बूटरुपी मिसाइल.

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
7 Apr 2009 - 9:47 pm
गाभा: 

वास्तविक बुटाचे काम हे मानवाच्या पावलांचे धूळ, काटे,रस्त्यातील खाचखळगे, व अन्य तत्सम पदार्थ यापासून संरक्षण
करणे असेच वाटत होते. याच बूटाने " डोक्यात बुट निघणे " यासारखे वाक्प्रचार दिले.
पण या बुटाला सध्या काय झाले आहे समजत नाही. सध्या हा मानवनिर्मित प्राणी सध्या मान्यवर लोकांच्या अंगावर
धावून जाताना दिसतो. याला सध्या काय झाले आहे ते समजत नाही. मानवाचे रक्षण करण्याऐवजी हा एखाद्या मिसाइलसारखा मानवावर हल्ला करताना दिसतो.
हे सर्व " बूट पुराण " लिहिण्याचे कारण असे की, संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर
सहज बातम्या बघितल्या तर काय एका पत्रकाराने आपले श्री . चिदंबरम यांच्यावर बूट फेकुन मारला.
याच्याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष श्री बुश यांनाही बुटाचा प्रतिसाद मिळाला होता. तेही चिदंबरमसारखे थोड्क्यात बचावले. मला वाटते सध्या सर्व सामान्य लोकांचा आपल्या नेत्यावरचा राग व्यक्त करण्याचे काम या मानवनिर्मित प्राण्याने ( बुटाने ) स्वीकारलेले दिसते.
लोकांचा राग व्यक्त करण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. पुर्वी लोक नेत्यांच्या सभेत चपला फेकुन आपला राग व्यक्त
करत असत.
पण सध्या हे काम बुटाला करावे लागते. तुम्हाला हा प्रकार आवडला का? अजुन कुठल्या नेत्यांवर बुटाने आक्रमण करावे
असे आपल्याला वाटते. का भारतातले सर्वच नेते जोड्याने ( बुटाने ) मारण्याच्या लायकीचे आहेत. क्रुपया प्रतिसाद द्या.

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

7 Apr 2009 - 10:12 pm | क्लिंटन

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान स.का.पाटील आणि मोरारजी देसाईंवर चौपाटीवरच्या सभेत कोणीतरी जोडे फेकले.त्यावर आचार्य अत्र्यांची प्रतिक्रिया ’काँग्रेसच्या मंत्र्यांवर कोणी जोडे फेकू नयेत कारण तो जोड्यांचा अपमान आहे’. हे भाषण माझ्याकडे आहे. ते लवकरच अपलोड करून दुवा देतो. म्हणजे पाहिजे असल्यास ते डाऊनलोड करून घेता येईल. ते भाषण स्वत: अत्र्यांच्या आवाजातील आहे असे वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

वर उल्लेख केलेले (बहुदा) आचार्य अत्र्यांच्या आवाजात असलेले भाषण इथून डाऊनलोड करून घेता येईल.याच भाषणात बूट फेकायचा उल्लेख आहे म्हणून या चर्चेच्या प्रतिसादात लिहित आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

विकास's picture

8 Apr 2009 - 4:00 am | विकास

हे सदानंद जोशींनी केलेल्या "मी अत्रे बोलतोय" मधील भाग असावा असे वाटते.

आंबोळी's picture

7 Apr 2009 - 10:37 pm | आंबोळी

दादानु,
कुठुन डाऊनलोड करु?
तुमचे इथून ब्राउन दिसत नाहिये... आणि त्यावर टिचकले तरी काही होत नाहिये...

आंबोळी

आता ते ब्राउन दिसु लागले आहे आणि मी डाऊनलोड करतोय.... धन्यवाद!!!
प्रो. आंबोळी

अविनाशकुलकर्णी's picture

7 Apr 2009 - 11:01 pm | अविनाशकुलकर्णी

सारे नेते बुट मारण्याच्या पलिकडे गेले आहेत....

X( X( X( X(