प्रश्न नव्हे उत्सुकता: आपण खाणावळीच्या डब्यांमधे आणि बाजारू टायरच्या दुकानांत काय पहातो?

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
30 Apr 2009 - 3:17 am
गाभा: 

हेडर :
येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. काकांनो आणि काकुंनो, नानांनो (नानी नाहियेत आल्या आजुन ..आणि काही चान्स पण दिसत नाही.. त्यामुळे गाळतो ही जागा) तात्यांनो आणि उरलेल्या सर्व गबाळ्यांनो .. आज मी तुम्हाला ह्या कुटाकुटीतुन एक नविन विचार करायला लावणारा आणि कौल, जो न देखे रवी, संपादकिय, kala dalan याच्या पलीकडे गेलेला एक महान कुटाकुट लेख सांगणार आहे , तर तो तुम्ही शांत चित्ताने ( बाकीचं ब्राऊझिंग जरावेळ बंद करून ) वाचावा एवढीच इच्छा व्यक्त करून मी लेख लिहायला सुरूवात करतो .
त्या आधी एक सांगतो की डोक्यात हेलमेट घाला आणि कुलूप लावा त्या हेल्मेटला , जास्त विचार करायला लावल्याने मेंदू पळून जाऊ शकतो .

बॉडी:
बरेच दिवस मनामध्ये घोळत असलेला हा प्रश्न.(इतका घोळत होता इतका घोळत होता की मेंदूत लस्सी तयार झाली हो .. आणि साजूक तुपही निघालय मनभर ... त्यामुळेच की काय .. माझ्या डोक्याला हल्ली तेल लावायची गरज नाय पडत... डॉकंच तुपकट होतंय ...) याचं समाधानकारक उत्तर अजूनपर्यंत तरी मला मिळालेलं नाही. एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो. हा कुटाकुट खाणावळीच्या (मराठीत मेस) भाज्यांना कमी लेखण्यासाठी नाहीये. यावर निखळ संवाद होउ द्यावा. आणि ह्या संवादाचे प्रायोजक आहेत "परिकथेतील राजकुमार सायबर कॅफे "- अ चेन ऑफ सायबर कॅफेज अव्हेलेबल २४X७ . ह्यांची ब्रांच वेशीबाहेरच्या राक्षसाच्या गुहेबाहेरही आहे ) चला आपणही लेखात बाजारूपणाची संधी मिळाली तर घेऊ .. आणि बाकीच्यांचा बाजारू पणा काढायला मोकळे होऊ,,, पर्‍या ऍड्वरटाइजमेंटचे पैसे तयार ठेव बे ..

आज भर दुपारी पावट्याची सुगंधीत भाजी, रेशणिंगच्या तांदळाचा भात,इंडियन चक्का - कुजलेल्या लसणाचं बेसण, मोडाच्या मुगाची उसळ,छन्नी-हातोडीने किंवा हेक्सा ब्लेड ने कापू शकू अशा चपात्या आणि आंबलेल्या लिंबाचं तुरट लोणचं हा असला लंचबॉक्स आमच्या मेसवाल्याने आणून दिला. ते पाहून माझ्या तरी तळपायची पायतान मेसवाल्याच्या मस्तकात गेली.(पिवर कोल्हापुरी पायतान, त्यात आम्हाला तेच्च घालून क्रिकेट फुटबॉल खेळायची हौस.. मग स्पाईक्स म्हणून घोड्याची नाल बसवलेली हो... मग काय एक निबार बसली तसं २ सेंटीमिटर व्यासाचं टेंगूळ ) काय हे खाणं! काही अर्थ? पाश्चात्य खाद्य संस्कॄतीचं अनुकरण जरूर करावं पण त्याला blindly follow करणं हे चुक नाही का? उगाच "मॅकडॉणॉळ्ड/ ढॉमिणोज " ची स्टाईल मारायला जातो साला. भिकारड्याने कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ... आता उडित मुग किंवा पावटा .. असले कच्चे प्रकार पोटात गेल्यावर काय होणार ? खूप इच्छा आहे की कार्ल्याची भाजी , उडदाची हिरविट काळी आमटी , घसा जाम करणारा सुक्का पावटा, सर्वांग सुंदर शेवगा , बेसन याच्या पलीकडे जाऊन मस्त चमचमीत पदार्थ देणारी मेस निघावी. ते जेवण गोडधोड पदार्थांसह , sweets and starters सह, त्यातल्या चविष्ट मुख्य भोजणासह मिळावे . खाणावळीचा उद्देश फक्त रेशणिंगचं आणि वाया गेलेल्या भाज्यांचं अंन्न बॅचलर पोरांच्या माथी मारावं हाच आहे का? कोणताही नवी रुचकर चव न देणारा डब्बा सूजाण बॅचलर्सने खावा का ?

