इसकाळचे नवे रूप..

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in काथ्याकूट
22 Jan 2009 - 5:34 am
गाभा: 

आत्ताच पाहीलं.. सकाळच्या साईटचे रुपडे बदलले आहे! छान दिसतेय आता.. टॅब्स, तुमचा जिल्हा निवडता येणे, असे सगळेच रुप आवडले. पूर्वी फार लवकर वाचून व्हायचा सकाळ.. आता भरपूर बातम्या,विषय इत्यादी भरगच्च आहे असं पहिल्या पानावरून वाटतं.. कदाचित मांडणीमुळे असावे.

फाँट बदलूनच घ्या, म्हणजे बदललेला इसकाळ कळेल वगैरे म्हणत आहेत तिथे, पण फाँट काही मला डाउनलोड करता आला नाही! रनटाईम एरर आली, एकंदरीत स्लो झाल्यासारखी वाटली साईट.. :( कदाचित काही दिवसात होईल ठीक..

वेल, तसा काथ्याकुट करण्यासारखा विषय नाहीए. पण एक्साईटमेंट मधे अरे लोकांनी हे पाहीलं का? अश विचाराने लिहीतीय हे.. साहीत्यिक मूल्य आणि वैचारिक काहीही नाही आहे त्याबद्दल क्षमस्व!

तुम्हाला कसे वाटले सकाळचे रूप?

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

22 Jan 2009 - 5:38 am | नाटक्या

मी पण आत्ताच बघीतले. छान केले आहे.

घाटावरचे भट's picture

22 Jan 2009 - 6:16 am | घाटावरचे भट

हम्म्म....चांगलाय. बराचसा मटासारखा आहे. फक्त रंगरंगोटी जरा जास्त आहे.

अगदी घरगुती रुप होते. सकाळचा चहा घेतघेत चाळावा असं वाटायचं तिथून एकदम कॅफे बरिस्तात जाऊन मोक्का सिप करत ब्राऊजिंग केल्यासारखं वाटतंय आता!
असो. काळाप्रमाणे बदलते रुप आहे. कदाचित काही दिवसांनी सवय होईल नजरेला. पण सकाळने त्यांच्या बातम्यात आणि सदरांमधे असलेली त्यांची बाकीची वैशिष्ठ्ये जपावीत असे मात्र मनापासून वाटते.
पुढील वाटचालीला ईसकाळला शुभेच्छा!

चतुरंग

भिडू's picture

22 Jan 2009 - 10:09 am | भिडू

मलाहि आधिचिच साईट आवडलि. ति जास्त सुट्सुटित होति. आता खुप गिचमिड झाल्यासारखि वाटत आहे.

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 10:06 am | विसोबा खेचर

मलाही नवे स्वरूप आवडले...

आपला,
(सकाळप्रेमी) तात्या.

दशानन's picture

22 Jan 2009 - 10:19 am | दशानन

छान आहे, पण जर डिझायनरच्या नजरेतुन पाहीलं तर काही त्रुटी दिसतात.

१. फॉन्ट साईझ व प्रकार पहिल्या नजरेतच मनातून उतरतात.

२. साईट ऑपोन होण्यासाठी खुप वेळ लागत आहे, हा वेळ कमी करने त्यांना गरजेचे आहे. पेज जनरेट टाईम हा १.५६ मिनिट आहे ५१२ च्या स्पीड वर :(

३. सब-मेन्यु आतील पानात वापरले नाही आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रथम पानावर येणे भाग पडत आहे.

४. चलचित्रांसाठी नवीन पध्दतीचा फ्लाश प्लेयर वापरला नाही तोच जुना मिडिया प्लेयर स्ट्रिमिंग वापरले आहे.

५. साईटच्या काही जागी कोडिंगच्या चुका आहेत शक्यतो.

६. सर्च व्यवस्थीत काम करत नाही आहे.

७. जुनी पानं शोधण्याचा डायरेक्ट पर्याय दिसत नाही आहे.

८. प्रथम पानांच डिस्प्ले सेटिंग अजून बदलायला हवं .

अजून ही काही आहेत पण सर्व साधारण पणे साईटची रंगसंगती चांगली आहे योग्य तो बद्ल केल्यास नवीन साईट उत्तम दिसेल ह्यात काही शंकाच नाही.

