मोक्का उर्फ मकोका

गुळांबा's picture
गुळांबा in काथ्याकूट
16 Feb 2009 - 7:51 am
गाभा: 

मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. माझ्या माहिती प्रमाणे हा
कायदा अजामीनपात्र आहे. ज्या गुन्हेगाराला लागू होईल तो लवकर तुरुंगातुन बाहेर यायाची शक्यता कमीच. म्हणुन ह्या कायद्याला सर्व घाबरुन असतात.

आता आपण भारतातील एका बँकेचे उदाहरण पाहु. या क्षयज्ञ बँकेला १५ ऑगस्टला २००८ ला स्वातंत्रदिनाची, १७ ऑगस्टला रविवारची व १९ ऑगस्टला पतेतीची सुटी होती. त्या बँकेच्या कामगार युनियनने दि. १६ व १८ ला संपाची हाक दिली व त्या बँकेचे हजारो कर्मचारी संपावर गेले.

नतीजा असा झाला कि सलग ५ दिवस १५ ऑगस्ट २००८ ते १९ ऑगस्ट २००८ बंद राहिल्या. अर्थव्वस्थेचे करोडोचे नुकसान झाले. सलग ५ दिवस बँक बंद राहिल्याने लोकांचे हाल झाले. हि बँक स्वत:ला देशाची सर्वात मोठी बँक म्हणवते. युनियन करुन, संप पुकारुन देशाचे आर्थिक नुकसान करणं हि संघटित गुन्हेगारी का समजु नये?

मुंबई सारख्या महानगरात म्युन्शिपाल्टीची लोकं एन पावसाळ्यात एकत्र येऊन संप पुकारतात. रविवार आणि एखाद्या सार्वजनिक सुटीला जोडुन सलग तिसऱया दिवशी कचरा उचलत नाहीत. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरते. रोगराई वाढते.

श** रा* या त्यांच्या नेत्याला मग मकोका का लावु नये?

मी म्हणतो कडक कायदे केले तरच ह्या संपबाजीला आळा बसेल. तुमचे मत सांगा.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

16 Feb 2009 - 12:33 pm | नितिन थत्ते

मला मुंबई महानगरपालिकेच्या बोनसविषयी नेहमी एक प्रश्न पडतो
दर वर्षी संप केल्यावर बोनस्ची मागणी मान्य केली जाते. असे असताना त्या बोनसची तरतूद अर्थसंकल्पात अगोदरच का केलेली नसते?
की संप केल्याशिवाय बोनस द्यायचा नाही असे प्रशासनाने ठरवलेले असते? तसे असेल तर संप करणे आवश्यकच म्हणावे लागेल.
याची दुसरी बाजू म्हणजे फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर होताच, त्यात बोनसची तरतूद नाही म्हणून युनियन लगेच फेब्रुवारीतच का संप करीत नाही?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

गुळांबा's picture

18 Feb 2009 - 5:30 pm | गुळांबा

"तु मारल्या सारखं कर, मी रडुन दाखवतो म्हणजे जन्ता फसेल" असे काहीतरी असावे असे माझे मन म्हणते.

कशिद's picture

17 Feb 2009 - 1:17 pm | कशिद

नक्की ही केस कुठली ..

मला काही गोष्टी विसंगत वाटत आहेत .

मोक्का अणि बँकेचा संप चा कसा समन्ध जोडला हे समजत नाहि हि केस कामगार कायदा मोड़ते आहे जर संप केला आहे तर..
अणि मोक्का ही फोजदारी न्यालायाची केस आहे.

संप म्हणजे काही संघटित गुन्हेगारी नाही..अणि मोक्का हा कायदा आतिरिकी करवाया रोकान्यसठी केला आहे..थो सम्पकारी कर्मचारयं वर कसा काय कालवला ..?

कुर्पाया केस ची पूर्ण माहिती दया ...

कायद्या चा विद्यार्थी (अक्षय )

गुळांबा's picture

18 Feb 2009 - 6:32 pm | गुळांबा

खंडणी मागणारे गुंड आणि संख्याबळावर अतिरिक्त बोनस वसुल करणारे सारखेच असे मला म्हणायचे होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे बोनस हा राजीखुशीने द्यायचा भाग राह्यलेला नाही.

बेसनलाडू's picture

17 Feb 2009 - 2:53 pm | बेसनलाडू

माझ्या लाडक्या व्हाइट् चॉकलेट् मोका बद्दल काहीतरी असेल म्हणून उघडलेल्या लेखाने भ्रमनिरास केला :)
बाकी तज्ज्ञ मंडळी लेखातील मुद्द्यावर चर्चा करतीलच!
(मोकाप्रेमी)बेसनलाडू

गुळांबा's picture

18 Feb 2009 - 6:39 pm | गुळांबा

राहुन गेला. तो म्हणजे मुंबईचे ट्याक्सीवाले. न्यायालयाने अनेकदा सांगितले की १५
वरषापुर्वीच्या ट्याक्स्या रद्द करा. मात्र हे लोक २५ वर्षापुर्वीच्या खटारा ट्याक्स्या पण मोडित काढायला तयार नाही. खिळखिळ्या झालेल्या ट्याक्स्या भाड्याने चालवायला देउन स्वत: मजेत जगतात. १५-१६ वर्षे ट्याक्सी चालवुन ह्यांच्याकडं नवीन ट्याक्सी कर्ज काढुन पण घ्यायची पण ऐपत नाही हे कोणाला खरे वाटेल काय. त्यांना सरकारने फुकट नवीन ट्याक्सी द्यावी असे वाटते. नाहीतर आहेतच संप करायला तयार.