वेज हैद्राबादी बिर्यानी :)

जेन's picture
जेन in पाककृती
20 Jun 2009 - 11:51 am

मित्रांनो हा माझा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे .... आणि तेही मराठीत ....माझी काही चूक झाली तर क्षमा करा ......

तसे तर ही रेसीपी नॉन वेज असते पण माझ्या सारख्या शाकाहारी लोकांना हे नक्कीच आवडेल.....चला आता सुरु करुया...

सर्व प्रथम आपण लागणार्‍या वस्तूंची लिस्ट करुया.....

हवे असलेले साहित्य :
बासमती राईस (पतेली मधे मीठ टाकून वाफायचा,सुट्टा भात करण्यासाठी त्यात १ टी स्पून तेल एड करा) : ५००ग्राम
कांदे (उभा कापलेला) : ४ते ५
टॉमेटो : ५ते ६
गाजर : २
कॅपसीकम : ३
फ्लॉवर : ५०ग्राम
वटाने : १०० ग्राम
वाफवलेल्या पालकची पेस्ट : २५०ग्राम
आले - लसूणची पेस्ट : २टेबलस्पून
गरम मसाला :१टेबलस्पून
एवरेस्ट बिर्यानी मसाला : १टी स्पून
लाल मिर्च पावडर : २टेबलस्पून
हळद पावडर : १टीस्पून
जीरा : २टी स्पून
मीठ् : चवीनुसार
सोडा :१टीस्पून
लवंग ,कडी पत्ता , इलायची, कोथींबीर गरजेनुसार
शेवटी सजावट करण्यासाठी
काजू आवडीनूसार
तेल : १ वाटी,
घी : ३/४ वाटी ,
मलाई : १वाटी
कोळसा

कृती:
सर्व प्रथम एका पॅन मधे तेल टाका, आणि ते गरम झाले की त्यात जीरा,लवंग्,कडी पत्ते आणि ईलायची टाका.
त्यानंतर उभा कापलेला कांद्यात मीठ घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत गरम करा.त्यात आल्या लसूणची पेस्ट टाका.
आता गाजर , कॅपसीकम,वटाने आणि फ्लॉवर घेऊन त्यात सोडा घालून,पॅनला धाकून त्यात पाणि सुटे तोपर्यंत शिजवा.
आता कापलेला टॉमेटो टाका आणि त्याचाही पाणि सुटेपर्यत पकवा.
पुढे त्यात पालकची पेस्ट आणि मलाई टाका .
तो उकळे तो पर्यत त्यात मीठ्,हळ्द्,लाल मीर्च्,गरम मसाला आणि एवरेस्ट मसाला टाका आणि सगळे मसाले आणि भाज्या बरोबर मिक्स करा.
हे झाले की त्यात भात टाका आणि मस्तपैकी पालकचा आणि मसालेचा रंग येईपर्यंत मिक्स करा.
सगळे झाले की शेवटी पॅन मधे बिर्याणिवर १ कोळशाचा तुकडा ठेवा आणि २ मिनीटांसाठी पॅनला झाका. पॅन उघड्ले की त्यातून मस्त तंदूरचा सुगंध येतो.
त्यानंतर एका प्लेट मधे वाढून त्यावर कोथींबीर आणि काजूने सजावट करा. बिर्याणी आपण रायता बरोबर खाऊ शकतो.

फोटो नेटवरून घेतला आहे.

ह्या पाककृती चे क्रेडीट जाते माझ्या आईला जी मला सतत अशी रेसीपी शिकवत असते.

थँक्स

प्रतिक्रिया

जागु's picture

20 Jun 2009 - 11:57 am | जागु

वा छान आहे रेसिपी.

विनायक प्रभू's picture

20 Jun 2009 - 11:58 am | विनायक प्रभू

असेच म्हण्तो.

टारझन's picture

20 Jun 2009 - 1:16 pm | टारझन

व्हेज ??????????

चालणार नाय !! मी त्यातले फ्लावर पालक आणि बाकी नको असलेले पदार्थ काढून चिकन पिस एक्टरनली टाकणार !!! पहिल्या लेखणाबद्दल अभिणंदण

- टारझन

दशानन's picture

20 Jun 2009 - 1:18 pm | दशानन
जेन's picture

20 Jun 2009 - 1:35 pm | जेन

तुला चिकन शिवाय काही दिसते कि नाही.....कधी क्धी वेज पण खायचे.....माझी कृती वाचऊयासाठी धन्यवाद.....

अवलिया's picture

20 Jun 2009 - 2:05 pm | अवलिया

काय चाललेय रे मुलांनो!!
असो, आज माझा उपास आहे तर व्हेजच खाइन म्हणतो :)

वा सुंदर फटु आणि पाकृ !
मस्त !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

जेन's picture

20 Jun 2009 - 2:09 pm | जेन

तुम्ही अगदी घाबरु णकोस.....
ह्याला ना फक्त बोलण्याची हिंमत आहे......
आणि टार्‍या फक्त णॉन वेजनेच श्कित नाही येत...
खरी शक्ति आहे ताजा ताजा भाज्येत आणि तुम्च्या बरेच दिवस फ्रोझन करुन ठेवलेला चिकन मधे णाही.......
कळलं का??

