निवडणुक निकाल आंतरजालावर कुठे दिसेल?

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
16 May 2009 - 8:19 am
गाभा: 

लोकसभा निवडाणूकीचा निकाल आंतरजालावर कुठे दिसेल?
चांगले खात्रीशीर संस्थळ माहित असेल तर सुचवा.

धन्यवाद,

गणा मास्तर
सरपंच
भोकरवाडी ग्रुप ग्रामपंचायत.

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

16 May 2009 - 8:42 am | बहुगुणी

हे संस्थळ पहा.

विकास's picture

16 May 2009 - 8:45 am | विकास

http://www.ndtv.com/news/index.php (येथे लाइव्ह टिव्ही बघण्याची सरळ सोय आहे)

http://ibnlive.in.com/politics/index.html (येथे जर साइन अप केले तर लाईव्ह टिव्हीपण पहाता येतो)

दोन्हीकडचे सध्याचे कोण पुढे आहेत संदर्भातील निकाल वेगवेगळे आहेत... जरी शेवटी ते समान झाले तरी

मदनबाण's picture

16 May 2009 - 8:59 am | मदनबाण

http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=5425

अवांतर :--- घोडेबाजारात एका घोड्याचा भाव काय असावा ?
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

जृंभणश्वान's picture

16 May 2009 - 9:06 am | जृंभणश्वान

टि व्ही बघायचा असेल तर आयबीन लोकमत बघा
http://www.idesitv.com/nepal.php

पण सावधान ! सतत वागळेमहाराजांना सहन करायची क्षमता असेल तरच बघा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूक आयोगाच्या अधिकृत या संकेतस्थळावर बघा ! (सर्व्हर बीझी येतो तिथेही )

गणा मास्तर's picture

16 May 2009 - 9:39 am | गणा मास्तर

प्रत्येकजण वेगळीच माहिती दाखवतोय, म्हणुन खात्रीशीर माहिती देणारे संस्थळ हवे होते.
लाईव्ह टीव्हीमध्ये त्यांची भांडणे पाहुन वैताग आला आहे.
(पाच वर्षे सहन करायचे आहे गणा...)
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

या वृत्तानुसार.

याच संस्थळावर एक्झिट पोल्सच्या योग्यतेविषयी टिप्पणीही आहे.

बहुगुणी's picture

16 May 2009 - 10:21 am | बहुगुणी

मार्गारेट अल्वा, मणिशंकर अय्यर, जयाप्रदा, आणि पी. चिदंबरम!

टाईम्स च्या ताज्या वृत्तानुसार पी. चिदंबरम यांनी पिछाडी भरून काढलीय, ते सध्या पुढे आहेत. पण एन डी टी व्ही मात्र ते अजून मागेच असल्याचं दाखवतोय.

Nile's picture

16 May 2009 - 10:59 am | Nile

फारच उत्सुकता ताणलेली दिसते ;). हे सुरवातीला होणारच. संध्याकाळीच (भा.प्र.वे.) सगळं स्पष्ट होईल. :)

बाकी मु.म. जोशी ही झोपले वाटत!

विकास's picture

16 May 2009 - 4:30 pm | विकास

चिदंबरम हरले.

Nile's picture

16 May 2009 - 11:39 pm | Nile

Chidambaram wins after recount :)

आता बोला! :)

भोचक's picture

16 May 2009 - 11:52 am | भोचक

इथे पहा निकाल. अगदी डिटेलमंदी.

http://in.webdunia.com/marathi/election/ElectionResults2009Map.aspx

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

अनामिका's picture

16 May 2009 - 11:52 am | अनामिका

मु म जोशी जागे आहेत अजुनतरी #:S
मुंबई बद्दल काय माहिती.मनसे एखादि तरी जगा मिळवणार कि स्वकियांविरुद्ध उघडलेल्या आघाडीमुळे काँग्रेसचाच फायदा करुन देणार?
याला म्हणतात" तुला नाही मला आणि घाल कुत्र्याला"
>:P

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अनामिका's picture

16 May 2009 - 1:20 pm | अनामिका

सेनेला ठाण्याचा गड राखण्यात अपयश
...........
:(
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 1:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेनेचा एकही उमेदवार येत नाही. (बाळा नांदगावरकर लढत देत आहे म्हणे)
अहो, सेनेचे नेतृत्व एका पुचाट माणसाच्या हाती दिल्यावर काय होणार ?
(राज ठाकरेंचे नेतृत्व असते तर चित्र वेगळेच दिसले असते)

वयक्तिक मला काँग्रेस विजयी होत असल्याचा आनंद नाही. पण काहींची मस्ती उतरल्याचा नक्कीच आनंद आहे.

