महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर"

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट
13 Jul 2009 - 7:53 pm
गाभा: 

नमस्कार,
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की दि.१९ /०७ /२००९ रोजी दु. ४.०० ते रात्रौ ९.३० या वेळेत
ठाणे येथे " लक्ष्मी केशव कार्यालयात " सुप्रसिद्ध कवी महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर" यांचा ( स्वत: ) कवितावाचन आणि मुलाखत असा कार्यक्रम ’लोकमत सखी मंच’ तर्फ़े आयोजित करण्यात आला आहे.
रसिकांनी जरूर याचा लाभ घ्यावा.
कार्यक्रम विनामूल्य आहे.

स्थळ :
लक्ष्मी केशव कार्यालय ,
प्रताप सिनेमा समोर,
कोलबाड रोड , खोपट .
ठाणे (प).

प्रतिक्रिया

सुनील's picture

13 Jul 2009 - 8:06 pm | सुनील

कार्यक्रम उत्तमच शिवाय ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिपाकट्टादेखिल
भरवता येईल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Jul 2009 - 6:17 pm | श्रीयुत संतोष जोशी

वा वा हे तर एकदम भारी होईल.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

पाषाणभेद's picture

14 Jul 2009 - 3:07 am | पाषाणभेद

मंगेश पाडगावकर यांचे काव्यवाचन म्हणजे एक जिवंत अनुभवअसतो. ते बोलतात ते सुद्धा एक काव्यच असते.
रसीकांनी याचा जरुर लाभ घ्यावा.

अवांतर: एका वेळी एकच कार्यक्रम करावा. भेसळ झाली तर आस्वाद घेता येत नाही.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

पाषाणभेद's picture

15 Jul 2009 - 3:12 am | पाषाणभेद

पण सखी च्या सख्यांनी यावे की न यावे ?
आल्यास दंड होईल का?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर's picture

14 Jul 2009 - 1:46 pm | विसोबा खेचर

नक्की येणार..!

या निमित्ताने मिसळपाव परिवारातर्फे पाडगावकरांना एखादी छानशी भेटवस्तू किंवा शाल-श्रीफळ देण्यास मला आवडेल! :)

त्यानंतर लहानशी मद्यपार्टी करू. पाडगावकरसाहेब त्याही पार्टीला अवश्य उपस्थित राहतील अशी त्यांना विनंती करू.. :)

तात्या.

सुनील's picture

14 Jul 2009 - 2:25 pm | सुनील

फस्स्क्लास प्लॅन!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2009 - 3:30 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ही पोलिस बिनतारी विभागाला सलाम ठोकला तेव्हा पाडगावकरांची सलाम आठवली. ऐका
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.