नारळ खवण्याचा काही सोपा उपाय?

गोगलगाय's picture
गोगलगाय in पाककृती
8 May 2009 - 8:12 am

अंजलीच्या यंत्राने फारच कष्ट पड्तात आणि वेळही फार लागतो. विद्युत जनित्रावर चालणारे यंत्र मिळ्ते का? इंडीयन स्टोअर मधील कोकोनट पावडर अथवा फ्रोझन कोकोनट पावडरचा पर्याय नकोय.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 May 2009 - 8:28 am | विनायक प्रभू

अंजली च्या यंत्राची धार लवकर जाते हे खरे आहे.

अनंता's picture

9 May 2009 - 5:35 pm | अनंता

मास्तर समुपदेशनाबरोबरच इतर कामंही करतात म्हणे!

आम्ही परान्न, श्राद्धान्न आणि टेबलाखालनं खात नाही.

सहज's picture

8 May 2009 - 8:36 am | सहज

ह्या दुव्यावर बघ. आणि शोध कुठे मिळते ते. :-)

दशानन's picture

8 May 2009 - 10:02 am | दशानन

माझ्या कडे पण एक यंत्र आहे पण मॅन्युअल आहे चाले काय ?
फोटो पाठवतो !

थोडेसं नवीन !

विनायक प्रभू's picture

8 May 2009 - 10:27 am | विनायक प्रभू

लय भारी चालते.

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 10:31 am | नितिन थत्ते

नारळ खवण्याचे यंत्र बनवता येईल का यावर खूप विचार एके काळी केला होता. काही डिझाइन बनवली होती. पण 'गृहीणीस' (सुरक्षितपणे) वापरता येईल असे यंत्र बनवता येईल असे वाटत नाही.
अवांतरः पूर्वेकडील देशात दुकानात नारळ खवूनच मिळतो असे ऐकले आहे. (पाहिलेले नाही) पण मुख्य मुद्दा सुरक्षिततेचा वाटतो.

त्या ऐवजी नारळाची वाटी बत्त्याने तोडून त्यातून खोबरे काढून मिक्सरमध्ये वाटून घेता येतो. यात काळी पाठ पण येते. किंवा मोठ्या किसणीवर किसून घेता येईल.

पुन्हा विचार करून पाहीन आणि बनवता आले तर सांगेन.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अविनाशकुलकर्णी's picture

8 May 2009 - 11:00 am | अविनाशकुलकर्णी

दशानन's picture

8 May 2009 - 11:18 am | दशानन

पोकलॅन मशीन ने कसा काय नारळ खवायचा हो =))

थोडेसं नवीन !

सँडी's picture

8 May 2009 - 11:20 am | सँडी

http://lh3.ggpht.com/_e1WTPhGfnMU/SgPC4EvfE5I/AAAAAAAAAx8/MHYSgEOZL0U/s8...
=)) =)) हे माहीतीच नव्हतं!

-संदीप.
काय'द्याच बोला.

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 11:28 am | नितिन थत्ते

फोटो पाहिले. हेच यंत्र शक्य स्वरूपाचे आहे. वापरून पाहिले आहे का?
हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य वाटते. तसेच खूप जोरात फिरल्याने खोबरे दूर उडते. त्याचा बंदोबस्त करावा लागेल. तसेच वाटी घट्ट धरणे अवघड आहे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अश्विनि३३७९'s picture

8 May 2009 - 11:58 am | अश्विनि३३७९

लग्न झालं नसेल तर करून टाका.. बायको देईलच पटकन खवुन
( मस्करी चालते ना... )

यन्ना _रास्कला's picture

11 May 2009 - 6:04 am | यन्ना _रास्कला

लग्न झालं नसेल तर करून टाका.. बायको देईलच पटकन खवुन

गोगलगाय ही ती गोगलगाय हाय. तो गोगलगाय एैकलाय का कंदी. नायतर त्याला गोगलबैल नस्त म्हटल. ती गोगलगाय कशी बर बायको करनार?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

पर्नल नेने मराठे's picture

8 May 2009 - 3:57 pm | पर्नल नेने मराठे

इकडे नारळ खवुनच देतात. आपण निवडायचा फक्त.
मला वाटते, बिग बझार तत्सम ठिकाणी विचारा.. तिकडे खवुन मिळेल कदाचित.
चुचु

खालिद's picture

8 May 2009 - 4:17 pm | खालिद

दाताने खवणा
सर्वात सोपयं

मि माझी's picture

8 May 2009 - 4:19 pm | मि माझी

तुम्ही कुठे राहता? पुण्यात मंडईत एका ठिकाणी खवून मिळतो नारळ..

मि माझी
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!

अवलिया's picture

8 May 2009 - 4:20 pm | अवलिया

अंजलीच्या यंत्राने फारच कष्ट पड्तात आणि वेळही फार लागतो.
अंजलीचे नसेल जमत तर मग सोनालीचे वापरुन बघा

नारळ खवण्याचा काही सोपा उपाय?
हो आहे की ! खवणे हाच उपाय.

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

9 May 2009 - 3:29 pm | पर्नल नेने मराठे

=))

चुचु

विनायक प्रभू's picture

8 May 2009 - 5:11 pm | विनायक प्रभू

अवलिया की जै हो

गोगलगाय's picture

8 May 2009 - 11:55 pm | गोगलगाय

>>लग्न झालं नसेल तर करून टाका.. बायको देईलच पटकन खवुन
लग्न झालं नसतं तर ही वेळ आली असती का सांगा बरे..

>>तुम्ही कुठे राहता? पुण्यात मंडईत एका ठिकाणी खवून मिळतो नारळ..
म्हणजे आम्ही आता नारळ खवणेपण भारतात आउट्सोर्स करायचे की काय?

अविनाशकुलकर्णी's picture

9 May 2009 - 11:09 pm | अविनाशकुलकर्णी

लग्न झाले नसेल तर मुलगी पहायला जाताना नारळ घेवुन जात जा..व वधु परिक्षा म्हणुन मुलिस नारळ खवायास सांगा.. जर मनासारखा खवला असेल तर वधु पित्यास मुलगी व उरलेल्या करवंट्या स्विकारुन लग्नास तयार आहे असे सांगा....

देवदत्त's picture

10 May 2009 - 11:32 pm | देवदत्त

=)) :D

मि माझी's picture

11 May 2009 - 12:35 pm | मि माझी

>>म्हणजे आम्ही आता नारळ खवणेपण भारतात आउट्सोर्स करायचे की काय?
आता भारत एवढा प्रगत झालाय त्याला तुम्हि तरी काय करणार..??

मि माझी
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!