रिमझिम झरती श्रावण धारा

मानस's picture
मानस in काथ्याकूट
14 Jan 2008 - 11:09 pm
गाभा: 

परवा बर्‍यांच दिवसांनी हे गीत ऐकलं, एक छान घरगुती मैफल जमली होती. मिपावर नियमीत असणार्‍या 'मुक्तसुनित' ने सुद्धा दोन-तीन सुंदर गीते सादर केली.

असो,मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, हे गीत बरेच जण सदर करताना "झिमझिम झरती श्रावण धारा" असे करतात.

नक्की शब्द काय आहेत? मूळ गाणं ऐकल्यावर असं वाटतं की सुमन कल्याणपूर म्हणताना "झिमझिम" म्हणतात. पण मधुकर जोशी ह्यांची कविता "रिमझिम झरती श्रावण धारा" अशीच आहे.

तज्ञांनी खुलासा करावा.

धन्यवाद

मानस

प्रतिक्रिया

सुनील's picture

14 Jan 2008 - 11:20 pm | सुनील

"रिमझिम पाऊस" असाच वाक्प्रचार आहे, "झिमझिम पाऊस" असा नाही.

नाच रे मोरा या गाण्यातदेखील - पावसाची रिमझिम थांबली रे... अशाच ओळी आहेत.

सुमन कल्याणपूरांचे गाणे ऐकताना "झिमझिम" असे ऐकू येते? मी "रिमझिम" असे ऐकत होतो!!

अवांतर - पूर्वी रिमझिम नावाचे एक कोल्ड्रींक मिळत असे. आता मिळते का ठाऊक नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2008 - 11:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाण्यात कोणते शब्द आहेत हे आम्हाला माहित नाही. पण, काय झीम-झीम पाऊस चालु आहे असा शब्दप्रयोग ऐकलाय बॉ ......!!!
( खेडेगावात तर ब-याचदा झीमझीम पाऊस पडतो .....या पावसाने पार रेंदाडी होते आणि असा पाऊस ब-याचदा उपयोगाचाही असतो )
रिमझिम हा शब्द ब-याचदा कवितेत आणि गाण्यात दिसतो.

सारांश :- आमच्याच चर्चेवरुन आमचे असे मत बनले आहे की, गाण्यात बहूतेक रिमझिम हा शब्द असेल !!!

अवांतर :- रिमझिम आणि झिमझिम या शब्दाच्या बाबतीत पावसाच्या पडणा-या थेंबावर तर हा फरक नसेल ? ;)

स्वाती राजेश's picture

15 Jan 2008 - 1:45 am | स्वाती राजेश

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात
प्रासादी या जीवलग येता, कमळमिठी मध्ये संग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल, माघारी दारात
मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नयने, करसी नीत बरसात

विसोबा खेचर's picture

15 Jan 2008 - 9:07 am | विसोबा खेचर

फारच छान गाणं आहे!

आमचे मुक्तसुनितराव गातात हे आम्हाला माहीत नव्हतं! छुपे रुस्तुम निघाले की! ऐकलं पाहिजे एकदा त्यांचं गाणं..:)

तात्या.

प्रमोद देव's picture

15 Jan 2008 - 9:26 am | प्रमोद देव

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात

गीत - मधुकर जोशी
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - सुमन कल्याणपूर

साभार: आठवणीतील गाणी.कॉम

मानस's picture

15 Jan 2008 - 8:03 pm | मानस

सर्वांना धन्यवाद,

आठवणीतील गाणी ह्या साईटवर 'झिमझिम' असे आहे, पण ते कितपत बरोबर आहे?

अजुनही उत्तराच्या शोधात

मानस