रगडा पॅटिस (फोटु सहीत)

समिधा's picture
समिधा in पाककृती
23 Mar 2009 - 4:40 am

हा पदार्थ ह्या आधी मि.पा.वर दिला आहे,पण माझी पध्द्त थोडी वेगळी असल्याने मी पण देत आहे.
पॅटिसः
साहित्यः
बटाटे ३-४
हळद,तिखट्,मिठ, चविनुसार
ब्रेड स्लाईज २
तेल पॅटिस भाजण्यासाठी
कृती:
बटाटे उकडुन मॅश करुन घ्यावेत.
त्यात हळद,तिखट्,मिठ आणि पाण्यात भिजवुन काढलेले ब्रेड स्लाईज घालुन मस्त एकजिव करावे
हव्या त्या आकाराचे पॅटिस बनवुन तेलावर भाजुन घ्यावेत.


रगडा
साहित्यः
पांढरे वाटाणे २ वाटी (रात्रभर किंवा ६-७ तास भिजवुन ठेवावेत.)
तिखट, छोले मसाला, मिठ ,चविनुसार
मोहरी आणि हिंग थोडस.
कांदा १(बारिक चिरलेला)
टोमॅटो १ बारिक चिरुन
तेल अंदाजे
कृती:
भिजवलेले वाटाणे कुकर ला शिजवुन घ्यावेत.
एका भांड्यात तेल तापत ठेउन त्यात मोहरी, हिंग, हळद आणि कांदा घालुन खुप परतावे.
नंतर टोमॅटो घालुन त्यावर आवडीप्रमाणे तिखट,छोले मसाला घालावा.
मग शिजवलेले वाटाणे घालावेत.
शेवटी मिठ घालुन मस्त उकळावे.

इतर साहित्यः
चटणी,बारिक चिरलेला कांदा,कोथिंबीर आणि शेव
चटणी:
साहित्यः
भिजवलेलीचिंच आणि खजुर, गुळ,मिठ्,तिखट्,थोडासा पुदिना
कृती:
वरिल सर्व साहीत्य एकत्र मिक्सर मधुन काढावे.

एका बाऊल मध्ये पॅटिस मग रगडा त्यावर चटणी ,कांदा,कोथिंबीर्,शेव घालुन तयार करावे.

नंतर गरमागरम रगडा पॅटिस वर ताव मारावा. ;)

प्रतिक्रिया

लवंगी's picture

23 Mar 2009 - 4:49 am | लवंगी

सही फोटो.. आता जेवण झाल आणी आता परत भूक लागली.

समिधा's picture

23 Mar 2009 - 7:20 am | समिधा

येतेस का खायला?

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

लवंगी's picture

23 Mar 2009 - 7:49 am | लवंगी

अस प्रेमाने बोलवते म्हटल्यावर आता पळत येते.

समिधा's picture

23 Mar 2009 - 7:53 am | समिधा

नक्की ये.... :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

सँडी's picture

23 Mar 2009 - 7:10 am | सँडी

खुपच छान!
करुन पहातो...आणि खातो, लवकरच!

रेवती's picture

23 Mar 2009 - 7:21 am | रेवती

फोटूसहित असलेली पाकृ छानच!
माझी आवडती पाकृ असल्याने एक दोन दिवसात करीनच.
रेवती

प्राजु's picture

23 Mar 2009 - 7:30 am | प्राजु

पण यात नेमकं वेगळं असं काय केलं आहेस?? मीही पॅटिस असेच करते आणि रगडाही असाच करते. मला वाटलं वेगळी पाकृ म्हणजे तू वाटाण्यांऐवजी छोले चा रगडा करतेस की काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

23 Mar 2009 - 7:52 am | समिधा

अग आकांक्षाने केलेल्या पाकृ.पेक्षा थोडी वेगळी आहे.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु's picture

23 Mar 2009 - 8:16 pm | प्राजु

काहीही असो.. फोटो जबरा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

23 Mar 2009 - 7:36 am | सहज

सुंदर सुंदर सुंदर....

