शिवाजी महाराज

छत्रपति's picture
छत्रपति in काथ्याकूट
18 Jan 2008 - 7:49 pm
गाभा: 

शिवाजी महाराज

खर॑ तर शिवाजी महाराजा॑बद्दल लिहायच॑ कस॑ हा प्रश्नच आहे....
मी इथे काही लिहिणार नाहिये...
मला त्या॑च्या बद्दल माहिती हविये... (तुमच्याकडुन)
पण इथे लिहिणार्‍या॑ना काहि स॑केत पाळावे लागतील...

१) कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी आणि जबाबदारी लिहिणार्‍या॑ची असेल.
२) कृपया साइट ची अमूल्य जागा लक्षात घेता उगाचच कुठलीही माहिती देवु नये....
उदा. जन्म,जन्मठिकाण, आइचे नाव, वडिला॑चे नाव वगैरे वगैरे वगैरे...

प्रतिक्रिया

सुनील's picture

18 Jan 2008 - 9:27 pm | सुनील

आपण छत्रपति आहात!

बॉल असा थेट दुसर्‍याच्या कोर्टात टाकण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या सर्विसने सुरुवात केली असतीत तर बरे झाले असते.

आणि कसले लिखाण आपल्याला इथे अपेक्षित आहे? नुसतीच माहितीची जंत्री की, त्यावर आधारीत काही विवेचन वगैरे?

तुम्ही सुरुवात तर करा. आम्ही वाट पाहत आहोत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छत्रपति's picture

18 Jan 2008 - 9:39 pm | छत्रपति

अस॑ असेल तर ही घ्या माझ्या कडून सुरुवात....

शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...?

ऋषिकेश's picture

18 Jan 2008 - 9:45 pm | ऋषिकेश

शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...?
स्वाभिमान, दिशा आणि विश्वास!

चतुरंग's picture

18 Jan 2008 - 10:03 pm | चतुरंग

मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा!
विकिपीडिया वरील http://en.wikipedia.org/wiki/Shivaji हा दुवा वाचा. एकाच ठिकाणी बरीच माहिती मिळेल.

समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचे काय वर्णन केले आहे ते "निश्चयाचा महामेरु" (ह्याचा दुवा माझ्याकडे नाहीये, कोणाकडे असल्यास द्यावा) ह्या काव्यात वाचावे म्हणजे राजांसाठी मावळे असे का बावळे झाले ते कळेल!!

चतुरंग

वरदा's picture

18 Jan 2008 - 9:59 pm | वरदा

उज्वल भविष्याची स्वप्न!

सुनील's picture

18 Jan 2008 - 10:14 pm | सुनील

शिवाजी महाराजा॑च्या बरोबर असलेल्या कि॑वा त्या॑ना साथ देणार्‍या मावळ्या॑ना शिवाजीमहाराजा॑नी असे काय दिले होते की ते मावळे त्या॑च्या साठी स्वत:च्या घरावर आणि जिवावर तुळशीपत्र ठेवण्यास तयार झाले...?

त्यांच्या गुलामगिरीची जाणीव !

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत's picture

18 Jan 2008 - 10:53 pm | नीलकांत

खरं तर प्रत्येकाला ही मोगलाई नकोशी झाली होती. ज्यांचे हितसंबंध ह्या मोगलाईत जपले गेले होते तेच केवळ ती टिकावी म्हणून प्रयत्न करत होते. मोगलाईचे स्वरूप पाहता जहागिरी हेच इमान असलेले बडे धेंडं ती टिकावी असे प्रयत्न करत.
सामान्य लोकांसाठी अत्यंत अन्यायकारक होती. वेळोवेळी त्याविरुध्द भडका होत सुध्दा असे पण त्याला भक्कम पाया नसे.
शिवाजी महाराजांच्या सोबत मोठी झालेल्या मंडळींत सामान्य वर्गच मोठ्या प्रमाणात होता. ह्या सर्वांना शिवाजी महाराजांनी एक विचार दिला, त्याला योग्य असा आचार दिला आणि योग्य प्रमाणात शक्ती व युक्तीची जोड दिली. त्यातून तयार झालेले रसायण अजोड होते.

