ब्रेडची भजी (ब्रेड पकोडा)

चकली's picture
चकली in पाककृती
19 Jun 2009 - 6:59 pm

Bread Pakoda

१६ बाईट साईझ भजी
वेळ: ४० मिनीटे (बटाटा भाजी + भजी)

breadchi bhaji, bajji, bhajji, bread pakoda, pakora, mansoon special bhajji

bread pakoda, pavachi bhaji

साहित्य:
८ ब्रेड स्लाईस
दिड कप बटाट्याची तिखट भाजी (३ ते ४ मध्यम बटाटे)
१ कप बेसन
२ टेस्पून तांदूळ पिठ
१ कप पाणी
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून जिरे
चिमुटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात आणि गुठळ्या राहात नाही. बटाट्याची भाजी जरा तिखट असावी नाहीतर भजी तळल्यावर तिखटपणा कमी लागतो.
२) वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र मिक्स करावे त्यात पाणी घालून पिठ भिजवावे. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
३) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात (टीप १) एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. सुरीने आवडीनुसार कापून तुकडे करावेत. (टीप २)
४) प्रत्येक तुकड्यावर पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे. (टीप ३)
५) तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत.
सर्व्ह करताना पुदीना चटणी, चिंचेची चटणी, किंवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे. ज्यांना एक्स्ट्रा स्पाईसी खायला आवडत असेल त्यांनी शेजवान सॉसबरोबर हे पकोडे ट्राय करून पाहावेत.

टीप:
१) उरलेल्या पिठात थोडी जिरपूड, लाल तिखट, आमचूर किंवा चाट मसाला घालून मिक्स करावे ब्रेडच्या उरलेल्या कडा या पिठात घोळवून भजीप्रमाणेच तळाव्यात.
२) दुकानात किंवा गाडीवर त्रिकोणी तुकडे मिळतात. मी शक्यतो ४ तुकडे करते म्हणजे खायला सोपे पडते.
३) ब्रेडचा कोरडा तुकडा पिठात घोळवल्यावर, तो पिठ आत शोषून घेतो आणि मग आतपर्यंत गेलेले पिठ निट न शिजल्याने भजी कच्ची राहते म्हणून ब्रेडवर थोडे पाणी शिंपडल्याने, पिठ आतपर्यंत शोषले जात नाही आणि भजी छान तळली जाते.
४) जर प्लेन पकोडे बनवायचे असतील तर बटाट्याची भाजी करू नये फक्त ब्रेडचे कापलेले तुकडे भिजवलेल्या पिठात बुडवून नेहमीसारखे तळावे.

चकली
http://chakali.blogspot.com

प्रतिक्रिया

रेवती's picture

19 Jun 2009 - 7:07 pm | रेवती

बाहेर पाउस पडतोय आणि चकलीताईनं अशी काही फर्मास पाककृती दिली आहे की बास! डोळ्यांमुळे मनाला त्रास होतो आहे.;)
आता ही पाकृ ट्राय न करणारे लोक विरळाच!

रेवती

नितिन थत्ते's picture

19 Jun 2009 - 7:30 pm | नितिन थत्ते

कुठाय पाऊस?

बाकी पाकृ खासच.

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्राजु's picture

19 Jun 2009 - 8:28 pm | प्राजु

ब्रेडच्या आत बटाट्याचे स्टफिंग करून तळणे...
मस्त आहे आयडीया. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

19 Jun 2009 - 8:29 pm | मदनबाण

चकली ताय...एकदम मस्तच.
हा प्रकार बर्‍याच वेळा ट्राय केला आहे(घरी नाही बाहेर),पण बर्‍याच ठि़काणी मधली बटुची भाजी कमी घातलेली मिळाली...तेव्हा एव्हढी मजा नाही येत.
बटाट्याची भाजी जरा तिखट
भाजी तिखट नसेल तर मजाच नाही !!! :)

(खादाड)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

बहुगुणी's picture

19 Jun 2009 - 8:51 pm | बहुगुणी

आमच्या शाळेच्या समोरच्या एका(च!) दुकानात मिळायचा, आणि ते पाववडे (हो या नावाने ते विकले जायचे तेंव्हा) त्या दुकानाच्या मालकीण बाई मधल्या सुटीत मोजून १००च करायच्या, त्यामुळे ते घेण्यासाठी मरणाची गर्दी उसळायची त्याची आठवण झाली. विशेषतः पावसाळ्यात. धन्यवाद, चकलीताई, एका उत्तम पदार्थाची सचित्र आठवण करून दिल्याबद्दल!

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jun 2009 - 11:14 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह एका मस्त पदार्थाची पाकृ.. वाह वाह.. आमच्या शाळेत हाच पदार्थ पाव-पॅटीस म्हणून मिळायचा... लई भारी लागतो..

(अख्खा पाव-पॅटीस प्रेमी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

20 Jun 2009 - 12:17 am | विसोबा खेचर

सु रे ख..!

आपला,
(चकलीचा मित्र) तात्या.

Nile's picture

20 Jun 2009 - 12:21 am | Nile

(चकलीचा मित्र) तात्या.

म्हणजे कडबोळं का हो तात्या? ;)

शाल्मली's picture

20 Jun 2009 - 12:46 am | शाल्मली

वॉव!!
खतरनाक फोटो!
तू प्लेन पकोड्यांचा उल्लेख केला आहेस ना, तसे बरेचदा मी जेवताना तोंडीलावणं म्हणून करते. मस्त लागतात.
पण बटाट्याची भाजी मधे घालून भजी म्हणजे एकदम झकासच आहे कल्पना :)

--शाल्मली.

क्रान्ति's picture

20 Jun 2009 - 6:11 pm | क्रान्ति

मस्त पाकृ. फोटो पण सुरेख.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

मितालि's picture

20 Jun 2009 - 8:26 pm | मितालि

छान आहे पाककृती.. रत्नागिरीत कॉलेज कॅन्टीन मधे या भजी सोबत दहयाची चटणी मिळते..दह्यात थोडी साखर, मीठ, मिरचीपुड, कोथिंबीर व पाणी घालुन तिखट व गोड चटणी बनवतात..

चकली's picture

22 Jun 2009 - 9:57 pm | चकली

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !!

चकली
http://chakali.blogspot.com

कच्चा कान्दा's picture

3 Jul 2009 - 1:25 am | कच्चा कान्दा

या ब्रेड-पकोड्यावर थोडासा चाट मसाला टाकून खाल्लीये कोणी ?
मी प्रथम लातूर ला हा पदार्थ खाल्ला होता. वैद्य होटेल मध्ये...!!!

धन्यवाद चकलीताई..

---
कच्चा कांदा..

आशिष सुर्वे's picture

4 Jul 2009 - 12:29 am | आशिष सुर्वे

येऊदेत... अजून 'ब्रेड' चे पदार्थ येऊदेत.

बा़की 'ब्रेड' म्हणजे आपला 'कच्चा बिन्दू' बरे का!

सँडी's picture

4 Jul 2009 - 6:57 am | सँडी

हेच म्हणतो!

फोटो पण मस्तच! परफेक्ट खादाडी...

मसक्कली's picture

6 Jul 2009 - 5:13 pm | मसक्कली

आमि पन केल होत , मस्त लगत हे......;)

यात महत्वाचि म्हनचे बटट्याचि भाजि आहे तिचि तेस्त चन्गलि आसेल कि आपोआप ब्रेद पकोदा चन लगतो......टोम्याटो केचप सोबत फार चान लगत्.............यम्मि.......... =P~ 8>