सुक्या's picture

23 Mar 2009 - 7:57 am | सुक्या

मस्तच . .
शेवटचा फोटु पाहुन भुक लागली . . :P

(भुक्या) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 9:32 am | विसोबा खेचर

समिधा, जियो..!

पाकृकरता शब्द नाहीत...!

आम्ही जे शब्द वापरतो ते आमच्या काही सुहृद आणि हितचिंतक मैत्रीणींना पसंद नाहीत! :)

तात्या.

चित्रा's picture

24 Mar 2009 - 12:57 am | चित्रा

आम्ही जे शब्द वापरतो ते आमच्या काही सुहृद आणि हितचिंतक मैत्रीणींना पसंद नाहीत!

छान झाले. धन्यवाद!

पाककृती आणि फोटो छान.

रेवती's picture

24 Mar 2009 - 1:05 am | रेवती

हेच म्हणते गं चित्राताई, अगदी हेच म्हणते!:)

रेवती

गुळांबा's picture

23 Mar 2009 - 10:40 am | गुळांबा

भाजण्यापुर्वी थोडे रव्यात किंवा खसखशीत घोळवुन मग तेलावर भाजा. मग सांगा कसे लागते ते
प्याटिस. येकदम ढासु लागल बगा.

ऋचा's picture

23 Mar 2009 - 10:59 am | ऋचा

मला घरी करायचच होतं पण कृती मिळत नव्हती
धन्यवाद आणि मस्त फोटु....... =P~
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

छोटुली's picture

23 Mar 2009 - 11:41 am | छोटुली

फोटो पाहुन खावासा वाटत आहे.मी थोद्या वेगळ्या प्रकार वापरुन रगडा करते.

थोडा अख्खा गरम मसाला भाजुन मिक्सर मधुन काढुन फ्राय करते.त्याने छान चव येते.

सोनम's picture

23 Mar 2009 - 8:12 pm | सोनम

पाककृती छान आहे. :) :) :)
आणि फोटो पाहून तर आताच करावीशी वाटते..
आता जाते आणि एकदाची करुनच येते...
धन्यवाद =D> =D> =D>

शितल's picture

23 Mar 2009 - 9:28 pm | शितल

फोटो मस्तच :)
मी वाटाण्याच्या भाजीत छोले मसाला वापरत नाही, वाटप लावते खोंबरे/कांदा याचे, आता तुझ्या पध्दतीने करून बघेन. :)

मदनबाण's picture

23 Mar 2009 - 11:00 pm | मदनबाण

आहाहा...च्यामारी असे चटकदार फोटो पाहिले की जाम भूक लागते...:)

(खादाड)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 10:52 pm | क्रान्ति

माझी आवडती डिश! एकदम बढिया! फोटो तर भन्नाटच आहेत. खास करून शेवटचा खूप मस्त आहे. [माझ्या लेकीला तो पाहून पुन्हा भूक लागली!]
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

भाग्यश्री's picture

23 Mar 2009 - 10:59 pm | भाग्यश्री

कालच जेवणाच्या वेळेस पाहीली ही पाकृ! इतकी भूक लागली की प्रतिसाद द्यायच्या आधीच स्वयपाकाला पळून गेले..
आज जरा भरल्या पोटी लिहीते..
मी हा प्रकार स्वतः करण्याच्या ऐवजी तुझ्याकडे येऊन आयते खाणं पसंत करेन! :)
केव्हा येऊ??

http://bhagyashreee.blogspot.com/

समिधा's picture

23 Mar 2009 - 11:15 pm | समिधा

कधिही ये ,तु आल्यावर पुन्हा बनवेन. :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चकली's picture

24 Mar 2009 - 12:31 am | चकली

माझा आवडता पदार्थ..छोले मसाला + पांढरे वाटाणे वापरून कधी केला नाही रगडा. आता करून बघेन.
चकली
http://chakali.blogspot.com

दिपाली पाटिल's picture

24 Mar 2009 - 7:15 am | दिपाली पाटिल

मस्त दिसतेय रगडा पॅटिस...