हा सगळा प्रकार एका दिवसात झाला नव्हता. जीजाऊंनी अत्यंत योजनाबध्द हा प्रवास सुरू केला होता. जनसामान्याच्या भावभावना समजून त्यांना हात घालून त्यांना निर्भय व शूर करणे ह्याची सुरूवात , गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून दिलेल्या उत्तराने होते. लांडग्यांच्या शेपटीला दिलेला मोबदला अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यातून या सामान्य मावळ्यात आत्मविश्वास पेरल्या गेलेला दिसतो.

शिवाजी महाराजांना आपल्या सैन्याची शक्तीस्थळे माहिती होती तसेच कमकुवत बाजू सुध्दा माहिती होत्या. कुठलाच लढा भावनेच्या आहारी जाऊन लढू नये असे त्यांचे स्पष्ट मत. त्यामुळे थोड्या थोड्या कारणांसाठी मरू किंवा मारू करणारा मावळा... आज जिंकू किंवा उद्या पण जिंकणार आम्हीच असं म्हणून लढाईत उतरू लागला , मैदान मारू लागला. शक्ती कमी पडताना दिसल्यास खुशाल मराठी सैन्य तेथून पळ काढी... पुन्हा ताकद जमवी आणि हल्ला करित असे. लढाईचा शेवट विजयात होत असे. हा संस्कार शिवाजी महाराजांनी रुजवला होता.

अफजल खानाच्या वेळी जेव्हा खानाचे पारडे जड होते आणि आपले आपले म्हणावे असे जवळचे खानाला मिळाल्याने शिवाजीमहाराजांच्या सैन्यात थोडी निराशा होती. मात्र आई भवानीने स्वतः दृष्टांत देऊन आपल्या तलवारीत प्रवेश केला आहे आणि आता ही तलवार भवानी तलवार आहे असं घोषीत करून महाराजांनी आपल्या सैन्यात एक नव चैतन्याचा संचार केला. आज आपण याला सहज कुठलंही मानसशास्त्रीय संज्ञेचं नाव देऊ शकू पण महाराजांनी हा प्रयोग त्या काळात प्रत्यक्ष केला.
शिवाजी महारांजांचा हिंदवी स्वराज्याचा विचार आणि त्या योगे असलेला त्यांचा आचार हाच सामान्य मावळ्याला पराकोटीचं बळ देत असेल.

नीलकांत

राजे's picture

18 Jan 2008 - 10:59 pm | राजे (not verified)

वा, वा, छान एकदम माहीतिपुर्ण व चर्चा चालू करणारे व वाचक दोघे ही सहमत होतील असे विचार. सहमत.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

पासून आपल्या मातीतील सरदार, जमीनदार, व्यापारी व इतर धनिक परकीय शासकांना सहाय्य करीत आले व स्वतःची तुंबडी भरत आले. परकीय राज्यांत देखील ते सुखीच होते. सामान्य शेतकरी व कष्टकरी यांना कोणी वाली नव्हता. या सामान्य व शेतक-यांना व कष्टक-यांना एकत्र करून त्यांचे राज्य शिवाजीने स्थापन केले. पूर्वीच्या जमीनदार व सरदारांनी शिवाजीला विरोधच केला. माझ्या मताप्रमाणे समाजाच्या तळागाळातून नेते व योद्धे तयार करणारा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील इतिहासातील पहिला समाजवादी राज्यकर्ता शिवाजी होय. येथे मी शिवाजी महाराजांचा प्रेमाने एकेरी उल्लेख केलला आहे. त्यांचा उपमर्द करण्याच्या दृष्टीने नव्हे. कोणत्याही धर्माची व्यक्ती ती एकनिष्ठ असल्यास तिला तिच्या योग्यतेप्रमाणे पद मिळत असे. त्यांचे राज्य ख-या अर्थाने सर्व धर्म समभाव ठेवणारे व निधर्मी होते. समाजिक व आर्थिक न्याय असलेले व कायदा सुव्यवस्था असलेले सामान्य माणसाला सुरक्षा असलेलेल राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले.