पाककृती हवी आहे! मिर्ची का सालान!

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in पाककृती
4 Apr 2009 - 9:25 pm

हैदराबादी बिर्याणी बरोबर वाढले जाणारे मिर्ची का सालान जसे बनवतात?

प्रतिक्रिया

पक्या's picture

4 Apr 2009 - 10:58 pm | पक्या

तरला दलाल ची रेसिपी आहे.
साहित्यः
२ कप जाड हि. मिरच्या किंवा ढोबळी मिरची ..जाड लांबट आकारात कापून ,
१ चमचा जिरे, १/२ चमचा मोहरी , १/४ चमचा मेथ्या (मेथी बी) , १/४ चमचा कलौंजी (कांदा बी)
१/४ चमचा हळ्द, २ चमचे धने जीरे पूड , २ चमचे तिखट (लाल मिरची पूड)
६-७ कडीपत्त्याची पाने , १ चमचा चिंचेचा कोळ , कोथिंबिर चिरून , तेल, चवीनुसार मीठ,

दाणे तीळ कूटासाठी - २ चमचे शेंगदाणॅ, २ चमचे तीळ , १ चमचा जीरे मिक्सर मधून कोरडेच वाटून घेणे.
ओल्या मसाल्यासाठी - ६ लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले , १ कप चिरलेला कांदा, १/२ चिरलेला टोमॅटो , ३ मोठे चमचे ताजा खोवलेला नारळ. सर्व पदार्थ लागेल तसे थोडे पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्यावेत.

कृती:
लांबट आकारात मिरच्या कापून घ्याव्यात. आतील बी काढून टाकावे. कढईत तेल गरम करून मिरच्या किंचित पांढरट रंग येईपर्यन्त तळून घ्याव्यात. बा़जूला काढून ठेवाव्यात.
त्याच तेलात जीरे , मोहरी, कलौंजी, मेथ्या आणी कडीपता टाकावा. मोहरी तडतडली की ओला मसाला घालावा. २ मिनिटे परतावा. हळद, धने जिरे पूड , लाल तिखट , दाणे-तीळ पूड घालावी. सर्व नीट मिक्स करून घेऊन मध्यम आचेवर तेल सुटेपर्यन्त परतत रहावे. २ कप पाणी घालावे. चिंचेचा कोळ घालावा. उकळी येऊ द्यावी. मग तळलेल्या मिरच्या घालाव्यात. कोथिंबीर् मीठ घालून ग्रेव्ही घट्टसर होईपर्यंत शिजू द्यावे.
गरमागरम वाढावे.

mirchi ka salan
फोटो आंतरजालावरून साभार.

संजय अभ्यंकर's picture

15 Apr 2009 - 7:36 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/