रेल्वे बजेट - परत एकदा निराशा

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
3 Jul 2009 - 5:03 pm
गाभा: 

मुंबईच्या पश्चिम, मध्य, हार्बर प्रवाशांतर्फे ममता बॅनर्जींचा जाहीर निषेध !!

नव्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पाने मुंबईकरांची घोर निराशा केली आहे.प्रवासी भाड्यात कुठलिही भाडेवाढ न होणे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
मात्र सामान्य मुंबईकर लोकल प्रवाशांच्या खुप अपेक्षा ( १२ -१५ डब्यांच्या लोकल, लोकलच्या संख्येत वाढ, ठाणे- पनवेल लोकल, हार्बर लाईनचा गोरेगाव पर्यंत विस्तार इत्यादी) असताना आणि रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल मुंबईतून मिळत असताना यातील एका ही मागणीचा विचार न केला जाणे यासारखी वाईट गोष्ट नाही.
आता गरज आहे ती महाराष्ट्रातील / मुंबईतील सर्व खासदारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी/ मुंबईसाठी आवश्यक असणार्‍या सर्व मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दबावतंत्र/ आंदोलन याचा मार्ग अवलंबण्याची. ( राज साहेबांनी बरोबर म्हणले होते आता महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत कोण उठवणार? )

दरवर्षी प्रमाणे रेल्वे मंत्र्यांच्या राज्यातून मुंबईत एक तरी नवी गाडी चालू होणे आणि परप्रांतीयाची लोकसंख्या अबाधीत ठेवणे ही प्रथा या वर्षीदेखील नवीन रेल्वे मंत्र्यांनी मोडीत न काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!
किंबहूना आपल्या लोकांना मुंबईत जलद पोहोचता यावे म्हणून हावडा- मुंबई विना थांबा रेल्वेची घोषणा करुन पाटणा - मुंबई एक्स्प्रेसवर मात केली आहे.
( यापुढे ही प्रथा बंद होण्यासाठी मा. पवार साहेबांनी रेल्वे खाते आपल्याकडे पर्यायाने महाराष्ट्राकडे घ्यावे. आणि दरवर्षी नवीन गाडी चालू करण्या एवजी मुंबईहून पटणा, हावडा येथे जाणार्‍या अगणित गाड्यांपैकी एकेक गाडी रद्द करावी )

चला इथेच थांबतो. ५.१२ ची नऊ डब्यांची वाशी लोकल पकडायला पळायला पाहि़जे.

(आपला लोकल )अमोल

प्रतिक्रिया

अरे आपण साधे कपडे घेतो, घर घेतो, एखादी वस्तू घेतो तेव्हा आपण किती प्लानींग करतो. आणि हे मंत्री- संत्री लोक खिरापत वाटतात.

अवांतर : राज ठाकरे सारख्या माणसांची महाराष्ट्राला किती आवश्यकता आहे हे वारंवार अधोरेखित होत आहे. वेळीच वेळ ओळखा.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते's picture

3 Jul 2009 - 6:10 pm | नितिन थत्ते

९०च्या दशकात मुंबई ग्राहक पंचायतीने अभ्यास करून मुंबई उपनगरी रेल्वेमधून रेल्वेला अफाट नफा होतो असा अहवाल तयार केला होता. तो कोणाला माहिती आहे काय? किंवा कुठे पहायला मिळेल?

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

ऍडीजोशी's picture

3 Jul 2009 - 6:58 pm | ऍडीजोशी (not verified)

क्षमतेच्या कितीतरी पट लोकं कोंबल्यावर अफाट नफा होणारच.

