बोंबील फ्राय पाककृती हवी आहे.

सालोमालो's picture
सालोमालो in पाककृती
26 Feb 2009 - 12:26 pm

मला बोंबील फ्राय पाककृती हवी आहे. जरा लवकर टाका. या शनिवारी पहिल्यांदाच फिश बनवून बघणार आहे. शुभारंभासाठी बोंबील निवडलाय.

सालो

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 12:27 pm | पिवळा डांबिस

आपल्या प्राजुताईला विचारुन पहा.....
तिला बोंबलांच्या बर्‍याच रेसेपी माहिती आहेत....

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:03 am | प्राजु

कोणी भेटलं नाही का सकाळपासून??
थांबा आता, तुमच्या घरी धाड टाकेन आणि काकूंकडून एकदम फर्मास बोंबलाच्या रेसिप्या शिकून घेईन आणि मग या सालोमालो ना शिकवेन. :)
जस्ट वेट ऍण्ड वॉच.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुनील's picture

26 Feb 2009 - 12:35 pm | सुनील

बाबारे, नवशिक्या आहेस म्हणून सांगतो - बोंबिल चवदार असतो हे खरे पण मासा अगदी लिबलिबीत रे. सुरुवात करायची तर सुरमई/रावसापासून कर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिता's picture

26 Feb 2009 - 12:46 pm | अभिता

पाककृति ह्या विभागात बघा. सापडेल.

अभिता's picture

26 Feb 2009 - 12:56 pm | अभिता

५व्या पानावर जयेश माधव यांनी सुरु केलेला धागा आहे.(बोंबिल या नावाने)

मितालि's picture

26 Feb 2009 - 1:12 pm | मितालि

गुरुवारी आठवण करुन दिली बोंबिलाची...

पिवळा डांबिस's picture

26 Feb 2009 - 1:14 pm | पिवळा डांबिस

हाणा त्याला, सोडू नका!!!!
:)

सालोमालो's picture

26 Feb 2009 - 1:29 pm | सालोमालो

प्राजु, तुझं नाव पुढे आलयं. सांग जरा छान कुरकुरीत बोंबील कसा करू ते. कुरकुरीत असूनही फार तेलकट नको. सध्या डाएटींग वर आहे. :)

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:01 am | प्राजु

अहो सालोमालो.........
डांबिसकाकांनी किडा सोडला आणि तुम्ही विश्वास ठेवला. अहो आजपर्यंत फिश (न शिजवलेला) हातातही नाही घेतला मी.. पुढे कधी घेईन हे ही नाही माहिती. मला काय विचारता बोंबिल कसा करायचा? तो बोंबिल.. बोंबलायला दिसतो कसा हे नाही माहिती मला. मी काय डोंबलाची रेसिपी सांगू?? :SS
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सालोमालो's picture

27 Feb 2009 - 11:29 am | सालोमालो

प्राजु ताई,

बरोबर आहे. आता यापुढे विश्वास विचार करूनच ठेवीन. काय होतं, वेळ जातो फुकट आणि हाती काही लागत नाही. कोणाला पाककृती विचारु नये हे मात्र कळलं.

सालो

जागु's picture

26 Feb 2009 - 1:32 pm | जागु

सालोमालो
बोंबिलाचे डोके आणी शेपुट काढायचे, पोटातिल घाण काढायची, स्वच्छ धुवुन त्याला मिठ, हिंग, हळद, मसाला आणि आल लसुण पेस्ट लावावी, वरुन लिंबु पिळायचा जास्त नको थोडाच. मग एका ताटात तांदळाच पिठ घ्यायच
तवा चांगला तापला की, त्यात थोडे तेल सोडायचे मग बोंबिल पिठात लोळवुन तव्यावर टाकायचे गॅस मिडियम ठेवायचा. थोड्या वेळाने उलटे करुन तळायचे. झाले बोंबिल.

तांदळाच्या पिठात थोडे बेसन मिक्स करुन पण छान लागतात.
आल लसुण पेस्ट नसली तरी चालते.

सालोमालो's picture

26 Feb 2009 - 1:47 pm | सालोमालो

खूप आभार. डोके, शेपुट आणि पोटातली घाण काढुन मिळते ना कोळीणीकडून? का self service आहे?

सालो

हाय सोलो

प्रथम बोंबिल व्यवस्थित धूऊन घ्यावेत. नंतर ते एका पातळ कपड्यामध्ये ठेऊन सगळ पाणी निघुन जाईल तोवर पाट्याखाली ठेवावेत. कोकम किंवा आले-लसुणची पेस्ट व त्यात लाल मसाला टाकून ती पेस्ट बोंबिला लावून ५ ते १० मिनिटे ठेवावे. तळताना रवा किंवा तांदळाचे पीठ लावून नॉनस्टिक तव्यावर थोडे थोडे तेल घालून मस्त कुरकुरीत फ्राय करावेत.

प्राप्ती

सालोमालो's picture

26 Feb 2009 - 1:57 pm | सालोमालो

खूप धन्यवाद. रेसिपी छान वाटतेयं.

ता.क. अरे नाव तरी व्यवस्थीत घ्या रे. सालो च सोलो केलयं. Globalization अजुन काय!

सालो

मितालि's picture

26 Feb 2009 - 1:53 pm | मितालि

मासे खायचे असतील तर ते स्वच्छ करायच काम पण मनापासुन करायच...

सालोमालो's picture

26 Feb 2009 - 2:01 pm | सालोमालो

मिताली ताई, सुरवात आहे अजून, होईल सवय. आत्ता सध्या तरी कोणी साफ करून दिले तर बरं.

सालो

जागु's picture

26 Feb 2009 - 2:06 pm | जागु

कोळीण ओळखीची असेल तर साफ करुन देईल नाहीतर जरा जास्त रिक्वेस्ट करायची.
प्राप्ति पाट्याखाली ठेवलेले बोंबिल पण छान लागतात ग. पण हल्ली पाटे बर्‍याच घरात नसतात ग.

चंबा मुतनाळ's picture

26 Feb 2009 - 2:30 pm | चंबा मुतनाळ

पाटा नसला तर गोटा टायर खाली बोंबील ठेवावे, सगळे पाणी निघून जाते!

सालोमालो's picture

26 Feb 2009 - 3:15 pm | सालोमालो

कोळीण ओळखीची करण्याचं काम माझ. आजचं कामाला लागतो आणि चांगली कोळीण शोधून काढतो.

(डोलकर दर्याचा राजा) सालो

आप्पा मु.पो. बोरिवली's picture

1 Mar 2009 - 9:09 pm | आप्पा मु.पो. बोरिवली

छान, कोळीणच खास ओळ्खी ची झाली तर मग काय, तयार बोम्बिल च ताटात...

खादाडि साठि तत्पर

बाप्पा's picture

26 Feb 2009 - 4:09 pm | बाप्पा

यांना कुणी तरी आवरा रे... आज गुरुवार आहे.. उगाच मला उपवासाच्या दिवशी जाळु नका... X(

-- बाप्पा लंबोदर.