आणि बांध फुटला

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
1 Jul 2009 - 9:20 am
गाभा: 

ज्या घरात पालक आणि मुले ह्यांच्यात अभ्यासावरुन भांडणे असतात त्यांना मी एक प्रश्न न चुकता विचारतो.
" काहो, मुलाला जवळ बसवुन पाठीवरुन किंवा डोक्यावरुन हात फिरवल्याला किती दिवस झाले"?
बहुतेकांच्या चेहेर्‍यावर 'कुठल्या येड्चापाच्या नादाला लागलो 'असे भाव असतात.
___________________________________________________________

चिरंजीव माझी कुठलीही मदत न घेता आपणच मिळवलेल्या नोकरीवर जाण्याचा पहीला दिवस. बुट घातले आणि दरवाजा उघडणार इतक्यात मी त्याला हाक मारली, "बेबी"( मला मुलगी नाही, आणि आहे ती खुप लांब असते). तो वळला, आणि माझ्या ओठाचा चंबू बघुन परत फिरला. हसत हसत गालाचा एक छान पापा दिला. इतक्यात बायकोने दरवाजा उघडला होता. आणि ते दृश्य समोरच्या घरातील नवविवाहीतेने बघितले.
संध्याकाळी बायकोने तीने उधळलेली मुक्ताफळे अयकवली. आता दरवाजा उघडा होता हा एक निव्वळ अपघात होता. आणि उघडा आहे माहीत असते तरी माझ्यात काही ही फरक पडला असता. माझे घर , माझा मुलगा कुणाला भोचकपणा करायची काय गरज?
तीने बायकोची शिकवणी घेतली होती.
आता मुलगा मोठा झाला.
अशाने मुले पंगु होतात.
कायम आधार लागतो. वगैरे वगैरे.
ती काय म्हणते त्याकडे लक्ष देउ नकोस असे बोलुन मी विषय बंद केला.( मनातल्या मनात एक सणसणीत शिवी दिली- जातेस कुठे, येत्या सहा महिन्यात " काकु, जरा काकांना ह्यांच्याशी बोलायला सांगा हे नक्की)
हासनची मेहुणी आली आहे. हीला मुलबाळ नाही. त्यामुळे चिरंजीवांची चैन आहे सध्या. माय पण आणि मावशी पण. दिवसाला तासभर वय वर्ष २
------------------------------------------------------------------------------------------------------
काही दिवसापुर्वी माझ्या एक विद्यार्थ्याचा फोन आला. चिरंजीव लंडनला सॉफ्टवेअर इंजिनयर आहेत. ४ वर्षांनी भारतात आला होता.
एक संध्याकाळ माझ्यासाठी खास राखुन ठेवली होती. व्हिस्की बरोबर खुप गप्पा झाल्या. तिथली परिस्थीती कळली. ह्याच्या कडे 'स्किल लेवल'
उच्च पातळीची असल्याने फरक पडला नव्हता. उलट प्रगतीच झाली होती.
काय , रे घरीच राहतो आहेस ना? का हॉटेलात? - मी
"नाही सर, बाबांनी घर छान रेनोवेट केलय, कमोड पण बसवलाय. त्यामुळे घरीच."
( एके काळी चिरंजीव घरातुन दिगंबर अवस्थेत कॉमन टॉयलेट्ला धावुन जायचे)
"आई काय म्हणते आहे"- मी
"खुष आहे, स्टे वाढवायला सांगते आहे"
"मग राहा की" मी
" बायकोला ताजमहाल दाखवायचा आहे"
" ताजमहाल कुठे पळुन जातोय, पुढच्या वेळेला बघ. म्हातारी आसुसलेली आहे, तुझ्या सहवासाकरता, जा कुशीत तीच्या. तुझ्या मुलाला पण जाउ दे"
"छे, हो सर, मला तसे वाटत नाही. मी तर फक्त कडक रुप बघीतले आहे तीचे."
" अरे, ती गोष्ट त्या वेळची गरज होती" मी
"बायको समोर अवघड वाटेल"
"तुझी बायको काय थेम्स नदीच्या काठी जन्माला आली काय?, तिथे वाढलेली असली तरी मुळ भारतीयच आहे ना? आणि इंग्रज मंडळी आपल्या म्हातार्‍याना काय प्रेम देत नाहीत" - मी
"सगळ्यासमोर कसे जमणार, सर"
" अरे ***** मी काय तुला प्रेस कॉन्फरन्स भरवायला सांगतो आहे का?, आणि एवढा अवघडत असशील तर दे बायकोला शॉपिंगला पाठवुन. म्हातारी मला गावदेवी बाजारात भेटली होती. तसे थेट काही म्हणाली नाही. पण तीने काहीही न म्हणता तीला काय म्हणायचे आहे ते मला समजायची अक्कल देवाने दीली आहे." मी
हो, सर.
________________________________________________________________काल आठ वाजता परत फोन आला. ताजमहाल भेट रद्द झाली होती. लेक जवळ आल्यावर म्हातारीच्या डोळ्यातला ओघ एक तास थांबला नाही.
आणि बांध फुटलेला होता.
___________________________________________________________खरेच का आई जन्मदात्या आई वडीलांचे प्रेम घ्यायला आणि द्यायला वय आड येते? १९ वर्षी आपल्या आईला गमवुन बसलेल्या कर्म दरिद्र्याला ही मानसिकता नाही समजत बॉ. आजही कुणाचीही लाज न बाळगता तीच्या कुशीत शिरुन लहान होण्यास आवडले असते.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Jul 2009 - 9:35 am | अवलिया

:)

--अवलिया

अवलिया's picture

1 Jul 2009 - 9:43 am | अवलिया

आणि हो, तुम्ही पक्के येडचाप आहात हे विसरु नका ! :)

(येड्या मास्तरचा महायेडा मित्र ) अवलिया

मास्तर व अवलिया एकमेकांना मिठी मारुन रडत आहे असे दृश्य डोळ्यासमोर तरळुन गेले.

