पद्मसिंह पाटलांना अटक

टायगर's picture
टायगर in काथ्याकूट
6 Jun 2009 - 10:36 pm
गाभा: 

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी खासदार पद्मसिंह पाटील यांनी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पद्मसिंह पाटील हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसातच पद्मसिंह पाटील यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. आता त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

प्रतिक्रिया

निळु's picture

6 Jun 2009 - 11:19 pm | निळु

नुसती अटक होऊन उपयोग नाही तर कठोर शि़क्षा व्हावयास हवी.

सँडी's picture

6 Jun 2009 - 11:38 pm | सँडी

पहातोय आयबीएनवर...

शरदराव, संभ्रम दुर करा आता. कठीण आहे.

निदान आतातरी डोळे उघडावेत ही अपेक्षा आहे आता.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

तिमा's picture

7 Jun 2009 - 10:45 am | तिमा

या राक्षसी ताकद असलेल्या नेत्यांची अशीच सुंदोपसुंदी चालू दे जेणेकरुन सामान्य नागरिक यांच्या कचाट्यातून सुटण्याची आशा तरी जिवंत राहील.
'तिजोर्‍यांत केले त्यांनी बंद स्वर्ग सात' हे अशा सर्वच नेत्यांना लागू आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

अविनाशकुलकर्णी's picture

7 Jun 2009 - 11:18 am | अविनाशकुलकर्णी

राजकिय रक्षण व आरक्षण हवे या नेत्यांना

ज्याला मारले तोही मोठा राजकारणी होता. त्याच्या नातलगांचे हात लांब पोचत होते म्हणून ते सीबीआय द्वारा तपास घडवून आणू शकले आणि ह्या पाटलापर्यंत पोचू शकले. सामान्य कुणी असता तर काही घडले नसते.
अर्थात ह्यापुढचा तपासही कुणाकडे जास्त सत्ता आहे कोण वरची चक्रे जास्त जोरात फिरवतो त्यावर अवलंबून असणार. खरेखोटे काय ह्याची शहानिशा करण्याचा भाग कमीच.

कुठल्याही बड्या धेंडाला अटक झाली की त्याच्या छातीत दुखते वा रक्तदाब वाढतो आणि तो इस्पितळात भरती होतो. असल्या बड्या लोकांकरता तुरुंगातच एक वॉर्ड उघडावा म्हणजे असल्या सबबी निघणार नाहीत.

शैलेन्द्र's picture

8 Jun 2009 - 10:38 am | शैलेन्द्र

शरद पवारांना काँग्रेसने व्यवस्थित कोंडलय, पवारांची सगळी निगोशीएशन पॉवर संपलीय.

चिरोटा's picture

8 Jun 2009 - 10:47 am | चिरोटा

पवार ह्यांचे मेव्हणे आहेत ना? धुतल्या तांदळासारखे स्वछ्छ पवार आता काहिच बोलणार नाहीत. अगदीच विचारले तर 'आरोप अजुन सिध्ध झालेला नाही.आरोप सिध्ध झाल्यावरच आपण बोलु' असे गुळमुळीत उत्तर देतील.
आज महाराष्टात सर्वच राजकिय पक्ष खुनबाजीत उस्ताद झाले आहेत.राष्ट्रवादी तर बेहिशोबी पैसेवाल्यांचे ,गुंडांचे खास पालनपोषण करते असे ऐकुन आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

अडाणि's picture

8 Jun 2009 - 9:49 pm | अडाणि

हे नक्की का ?

माझ्या माहितीप्रमाणे प्रो. एन. डी. पाटील हे त्यांचे मेव्हणे आहेत... तुमची काही गल्लत झालिये का माझी माहिती अपुरी आहे?

-
अफाट जगातील एक अडाणि.

निळु's picture

10 Jun 2009 - 2:14 pm | निळु

प्रो. एन. डी. पाटील हे शरद पवारचे मेव्हणे (बहिणीचे मिस्टर)आहेत.अजित पवार हे पद्म सिंहाचे मेव्हणे आहेत.

शेवटी काय घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे!

mamuvinod's picture

8 Jun 2009 - 7:14 pm | mamuvinod

तुमचे तर नगरसेवक ते खासदार सगळेच गुन्हेगार आहेत. राष्ट्रवादी तर बेहिशोबी पैसेवाल्यांचे ,गुंडांचे हक्काचे घर आहे.

केशवराव's picture

8 Jun 2009 - 7:55 pm | केशवराव

अगदी असेच झाले ना?

हरकाम्या's picture

9 Jun 2009 - 1:44 am | हरकाम्या

एका माजी ग्रुहमंत्र्याने हे करावे राष्ट्र्वादीवाले हे पाप कुठे फेडतील ?

