झटपट रवा डोसा...(फोटोसहित )

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in पाककृती
21 Apr 2009 - 3:56 pm

नमस्कार,

आज खुप दिवसांनी एक पाकॄ घेउन आले आहे :-)

साहित्यः
१.१वाटी मैदा
२.१वाटी रवा
३.२ चमचे दही(नसले तरी चालते)
४.३-४ हिरव्या मिरच्या(किती तिखट पचवु शकता त्यानुसार :-) )बारीक चिरुन
५.१-२ चमचे आलं-लसुण बारीक चिरलेला
६.भरपुर ताजा कढिपत्ता,बारीक चिरलेली कोथिंबीर
७.फोडणीचे साहित्य (जिरे,मोहरी,हिंग,हळद)
८.एक बारिक चिरलेला कांदा
९.मीठ
१०.१ चमचा साखर्(आवडत असल्यास)

कॄती:
रवा,मैदा,दही,मीठ,साखर आणि पाणी घालुन सारखे करावे आणि एक तास भिजवत ठेवावे...यात भरपुर पाणी लागते कारण रवा पाणी शोषुन घेतो...

आता तेलाची फोडणी करुन त्यात जिरे,मोहरी,हिंग,बारीक चुरलेला कढीपत्ता,बारीक चिरलेल्या मिरच्या,आले,लसुण,कोथिंबीर घालावे..
ही फोडणी आता डोश्याच्या पिठात ओतावी,कांदा घालावा आणि व्यवस्थीत हलवुन घ्यावे...गरजेनुसार पाणी आणि मीठ घालावे...
शेवटी जे पीठ तयार होइल ते खुप पातळ (आमटीसारखे पळीसांड झाले पाहिजे)

आता नॉनस्टीक तव्यावर थोडेसे तेल लावुन घ्यावे..आणि वाटीने पीठ पसरुन डोसा घालावा..
पीठ पसरताना आधी कडेने घालत घालत मग मध्यापर्यंत यावे...मधे मधे भोके ठेवावीत्...तसेच तवा तापलेला असताना पीठ घालावे...

एका बाजुन छान खरपूस भाजुन झाले की मग उलटुन टाकावे...मस्त कुरकुरीत डोसा तयार होईल....

आता नारळाच्या अथवा दाण्याच्या चटणी सोबत फस्त करावा :-)

चटणी ची कॄती ( खास रेवतीसाठी) :-)
साहित्यः
शेंगदाणे मुठभर,२ पाकळी लसुण,२-४ लाल सुक्या मिरच्या,१ चिंचेचे बुटुक,मीठ्,साखर,
कॄती:
सर्व पदार्थ मिक्सरवरुन जरुरीप्रमाणे पाणी घालुन बारीक वाटणे...लाल मिरच्या नसल्यास लाल तिखट घालणे.
आवश्यक तेवढे पाणी घालुन सारखे करावे...

माहितीचा स्त्रोतः
आंतरजाल

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2009 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार

मार डाला !!
ह्या रवीवारी रवा डोसा झिंदाबाद !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 4:31 pm | भडकमकर मास्तर

लै भारी ...
आवडला फोटो आणि पाकृ
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

21 Apr 2009 - 4:38 pm | मदनबाण

भुक लागली !!! :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रश्मी's picture

21 Apr 2009 - 5:07 pm | रश्मी

हो ख्ररच भुक लागली .

लवंगी's picture

21 Apr 2009 - 5:21 pm | लवंगी

असच म्हणते

पाषाणभेद's picture

21 Apr 2009 - 4:42 pm | पाषाणभेद

तोंडाला पाणि सुटले.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

स्वाती दिनेश's picture

21 Apr 2009 - 5:15 pm | स्वाती दिनेश

मस्त ग स्मिता, झकासच दिसतो आहे डोसा.
स्वाती

ठकू's picture

21 Apr 2009 - 5:24 pm | ठकू

मस्त आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

चकली's picture

21 Apr 2009 - 5:24 pm | चकली

मैदा ऐवजी तांदूळ पीठ वापरून मी अशीच घावने खाल्ली आहेत. छान लागतात.

चकली
http://chakali.blogspot.com

रेवती's picture

21 Apr 2009 - 5:56 pm | रेवती

डोसा छान कुरकुरीत दिसतोच आहे.
करून पाहीन.
कृपया चटणीची कृती देणे.
रेवती

क्रान्ति's picture

21 Apr 2009 - 7:48 pm | क्रान्ति

फोटोवरूनच डोसा आणि चटणीही खमंग दिसते आहे. रविवारची वाट पहाणं जमेल का? बहुतेक आधीच प्रयोग करावा लागेल. आताच तोंडाला पाणी सुटलंय.
<:P
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

स्मिता श्रीपाद's picture

22 Apr 2009 - 10:37 am | स्मिता श्रीपाद

प्रतिसादाबद्दल सर्वांचे खुप खुप आभार :-)

-स्मिता

प्राजु's picture

25 Apr 2009 - 10:38 pm | प्राजु

जबरदस्त झाला.
खास करून चटणी... मस्तच!
मी नेहमी मैदा आणि फोडणी नव्हते घालत. आता ही मस्त आयडीया मिळाली आहे.खूप धन्यवाद स्मिताताई.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

26 Apr 2009 - 1:41 am | समिधा

करुन बघितला खुपच छान झाला आता माझ्या घरी कायम होत राहील.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2009 - 10:59 am | स्मिता श्रीपाद

जबरदस्त झाला.
खास करून चटणी... मस्तच!

धन्यवाद प्राजु लगेच करुन पाहिल्याबद्दल..फोटु दाखव ना तुझ्या डोश्याचे..
आणि ही चटणी आहे ना हिला पल्ली असे काहीतरी म्हणतात्..आता नीटसं नाव नाही आठवत्...माझ्या साउथ इंडियन मैत्रिणीच्या आईनं सांगितली होती.....

.खूप धन्यवाद स्मिताताई.

ताई?...अरे बापरे....ताई वगैरे नको म्हणुस मला :-)

करुन बघितला खुपच छान झाला आता माझ्या घरी कायम होत राहील.

धन्यवाद समिधा...

-स्मिता

विसोबा खेचर's picture

26 Apr 2009 - 9:24 am | विसोबा खेचर

क्लासिक...!

स्मिता, जियो...!

तात्या.

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2009 - 10:57 am | स्मिता श्रीपाद

धन्यवाद तात्या :-)

मेघना भुस्कुटे's picture

26 Apr 2009 - 11:15 am | मेघना भुस्कुटे

मीपण करून बघितला. मस्त झाला. धन्यु. :)

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2009 - 10:56 am | स्मिता श्रीपाद

मीपण करून बघितला. मस्त झाला. धन्यु.

खुप आभार :-)

मसक्कली's picture

23 Jun 2009 - 12:15 pm | मसक्कली

यम्मि.............. =P~

तोन्डला पानि सुटले आहे..........!!

लइ भारि...........!!

आजुन जरा सोप्या सोप्या पाक क्रुती येउ द्या.........ताइसाहेब ;)

सोनम's picture

20 Sep 2009 - 11:21 am | सोनम

स्मिता ताई खूपच छान आहे डोसा. =D> =D>
करुन पाहिला तर छान झाला होता. :) :)
त्यात बेसन पीठ घातले तर चालेल का? :? :?