तसचं Tyre shop चं.
पुन्हा एक बाजारू ऍड्वरटाईज (टारझन टायरवाले आण्णा : आमचेकडे सर्व प्रकारच्या टायरांचा बँड वाजवला जाईल , आतून बाहेरून पंक्चर काढले जाईल, तसेच स्टोव्ह आणि मोबाईल रिपेर करून दिला जाईल, कंप्यूटर्सचे सुट्टे भाग विकतो , मुंबै-पुणे-सातारा-शिर्डी-धूळे-जळगाव-नाशिक-जालना गाड्यांच्या बुकींसाठी भेटा, मुळव्याधीवर रामबाण औषध मिळेल)

पंक्चर काढणे जर साऊथ इंडियन्स ची अस्मिता असेल, स्पंदन असेल तर त्याचा खुला बाजार मांडणे योग्य आहे का? आपल्या नव्या कोर्‍या गाडीचे नविन टेक्नॉलॉजीचे रॅडियल अँड ट्यूबलेस टायर्स ह्या अण्णा लोकांना practice करण्यासाठी असते का ? आपल्याला गाडीए हाय परफॉर्मन्स ऑन हाय स्पीड द्यावा ह्यासाठी असते ? आणि हेच डब्बेवाले डबडे -महाडबडे त्यांना डब्बे विकतात. तिस - चाळीस रुपयांना. मग हेच आण्णा लोक असल्या डब्यातल्या आरबट चरबट भाज्या खाऊन प्रत्येक टायरवर पॅच मारण्यासाठी आपल्या कडून १०० रुपये घेतात. एक सुद्धा असा टायरवाला आण्णा नसावा जो तत्वासाठी एका पंक्चरचे चार पंक्चर्स काढणार नाही? आपणचं यांना हायवे च्या कडेला बसवतो ना(पेपरवर नव्हे) ? धावा करतो आडचणीच्या वेळी समोर दिसावा म्हणून गाडीची (टायरची) वाट लागू नये म्हणून. का? त्यांच्यावर बंधन घालणारे आपण कोण? पण किबोर्ड ला तर आहे ना माझ्या संगणाकाच्या ? (स्वगत : कितीवेळ झाले जास्तित जास्त बावळट पणे लिहीण्याचा खटाटोप करतोय .. पण साला काय यश येत नाय .. तो ओरिजिनल लेख वाचला की तसं का लिवता येत नाय बॉ .. म्हनून ण्यूणगंड( मराठीत काँप्लेक्स) यायला लागलाय ) यांना पैसा कमी पडतो म्हणून हे बिनपंक्चर टायराला ४ पॅच एक्स्ट्रा लावायची काम करतात. यांना असं टायरांची वाट लावायला आणि आपल्याला लुबाडायला इथे आणलयं का? हे असे पैसे वाटल्यावर financial equality राहील? (ह्या वाक्यासाठी टाळ्या)

80% of the wasted and bad quality food is eaten by 20% of the people , that is bachelors . हे equation बदलणं यामुळे थोडं तरी शक्य होइल का?

फुटर :
एवढा वेळ माझी ही बेसंबंध बडबड अत्यंत शांत चित्ताने (मनात भलेही बुकलून काढण्याचे विचार असोत) ऐकून घेतल्याने मी सर्वांचा ऋणी आहे .. एवढे लिहून मी माझी कुटाकुट संपवतो, जय हिंद , जय म्हाराष्ट्र !!!

-टारोमारो

जाता जाता (हे उगाच मास्तर कडून उधार) : जर आयपीएल-पप्पू कांट डांस साला ह्यांत संबंध असू शकतो तर मेसवाला-टायरवाला मधे का नाही ?

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

30 Apr 2009 - 3:33 am | घाटावरचे भट

नहींऽऽऽऽऽऽऽऽ

पिवळा डांबिस's picture

30 Apr 2009 - 4:08 am | पिवळा डांबिस

....कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ...

वाचतांना अननस खात होतो. हे वाचून ठ्ठो! झालं....
जोरदार ठसका लागला...
अननसाचा रस नाकात आणि घशात गेला...
इतका खोकतोय का म्हणून आजूबाजूच्या ऑफिसमधली लोकं जमा झाली....
त्यामुळे घाईघाईने मिपाची विंडो बंद करायला लागली...
हा टार्‍या एक दिवस जीवे मारणार आम्हाला!!!!
:)

स्वप्निल..'s picture

30 Apr 2009 - 5:51 am | स्वप्निल..

तुला सुचते कसं बे.. =)) =)) =))

स्वप्निल

मिंटी's picture

30 Apr 2009 - 2:16 pm | मिंटी

=)) =)) =)) =))

स्वप्निल यांच्यासारखंच विचारावसं वाटतं.... तुला सुचतं कसं रे .............

असो. मस्तच लिहिलं आहेस...... लगे रहो टारोमारो ;)

बेसनलाडू's picture

30 Apr 2009 - 6:01 am | बेसनलाडू

धन्य आहात!
(वाचक)बेसनलाडू

विनायक प्रभू's picture

30 Apr 2009 - 6:46 am | विनायक प्रभू

कठीण आहे टार्‍याच.
जाता जाता: मी संपलो

अवलिया's picture

30 Apr 2009 - 6:46 am | अवलिया

हा हा हा

टारोमारो लै भारी :)

--अवलिया

मुक्तसुनीत's picture

30 Apr 2009 - 6:50 am | मुक्तसुनीत

टारेश्वर ,
फुल फॉर्म मधे ! एकेक वाक्य वाचताना खोखो हसण्यापासून धोधो हसण्यापर्यंत मजल ! लय भारी ! आज मिपावर फटाके फुटून राह्यले बॉस !
लगे रहो टारू ! ;-)

सहज's picture

30 Apr 2009 - 6:56 am | सहज

खंग्री!!!

सध्या फूल फॉर्मात की!

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2009 - 7:42 am | भडकमकर मास्तर

मी स्वगृहात वरती धाग्याचे नाव पाहिलं आणि वाटलंच की हा टार्‍याचा धागा असणार...
असंबद्ध लिहूनही भावना पोचवण्यात यशस्वी.. :)

१.एक सुद्धा असा टायरवाला आण्णा नसावा जो तत्वासाठी एका पंक्चरचे चार पंक्चर्स काढणार नाही?
२.टारोमारो...

या दोन ठिकाणी ब्येक्कार हसलो राव...

छोटा डॉन's picture

30 Apr 2009 - 8:18 am | छोटा डॉन

=)) =)) =))

>>असंबद्ध लिहूनही भावना पोचवण्यात यशस्वी..
असेच म्हणतो ...

च्यायला टार्‍या लै बेक्कार सुटला आहे आजकाल , तुझे लेख वाचतान वर सुचणा करत जा की उठल्याउठल्या वाचु नये ( किंवा वाचुन ये ;) ...
मस्त जमला आहे लेख.
थोडा हेन आणि हिडीसपणा कमी पडला आहे ह्यावेळी पण हरकत नाही. ;)
पुलेशु ...

------
डॉनोमानो , मानो या ना मानो ...
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्राची's picture

30 Apr 2009 - 8:13 am | प्राची

टारोमारो,
लई भारी विडंबन.
टारोमारो हे आपल्यासाठी

अवांतरःहे टारूराव तर टपलेलेच असतात वाटंत,कधी एकदा विडंबन करायला धागा येतोय(सावज मिळतंय).त्यामुळे लेखकांना जरा दबकून दबकून (टारोमारोंकी नजरोंसे बचके) धागा काढावा लागत असेल.

नितिन थत्ते's picture

30 Apr 2009 - 11:10 am | नितिन थत्ते

इथे टारझणसाहेब मेसचे जेवूण कातावलेत आणि तुम्ही फोटो दाखवून जखमेवर मीठ चोळताय.
अवांतर : ताटात मीठ नाही दिसत. तेच चोळायला वापरले वाटते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्राची's picture

30 Apr 2009 - 5:49 pm | प्राची

=)) =)) =))

प्राजु's picture

30 Apr 2009 - 10:31 pm | प्राजु

अवांतर : ताटात मीठ नाही दिसत. तेच चोळायला वापरले वाटते.
=)) =)) =))

ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर!!

टारूभाय,
तुझं डोकं अजब आहे. मस्त लिहिलं आहेस... =D>
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

30 Apr 2009 - 8:42 am | नंदन

लै भारी, टारूभाऊ.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2009 - 9:12 am | प्रकाश घाटपांडे

.

आज मी तुम्हाला ह्या कुटाकुटीतुन एक नविन विचार करायला लावणारा आणि कौल, जो न देखे रवी, संपादकिय, kala dalan याच्या पलीकडे गेलेला एक महान कुटाकुट लेख सांगणार आहे

हा तर मेटाकूट! तबीयत यकदम खूष!

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मयुरा गुप्ते's picture

30 Apr 2009 - 9:23 am | मयुरा गुप्ते

=)) व्वा.. एका गंभीर विषयाला वाचा फोडुन आमची हसुन हसुन बोबडी वळवल्याबद्दल " अभिणंदण".

यन्ना _रास्कला's picture

30 Apr 2009 - 9:39 am | यन्ना _रास्कला

बाकीचं ब्राऊझिंग जरावेळ बंद करून

इतर काय बनद करावं लागलच नाय. आपला कात्याकुट वाचुन डोल डबडबल. वाटल इतक चान्गल लिखान वाचल्याव देव उचलुन नेईल तर बर होइल. (मला नाय तुमाला). तेवडच देवाला फुर्सतीच्या वेलेत येन्टरटेनमेट.

उठा लेरे बाबा , उठा ले मेरेको नहि इन दोनोको उठाले - हेराफेरी

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Apr 2009 - 9:54 am | चन्द्रशेखर गोखले

हसून हसून मरायला झालं ..!!

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2009 - 10:02 am | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या!!! टार्‍या!!! तू धन्य आहेस रे... काय बोलू तुला? बेक्कार बेक्कार बेक्कार... एकदम जबरदस्त लिवलंय. दिवस चांगला जाईल आज. सक्काळी सक्काळी मस्त हसलो आज. पण तुझ्या ही&हि चे अजून खूप खूप म्हणजे खूपच पोटेंशियल आहे. आजकाल तू थोडा हात आखडून लिहितोस असे वाटते आहे. असा, मवाळ होऊ नकोस!!!

एक खंत... तुला ण्यूणगंड यायच्या ऐवजी इतर काही लोकांना का येत नाही रे?

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

30 Apr 2009 - 10:09 am | दशानन

=))

बेक्कार !

थोडेसं नवीन !

स्मिता श्रीपाद's picture

30 Apr 2009 - 10:21 am | स्मिता श्रीपाद

टारोमारो,

तुम्हाला __/\__ शिरसाष्टांग णमस्कार :-)

हसुन हसुन फुटले :-)

जेन's picture

30 Apr 2009 - 10:33 am | जेन

एवढे छान लिहीले एवढे छान लिहीलेत की काय सांगू केवढे छान लिहीलेय!!
+१ री.....

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Apr 2009 - 10:57 am | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2009 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार

वाकडा सलाम.

अ गा गा गा
=)) =))

बेक्कार फुटलो !!
ह्या महान लेखासाठी आपण आमचे प्रायोजकत्व घेउन आम्हाला कृतकृत्य केलेत टारोमारो साहेब.