हुप्प्या's picture

9 Jun 2009 - 7:26 am | हुप्प्या

मला एक न कळलेले गूढ म्हणजे भाजपाचा कुणी नगरसेवक मोहन शुक्ला ह्याने ही सुपारी मारेकर्‍यांपर्यंत पोचवायला केलेली मदत.
म्हणजे असली कामे समस्त पक्ष आपसातले राजकीय फरक विसरून एकत्रपणे करतात का?
आणि पकडले गेले तर पक्षातून हकालपट्टी वगैरे वरवरची मलमपट्टी आहेच रामबाण.

आम्हाघरीधन's picture

9 Jun 2009 - 12:00 pm | आम्हाघरीधन

उत्तर प्रदेशातील बसपा नेत्यांपर्यंत हे प्रकरण गुंतले आहे असे वाचणात आले.
सर्वपक्षीय गुन्हेगारी सुरु आहे याचेच हे द्योतक ....

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पवनराजे निंबाळकरांच्या हत्येप्रकरणात पद्मसिंह पाटील गुन्हेगार असतीलही असे ग्रहीत धरले, पण त्याला पक्ष किंवा पक्षाचा नेता जवाबदार असतो असे म्हणने बिल्कूल पटत नाही. तसेही आज सर्वच दैनिकात प्रफूल्ल पटेलांनी सांगितले आहे की, जर पद्मसिंह पाटील दोषी आढळले तर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात येइल. उद्या काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्याने सामान्य माणसाला गल्लीत एखाद्याला चोप दिला,याचा अर्थ काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते त्या गोष्टीला जवाबदार आहेत असे होत नाही. त्यामुळे शरद पवारांवर विनाकारण आगपाखड करणे योग्य नाही. राहिले राजकीय पक्षातील नेत्यांचे गुन्हेगारीकरण ते तर सर्वच पक्षात आहेत. ते तसे असूनही आपण त्यांना निवडून देतो आणि पुन्हा गुन्हेगार सत्तेवर येतात म्हणून बोंबलत बसतो.

त्यापेक्षा मला कमाल वाटली ती विरोधी पक्षाचे नेते रामदास कदम यांची. सभागृहातील कितीतरी महत्वाच्या प्रश्नांची चर्चा बाजूला ठेवून हे राज्य गुन्हेगारीला प्रोत्साहान देते. असा आरडा-ओरडा करीत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. अर्थात राजकारणातील गुन्हेगारी मोठा प्रश्न आहे हे नक्की. अशा आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, हेही खरं आहे. पण अशा प्रसंगी आपण आपली विवेकशक्ती गमावू नये असे वाटते म्हणून हा प्रपंच ! :)

-दिलीप बिरुटे
(शरदपवारांचा फॅन)

कुंदन's picture

9 Jun 2009 - 2:31 pm | कुंदन

>>शरद पवारांवर विनाकारण आगपाखड करणे योग्य नाही.
सहमत.....
यावर्षी भारत रत्न साठी शिफारस करावी का त्यांची?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 2:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>यावर्षी भारत रत्न साठी शिफारस करावी का त्यांची?

अरेरे ! किती त्रास करुन घेता. :)

मुळातच राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातील गुंडापूंडाचा पक्ष आहे.आपन शिवसेनेतील गुंडगिरी बद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या खुनशी गुन्हेगारप्रवृतीबद्दल दुर्लक्ष करतो हे चुकीचे आहे.शरद पवार व अजित पवार महाराष्ट्रात गुंडगिरीला प्रोहत्साहन देतात,गुन्हेगारांच्या पाठीशी आपले राजकिय वरदहस्त ठेवतात हे कित्येकदा स्पष्टपणे दुसुन आले आहे.पवार साहेबानी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीना आपल्या खासगी विमानातुन सफर घडवली होती हे तुम्ही विसरला काय? पिंपरी-चिंचवड मध्ये तिवेकर नगरसेवकाच्या खुना पाठीमागे कोणाचा हात आहे? निंबाळकराच्या खुनाची सुपारी कोणी दिली? इस्लामपुर मध्ये दोन भावाचा खुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने कोणाच्या सांगण्यावरुन केला.? असे कितीतरी खुनाची उत्तरे राष्ट्रवादी कडुन मिळायची बाकी आहेत.
रामदास कदम ह्यानी विधानसभेत तो प्रश्न अगदी योग्यरीतीने मांडला ह्यात काहीच शंका नाही. कारण ओरडुन बोलल्याशिवाय तुमचे म्हणणे ह्या जगात कोण एकत नाही. व एका माजी गृहमंत्र्याने व विद्य्मान खासदाराने खुनाची सुपारी देणे किती शरमेची बाब आहे हे तुम्हाला कसे कळणार? ह्यावर सगळ्यानी आवाज उठवणे गरजेचे आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या पक्षात गुंडप्रवृत्तीची माणसं नाहीत ते सांगा. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील गुन्हेगारीची आकडेवारी १अशी असतांना कोणत्याही पक्षाला सज्जन मीही म्हणत नाही. फक्त 'हत्येच्या प्रकरणाचा' थेट शरद पवारांशी कसा संबंध आहे, तितके पटवून द्या...!