देवदत्त's picture

22 Jan 2009 - 8:37 pm | देवदत्त

राजे,
मस्त निरीक्षणे. तुमच्या मतांचा त्यांना चांगलाच फायदा होईल. नाहीतरी त्यांची ती beta आवृत्तीच आहे :)

दशानन's picture

30 Jan 2009 - 2:44 pm | दशानन

बापरे !

इसकाळ ने वरील सर्व मुद्दे विचारात घेतले व त्यावर कृती देखील केली... वा !

फक्त व्हिडीओ संदर्भातील सुचना त्यांनी अमलात आणली नाही आहे बाकी सर्व गोष्टी वर योग्य काम झाले आहे... प्रसन्न झालो आज !

जय हो मिपा की !
जय हो पब्लिक की !
जय हो सब की !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

पाषाणभेद's picture

22 Jan 2009 - 11:16 am | पाषाणभेद

जैन शेठ बरोबर बोलतात.
-( सणकी )पाषाणभेद

लिखाळ's picture

22 Jan 2009 - 5:10 pm | लिखाळ

त्रास फाँटचा.
इसकाळची नवी आवृत्ती चांगली आहे. जुन्या नव्यात रचनेचा फरक आहे. सुटसुटीत आहे.

पण ही फाँटची भानगड कशाला. आता काय प्रत्येक संगणकावर इसकाळ उघडला की फाँट डाउनलोड करायचा का ! सायबर कॅफेत, इतरांच्या संगणकावर, अश्या संगणकावर जीथे कोणतेही इंस्टॉलेशन करायला परवानगी लागते तेथे सकाळ कसा वाचावा. सोयी देताना त्यात असल्या अडचणी कशाला ! मला फार वैताग आला आहे. पूर्वीच्या आवृत्तीमध्ये ही भानगड नव्हती. आणि आता नव्या फाँन्टशिवाय सकाळ वाचणे म्हणजे बटबटीत अक्षरे पाहणे.

इसकाळ वाल्यांनी ही वेगळ्या फाँन्टची भानगड वगळावी. अशी त्यांना विनंती. इसकाळ मिपाचे सदस्य आहेत. त्यांनी यासाठी काही करावे अशी विनंती.
-- लिखाळ.

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Jan 2009 - 5:21 pm | ब्रिटिश टिंग्या

सहमत!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

देवदत्त's picture

22 Jan 2009 - 8:30 pm | देवदत्त

सहमत.
दर्जा वाढवताना नुसत्या अडचणीही वाढवून ठेवल्यात असे वाटते.

सोमा's picture

30 Jan 2009 - 4:08 pm | सोमा

tasa kahi vishes Tras nahi aahe. Fakt 250Kb cha Font tar aahe.
Aani Font Open karanya peksha Save Karun mag Install Kar Na !

Simple !

दशानन's picture

30 Jan 2009 - 4:09 pm | दशानन

धन्यवाद, आम्हाला हे माहीतचं नव्हते... तुम्ही संगणक व महाजाल ह्यावर अजून काही माहीती देऊ शकता का आम्हाला :?

अडाणी - राजे
*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

लिखाळ's picture

30 Jan 2009 - 4:14 pm | लिखाळ

माझी समस्या पुढील प्रमाणे आहे. फाँन्ट उतरवणे सोपे-अवघड इत्यादी नाही.

आता काय प्रत्येक संगणकावर इसकाळ उघडला की फाँट डाउनलोड करायचा का ! सायबर कॅफेत, इतरांच्या संगणकावर, अश्या संगणकावर जीथे कोणतेही इंस्टॉलेशन करायला परवानगी लागते तेथे सकाळ कसा वाचावा. सोयी देताना त्यात असल्या अडचणी कशाला !
-- लिखाळ.

दशानन's picture

30 Jan 2009 - 4:16 pm | दशानन

ह्यासाठीच त्यांच्या कडे मदत मागीतली आहे ;)

इंग्लिश मध्ये लिहतात म्हणजे बुध्दीमान असणारच !

*******

येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.

उदय ४२'s picture

22 Jan 2009 - 5:34 pm | उदय ४२

कोल्हापुरच्या पुढारीची साइट्देखील आत चांगली झाली आहे..इ पेपरच दिलय त्यांनी.तो पाहीलाय का कुणी?

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

गणेशलोहार's picture

22 Jan 2009 - 9:09 pm | गणेशलोहार

पुढारी नुकताच वाचु लागलो आहे.

