प्रकाशचित्र संपादन प्रणाली

गणा मास्तर's picture
गणा मास्तर in काथ्याकूट
6 May 2009 - 2:36 pm
गाभा: 

नमस्कार,
मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे.
पिकासामध्ये बर्‍याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही.
जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 May 2009 - 2:37 pm | अवलिया

हे जे काही लिहिले आहे ते कळाले नाही, मराठीत लिहा !

--अवलिया

मनिष's picture

6 May 2009 - 2:39 pm | मनिष

हे पहा -
http://www.gimp.org/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 May 2009 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात.

विकास's picture

6 May 2009 - 4:49 pm | विकास

>>माझ्या मते जिंप (gimp) दोन्हीवर चालते. जिंप लिनक्सवर नक्की चालते. फोटोशॉपएवढं चांगलं नसलं तरी अनेक साध्या गोष्टी करता येतात.

बरोबर आहे. दोन्हीवर चालते. मी संगणकावर जेंव्हा उबंटू घातले तेंव्हा ते त्या पॅकेजमधून आलेच होते. विंडोज वर सहज घालता येते.

कराडकर's picture

6 May 2009 - 3:31 pm | कराडकर

http://www.techsupportalert.com/best-free-digital-editor.htm
या लिंकवर पहा.. कांही प्रकाशचित्र संपादनासाठी उपयोगी मोफत संगणक प्रणाली संबंधी माहिती

गणा मास्तर's picture

6 May 2009 - 4:57 pm | गणा मास्तर

गिंप वापरुन बघतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

घाटावरचे भट's picture

6 May 2009 - 10:33 pm | घाटावरचे भट

गिंप गिंप आणि गिंप... फुकट आणि सोयीचे
आजही डाऊनलोड कीजीए और इस्तेमाल कीजीए
('गरुडछाप गरुडछाप गरुडछाप.....गरुडछाप' या चालीवर')

अगोचर's picture

7 May 2009 - 2:19 am | अगोचर

"जिंप" म्हणतात ना त्याला ?
विंडोज आणि लिनक्स (कुठलेही) वर नक्की चालते.
- अगोचर