बिरडया॑चा भात

चैत्राली's picture
चैत्राली in पाककृती
5 Mar 2009 - 4:04 pm

साहित्य :-
२ वाट्या बासमती ता॑दुळ.
२ वाट्या भिजत घालून सोललेले कडवे / गोडे वाल.
गोडा मसाला १ चमचा.
काळा मसाला १/२ चमचा.
दाण्याचा कुट १ मोठा चमचा.
हळ्द १ चमचा.
मीठ अ॑दाजाने.
हि॑ग १ चमचा.
मोहरी १ चमचा.
लाल ति़खट आवडीनुसार.
कडवे वाल घेतल्यास चवीपुरता गुळ.
कढीपत्त्ता.
तेल २ मोठे चमचे.
सजावटीसाठी कोथि॑बीर, किसलेले खोबर॑.

कृती :-
प्रथम ता॑दुळ व भिजत घालून सोललेले कडवे / गोडे वाल धुवुन निथळ्त ठेवावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात २ मोठे चमचे तेल टाकावे. तेल तापल्यावर मोहरी, हि॑ग, हळ्द व कढीपत्त्ता घालून खम॑ग फोडणी करावी. त्यात प्रथम वाल व ता॑दुळ घालून चा॑गले परतून घ्यावे. न॑तर त्यात ता॑दुळाच्या दुप्पट उकळ्लेले पाणी व मीठ घालून भात अर्धवट शिजवून घ्यावा. न॑तर त्यात कोथि॑बीर व किसलेले खोबर॑सोडून इतर सर्व साहित्य घालून भात मऊसर पण मोकळा शिजवून घ्यावा वरुन सजावटीसाठी कोथि॑बीर, किसलेले खोबर॑ पेरावे. घरी कढवलेले साजूक तूप व लि॑बू पिळून गरम गरम खावा. (पावसाळी वातावरणात तर याची लज्जत काय वर्णावी)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Mar 2009 - 4:10 pm | विसोबा खेचर

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना कोंणताच बरा-वाईट प्रतिसाद देत नाही.. क्षमस्व.

आपल्याला आमच्या बहुमोल प्रतिसादाची आवश्यकता असेल तर कृपया यापुढे मिपावर पाकृ टाकताना सोबत फोटूही देण्याचे करावे. आवश्यकता नसेल तर राहिलं! :)

वास्तविक बिरड्याचा भात ही आमची अत्यंत म्हणजे अत्यंत आवडती पाकृ! म्हणूनच फोटू अत्यावश्यक होता. तो पाहात पाहात जीव जाळून घेण्याची मजा काही औरच! असो..

आपला,
(कायस्थ) तात्या.

विंजिनेर's picture

5 Mar 2009 - 4:25 pm | विंजिनेर

म्हणूनच फोटू अत्यावश्यक होता. तो पाहात पाहात जीव जाळून घेण्याची मजा काही औरच! असो..

हल्ली फोटो नाही तेच एका अर्थाने बरे आहे.
कारण ते खतरनाक पाकृचे खतरनाक फोटो पाहिले की ओवाळून टाकायलासुद्धा जीव राहात नाही(बाय द वे, तात्या तुम्हाला हे स्वानुभवावरून माहित आहे तरी जित्याची खोड ...).
त्यामुळे चैत्राली तै, चालुदे..
दृष्टी आड सृष्टी... :(

मिथिला's picture

6 Mar 2009 - 2:00 am | मिथिला

माझा हा खुप आवडता भात ....त्यात मी नारळाचे दुध टाकते शिजवताना ...छान चव येते...

चित्रा's picture

6 Mar 2009 - 2:17 am | चित्रा

छान पाककृती!
पुढच्याही लिखाणाला शुभेच्छा!

बेसनलाडू's picture

6 Mar 2009 - 3:10 am | बेसनलाडू

हे सुद्धा करणारच!
(प्रयोगशील)बेसनलाडू

परीसा's picture

6 Mar 2009 - 1:40 pm | परीसा

रेसिपी खुप छान आहे. पण मला हे सांगाल का कि गोडा मसाला आणि काळा मसाला म्हणजे नक्कि कुठला मसाला?

परीसा

hemuu's picture

30 Mar 2009 - 4:29 pm | hemuu

करी पण करतात ना?
महित असेल तर रेसिपी टका
मिपा वर ,

चकली's picture

30 Mar 2009 - 6:41 pm | चकली

पाकृ छानच :)

चकली
http://chakali.blogspot.com

सुनील's picture

30 Mar 2009 - 7:19 pm | सुनील

वर परीसा यांनी विचारलेली शंका रास्त आहे. माझ्या माहितीनुसार गोडा मसाला आणि काला मसाला हे दोन्ही एकच. तुम्हाला वेगळे अभिप्रेत असतील तर कृपया स्पष्ट करावे.

वालाला बहुधा फक्त कोकणातच बिरडे असे संबोधततात. आणि चातुर्मासात ज्यांना मांसाहार निषिद्ध असतो त्यांचासाठी बिरड्याचे विविध प्रकार (उदा बिरड्याची उसळ) म्हणजे पर्वणीच!

पाकृ छान आहेच फक्त फोटूचे तेवढे बघा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.