निवडणूक आणि ड्राय डे

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
15 Apr 2009 - 11:52 pm
गाभा: 

उद्या १६ एप्रिल. विदर्भात आणि इतरत्रही बर्‍याच मतदारसंघांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकशाहीमुळे जनतेला जे अधिकार मिळालेले आहेत, आणि जी कर्तव्ये हा महान देश उभा ठेवण्यासाठी जनतेला पार पाडावी लागतात, त्यातला "मतदान" हा अधिकार आणि कर्तव्य आहे.

परंतु, निवडणूक आयोग, हा हिटलरच्या बापाचा अवतार आहे. टी एन शेषन पासून लोकशाहीवर गदा आणण्याचे काम निवडणूक आयोगाने केला आहे. लोकशाहीत, कुठलेही कायदे अस्तित्वात नसताना, निवडणूक आयोग दरवेळी आपली मनमानी करीत असतो. पैसे वाटावेत की वाटू नये, ह्याबद्दल जसवंतसिंग आसामात गेले, आणि गोविंदाचा पत्ता कटला.

पण ह्यावेळी मात्र हद्द झाली !

निवडणुकांआधीचे तीन दिवस ड्राय डेज !!!

१४, १५, आणि १६, असे तीन दिवस आम्ही (म्हणजे जनता) तहानेले !

जेव्हा वाटेल तेव्हा सनदशीर मार्गाने दारू पिण्याचा आमचा हक्क निवडणूक आयोगाने हिरावून घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात बोलायची राजकारण्यांची देखील हिम्मत नाही.

ही लोकशाही आहे का ? खरेच सांगा !

निवडणूक आयोगाच्या मनमानीचा निषेध म्हणून आम्ही उद्या मतदान करणार नाही !

(ता. क. १३ तारखेला स्टॉक का जमवून ठेवला नाही, असा उद्दाम प्रश्न विचारू नका. कारण प्रश्न तत्त्वाचा आहे.)

(ता. ता. क. २ ऑक्टोबर ला आणि इतर काही सुट्ट्यांना ड्राय डे असतो, त्याबदल आब्जेक्शन का नाही असे विचारू नका. आब्जेक्शन आहेच. पण एखादा दिवस आमचे निभते. तीन सलग दिवस नाही. विशेषतः बुधवारी तर नाहीच.)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 12:11 am | विसोबा खेचर

जेव्हा वाटेल तेव्हा सनदशीर मार्गाने दारू पिण्याचा आमचा हक्क निवडणूक आयोगाने हिरावून घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात बोलायची राजकारण्यांची देखील हिम्मत नाही.

सहमत आहे...

निवडणूक आयोगाच्या मनमानीचा निषेध म्हणून आम्ही उद्या मतदान करणार नाही !

ठाण्याला मतदान असेल तेव्हाही असाच ड्रायडे असेल त्यामुळे त्याचा निषेध म्हणून मीदेखील मतदान करणार नाही!

(ता. क. १३ तारखेला स्टॉक का जमवून ठेवला नाही, असा उद्दाम प्रश्न विचारू नका. कारण प्रश्न तत्त्वाचा आहे.)

अगदी खरं!

पण एखादा दिवस आमचे निभते. तीन सलग दिवस नाही. विशेषतः बुधवारी तर नाहीच.)

सहमत...!

ड्राय डे या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. दोन घोट सुखाने पिऊ इच्छिणार्‍यांची ही शुद्ध अडवणूक आहे. आणि याचा निषेध म्हणून मतदान न करणे, हा मिसळभोक्ता यांचा पर्याय मला योग्य वाटतो!

आपला,
(परवानाधारी मद्यप्रेमी) तात्या.

दोन ऑक्टोबरला आपण मारे ड्राय डे साजरा करतो पण बापूंच्या वापरातल्या वस्तू अखेरीस आमच्या दारुवाल्या विजय मल्ल्यानेच भारतात आणल्या आणि बापूंचा मान राखला! तेव्हा कुणी माईचा पुत पैशे घेऊन म्होरं झाला नव्हता! पण आम्ही कपाळकरंटे ते करंटेच! दोन ऑक्टोबरला ड्राय डे साजरा करण्यातच धन्यता मानतो. मला व्यक्तिश: ही अत्यंत शरमेची बाब वाटते! निदान दोन ऑक्टोबरचा ड्राय डे तरी रद्द झालाच पाहिजे!

आपला,
(विजय मल्ल्या प्रेमी) तात्या.