नेत्यांच्या विमानात, लग्न समारंभात, सभेत, गुंड माणसे दिसतात म्हणून त्यांचा त्यांच्याशी संबंध आहेच हे म्हणने तितकेसे पटत नाही.

संदर्भ : १ ) विकासरावांच्या उपक्रमच्या खरडीतून आकडेवारीचा दुवा उचलला आहे.

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2009 - 6:36 pm | मुक्तसुनीत

नेत्यांच्या विमानात, लग्न समारंभात, सभेत, गुंड माणसे दिसतात म्हणून त्यांचा त्यांच्याशी संबंध आहेच हे म्हणने तितकेसे पटत नाही.

खरे आहे .... नेत्यांच्या विमानात , घरात , लग्नात गुंड माणसे दिसणे हा एक निव्वळ योगायोगाचा भाग आहे. भाई ठाकूर , पप्पू कलानी , पद्मसिंग पाटील यांचे पवार साहेबांभोवती असणे म्हणजे बोलाफुलाची गाठ आहे. पत्रकार , विरोधी पक्षनेते रामदास कदम वगैरे वगैरे मंडळी लोकांची दिशाभूल करतात. पवारांना , पद्मसिंग पाटलांना देव्हार्‍यात ठेवायचे सोडून , "योगायोगाने" घडणार्‍या खून , खंडणी सारख्या किरकोळ घटनांबद्दल त्यांना दोष देणे कितपत योग्य आहे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>नेत्यांच्या विमानात , घरात , लग्नात गुंड माणसे दिसणे हा एक निव्वळ योगायोगाचा भाग आहे. भाई ठाकूर , पप्पू कलानी , पद्मसिंग पाटील यांचे पवार साहेबांभोवती असणे म्हणजे बोलाफुलाची गाठ आहे.

शरद पवारांकडेच पाहतांना असा चश्मा का लावायचा ? इतर कोणत्या नेत्यांबरोबर असा भाई परिवार नाही का ? राजकारणी आणि कलाकारांचे संबध कोणा-कोणाशी कसे-कसे आहेत, हे सर्वांना ठाऊक आहेत, त्यात नवल ते काय !

>>"योगायोगाने" घडणार्‍या खून , खंडणी सारख्या किरकोळ घटनांबद्दल त्यांना दोष देणे कितपत योग्य आहे ?

हम्म ! अशा सर्वच गोष्टींना शरद पवार,सोनिया गांधी,अटलबिहारी बाजपेयी,बाळासाहेब ठाकरे, जवाबदार आहेत, असे म्हणायचे का ? अतिशय शुल्लक घटनाही जेव्हा घडते, तेव्हाच कायद्याने त्यांना योग्य प्रतिबंध केला असता तर, अशा प्रसंगी याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची गरज पडली नसते असही वाटते.

-दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2009 - 9:23 pm | मुक्तसुनीत

शरद पवारांकडेच पाहतांना असा चश्मा का लावायचा ? इतर कोणत्या नेत्यांबरोबर असा भाई परिवार नाही का ? राजकारणी आणि कलाकारांचे संबध कोणा-कोणाशी कसे-कसे आहेत, हे सर्वांना ठाऊक आहेत, त्यात नवल ते काय !

प्रस्तुत संदर्भ पद्मसिन्ग पाटील --> शरद पवार असा आहे. प्रस्तुत चर्चा सुद्धा त्यांच्याबद्दल आहे. म्हणून त्यांचा उल्लेख. चष्मा कसला समजले नाही बॉ ! :-)

अतिशय शुल्लक घटनाही जेव्हा घडते, तेव्हाच कायद्याने त्यांना योग्य प्रतिबंध केला असता तर, अशा प्रसंगी याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची गरज पडली नसते असही वाटते.

प्रस्तुत संदर्भात एका व्यक्तिचा खून पडला आहे. ही घटना सर्वसामान्यपणे क्षुल्लक समजली जात नाही. बाकी पुढचे विधान म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणता आले असते या धर्तीचे ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2009 - 10:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदर्भहीन (आणि आत्याबाईच्या मिशावर )चर्चा होत आहे, असे निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी !

या चर्चेतील आपल्या प्रतिसादाचा आदर करुन, आपल्या प्रतिसादास आमचा हा शेवटचा उपप्रतिसाद, धन्यवाद !

-दिलीप बिरुटे
(आभारी )

यन्ना _रास्कला's picture

10 Jun 2009 - 8:31 am | यन्ना _रास्कला

प्रस्तुत संदर्भात एका व्यक्तिचा खून पडला आहे. ही घटना सर्वसामान्यपणे क्षुल्लक समजली जात नाही.

आनि आन्ना हजारेची पन सुपारी दिलि व्हती त्याच काय. तो त द्येवमानुस. लाजा नाहित ह्या राजकारनी लोकान्ला आनी पदमसिव्ह आनि राश्ट्रवादिच समर्थन करनार्‍याना.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

रामपुरी's picture

11 Jun 2009 - 10:48 pm | रामपुरी

आण्णा हजारे कुठला देवमाणूस? तो माणूस पण पक्का राजकारणी आहे. यांना भ्रष्टाचारी मंत्र्यांची नावे जाहीर करायला मुहुर्त लागतो (कि न जाहीर करायला आणखी काही लागते???). तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. सगळा चोरांचा बाजार आहे. प्रसिद्धीच्या झोतात रहायला दर दोन महीन्यांनी उगीच काहितरी वावड्या उठवायच्या आणि नंतर माफी मागायची. पण त्याना सांगायला हवं कि लोक असल्या युक्त्यांना फार काळ फसत नाहीत.

आम्हाघरीधन's picture

9 Jun 2009 - 3:18 pm | आम्हाघरीधन

केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर भाजपा, शिवसेना, कौन्ग्रेस्स, आर पी आय, आदी सर्व पक्षांना गुंड लोक लागतातच.......

भाजपाच्या परळी वैजीनाथ येथील गुंडगिरीचा अनुभव बीड - परळीकरांना जरूर विचारा. शिवसेनेचा तर संपूर्ण महाराष्ट्रात आवाज आहे.. मनसे पण त्याच वाटेवर आहे. कोन्ग्रेस तर यात माहीर आहेच..
कुणाकुणाला नावं ठेवावीत..... सर्वच एका माळेचे मणी आहेत.

आताच कोणीतरी म्हणाले 'भरती चालु आहे '.....

तिमा's picture

9 Jun 2009 - 5:50 pm | तिमा

तुम्हाला सगळ्यांना उगाचच या राजकारण्यांचा राग आलाय. अहो, त्यांच्या दृष्टीने विचार करुन पहा, इतका पैसा आणि सत्ता तुमच्याकडे आली तर तुम्ही कसे वागाल याची खात्री देऊ शकता ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

प्रकाश घाटपांडे's picture

9 Jun 2009 - 7:54 pm | प्रकाश घाटपांडे

सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाण प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे गुंडगिरी आहेच. पक्षांचा परस्परांवर सकारात्मक दबाव असण्याऐवजी नकरात्मक मोकळीक दिसुन येते. तु मारल्यासारख कर मी लागल्यासारख करतो. आपण सगळे मिळुन जनतेला लुटू यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

शरद पवार त्यांना वाचवतीलच ! "सी बी आय" ला मॅनेज करता येतं हे लक्षात ठेवा. शेवटी तीही मानसं च आहेत.

नितिन थत्ते's picture

9 Jun 2009 - 9:35 pm | नितिन थत्ते

>>"सी बी आय" ला मॅनेज करता येतं हे लक्षात ठेवा

सहमत. अडवाणी नाही का बाबरी मशीद प्रकरणातून निर्दोष सुटले?
बाबरी मशिदीचे सारे प्रकरण जगाच्या देखत करूनही!!
(ते तर पंतप्रधानही व्हायच्या तयारीत होते)

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 8:46 am | विसोबा खेचर

अण्णा हजारेंच्या जिवालाही भिती आहे. त्यांच्याही नावाची सुपारी दिली गेली होती!

असो,

राजकीय पक्ष = गुन्हेगारी, गुंडगिरी

असे आता समीकरणच झाले आहे. त्यात नवल ते काय?

आपला,
(बेशरम) तात्या.

मराठी_माणूस's picture

10 Jun 2009 - 11:01 am | मराठी_माणूस

राजकारणी गुन्हेगाराशी संबंधीत असतात असे असुन सुध्दा काही लोक त्यांचे फॅन असतात हे काही समजत नाही

निशिगंध's picture

11 Jun 2009 - 9:47 pm | निशिगंध

आता कसे वाटतेय !!!!!!!
बर बर वाटतेय..

____ नि शि गं ध ____