-दिलीप बिरुटे

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 11:49 pm | नितिन थत्ते

हे आम्हाला आनंद परांजपेला ठाण्याऐवजी कल्याणहून उभे केले तेव्हाच कळले होते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अनामिका's picture

16 May 2009 - 4:03 pm | अनामिका

डॉक्टर!

सेनेचे नेतृत्व "राजच्या "हातीच असायला हवे होते याबद्दल दुमत असु शकत नाही.
राजचा आक्रमकपणा उद्धवच्या अंगी खचितच नाही.
पण ज्या मराठीच्या मुद्द्यावरुन राजने रान उठवले होते त्यामधे तो यशस्वी झाला का ?तर नाही हेच त्याला उत्तर.
संजय निरुपम जिंकुन येणे हे उदाहरण फार बोलके आहे...........शेवटी काय तर दुहीचा जो शाप महाराष्ट्राला पुर्वापार नेस्तनाबूत करत आला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली..............राम नाईकांसारख्या प्रामाणि़क कार्यकर्त्याचा पराभव होणे ही मुंबईतल्या मराठी माणसांसाठी नामुष्कीची घटना नाही का?
माज उतरण्या मागे तुमचा रोख कुणाकडे आहे ते समजले पण आता ज्यांना नको इतका माज चढेल त्यांचे काय करायचे..............शेवटि त्यांचा माज महाराष्ट्राच्या मुळावर उठला नाही म्हणजे मिळवले?
या लोकसभा निवडणुकत ज्या प्रकारे काँग्रेस व आघाडिला बहुमत मिळाले आहे त्याची कल्पना आज सकाळपर्यंत काँग्रेसने देखिल केली नसेल याची खात्री आहे.............भाजपाला आत्मपरिक्षणाची गरज आहेच आहे पण त्याहीपेक्षा ती डाव्यापक्षांना अधिक आहे .
विरोधासाठी विरोध करुन मते मिळत नाही हे रालोआ ला देखिल कळले असेलच............ आणि निदान महाराष्ट्रात काँग्रेस जास्त जागा मिळवु शकला असल्या कारणाने राष्ट्रवादीला आता कायम आपल्या टाचेखाली दाबायचा प्रयत्न करणार.
मला स्वतःला विचाराला तर खरच अडवाणी पंतप्रधान न झाल्याने दु:ख झालय....त्याचबरोबर ठाण्याचा गड राखण्यात सेनेला अपयश आल याची देखिल खंत आहेच .पण त्यातदेखिल आनंदाची गोष्ट म्हणजे अंतुलेंचा झालेला दारुण पराभव.
निदान रायगड्च्या सुज्ञ मतदारांनी अंतुलेंना त्यांची खरी जागा दाखवली .
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, मॅडम !
>>मराठीच्या मुद्द्यावरुन राजने रान उठवले होते त्यामधे तो यशस्वी झाला का ?
येस्स ! तो यशस्वीच झाला आहे. आपण दिलेले उमेदवार निवडून येणार नाहीत हे राज ठाकरेंना माहित नाही का ? ( मुंबैच्या लढती सोडल्या तर..) पण स्वतःला अजमावण्याची ही एक संधी होती. आपण नाही निवडून आलो तरी आपण काहींना पाडू शकतो हा संदेश या लोकसभेच्या निमित्ताने त्यांनी दिला असे वाटते. ( ही चर्चा बरेच काही सांगते)

>>ज्यांना नको इतका माज चढेल त्यांचे काय करायचे..............शेवटि त्यांचा माज महाराष्ट्राच्या मुळावर उठला नाही म्हणजे मिळवले?

हम्म :( हा एक प्रश्न मोठा आहे खरा...!

>>पण त्यातदेखिल आनंदाची गोष्ट म्हणजे अंतुलेंचा झालेला दारुण पराभव.
त्यांच्या पराभवाने मलाही आनंद झाला. त्यांनाही लै पुळका त्या..त्या...असो.

>>भाजपाला आत्मपरिक्षणाची गरज आहेच आहे
हो, आता आत्मचिंतनाच्या बैठका होतील ( पार्टी के हार की समीक्षा की जायेगी) नंतर भोजन, आणि मग विश्रांती या त्यांच्या नियमित कार्यक्रमात फारसे बदल होतील असे वाटत नाही.

-दिलीप बिरुटे