दशानन's picture

20 Jun 2009 - 2:43 pm | दशानन

+१

सहि बोललीस तु !

राजे जैन

थोडेसं नवीन !

वेताळ's picture

20 Jun 2009 - 2:16 pm | वेताळ

पहिला प्रयत्न उत्तम.
पाला खाणारा टारझन कधी बघितला नाही. त्याचे फोटो पण डकवा इथे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सहज's picture

20 Jun 2009 - 2:51 pm | सहज

पहील्यावहील्या भारी लेखाबद्दल अभिनंदन.

भारी आहे बिर्यानी.

जेन's picture

20 Jun 2009 - 2:56 pm | जेन

लोक्स माझी पाकृती वाचण्यासाठी धन्यवाद!!!!!

अविनाशकुलकर्णी's picture

20 Jun 2009 - 4:04 pm | अविनाशकुलकर्णी

मित्रांनो हा माझा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे .... आणि तेही मराठीत ....माझी काही चूक झाली तर क्षमा करा ...ते समजु शकते हो...पण बिर्याणी बनवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे का? तसा असेल तर तुम्हिच आम्हाला क्षमा करा

क्रान्ति's picture

20 Jun 2009 - 6:09 pm | क्रान्ति

मस्त खमंग चमचमीत पाकृ! फोटो तर भारीच.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

रेवती's picture

20 Jun 2009 - 6:29 pm | रेवती

चला......मिपाच्या अजून एका सुनेने स्वयंपाक मनावर घेतला म्हणायचा. काही दिवसांपूर्वी सौ. धमाल यांनीही पाकृ विभागात आपले प्रयत्न केल्याचे आठवते.
टार्‍या, व्हेज कि नॉन्-व्हेज ह्या वादात पडण्याआधी बायको चांगलं काहीतरी रांधून वाढतीये तर त्याचं कौतुक कर.
आम्हाला पाकृ आवडली!
शाब्बास सूनबाई!;)
रेवती

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2009 - 7:20 pm | स्वाती दिनेश

टार्‍या, व्हेज कि नॉन्-व्हेज ह्या वादात पडण्याआधी बायको चांगलं काहीतरी रांधून वाढतीये तर त्याचं कौतुक कर.
आम्हाला पाकृ आवडली! ;)
शाब्बास सूनबाई!

रेवतीसारखेच म्हणते.. :)
स्वाती

जेन's picture

20 Jun 2009 - 6:38 pm | जेन

बरोबर बोलला तुम्ही रेवती काकू.....
जेवण वेज असो कि नॉन वेज वाढणार्‍याच्या भावना समजून खाणार तर काय वेज आणि काय नॉन वेज........
शाबासकी साठी धन्यवाद!!!!!!:)

लवंगी's picture

20 Jun 2009 - 6:48 pm | लवंगी

अग, इतकि छान बिर्याणी दिसतेय कि यासाठि कुणीहि हसत हसत शाकाहारी होईल..

श्रीयुत संतोष जोशी's picture

21 Jun 2009 - 6:09 pm | श्रीयुत संतोष जोशी

फोटो क्लासिक आलाय. एकदम टेम्प्टींग .

पण एक सांगु का ?

हैद्राबादी बिर्याणी शक्यतोवर ) म्हणजे मी आत्तापर्यंत खाल्ली तेव्हा ती हिरवी असते . व्हेज. - नॉन व्हेज . कोणतीही (.

अगदी सहज म्हणून सांगितले. बाकी पाककृती भारी आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

जेन's picture

21 Jun 2009 - 6:17 pm | जेन

मी फक्त कृती टाकलेली आहे......
जेव्हा बनवणार नेक्स्ट टाईम नक्कीच फोटो टाकेल......

श्रीयुत संतोष जोशी's picture

22 Jun 2009 - 10:51 am | श्रीयुत संतोष जोशी

नको नको
नुसता फोटो नको. थोडी पार्सल पण करा.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विसोबा खेचर's picture

21 Jun 2009 - 7:30 pm | विसोबा खेचर

ह्या धाग्यातील बरेचसे अवांतर प्रतिसाद उडवले आहेत..

मिपावरील मोकळ्या वातावरणाचा आणि स्वातंत्र्याचा प्रत्येकच ठिकाणी गैरफायदा घेऊन अवांतर प्रतिसाद देण्याचे टाळावे. त्याकरता खरडवही आणि खरडायच्या फळ्याची सोय केलेली आहे...

कृपया सहकार्य करावे..

तात्या.

मसक्कली's picture

6 Jul 2009 - 4:57 pm | मसक्कली

आपल्याला २ नि पन जमतय्......कहिहि चलेल हो......;)

वेगळे पदार्थ मी आवडीने खाते :)

बकि फोटो तुमच्या प.क्रु.चा नहि वाट्त..... B)

आसो पन चान दिसत आहे फोटो..... ;)

शितल's picture

6 Jul 2009 - 9:11 pm | शितल

जेन,
मस्त पाककृती. :)
आता आईच्या हाताची खायला एकदा बोलव. :)