स्टफ मेथी पराठे

chikusi's picture
chikusi in पाककृती
5 Apr 2009 - 12:49 pm

साहित्य : 1 मेथीची जुडी, डाळीच पीठ, फोडणीचे साहित्य, कणीक, मीठ, तिखट, 7-8 लसूण पाकळ्य

कृती : मेथीची जुडी धुवून व बारीक चिरून घ्या. तेल तापवत ठेऊन त्यात मोहरी ठेचलेला लसूण, हिंग, हळद, मेथी, मीठ, तिखट घाला. भाजी परतून कोरडी झाल्यावर त्यात डाळीचे पीठ घाला. भाजी थोडी शिजवा, थंड करा. 10-12 मध्यम आकारच्या पोळ्यांसठी लागणारी कणीक, मीठ व मोहन घालून घट्ट भिजवा. नंतर दोन पुर्‍या लाटून एका पुरीवर मेथीची भाजी घालून त्यावर दुसरी पुरी ठेऊन घट्ट दाबून घ्या. हलक्या हाताने पीठ लाऊन प्रते लाटा. दही, चटणी, तूप, लोणी बरोबर पराठे खाण्यास द्या.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

5 Apr 2009 - 12:54 pm | पर्नल नेने मराठे

चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

5 Apr 2009 - 1:38 pm | परिकथेतील राजकुमार

आपले नाव सौ. पुजा उपेंद्र पाठक आहे का हो ? नसेल तर काय विलक्षण योगायोग आहे बघा ना ;)

परा होम्स
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

5 Apr 2009 - 1:50 pm | दशानन

>>परा होम्स

=))

कायच्या काय शोधतो रे ;)

पर्नल नेने मराठे's picture

5 Apr 2009 - 2:01 pm | पर्नल नेने मराठे

कथिन्च आहे 8| राज्कुमर तु दितेत्क्तिव आहेस का :-?
चुचु

सोनम's picture

15 Apr 2009 - 5:57 pm | सोनम

राज्कुमर तु दितेत्क्तिव आहेस का :? :?

मिसळपाववरील दितेत्क्तिव नक्कीच असेल चुचू. :) :)

प्राजु's picture

15 Apr 2009 - 6:43 pm | प्राजु

चिकुशी...
आपल्याकडून खुलासा हवा आहे. आपण त्याच आहात का? नसाल तर लेखन चौर्य च्या आरोपाखाली हा धागा अप्रकाशीत करण्यात येईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/