:)

अवलिया's picture

1 Jul 2009 - 9:50 am | अवलिया

मनापासुन दोस्ती करा ... सहज आणि अवलिया किंवा सहज आणि मास्तर पण गळ्यात गळे घालुन रडतील... :)

--अवलिया

वेताळ's picture

1 Jul 2009 - 9:56 am | वेताळ

मास्तर परत एकदा मस्तच लिहले आहे.

वेताळ

टारझन's picture

1 Jul 2009 - 10:35 am | टारझन

" आणि बोळा निघला !! " ... लवकरंच एक अत्तिशय हिण आणि हिणकस विडंबण पाडण्यात येणार आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2009 - 11:56 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, आवडला लेख.

एक मनात आलेला विचार, इतकी वर्षे भारताबाहेर राहिलोय, पण भारतात गेल्यावर (स्वतःचे घर असूनही) हाटेलात राहणारा माणूस कधीच दिसला नाही. कसे काय लोक असे करू शकतात कळले नाही अजूनही. असो.

बिपिन कार्यकर्ते

मराठी_माणूस's picture

1 Jul 2009 - 1:12 pm | मराठी_माणूस

मि प्रत्यक्ष पाहीला आहे

लंबूटांग's picture

1 Jul 2009 - 5:26 pm | लंबूटांग

मलाही अजूनपर्यंत कळलेले नाही. काही कारणे जी मी ऐकली त्यांच्याकडून

  1. एवढ्याशा घरात खूप गर्दी होते (घे की मग मोठे घर, आता छापतोयस ना इतके $$$)
  2. सारखे लोक येतात भेटायला, मग स्वतःसाठी वेळच नाही मिळत आणि घरच्यांना पण किती त्रास (च्यायला मग आलास कशाला इथे, तिथे होता ना हवा तेवढा वेळ)
  3. मुंबईजवळ असले की 'travelling' ला 'easy' पडते ना, केवढी ती गर्दी. भितीच वाटते. (हो बरे आहे तुझ्यासारखी लोके बाहेर जातायत, तेवढाच हातभार गर्दी कमी करण्याला)

सध्या तरी इतकीच आठवतायत. पण मला तरी कळत नाही की लहानपणापासून इतकी वर्षे तिथे त्याच वातावरणात राहताना न झालेला त्रास बाहेर गेल्यापासून २-४ वर्षातच अचानक कसा होऊ लागतो. आणि आई बाबांबरोबर राहताना थोडा सो कॉल्ड त्रास सहन केला तर कुठे बिघडले?

विनायक प्रभू's picture

1 Jul 2009 - 12:40 pm | विनायक प्रभू

So unclean you know. NO sanitation of toilet everyday you know.
So hOt you know.
अशी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारी लिस्ट

विंजिनेर's picture

1 Jul 2009 - 1:36 pm | विंजिनेर

बर्‍याच दिवसांनी माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मर्त्य मानवाला कळेल असे काहीतरी साधे सोपे मास्तरांनी लिहिले आहे. आवडले/कळाले :).
बाकी परदेशातून येऊन होटेलात राहणारी लोक अजुन सुदैवाने माझ्यातरी प्रत्यक्ष पाहण्यात आली नाहीयेत. पाहिलेय ते "तू तिथे मी" सारख्या चित्रपटांतच.
असो. पैसा/ऐषा-आराम माणसात कली शिरवतात हे खरे.

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

स्वाती२'s picture

1 Jul 2009 - 4:19 pm | स्वाती२

मी पाहिलेत होटेलचा मा़ज करणारी माणसे. एकाने विचारलं सुद्धा १BHK मधे कोंडल्यासारख नाही का वाटत म्हणून. तरी बरं इथे त्याच सुरुवातीला studio(1 room kitchen त्यात folding bed) च होतं.

विशाल कुलकर्णी's picture

1 Jul 2009 - 4:25 pm | विशाल कुलकर्णी

आज भर हापिसात रडिवलासा देवा !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

संदीप चित्रे's picture

1 Jul 2009 - 7:47 pm | संदीप चित्रे

हॅट्स ऑफ टू यू !
दुसरे शब्द नाहीयेत.

दशानन's picture

2 Jul 2009 - 5:46 pm | दशानन

हेच म्हणतो... !

थोडेसं नवीन !

लिखाळ's picture

1 Jul 2009 - 7:54 pm | लिखाळ

छान समुपदेशन.
--लिखाळ.

मृदुला's picture

2 Jul 2009 - 1:14 am | मृदुला

सल्ला आवडला. स्पर्शातून प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आपल्याकडेही मूळ धरेल पुन्हा.

मी अजुनपण माहेरी आले की आईच्या कुशीत झोपते. बाबांना नमस्कार करताना डोक्यावरुन फिरलेला हात आज खूप आठवला. मीतर मुलांना सवयच लावली आहे झोपायच्या आधी आई-बाबांच्या कुशीत शिरून पापी द्यायची.. पोर कितीही मोठी झाली तरी हि सवय मोडू देणार नाही मी.

पक्या's picture

2 Jul 2009 - 7:38 am | पक्या

जे बोलता येत नाही पटकन ते कधी कधी स्पर्शा द्वारे न बोलता व्यक्त केलं जातं.
फारच छान लेख. पटला .

क्रान्ति's picture

2 Jul 2009 - 8:19 am | क्रान्ति

१००% सहमत!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Jul 2009 - 5:44 pm | फ्रॅक्चर बंड्या

आवडला