बजबजपुरी.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
21 Jan 2009 - 9:12 pm
गाभा: 

मागच्या आठवड्यात मराठीतील १/२ चांगली संकेतस्थळे पाहण्यात आली आणि त्याचा परिचय व्हावा म्हणून हा लेखप्रपंच.

सर्वात अगोदर चे संकेतस्थळ म्हणजे www.bajbajpuri.com हे स्थळ.

या स्थळाचे वैशिष्ट म्हणजे,

१. सुंदर असे आरेखन.
२. मौजमस्ती, गंमत म्हणून हे स्थळ पहा असा प्रशासनाचा अभिप्राय.
३. आजचे शहाणपण, आ़जची म्हण इत्यादी सदरे ( सदर याचे अनेकवचन चुभुदेघे).
४. मराठी शुद्ध शिका असे म्हणत मनोगत चा दुवा देणे.
५. फतवा, पाकिस्तान असे शब्दप्रयोग.

बाकी सध्यातरी तरुण लोकांचा भरणा असल्यामूळे गंमत म्हणून जरी या संकेतस्थळाची निर्मिती झाली असली तरी यथावकाश मराठी भाषेत भर टाकण्याचे सत्कृत्य लवकरच घडेल असे मला वाटते. शेवटी संकेतस्थळ निर्मिती आणि ते चालविणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चालविण्यासाठी नेट लागतो आणि तो यांच्या कार्यकारी समितीच्या लोकांना मिळेलच असा विश्वास मला वाटतो.

बजबजपुरी लवकरच गजबजपुरी व्हावी अशी प्रार्थना मी करतो.

द्वारकानाथ कलंत्री.

बजबजपुरीचे घोषवाक्य,

"हा कट्टा टिंगल, टवाळी, खिल्ली, बाजारगप्पा, मौजमजा करण्यासाठीच आहे. कुठल्याही प्रकारचे गंभीर लिखाण येथे खपवून घेतले जाणार नाही. तसेच इथे प्रकाशित झालेल्या लेखनावर विश्वास ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी वाचकांची आहे. एकंदरीने हलकेच घ्यायचे हं."

अशी धारणा होळी अथवा शिमग्याला आली असती तर ते सण सुसंगत झाले असते. सक्रांतीला अशा संकेतस्थळाचे निर्माण म्हणजे एक व्याघातच आहे.

मराठीसाठी जे काही होईल ते चांगलेच असेल अशी माझी धारणा आहे म्हणून हा परिचय प्रपंच.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Jan 2009 - 9:24 pm | अवलिया

गांधीवादी मंडळींचे मला कौतुक वाटते. त्यांना सगळे कसे छान छान वाटते. असो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश's picture

21 Jan 2009 - 9:47 pm | ब्रिटिश

कवतीक केल्यावद्द्ल धन्यवाद सायब

मॅनेजर
कलंत्री ऍडवर्टायजींग एजन्सी
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

सर्किट's picture

22 Jan 2009 - 12:06 am | सर्किट (not verified)

तात्या देखील गांधीवादी आहे, हे मला माहिती नव्हते. त्या एकट्याची प्रेरणा अनेक संकेतस्थळांना आहे असे दिसते.

-- सर्किट

विनायक प्रभू's picture

21 Jan 2009 - 9:58 pm | विनायक प्रभू

मनिजर साहेब कॉपी छान आहे हो तुमची.
पण एकच कॉपी वरती कसे चालेल. अजुन २ किंवा ३ येउ द्यात.
म्हणजे तुमच्या एजन्सी ची लेवल कळेल.

इनोबा म्हणे's picture

22 Jan 2009 - 12:03 am | इनोबा म्हणे

शेवटी संकेतस्थळ निर्मिती आणि ते चालविणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चालविण्यासाठी नेट लागतो आणि तो यांच्या कार्यकारी समितीच्या लोकांना मिळेलच असा विश्वास मला वाटतो.
एवढं मात्र खरं आहे हां! नेट असले की कामे पटकन होऊन जातात, प्रत्येक वेळी सायबर कॅफेत जायचं म्हणजे जाम वैताग येतो. 8}

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 12:46 am | विसोबा खेचर

४. मराठी शुद्ध शिका असे म्हणत मनोगत चा दुवा देणे.

तिथे मिपाचाही दुवा दिलेला आहे हे आपण सांगायला सोयीस्करपणे विसरलात! कोई बात नही..! :)

असो, या नव्या संस्थळाला आमच्या शुभेच्छा! मोठे व्हा!