चिरोटा's picture

3 Jul 2009 - 6:55 pm | चिरोटा

मुंबईचे/महाराष्ट्राचे खासदार,मंत्री बजेट सादर होईपर्यंत गप्प का बसतात? उद्या नेहमीप्रमाणे 'महाराष्ट्रावर अन्याय' म्हणून हे लोक आता गळा काढतील.(आणि परवा दिल्लीला विमानाने जातील!).
मलाही हा उपनगरीय रेल्वेचा 'अफाट नफ्याचा' अहवाल पहायचा आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मराठी_माणूस's picture

3 Jul 2009 - 7:47 pm | मराठी_माणूस

आता गरज आहे ती महाराष्ट्रातील / मुंबईतील सर्व खासदारांनी एकत्र येऊन .....

महराष्ट्रातील खासदारानि फक्त मुंबई साठी एकत्र यावे काय. लेखात महाराष्ट्राच्या (मुंबई सोडुन) मागण्या बद्दल काहीच म्हटलेले नाही.

नितिन थत्ते's picture

3 Jul 2009 - 8:45 pm | नितिन थत्ते

>>लेखात महाराष्ट्राच्या (मुंबई सोडुन) मागण्या बद्दल काहीच म्हटलेले नाही

सहमत.

>>मलाही हा उपनगरीय रेल्वेचा 'अफाट नफ्याचा' अहवाल पहायचा आहे

माझ्या फायनान्सच्या मर्यादित ज्ञानावरून आणि प्राथमिक आकडेमोडीतून नफा होणे शक्य नाही असे मला वाटते. म्हणून कोणत्या गृहीतकावरून नफ्याचे गणित मांडले आहे ते जाणून घ्यायचे आहे.

नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)

हरकाम्या's picture

4 Jul 2009 - 1:53 am | हरकाम्या

या बजेटबद्दल सर्वप्रथम आमच्या मराठि खासदारांचे अभिनंदन करायला पाहिजे. त्यांच्या या निष्क्रिय व्रुत्तीने हे असे घडते आहे.या महाराषट्राचि अवस्था अशी होण्याला हीच कर्मदरिद्री मंडळि जबाबदार आहेत.राहिला पवारसाहेबांचा प्रश्न ,सध्या ते, क्रिकेट बोर्डाची निवडणुक, शेतिखाते, स्वताचा पक्ष मजबुत करणे या सर्व बाबींमध्ये
गुंतलेले असल्याने त्यांना इकडे लक्ष देणे कितपत जमेल याची शंका आहे.

अमोल केळकर's picture

4 Jul 2009 - 8:45 am | अमोल केळकर

सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

>>मा. पवार साहेबांनी रेल्वे खाते आपल्याकडे पर्यायाने महाराष्ट्राकडे घ्यावे.
त्यामुळे कितीकसा फरक पडेल?
परवा त्यांनी वांद्रे-वरळी सेतु नामकरणाच्या निमित्ताने सोनियांसमोर घातलेले लोटांगण विसरलात?

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jul 2009 - 8:48 am | अविनाशकुलकर्णी

महाराष्ट्र /मुंबई असे का म्हणता? मुंबई काय महाराष्ट्रा पासुन निराळी आहे का? मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे..महाराष्ट्र /मुंबई असे म्हटल्याने मुंबईचा स्वतंत्र पणाचा भाव वाढिस लागतो..पण हल्ली काहि दिवस अश्या पध्धतिने बोलणे लिहिणे हि प्रथा होत आहे...परवा विलास रावानि पण पण मुंबई/महाराष्ट्रातल्या आमदार खासदारानि एकत्र येवुन निवडणुक निराळी लढायची का याचा विचार करावा असे विधन केले..जरी वरवर महाराष्ट्र /मुंबई हा शब्द प्रयोग निरुपद्रवि वाटला तरी त्याचे परीणाम घातक आहेत....

शाहरुख's picture

5 Jul 2009 - 12:03 am | शाहरुख

>>दरवर्षी नवीन गाडी चालू करण्या एवजी मुंबईहून पटणा, हावडा येथे जाणार्‍या अगणित गाड्यांपैकी एकेक गाडी रद्द करावी

मग त्यास्नी परत कसं पाठिवनार ??