हरकाम्या's picture

16 Apr 2009 - 12:32 am | हरकाम्या

मला आपल्याबद्दल सहानुभुती वाटते पण मदत करु शकत नाही कारण आपल्याला मदत केल्यास मला ड्राय डे पाळावा
लागेल . आपण एखादया घरी चालविण्यात येत असलेला कुटिरोद्योग शोधा.
" शोधा म्हणजे सापडेल. " " गरज ही शोधांची जननी आहे. "

मिसळभोक्ता's picture

16 Apr 2009 - 12:54 am | मिसळभोक्ता

कारण आपल्याला मदत केल्यास मला ड्राय डे पाळावा लागेल .

अर्धी अर्धी ? म्हणजे दोघेही सेमि-ड्राय ! अर्ध अर्ध मत देऊ..

-- मिसळभोक्ता

हरकाम्या's picture

16 Apr 2009 - 4:52 pm | हरकाम्या

कधी भेटताय बोला ???????

सूहास's picture

16 Apr 2009 - 5:05 pm | सूहास (not verified)

<<कधी भेटताय बोला ?????>>

बा़की काय काम नाही वाटत,बाकी ते पण ठेक आहे म्हणा एकदा दारुच नाव काढले की हरकांम्या पण सर्व काम सोडुन येणारच की..

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

मराठमोळा's picture

16 Apr 2009 - 2:02 pm | मराठमोळा

>>निवडणूक आयोगाच्या मनमानीचा निषेध म्हणून आम्ही उद्या मतदान करणार नाही.

असे करु नका. आताचे सरकार पुन्हा आले तर त्या रामडॉसने (आरोग्य मंत्री) म्हंटल्याप्रमाणे खालील गोष्टी होतील.
१. ड्राय डे ची संख्या वाढवणार.
२. पगाराच्या आणी दुसर्‍या दिवशी ड्राय डे ठेवणार
३. वाईनशॉप आणी बारच्या वेळांवर बंधने आणणार.
४. परवान्यांचे कायदे कडक करणार.

बघा पटते का? मतदान करा आणी अशा नेत्यांचे दुष्ट कट उधळुन लावा.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मिसळभोक्ता's picture

17 Apr 2009 - 2:02 pm | मिसळभोक्ता

नुकत्यच हाती आलेल्या वृत्तानुसार संघाचे लोक संध्याशाखेनंतर थकून जातात, आणि मग घरी किंवा शाखामैदानाजवळच्या पाणवठ्यात क्षुधाशांतीसाठी जातात. रामडॉस सारखे लोकांवर बंदी टाकून घरी आतल्या खोलीत पीत नाहीत, त्यामुळे आम्ही जरी मतदानावर बंदी घातली तरी, पुरोहीतला मत देण्यास अनेकांना प्रवृत्त केले. विलास मुत्तेमवार मुर्दाबाद.

-- मिसळभोक्ता

चिरोटा's picture

16 Apr 2009 - 2:14 pm | चिरोटा

सध्या राजकारणी दारू प्यायल्यासारखे गेला एक आठवडा प्रचार सभांमधे बडबडत होते. फक्त हातात समोर प्याल्याऐवजी माईक होता.सगळ्या लोकाना त्याची लागण नको म्हणून आयोगाने तीन दिवस ड्राय डेज जाहीर करून टाकले.नाहीतर पंज्याऐवजी कमळावर शिक्का,कमळाऐवजी घड्याळावर शिक्का बसायचा.!!
उन्हाळा आहे-ऊसाचा रस,पन्हे,लिंबू सरबत्,शहाळे प्यायचे दिवस हे!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

16 Apr 2009 - 2:27 pm | सूहास (not verified)

पण आम्ही कोटा ठेवला आहे काळजी नसावी..

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

मिसळभोक्ता's picture

17 Apr 2009 - 2:04 pm | मिसळभोक्ता

हत्तीवर शिक्का मारा ! (इतका मोठ्ठा हत्ती असल्याने, शिक्का मारताना चूक होणार नाही !)

आणि, बोनस म्हणजे, मायावतीकाकू स्वतःही पितात, आणि इतरांनाही पाजतात !

जय हो !

-- मिसळभोक्ता

चिरोटा's picture

17 Apr 2009 - 2:24 pm | चिरोटा

त्या दारू दिल्याचा आव आणतात पण प्रत्य्क्षात पाणी पाजतात. :D
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

मिसळभोक्ता's picture

17 Apr 2009 - 2:30 pm | मिसळभोक्ता

आमचा अनुभव वेगळा आहे.

माणिकरावांनी आम्हाला अख्खी ब्लेंडर्स प्राईड पाजली काल !

-- मिसळभोक्ता

चिरोटा's picture

17 Apr 2009 - 3:05 pm | चिरोटा

हे कोण माणिकराव?राजकारणी की कुठल्या बारचा मालक?
क्ष्^न + य्^न = झ्^न