वेजिटेबल सूप

चकली's picture
चकली in पाककृती
14 Apr 2009 - 8:43 pm

वाढणी: प्रत्येकी साधारण १ कप (३ ते ४ जणांसाठी)

साहित्य:
२ टेस्पून किसलेले गाजर
२ टेस्पून कॉलीफ्लॉवर,एकदम बारीक चिरून
२ टेस्पून कोबी, एकदम बारीक चिरून
२ टिस्पून लसूण पेस्ट
२ टिस्पून तेल
३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
४ टेस्पून पाती कांदयाची हिरवी पात बारीक चिरून
चवीपुरते मिठ
१/४ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून विनेगर किंवा लिंबाचा रस
२ टेस्पून कॉर्न स्टार्च
४ कप पाणी
१ टिस्पून सोयासॉस (ऐच्छिक)

कृती:
१) कढईत तेल गरम करावे त्यात लसूण पेस्ट घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावी, जास्त ब्राऊन करू नये.
२) त्यात कॉलीफ्लॉवर, गाजर आणि कोबी घालून ३० ते ४० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. नंतर ४ टेस्पूनपैकी २ टेस्पून कांद्याची पात घालून १० ते १५ सेकंद परतावे. लगेच ४ पैकी साडे तीन कप पाणी घालावे. चवीपुरते मिठ घालावे.
३) सूपला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्न स्टार्च वापरणार आहोत. तेव्हा सूपला उकळी येईस्तोवर उरलेल्या १/२ कप पाण्यात २ टेस्पून कॉर्न स्टार्च निट मिक्स करून ते मिश्रण उकळत्या सूपमध्ये घालावे. घालताना सारखे ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
४) सूप १ ते २ मिनीट उकळू द्यावे म्हणजे कॉर्न स्टार्च कच्चा राहणार नाही. त्यानंतर गॅस बंद करून त्यात विनेगर आणि कोथिंबीर घालून ढवळावे. बोलमध्ये सर्व्ह करावे. सर्व्ह करताना वरून थोडी मिरपूड आणि पाती कांदा घालावा. तसेच १/४ टिस्पून सोयासॉसही घालू शकतो.

टीप:
१) या सूपमध्ये विनेगर जास्त चांगले लागते पण विनेगरचा वास आवडत नसेल तर लिंबाचा रसही वापरू शकतो.
२) सूपचा घट्टपणा अडजस्ट करण्यासाठी गरजेनुसार पाण्याचे प्रमाण कमीजास्त करावे.

http://chakali.blogspot.com/2009/04/fresh-vegetable-soup.html

प्रतिक्रिया

रेवती's picture

14 Apr 2009 - 8:45 pm | रेवती

चकलीताई,
मस्त पाकृ व फोटो तर भन्नाट!
करून बघणारच!

रेवती

चित्रा's picture

15 Apr 2009 - 2:52 am | चित्रा

असेच म्हणते. मस्त दिसते आहे सूप.

शाल्मली's picture

15 Apr 2009 - 2:39 pm | शाल्मली

असंच म्हणते..
सूप फारच मस्त दिसतंय.
करून बघणार..

--शाल्मली.

प्राजु's picture

14 Apr 2009 - 10:41 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

14 Apr 2009 - 11:02 pm | समिधा

पाकृ. आणि फोटो दोन्ही मस्तच.
:)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

बेसनलाडू's picture

15 Apr 2009 - 12:15 am | बेसनलाडू

नक्की करणार!
(स्वयंपाकी)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

15 Apr 2009 - 4:37 am | भाग्यश्री

चित्र अफलातून!
करून पाहीन..

मितालि's picture

15 Apr 2009 - 6:05 am | मितालि

खरच खुप छान दिसतय सुप्...चव पण छान असेल...