तात्या.

कलंत्री's picture

22 Jan 2009 - 9:05 am | कलंत्री

उपक्रमावर बजबजपुरीचे प्रसिद्धीपत्रक पाहिले आणि मिपावर नाही याची खंत वाटुन मी स्वतः श्री चित्त यांना न विचारता प्रसिद्धी केली. यात संकेतस्थळ पाहतांना जे काही नजरेत भरले ते लिहिले. मिपाचा धागा सोयीस्करपण दिला नाही हे मत चुकीचे आहे. मला दिसला असता तर तोही नक्कीच दिला असता.

कृपया गैरसमज नसावा.

चित्तरंजन भट's picture

22 Jan 2009 - 12:54 am | चित्तरंजन भट

सर्वात आधी मी बजबजपुरीतर्फे मिपाकर शुभचिंतकांचे आभार मानतो. आमचे स्नेही तात्या अभ्यंकर ह्यांच्या मिसळपाव ह्या दिग्गज संकेतस्थळावर बजबजपुरी.कॉम ह्या अस्मादिकांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाबद्दल काही गैरसमज पसरले आहेत किंवा पसरविले जात आहेत असे दिसते. गोंधळ जरा शांत झाल्यावर ह्यावर थोडे लिहावे असे मनात होतेच. म्हणून हा प्रपंच.

मिसळपाव ह्या संकेतस्थळाला उत्तर म्हणून बजबजपुरी हे संकेतस्थळ सुरू केलेले नाही. माझे मित्र उपक्रमकार शशांक जोशी, गमभनकार ओंकार जोशी ह्या जोशीद्वयांसोबत आणि इतर काही स्नेह्यांसोबत केवळ हास्यविनोदाला वाहून घेतलेले संकेतस्थळ सुरू करण्याबाबत २००७ सालीच (मिसळपाव सुरू होण्यापूर्वीच) चर्चा केली होती. (ही चर्चा जीमेलवर जतन झालेली आहे. कुणाला हवी असल्यास देता येईल) काही आराखडेही तयार केले होते. कंपूबाजी.कॉम हे डोमेननेमसुद्धा तेव्हा विकत घेण्यात आले होते. (तारखेची खातरजमा करण्यासाठी कुणाला कंपूबाजीची पावती पाहिजे असल्यास देता येईल.) पण अनेक कारणांमुळे असे संकेतस्थळ उघडण्यासाठी २००९ सालाची संक्रांत उजाडावी लागली. असो.

सुरेशभट.कॉम, मराठीअभ्यासपरिषद.कॉम आणि बजबजपुरी.कॉम ह्या आम्ही उभारलेल्या संकेतस्थळांचा आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की, बजबजपुरीची स्थापना कुठल्याही संकेतस्थळाशी स्पर्धा करण्यासाठी झालेली नाही. बजबजपुरीची उद्दिष्ट्ये इतर संकेतस्थळांपेक्षा अत्यंत वेगळी आहेत. इतर संकेतस्थळे आमच्यासाठी प्रेरणास्रोतच आहेत. त्यांची भरभराट बजबजपुरीच्या हिताचीच आहे.

मिसळपावला हार्दिक शुभेच्छा!

पूर्णविराम!

चित्तरंजन भट

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 1:04 am | विसोबा खेचर

मिसळपावला हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद!

बजबजपुरीलाही आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

एक उच्च दर्जाचे, निखळ आणि मुख्य म्हणजे निर्विष असे विनोदनिर्मिती करणारे संस्थळ म्हणून बजबजपुरी हे संस्थ़ळ नावारुपास यावे अशी मिपा परिवारातर्फे मनापासून शुभकामना..!

आम्ही तेथे तात्या अभ्यंकर या नावाने सभासदत्व घेतलेले आहे. तेथील विसोबा खेचर अथवा अन्य कुठल्या सभासदनामाशी आमचा संबंध नाही असे जाता जाता सांगावेसे वाटते..

पुन्हा एकवार मन:पूर्वक शुभेच्छा!

तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jan 2009 - 5:11 am | llपुण्याचे पेशवेll

धन्यवाद चित्त साहेब. सुरेशभट.कॉम साईट फारच छान आहे. आपण इथे येऊन निवेदन दिलेत आणि गैरसमज दूर केलेत याबद्दल आपले आभार.

>>आमचे स्नेही तात्या अभ्यंकर ह्यांच्या मिसळपाव ह्या दिग्गज संकेतस्थळावर बजबजपुरी.कॉम ह्या अस्मादिकांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाबद्दल काही गैरसमज पसरले >>आहेत किंवा पसरविले जात आहेत असे दिसते. गोंधळ जरा शांत झाल्यावर ह्यावर थोडे लिहावे असे मनात होतेच. म्हणून हा प्रपंच.

याबद्दल असे म्हणेन, जर आपण बजबजपुरीवरील लेखन वाचलेत तर ते मिपा, मिपाकर आणि तात्या यांच्याविरुद्धच्या ओकार्‍या काढायचे बेसिन आहे का काय असे वाटते. असो.
वेळ जाईल तशी सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो.
बजबजपुरीला आमच्याही शुभेच्छा.
धन्यवाद.

पुण्याचे पेशवे
Since 1984

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 10:20 am | विनायक प्रभू

पीस्फुल को-एक्झिस्टन्स शक्य आहे. कधी तरी एखादी कोपरखळी ठीक. बेसीन, पॉट होता कामा नये.
बालकांना पॉटी ट्रेनींग द्यावे.

कपिल काळे's picture

22 Jan 2009 - 9:42 am | कपिल काळे

कलंत्रीसाहेबांनी ताशे वाजंत्री घेउन बजबजपुरी चीए जाहिरात केली खरी पण त्यात गोंधळ दिसतो आहे.
लेखाचे पहिले वाक्य<<मागच्या आठवड्यात मराठीतील १/२ चांगली संकेतस्थळे पाहण्यात आली आणि त्याचा परिचय व्हावा म्हणून हा लेखप्रपंच.

सर्वात अगोदर चे संकेतस्थळ म्हणजे www.bajbajpuri.com हे स्थळ.>>

आता शेवटून दुसरे वाक्य <<अशी धारणा होळी अथवा शिमग्याला आली असती तर ते सण सुसंगत झाले असते. सक्रांतीला अशा संकेतस्थळाचे निर्माण म्हणजे एक व्याघातच आहे.>>

नक्की काय सांगायचे आहे कलंत्रींना?

गांधीवादी आणि गोंधळ यात पहिला शब्दात जसे साम्य आहे , तश्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का?

भाग्यश्री's picture

22 Jan 2009 - 10:24 am | भाग्यश्री

मराठीतील १/२ चांगली संकेतस्थळे पाहण्यात आली
हे दुसरं कुठलं संस्थळ असा मी ही विचार करत होते!
असो..

http://bhagyashreee.blogspot.com/

कपिल काळे's picture

22 Jan 2009 - 1:45 pm | कपिल काळे

माझ्या प्रतिक्रियेतील शेवटच्या वाक्यात <<गांधीवादी आणि गोंधळ यात पहिला शब्दात जसे साम्य आहे , तश्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का?>>

ह्यात शब्दा एवजी पहिले अक्षर असे वाचावे.

कधी कधी मला नमोगत चावतं!!

नितिन थत्ते's picture

22 Jan 2009 - 9:56 am | नितिन थत्ते

इथे बजबजपुरीविषयी कलंत्रींनी इण्ट्रो लिहिला त्यात जनतेला कलंत्रींच्या गांधीवादाची का आठवण व्हावी?

ह. घेऊ नका.

नितिन थत्ते

नितिन थत्ते's picture

22 Jan 2009 - 10:59 am | नितिन थत्ते

सर्व काही मिपासारखेच केले आहे. तात्यांची टवाळी आणि त्यांचा ह. घेतलेला प्रतिसादही वाचला.
मग नवीन कशाला? मिपा काय वाईट?
नाही भावली.

नितिन थत्ते

निखिल देशपांडे's picture

22 Jan 2009 - 2:02 pm | निखिल देशपांडे

आमच्या हाफिसात बजबजपुरि बन्द आहे........
पण मि पा चालु आहे....

त्या मुळे आम्हि मि पा वरच

हरकाम्या's picture

22 Jan 2009 - 10:40 pm | हरकाम्या

बजबजपुरिचा पत्ता दिल्याबद्द्ल धन्यवाद, मि नुकताच त्याचा सभासद झालो आहे .माझे तेथिल नाव हि हेच आहे .

जव्हेरगंज's picture

21 Dec 2015 - 8:21 pm | जव्हेरगंज

काय झालं याचं?