Aug 2009 - 11:46 am | प्रकाश घाटपांडे

विवाह कुठल्याही पद्धतीने होवो त्याची नोंद झाली पाहिजे. नोंद ग्राह्य असणे गरजेचे. कालबाह्य कायद्यात बदल झाले पाहिजेत. युयुत्सु यांच्या धाग्यात मला (मुक्त) स्त्री व (मुक्त) पुरुष एकाच मापाने तोलले पाहिजे असा कल वाटतो.चुभुदेघे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 2:07 pm | युयुत्सु

आपण माझ्या चर्चासूत्राचा योग्य अर्थ लावलात याचा आनंद झाला.

आपण विवाह कोणत्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याची implications काय याचे भान भावी वरांनी ठेवावे, कारण मुक्त स्त्री बरोबर राहताना कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात याची आज कालच्या विवाहेच्छु पुरुषांना जाण आहे असे मला वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालक, आजच्या मुक्त स्त्री मुळे आणि तिच्याबरोबर सप्तपदी घेतल्याने माणसाच्या आयुष्यात कोणते प्रश्न निर्माण होतात, सांगा तर खरं ?

-दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 2:02 pm | JAGOMOHANPYARE

मा़झ्या माहितीप्रमाणे अन्य धर्मियांना हिंदू विवाह कायद्याखाली लग्न लावायचे / करायचे असल्यास प्रथम हिंदू धर्म स्वीकारावा लागतो. एकदा हिंदू धर्म स्वीकारला की नातिचरामि त्या व्यक्तीला लागऊ होणार हे सामान्य बुद्धी सांगते.

मी हिन्दु विधी करतात असे म्हटले आहे,, हिन्दु होऊन हिन्दु विवाह कायद्या अन्तर्गत विवाह लावले तर काय होईल हे विचारलेले नाही... कारण तसे केले तर हिन्दु कायदा लागू होतोच ( आणि हे काय पोपटवाल्यालाही माहीत असते.. )

वर्ण सन्कर होऊ नये म्हणून सप्तपदी आणली, असे आपले मत आहे... मग आपल्याला सप्तपदी टाळायची का आहे? वर्ण सन्कर करायचा चान्स मिळावा म्हणून ?

मुळात हिन्दु धर्म स्वीकरता येतो का ? असा धर्म स्वीकरल्यास त्याला जात कुठली मिळते.... ? अशा लोकांशी रोटी बेटी व्यवहार कुठल्या जातीतील लोकानी करायचा ? त्याला कुल दैवत कुठले आणायचे ?
(शिवाजी महाराज - नेताजी पालकर चे उदाहरण सांगु नये... कारण त्याला मुळची जात आस्तित्वात होती... )

हा प्रश्न यापूर्वी मी उपस्थित केला होता. त्याचे समाधानकारक उत्तर अजुन कुणीही मला दिले नाही. माझ्या चिंतनिकेतील 'धर्मांतर' या शीर्षकाखालील टिपण वाचावे.
http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/09/blog-post_12.html
प्रत्येक विवाह कायद्याने निश्चित केलेली प्रथा सोडून इतर विधी हौसेखातर किंवा गंमत म्हणून केले तर ते अवांतर ठरतात.

मग आपल्याला सप्तपदी टाळायची का आहे?

या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मूळ लेखात आहे. तो परत वाचावा ही विनंति.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुळात हिंदू धर्म स्वीकारता येतो का ? असा प्रश्न विचारुन तुम्ही मुळ विषयाला फाटे फोडत आहात असे वाटते. आम्ही आपल्या ब्लॉगवरील लेख वाचलाच नाही असे गृहीत धरुन सप्तपदी विधी धोक्याचा विधी आहे, किंवा तो विधी माणसासाठी धोकादायक कसा ? इतकेच इथे स्पष्ट झाले तर बरे होईल असे वाटते

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 4:07 pm | युयुत्सु

आपल्याला मूळ लेख वाचायचे कष्ट घ्यायचे नसतील तर मलाही तेच तेच परत सांगण्यात स्वारस्य नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2009 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुळ चर्चा प्रस्ताव आणि आपल्या ब्लॉगवरील लेख, देवाची, शप्पथ घेऊन सांगतो, वाचला हो.
पण, प्लीज लेखनातले मैलाचे दगड कोणते ते सांगाच..किंवा कसे समजून घ्यावे ते तरी सांगाच ?

सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...(आपल्या लेखातील काही वाक्य )

विसंगतपणा कोणता ?

आपल्या लेखनातील मुद्दे...!
१) मनुष्यप्राणी निसर्गत: एकनिष्ठ राहण्यासाठी निर्माण झाला नाही. एकनिष्ठता ही समाजाने स्वीकारलेली कल्पना आहे. केवळ धार्मिक कल्पना म्हणून सातजन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे कितपत योग्य आहे?

माणसाचे वागणे स्वैर असावे असे म्हणायचे आहे का ? कुटुंब संस्था, विवाह संस्था नसावी काय ?

२)स्त्रीची पूर्णव्यवस्था करुन वेगळे व्हावे लागते.

स्त्रीचे लग्न झाल्यानंतर तिच्या पालन-पोषणाची सामाजिकदृष्ट्या जवाबदारी तिच्या नवर्‍यावर येते. जेव्हा तो तिला तिची कोणतीही व्यवस्था न करता सोडून देतो. तेव्हा आई-वडील (काही सांभाळतीलही) सांभाळत नाही. तेव्हा तिच्या मुलांची पालन-पोषणाची जवाबदारी कोणाची ? एक तर तिची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे किंवा तिने तिच्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, या करिता कायद्याच्या दृष्टीने व्यवस्था करुन देण्याची अट टाकली तर त्यात वावगे काय ? माणसाने स्त्रीचे शारिरीक शोषण करायचे आणि वस्तू म्हणून टाकून द्यायचे याचे समर्थन करायचे का ?

३) आपल्या लेखातील क्रमांक तीनचा मुद्दा..

सर्च स्त्रिया या काही कपटी नसाव्यात. खोटारड्या नसाव्यात. समाजाचे नितीनियम पुरुष आणि स्त्रीया दोघेही पाळत असतात. म्हणूनच कुटुंबव्यवस्था टीकून आहे, असे वाटते. आधुनिक स्त्री कायद्याच्या दृष्टीन जागृत झाली म्हणून पुरुषांना छळ सोसावा लागतो. हे मानायला मी तरी तयार नाही.

४) आपल्या चवथ्या मुद्यावर काय बोलावे असा प्रश्न पडला आहे. अहो, जन्मो-जन्मीचे माहिती नाही. पण आहे त्या जन्मात स्त्री-पुरुष अख्खा जन्म जर एकनिष्ठेने घालवत असतील तर त्याची काय अडचण आहे. स्वैर जीवन म्हणजे तर कुत्री-मांजराप्रमाणे जगावे असे म्हणायचे का ? अनेक स्त्रिया-पुरुष विवाह करत नसतील तेव्हा ती कदाचित स्वैर असतीलही. कदाचित तुमच्या विचारांचे समर्थन करायचे तर करार विवाहपद्धती बरी वाटेल. वाटेल तो पर्यंत सोबत राहावे आणि पुन्हा वेगवेगळे व्हावे. काय म्हणता ?
[ सप्तपदीमुळे माणसाचे काय नुकसान होते, आपल्या लेखावरील काही मुद्यावरुन अजूनही स्पष्ट होत नाही, असे मला वाटते ]

आपणास होणार्‍या त्रासाबद्दल क्षमा असावी.

-दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 3:49 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<<<<<<<आम्ही आपल्या ब्लॉगवरील लेख वाचलाच नाही असे गृहीत धरुन सप्तपदी विधी धोक्याचा विधी आहे, किंवा तो विधी माणसासाठी धोकादायक कसा ? इतकेच इथे स्पष्ट झाले तर बरे होईल असे वाटते
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

ते जर त्याना सान्गायचे असते तर त्यानी कधीच सान्गितले असते.....

सप्त पदी 'विधी'ची ही भीती नाहीच मुळी, भीती आहे ती 'विधी' निषेध न बाळगता वागल्यास आपल्यावर 'विधी' नुसार कारवाई होऊ शकते, याची ! त्यातून बाहेर पडायला तो कोण परदेशी बाबू त्याना पुस्तकरूपाने मदत करणार आहे.....

'ख्रिश्चन धर्मीय विवाहातील पांढरा झगा - कपड्यांची नासाडी ' या विषयावर पी एच डी करता येते का ? कुठल्या विद्यापीठातून ?

