राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
7 Apr 2009 - 10:12 pm
गाभा: 

या विषयावर मिपावर चर्चा झालीकी नाही हे मला माहिती नाही . पण सध्या सगळेच पक्ष निवडुन येण्याची क्षमता
या गोंडस नावाखाली समाजातील गुन्हेगार घटकांना आपल्या पक्षाचे तिकिट देताना दिसतात. संजय दत्त सारखा
प्राणी तर निवडणूक लढवण्याची परवानगी मिळण्यासाठि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतो. अमरसिंहासारखे नेते
त्याच्यामागे शेपटाप्रमाणे धावत असतात. अरुण गवळीसारखा माणूस तर यासाठि आपला पक्षच स्थापन करतो.
एकंदरीत काय तर कायद्यापासून स्वताचे रक्षण करण्यासाठि त्याच कायद्याला वाकवायला बघायचे.
मल याबाबतीत एक प्रश्न नेहमी सतावतो तो असा की समजा हे निवडुन येण्याची क्षमता असलेले सर्व प्राणी
निवडुन आले आणि यांची संख्या जास्त होवुन यांनि आपला स्वतंत्र गट लोकसभेत स्थापन केला आणि लोकसभेला
वेठिला धरले तर काय होइल ? एक भीषण चित्रच डोळ्यापुढे उभे राहते. आणि या सर्वच पक्षांच्या सत्तेच्या प्राप्तिसाठि
काहीही करण्याच्या या मनोव्र् त्तीची चीड यायला लागते. आणि या आपल्या देशाचे आणि या जनतेचे काय होणार
हा विचार मनात डोकावू लागतो . खरेच या गुंड मंडळींनी आपली लॉबी लोकसभेत स्थापन केली तर आपल्या
देशावर , आपल्यावर याचे काय परिणाम होतील. तुम्हाला काय वाटते क्रुपया प्रतिसाद द्या.

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

7 Apr 2009 - 11:21 pm | अविनाशकुलकर्णी

खरेच या गुंड मंडळींनी आपली लॉबी लोकसभेत स्थापन केली तर आपल्या.देशावर , आपल्यावर याचे काय परिणाम होतील. तुम्हाला काय वाटते क्रुपया प्रतिसाद द्या.

8} 8} 8} 8}

अहो काय प्रतिसाद द्या???? अहो अशी लॉबी लोकसभेत आहे म्हणुन तर १५०० अरब डालर इतकी रक्कम स्वीस बंकेत जमा आहे...काय परीणाम होणार आहेत..??? जनता सवय करुन घेईल...अतिरेकि हल्ल्यांचि नाहि का करुन घेतली..काहि होणार नाहि....यांना शेवटी जनताच निवडुन देते..

चिरोटा's picture

8 Apr 2009 - 7:35 am | चिरोटा

अशी लॉबी लोकसभेत आहे म्हणुन तर १५०० अरब डालर इतकी रक्कम स्वीस बंकेत जमा आहे

अगदी बरोबर.मुख्य म्हणजे राजकारणी हेच अधिक्रुत गुन्ड आहेत.गवळीने तस्करी आणि खन्डणी वसूल करुन पैसा मिळवला. राजकारणी अधिक्रुतरित्या देशाला लुबाडत असतात. म्हणुनच तर प्रत्येकाकडे 'समाजसेवा' करूनपण कोट्यावधी रुपयान्ची सम्पत्ती आहे.गवळी ने हे वेळीच ओळ्खून स्वतहाचा पक्ष स्थापन केला.जनता पण अश्या लोकाना निवडून देते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न