आनंदयात्री's picture

22 Jan 2009 - 5:37 pm | आनंदयात्री

>>साहीत्यिक मूल्य आणि वैचारिक काहीही नाही आहे त्याबद्दल क्षमस्व!

=)) =)) =))
लै भारी .. हाईट ऑफ मॉडेस्टी :)

सुहास..सदेव हसनार्..'s picture

22 Jan 2009 - 8:04 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

विशेष अस काही वाटल नाही....

गणेशलोहार's picture

22 Jan 2009 - 9:05 pm | गणेशलोहार

नाही आवड्ला.

अनामिक's picture

22 Jan 2009 - 9:11 pm | अनामिक

असे बदल दिसले की मला 'हु मुव्ह्ड माय चिज' ची आठवण येते.. आवडो अथवा न आवडो, बदल लवकरात लवकर अंगवळणी पाडून घेणे महत्वाचे.

अनामिक

सूर्य's picture

22 Jan 2009 - 9:28 pm | सूर्य

नवे रुप चांगले आहे.(अर्थात अजुनही चांगले करता येईल). मुख्य म्हणजे पुर्ण पानावर बातमी वाचता येते आहे (पॉप-अप नाहीये). फाँट डाउनलोड केल्याशिवाय वाचता येत आहे.

- सूर्य.

जृंभणश्वान's picture

22 Jan 2009 - 9:53 pm | जृंभणश्वान

वेगवेगळ्या दिवसांचे चिंटू फटाफटा बघता येते पुढे/मागे बटणांनी, ते आवडले

भाग्यश्री's picture

22 Jan 2009 - 11:03 pm | भाग्यश्री

मलाही हे जाम आवडलं! चिंटू आणि ग्राफीटी वाचायला मजा येईल आता..

मला, कुठली बातमी कुठल्या भागातली आहे हेच समजत नाही आहे आता. म्हणजे पूर्वी प्रिमिअर्,मुक्तपीठ असे प्रॉपर वेगळे भाग होते.. मी पहील्या पानावरची कुठली तरी बातमी वाचली तर ती प्रिमिअर मधली निघाली..
जरा कॉम्प्लिकेटेड झालाय.. आणि अशक्य स्लो.. इसकाळने फाँट्,साईट उघडायला लागणारा वेळ, आणि मांडणी याचा पुन्हा एकदा विचार करावा.. फाँटही डाउनलोड करून पाहीला, विशेष नाही आवडला..

असो, सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.. राज तुमची निरिक्षणं सही आहेत!

http://bhagyashreee.blogspot.com/

देवदत्त's picture

22 Jan 2009 - 11:55 pm | देवदत्त

सकाळ चे इंग्रजी रूप मला माहितच नव्हते. सकाळ टाईम्स कोणी आधी वाचला/पाहिला होता का? की आताच सुरू केला आहे?
मला आजच कळले इंग्रजी सकाळ बद्दल.
सकाळ टाईम्सचा ई-पेपर आहे तर मग मराठी का नाही असाही प्रश्न पडला.

भाग्यश्री's picture

23 Jan 2009 - 12:23 am | भाग्यश्री

सकाळ टाईम्स बरेच दिवस आहे.. २-३ वर्षं तरी झाली असावीत असा माझा अंदाज..
बाकी,इसकाळमधेही इपेपर असावा याच्याशी सहमत..

http://bhagyashreee.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

30 Jan 2009 - 3:24 pm | भडकमकर मास्तर

२-३ वर्षं तरी झाली असावीत असा माझा अंदाज..

नाही नाही ,एप्रिल की मे २००८ पासून सुरू झाला आहे... अजून सवय झालेली नाही... बरेवाईट काहीच मत तयार होत नाहीये त्याबद्दल :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ढ's picture

30 Jan 2009 - 3:35 pm |

मे २००८ ला सुरु झाला सकाळटाईम्स.

सुरु झाला म्हणजे आधी पुण्यात महाराष्ट्र हेराल्ड हा पुण्यातून प्रसिद्ध होणारा एकमेव
इंग्रजी पेपर होता. सकाळ ने तो टेकओव्हर करुन त्याचा सकाळटाईम्स केला !

यशोधरा's picture

30 Jan 2009 - 3:29 pm | यशोधरा

चतुरंग आणि जैका यांच्याशी सहमत. मलाही आधीचेच इसकाळचे रुपडे आवडले आत्तापेक्षा..