ज्या आत्मीयतेने आपण ह्या गंभीर विषयांना वाचा फोडली आहेत ते बघुन आपल्या लेखणीत क्रांतीस्मशानचंद्र आग्या वेताळे दिसले असेच म्हणावे लागेल.

ह्या नादान, नाकर्त्या आणी नालायक लोकांच्या पाठीवर आपण लेखणीच्या आसुडाचे फटकारे ओढुन गरीब जनतेला/कारवाल्यांना/बॅचलर्सना वाली (सुग्रीवाचा भाउ नाही) शिल्लक आहेत ह्याची एक आनंदी जाणीव करुन दिलीत.
जळालेले, करपलेले, कच्चे राहिलेले, आंबलेले अन्न खाणारे बॅचलर्स आज जे काय पानात पडले असेल ते सुखानी खाउन तृप्त झाले असतील. कारवाल्यांनी आपणहुन स्टेपनीसकट सगळी चाके पंक्चर करुन घेतली असतील.

"80% of the wasted and bad quality food is eaten by 20% of the people , that is bachelors . हे equation बदलणं यामुळे थोडं तरी शक्य होइल का?" ह्या वाक्यानी आपण जागतीक अर्थव्यवस्थेलाच धक्का दिला आहेत. एक नवा विचार आज इथे रुजु पाहतोय हे अभिमानानी नमुद करावे लागेल.

क्रांतीआगगोळा टारोमारो ह्यांना माझे वंदन.

पप्पु परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

30 Apr 2009 - 10:58 am | आनंदयात्री

=)) =)) =)) =)) =)) =))

नितिन थत्ते's picture

30 Apr 2009 - 11:19 am | नितिन थत्ते

टारझणचा लीन पॅच संपून फॉर्मात आलेला आहे. बाजारू क्रिकेट मॅचसारखा प्रत्येक बॉलवर षटकार चालू आहेत.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अभिज्ञ's picture

30 Apr 2009 - 11:23 am | अभिज्ञ

गुड वन.
:)

अभिज्ञ.

अवांतर : टा-या,तुझी प्रतिभा पाहता तु फक्त विडंबनात्मक शैलीत अडकून पडु नकोस,असे सांगावेसे वाटते.
:)

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

स्वाती दिनेश's picture

30 Apr 2009 - 11:32 am | स्वाती दिनेश

टारोबा, लय भारी..
धन्य आहेस..
स्वाती

कपिल काळे's picture

30 Apr 2009 - 12:26 pm | कपिल काळे

खास टारु ने उडवलेली टर.
शीर्षक वाचून खात्री झाली होती की हे टारुच काम!

निखिल देशपांडे's picture

30 Apr 2009 - 12:46 pm | निखिल देशपांडे

अरे टारु भाउ काय जबरदस्त लिहिले आहेस बे!!!!! प्रत्येक वाक्याला हसत होतो बघ....पराकॅफे ची ऍड काय....टारोमारो काय सहि आहेस रे

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

महेश हतोळकर's picture

30 Apr 2009 - 12:49 pm | महेश हतोळकर

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

चला मी जातो जेवायला!

सँडी's picture

30 Apr 2009 - 1:53 pm | सँडी

भिकारड्याने कुठून काचेतून पिझ्झा पाहिला .. आणि त्या आकाराच्या चपात्या खाऊ घालायला लागला .. भाज्या कच्च्या ठेऊ लागला ...
मस्तच! :D

मराठमोळा's picture

30 Apr 2009 - 1:59 pm | मराठमोळा

हाहाहाहा.....

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))

लै भारी...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

दिपक's picture

30 Apr 2009 - 2:22 pm | दिपक

भन्नाट लिहलंय टारोमारो. =))

हे असे पैसे वाटल्यावर financial equality राहील?

ऋषिकेश's picture

30 Apr 2009 - 2:45 pm | ऋषिकेश

इतकं हसवशील तर मला हापिसातून काढून टाकतील लेका!!!!
वाचून अक्षरशः फुटलो... धन्य आहेस तू
मात्र यावेळी तिरके - खास ठेवणीतले फटाके कमी होते.. अर्थात जे होते ते लै लै बुंगाट होते!! :)
बिपीनदा म्हणतो तसा हात आखडता घेऊ नकोस .. अजून लिहि!

