पोह्याचे कटलेट

ऋचा's picture
ऋचा in पाककृती
15 Apr 2009 - 11:05 am

साहीत्यः- उकडलेले बटाटे २,जाडे पोहे २ वाट्या,तिखट,मीठ्,साखर्,टोस्टचा चुरा किंवा बिस्कीटाचा चुरा

कृती :- पोहे भिजवुन घ्यावेत त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत त्यात तिखट-मीठ-साखर घालावी. हे सगळं एकत्र मिक्स करुन त्यांना चपटा आकार द्यायचा(रगडा पॅटीसच्या पॅटीसचा असतो तसा). तव्याला अगदी थोडे तेल लावुन त्यावर वरील केलेल्या चकत्या टोस्ट्च्या किंवा बिस्कीटाच्या चुर्‍यात घोळवुन फ्राय कराव्या.

प्रतिक्रिया

सोनम's picture

15 Apr 2009 - 5:50 pm | सोनम

पोह्याचे कटलेट करतात हे अजून माहित नव्हते. एकदा केले पाहिजे. :) :) :)
फोटू का नाही डकवला. :? :?

स्वाती राजेश's picture

15 Apr 2009 - 6:03 pm | स्वाती राजेश

त्यात हिरव्या मिरच्या,आलं,लसूण ची पेस्ट करून घातली तर छान लागते....
हे कटलेट दोन ब्रेड स्लाईस मधे, कांदा आणि टोमॅटोच्या चकत्याबरोबर मस्त लागते....:)

शितल's picture

15 Apr 2009 - 6:32 pm | शितल

अरे वा,
मस्त पाककृती, स्वाती ताईंनी मस्त आयडिया दिली आहे. :)
ॠचा ,
कटलेटचे फोटो का नाही दिलेस.

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 7:39 pm | क्रान्ति

बटाट्यासोबत गाजर, बीट, कोबी (फुलकोबी आणि पानकोबी दोन्हीही) घातल्या की अजून छान होते.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 9:52 pm | मदनबाण

चूकून पोह्याचे पापलेट असे वाचले!!

(धांदरट)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

यन्ना _रास्कला's picture

16 Apr 2009 - 7:12 am | यन्ना _रास्कला

सोपे आणि छान

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 10:31 am | विसोबा खेचर

फोटू? :)

ऋचा's picture

16 Apr 2009 - 11:01 am | ऋचा

स्वारी फोटो साठी
माझ्याकडे ओपन होत नाहीयेत फोटो
डकवले तरी नाही दिसले मग काढुन टाकले....

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"