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 7:37 am | मदनबाण

व्वा.टेस्टी सूप. :)

(स्वीट कॉर्नसूप प्रेमी)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार

मस्तच ! ह्या शनीवारचा मेनु फिक्स ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

15 Apr 2009 - 11:43 am | स्वाती दिनेश

फोटो लय झाक.. मस्तच दिसतय ग ,
स्वाती

सायली पानसे's picture

15 Apr 2009 - 12:02 pm | सायली पानसे

आजच करुन बघते.

rupali chaudhary's picture

15 Apr 2009 - 2:45 pm | rupali chaudhary

छानच फोतु अहे

मीनल's picture

15 Apr 2009 - 4:33 pm | मीनल

मी केल. छान लागल. सकस ही आहे सूप.
मीनल.

विसोबा खेचर's picture

15 Apr 2009 - 4:54 pm | विसोबा खेचर

सु रे ख...!

अन्य शब्द नाहीत...

तात्या.

स्वाती राजेश's picture

15 Apr 2009 - 5:28 pm | स्वाती राजेश

दोन्ही मस्त!!!!!

चकली's picture

15 Apr 2009 - 6:51 pm | चकली

सर्व वाचकांचे खूप खूप धन्यवाद!
चकली
http://chakali.blogspot.com

शितल's picture

15 Apr 2009 - 6:56 pm | शितल

चकलीताई,
सुंदर पाककृती,
नवर्‍याचे ह्या सुपचा फोटो पाहुन हे सुप तुला करायला जमेल का, करशिल का अशी विचारणा केली आहे. :)

चकली's picture

15 Apr 2009 - 7:02 pm | चकली

पूर्ण जेवण करायचा मूड नसेल तेव्हा हे सूप माझे आवडते सूप आहे. थोडया भाज्या संपतात. आणि पटकन होते. अवांतर : माझा नवराच हे सूप छान बनवतो. त्यावरून हे कोणालाही येउ शकेल बनवता :)

चकली
http://chakali.blogspot.com

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 7:37 pm | क्रान्ति

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटल. आता करून पहावच लागेल!
मस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2009 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो काय भारी आलाय !

चतुरंग's picture

15 Apr 2009 - 8:30 pm | चतुरंग

मस्तच! चकलीताई, कमालीचे टेंप्टिंग फोटू आलेत!! =P~

(सुपातला)चतुरंग

पक्या's picture

15 Apr 2009 - 10:48 pm | पक्या

मस्त सूप....माझे आवडते. फोटो पण छान.
पाण्याऐवजी जर व्हेजी किंवा चिकन स्टॉक वापरला तर अ़जून छान चव येते. थोडे अजून चटपटीत हवे असेल तर चिली सॉस पण घालावा.

>>>व्हेजी किंवा चिकन स्टॉक वापरला तर अ़जून छान चव येते.

हे बरोबर आहे. स्टॉक वापरून चव वाढते. फक्त कोथिंबीर ची छान सोपी चव हवी असेल, तर पाणीच वापरावे असा अनुभव.

चिली सॉस / शेझवान सॉस /बटर /चीझ घालून वेग वेगळे फ्लेवर देता येतील!

चकली
http://chakali.blogspot.com

मीनल's picture

16 Apr 2009 - 6:09 am | मीनल

माझ लक्ष त्या चीनी कॅरेक्टर असलेल्या बाऊलकडेही गेल.
सूपला साजेसे बाऊल आहे.त्यावरच लिहिलेले 大 म्हणजे 'मोठे' (big) आहे. पुढे काही वाचता येत नाही आहे.
चीनी मँडरीनमधे सूपला `थांग` म्हणतात.

मीनल.

चकली's picture

16 Apr 2009 - 7:49 am | चकली

मीनल, तुमचे निरीक्षण एकदम जबरदस्त आहे. माझ्या घराजवळच्या अशियन मार्केट मध्ये अशीच खूप छान छान भांडी आहेत. गेले दूकानात कि सगळेच घ्यावेसे वाटते.

चकली
http://chakali.blogspot.com