झोपेचे अनेक प्रकार

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
5 Feb 2009 - 12:15 am
गाभा: 

झोपेचे अनेक प्रकार आहेत...

१ झोपणे..
२ डोळा लागणे.
३ ढाराढुर झोपणे.
४ वामकुक्षि
५ अंमळ पडणे.
६ अर्धवट डोळा लागणे.
७ पसरणे.
८ गादित लोळणे.
९ साखर झोप.
१० बेंगी झोपेचा एक हा प्रकार आहे.. ज्या मधे माणसाला दिवसभर झोपावेसे वाटते.
आपण ह्या यादित काहि भर टाकु शकता का?

___________________________________________________

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

5 Feb 2009 - 4:19 am | बेसनलाडू

११. मीटिंगमध्ये झोपणे
१२. लेक्चरमध्ये झोपणे
१३. बसल्याबसल्या झोपणे
१४. उभ्याउभ्या झोपणे
???
(झोपाळू)बेसनलाडू

शितल's picture

5 Feb 2009 - 7:51 am | शितल

=))

चंबा मुतनाळ's picture

5 Feb 2009 - 4:58 am | चंबा मुतनाळ

कुणाबरोबर झोपणे ! ;)
आवडीचा प्रकार

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Feb 2009 - 5:10 am | llपुण्याचे पेशवेll

काम करता करता झोप लागणे..

(झोपाळू)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मुक्तसुनीत's picture

5 Feb 2009 - 5:13 am | मुक्तसुनीत

काळझोप .....

सुनील's picture

5 Feb 2009 - 7:10 am | सुनील

झोपेचे सोंग घेणे!

(सोंगाड्या) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

5 Feb 2009 - 8:10 am | टारझन

कायमचे झोपणे

(आता णाही येणे जाणे) टारू

अनिल हटेला's picture

5 Feb 2009 - 8:17 am | अनिल हटेला

काही धागे इतके जिवंत असतात की ते वाचता - वाचता झोपणे !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

गोमट्या's picture

5 Feb 2009 - 9:32 am | गोमट्या

डुलक्या काढणे....
पेंगणे / पेंगा मारणे...
मेल्यागत झोपणे...

नितिन थत्ते's picture

5 Feb 2009 - 10:42 am | नितिन थत्ते

लोकल मध्ये वरच्या कडीला धरून (उभ्याने) झोपणे
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

धमाल मुलगा's picture

5 Feb 2009 - 10:48 am | धमाल मुलगा

माझ्या आजीच्या भाषेत मी जे काही झोपतो ते:

उलथणे!!!! :)
(मी झोपलो आहे हे माझी आजी कधीही सरळ सांगत नाही. उत्तर एकच: 'उलथलाय बघ तिकडे बेडरुममध्ये/सोफ्यावर्/डायनिंगटेबलाशी/खुर्चीत्/जाजमावर्/बाल्कनीत.........)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

सुक्या's picture

5 Feb 2009 - 10:55 am | सुक्या

झोपेचे इतके प्रकार असतात हे मला माहीतच नव्हतं. मला आत्तापर्यण्त एकच प्रकार माहीती होता. आमचे तिर्थरुप त्याला 'गाढवासारखे लोळणे 'वगेरे म्हणतात.
कित्ती झोपा वाया घालवल्या. :''(

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

मॅन्ड्रेक's picture

5 Feb 2009 - 11:22 am | मॅन्ड्रेक

आडवे रहाणे
लवंड्णे
निजणे
टांगा वर करुन झोपणे.

Mandrake-
at and post : janadu.

मॅन्ड्रेक's picture

5 Feb 2009 - 11:25 am | मॅन्ड्रेक

झोपाळेश्वर-
at and post : janadu.

झोपेचा हा जागर डोळे उघडणारा आहे.

अजून एक झोपेचा प्रकार म्हणजे अघोरी (प्रचंड घोरत) झोपणे....
या प्रकारात फक्त घोरणारा माणूसच झोपू शकतो आजूबाजूच्यांना झोप लागणे केवळ अशक्य.

घोरण्यावरून या ओळी आठवल्या- (कवीचे नाव माहीत नाही, क्षमस्व.)

वृत्तः शार्दूलविक्रीडित

आजा घोरतसे तसाच मुलगा, ती सूनही घोरते
नातू आणि तशीच नात शयनी, घुर्घूर घुंकारिते
झोपेचे मम जाहले खवटसे, त्या रात्रिला खोबरे
आले मात्र हसू मला गवसले, घोरी घराणे खरे

दुसरा एक प्रकार म्हणजे गाढवझोप (गाढ तर आहेच)...
इथे झोपणार्‍याच्या आजूबाजूला पंचक्रोशीत दुसरे कोणीही झोपू किंवा बसूही शकत नाही, कारण झोपणारा हा झोपेत वर्तुळाकार, लंब आणि अर्ध वर्तुळाकार, रेषीय या सर्व गतींची प्रात्यक्षिकं करत असतो.

तिसरा एक प्रकार म्हणजे ज्यात झोपणारा आंथरूणाचे पांघरूण करतो आणि पांघरुणाचे आंथरुण करतो.

आता पुरे करतो नाहीतर तुम्ही वाचता वाचताच झोपाल.. :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

अनिल हटेला's picture

5 Feb 2009 - 11:33 am | अनिल हटेला

काय राव ,तु तर ग्रेटच आहेस !!!

=))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आचरट कार्टा's picture

6 Feb 2009 - 12:45 pm | आचरट कार्टा

घुर्घूर घुंकारिते...

=)) =)) =))
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

गोमट्या's picture

5 Feb 2009 - 11:31 am | गोमट्या

पहुडणे.... हि राहिलच...
तसेच..
कुंभकर्ण झोप..

दशानन's picture

5 Feb 2009 - 11:37 am | दशानन

(|:

आताच झोपेतुन उठलो आहे... @)

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सुचेल तसं's picture

5 Feb 2009 - 12:45 pm | सुचेल तसं

पनिर ह्या चर्चेवरचा प्रतिसाद इथे देत आहे.

पनिर करण्याची रीतः

१. फ्रिजमधले दुध बाहेर काढून ठेवा.
२. मग मिपावर बेंबीचा उपयोग काय ह्यासारखे किमान ४/५ काथ्याकूट टाका.
३. मग फोटोशॉपची जादू ह्या सदराखाली सिंडी क्रॉफर्डला नऊवारी साडी, नथ आणि इतर अलंकार चढवा.
४. आता येऊन दुधाकडे बघा. नासले असेल तर ठीक अन्यथा स्टेप नं. २ आणि ३ रिपीट करा.

नासलेले दुध हा पनीर बनविण्यासाठीचा कच्चा माल आहे. पुढील स्टेप्स जाणकार लोक सांगतील.

Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon

महेंद्र's picture

5 Feb 2009 - 5:02 pm | महेंद्र

हाडं अंथरणे...
म्हणजे झोपणे...

अरुण जाधव's picture

5 Feb 2009 - 10:08 pm | अरुण जाधव

ल् वंड्णे

संदीप चित्रे's picture

5 Feb 2009 - 11:53 pm | संदीप चित्रे

म्हणजे 'लावून' गाढ झोपणे :)

सचिन बडवे's picture

6 Feb 2009 - 10:46 am | सचिन बडवे

उताणे पडणे.
पालथे झोपणे.
पायावर पाय टाकुन झोपणे. (सोताहा च्या)