सहज's picture

2 Aug 2009 - 4:53 pm | सहज

नमनाला घडाभर तेल घालवलेच आहे आता..

सप्तपदींचा तुम्हाला समजलेला अर्थ काढून, कुठला करार करुन पुरुष कसा पुढे पस्तावेल हे लिहण्यापेक्षा, न्यायालयातील काही उदाहरणे दाखवुन ह्या सप्तपदीने पुरुषावर कसा अन्याय केला आहे हे स्पष्ट केले असतेत तर चर्चेत अर्थ होता.

बर सप्तपदी केले व "प्रीनप"ही केले तर हा धोका टळेल का ज्योतिषालाच शरण गेले पाहीजे?

------------------------------------
२५० रु मे भविष्य लेलो. २५० रु मे भविष्य लेलो. हम्म्म्म्म अडीच किलो तूरडाळ की भविष्य???/ मोठा गहन प्रश्न आहे

युयुत्सु's picture

2 Aug 2009 - 5:34 pm | युयुत्सु

"प्रीनप" भारतीय कायद्याने स्वीकारल्याचे ठाऊक नाही. फारच काय ते अस्तित्वात यावे यासाठी पुरुषमुक्ती-वादी संघर्ष करत आहेत.

प्रसन्न केसकर's picture

2 Aug 2009 - 6:27 pm | प्रसन्न केसकर

हिंदु मॅरेज अ‍ॅक्ट चे कलम सात हिंदु पद्धतीने केलेल्या विवाहात कोणते विधी झाले तर ते वैध ठरेल याबाबत आहे. ते असे:

7. Ceremonies for a Hindu marriage.- (1) A Hindu marriage may be solemnized in accordance with the customary rites and ceremonies of either party thereto.

(2) Where such rites and ceremonies include the Saptapadi (that is, the taking of seven steps by the bridegroom and the bride jointly before the sacred fire), the marriage becomes complete and binding when the seventh step is taken.

या विषयावर एव्हढी चर्चा सुरु आहेच तर जाणकारांकडुन याचाही उहापोह व्हावा.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 8:37 am | प्रकाश घाटपांडे

याच कलमावर विवाहपुर्व समुमदेशच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळी यावर अ‍ॅड सरवटे यांनी चर्चा केली होती. हिंदी पिक्चरमधे या सप्तपदी ने किती भांडवल पुरवलय! सप्तपदीला या अ‍ॅक्ट मध्ये अनन्य साधारण महत्व आहे असे त्यांनी नमुद केले. 'कोर्ट मॅरेज' मधे काही वकिल महाभाग जोडप्याला कोर्टाच्या इमारतीच्या समोर नेउन स्वतः काळा गाउन घालुन जोडप्याच्या मागे मधे उभे राहायचे व फोटो काढुन द्यायचा . झाल तुमच कोर्ट म्यारेज.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 10:20 am | युयुत्सु

कोर्ट मॅरेज एवढे सोपे नाही. त्यासाठी १ महिन्याची नोटिस द्यावी लागते. रजिस्ट्रार समोर सही करावी लागते.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2009 - 10:25 am | प्रकाश घाटपांडे

किस्सा काही महाभाग वकीलांबद्द्ल आहे. अशील हे निमशहरी वा ग्रामीण भागातील असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2009 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवाह झाला आहे, पण पुरावे देता येत नसतील पण स्त्री-पुरुष दीर्घकाळ एकत्र राहिले असतील तरीही तो विवाह झाला असे मानन्यात येईल. असे सर्वोच्च न्यायालय म्हणते...वाचा बातमी ...दीर्घ काळापासून एकत्र राहणारे स्त्री-पुरुष वैध पती-पत्नी

-दिलीप बिरुटे

नीधप's picture

3 Aug 2009 - 10:29 am | नीधप

आता हे नक्की कोणासाठी धोकादायक आहे?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2009 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आता हे नक्की कोणासाठी धोकादायक आहे?

दोघांसाठीही ! :)

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 10:35 am | युयुत्सु

woman is to be protected at all cost हे तत्त्व अशा प्रकरणात मार्गदर्शक म्हणून वापरले जाते.