(=)) =)) =)) ) ऋषिकेश

लिखाळ's picture

30 Apr 2009 - 5:54 pm | लिखाळ

टारोमारो...
लै भारी आहेस बाबा.. धन्य आहेस ! :)
फार हसलो....
-- लिखाळ.

चतुरंग's picture

30 Apr 2009 - 6:04 pm | चतुरंग

तुझ्यातले गद्य विडंबकाचे गुण अशावेळी फारच उफाळून येतात! काल रातच्याला हे वाचलं आणि बेक्कार हसलो, काही प्रतिक्रिया द्यायची सोय राहिली नव्हती शेवटी आज सक्काळी सक्काळी प्रतिक्रिया देतोय.
लईच्च हीण आनि हिडीस होत चाल्लाहेस दिवसेंदिवस! ;)
टारोमारो ने तर हसून लोळलो - सह्यांचे विडंबन हा तुझ्या बॅटींगमधला उत्तुंग षटकार असतो, थेट स्टेडियमच्या बाहेर! :D
लगे रहो टारोमारो!!

(हीण आनि हिडीस) चतुरंग

शितल's picture

30 Apr 2009 - 6:23 pm | शितल

=))

शाल्मली's picture

30 Apr 2009 - 7:10 pm | शाल्मली

टारोमारो,
काय काय लिहिशील तू.. भारीच आहेस!
=))

--शाल्मली.

काळा डॉन's picture

30 Apr 2009 - 8:39 pm | काळा डॉन

हाण तिच्यायला... बेक्कार टारोमारो..

तो सालोमालो काही परत येत नाही आता मिपावर... :D

(इथल्या काही कवींना असेच पळवुन लावायाची सुपारी टारोमारोला द्यावी का? :? )

क्रान्ति's picture

30 Apr 2009 - 10:09 pm | क्रान्ति

बरं झालं, जेवण झाल्यावर वाचलं, नाही तर हसून हसूनच पोट भरलं असतं, आणि उपास उद्या सोडावा लागला असता. अरे, किती हसवावं याला काही मर्यादा? टारूभाऊ, भारीच्या भारी हो!
=)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

टारझन's picture

30 Apr 2009 - 11:02 pm | टारझन

सर्व प्रतिसाद्यांचे (आणि प्रतिक्रिया टाईप करता करता डिलीट केलेल्यांचेही) आभार

एक महत्वाची गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते की ह्या विडंबणाचं ओरिजिनल पोस्ट मला सकाळपासूनच दिसत नाहीये , बहुदा डिलीट झालं असावं , असे एखादे फ्रस्ट्रेटिंग काथ्याकुट डिलीट होण्याने ह्यात मला ५० प्रतिक्रीया मिळण्यापेक्षा जास्त आनंद झाला आहे !!

प्राची ताई, आपण दाखवलेल्या चित्रातलं मृगजळ छाणच आणि त्यावरची खराटाभायची कमेंट क्लास ..
बाकी काल लिहील्यानंतर विडंबणातलं "सार" लोकांना समजेल्/पचेल की नाही ह्यावर थोडी शंका होती (ए कोण रे तो , मिपाकरांच्या विचारक्षमतेवर प्रश्न उभा केल्याचा आरोप करतोय ? ,मी माझ्या लिखाणावर कमेंट केलीये ही) पण सर्वांनी संभाळून घेतलं

आता कोणतीही लिखाण (किमान माझं तरी) असं नसतं की ते सर्वांना आवडतं , बर्‍याच मिपाकरांना ते आवडलं नसेलही ........... चालायचंच ..

लोभ असावा,
(आपलाच) टारझन

चित्रा's picture

1 May 2009 - 7:17 am | चित्रा

भारी लिहीलं आहे. ओरिजिनल आणि उत्फूर्त.
आम्हालाच ण्यूणगण्ड आला आहे हे वाचून.