JAGOMOHANPYARE's picture

2 Aug 2009 - 8:05 pm | JAGOMOHANPYARE

<<<<<<<<<<<

२५० रु मे भविष्य लेलो. २५० रु मे भविष्य लेलो. हम्म्म्म्म अडीच किलो तूरडाळ की भविष्य???/ मोठा गहन प्रश्न आहे >>>>>>>>>>>>>

तुरडाळीचच भविष्य बघा की मग ....!! :)

युयुत्सु's picture

3 Aug 2009 - 11:18 am | युयुत्सु

माझी भूमिका अधिक स्पष्ट व्हावी अशी काही जणानी मागणी केल्या मुळे मूळ लेखातील भूमिके संदर्भातील उतारा परत एकदा येथे देतो.

"४. एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे."

नीधप's picture

3 Aug 2009 - 11:29 am | नीधप

>>पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे,<<
पुरूष आपल्या जबाबदार्‍या पार पाडेलच याची कुठली खात्री असते? तरीही आपला सगळा कम्फर्ट झोन सोडून अनोळखी पुरूषाच्या घरात रहायला जातेच की बाई. तुमच्या वरच्या लॉजिकने हा पण बाईचा आत्मघातकीपणाच म्हणायला लागेल.
कायदे बाईच्या बाजूने असले तरी किती घरगुती अत्याचार खरोखर नोंदवले जातात? किती ठिकाणी मानसिकरीत्या गुलामीत आहेतच की अजून बाया. नवर्‍याने बडवलं दारू पिऊन तरी कुंकवाचा धनी म्हणून त्याला पाठीशी घालतातच की बाया अजून.
द्वीभार्याप्रतिबंधक कायदा असला तरी घरात सवतीला सहन करणार्‍याही बाया आहेतच की.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पक्या's picture

3 Aug 2009 - 12:40 pm | पक्या

युयुत्सु यांचे असे मत आहे की कायदा हा एकतर्फी आहे म्हणजे स्त्रियांच्या बाजूने आहे.
जर तो तसा आहे तर का आहे ह्याचा विचार युयुत्सु यांनी केला आहे का?
पुरूषप्रधान संस्कृती मध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळालेली आहे. नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे घरगुती अत्याचार (मारहाण, अपमानास्पद वागणूक) क्वचितच नोंदवले जातात.

माझ्याच माहितीतील एका जोडप्याचे उदाहरण देतो - नवरा बायको उच्चशिक्षीत. अमेरिकेत नोकरी. किरकोळ कारणावरून भांडणास सुरवात , नवर्‍याची मजल बायकोवर हात उगारेपर्यत गेलेली. चायनीज शेजार्‍याने आपल्या शेजारच्या घरात रात्रीचा काहीतरी गोंधळ चालू आहे म्हणून ९११ डायल करून पोलीस बोलावलेले. बायकोने बरीच गयावया केली तरी तिचे रडून लाल झालेले डोळे आणि एकंदर अवतार पाहून पोलिसांनी लगेच नवर्‍याला ताब्यात घेऊन त्या रात्री आत टाकलेला. (का मारले , खरेच मारले का , नक्की कोणाची चूक वगैरे काहिहि चौकशी न करता.) सकाळी त्याच्या एका मित्राचा (जो माझा ही मित्र होता) मदतीसाठी (सोडवण्यासाठी वकील वगैरे)फोन आला त्यावेळी वरील प्रकार मला समजला. आता बोला?
कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे तर त्याला पुरूषच जबाबदार आहेत. काही चांगल्या पुरषांना कायद्याचा त्रास सहन करावा लागला असेल/लागत असेल पण त्याला नाईलाज आहे ..वाईटाबरोबर काही वेळेस चांगले ही भरडले जाते .

बाकी तुमच्या ब्लॉग वर जाऊन अजून तरी तुमचा लेख वाचला नाहि. ईथे तुम्ही जे काही म्हणताय त्याला अनुसरून च हा प्रतिसाद दिला आहे. आम्हाला बुवा मिसळपाव सोडून दुसरीकडे जायची इच्च्छाच होत नाहि. त्यामुळे जे काही म्हणायचे आहे ते इथेच म्हणा. (तेच तेच मांडायला नको आहे तर कॉपी पेस्ट मारू शकता की)

सूहास's picture

3 Aug 2009 - 3:22 pm | सूहास (not verified)

<<<आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?>>>

सप्तपदी घेताना गोल-गोल फिरावे लागते व त्याच्याने चक्कर येऊ शकते म्हणुन म्हणताय का ???

(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)

सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...