संवाद कौशल्ये - माहिती आणि प्रश्न

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
15 Jan 2009 - 12:10 pm
गाभा: 

नमस्कार,

उत्तन (भाईंदर) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये येत्या २४ व २५ जानेवारीला वकृत्वकला आणि संभाषण कौशल्ये या विषयावर कार्यशाळा आयोजीत केलेली आहे. हे दोन दिवसांचे निवासी शिबीर आहे.

अधीक माहितीसाठी येथे बघा.

मला या संदर्भात काही प्रश्न पडले आहेत. कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

१) ही कार्यशाळा कुणी केली आहे का? अनुभव काय आहे?

२) दोन दिवसांच्या या कार्यशाळेने माझ्या संवाद कौशल्यांत भर पडेल का?

३) मागे मी दादर ला कुठे तरी स्वरसंस्कार अशी कार्यशाळा होते असं ऐकलं आहे ज्यात साध्या सोप्या व्यायामांनी (श्वासाच्या) आपल्या आवाजाला हवा तसा टोन देऊ शकतो. त्या कार्यशाळे बद्दल कुणाला काही माहिती आहे का?

४) संवाद साधने ही एक महत्वाची कला आहे. या विषयावर कुणी अधीक माहिती देऊ शकेल का?

नीलकांत

प्रतिक्रिया

नीधप's picture

15 Jan 2009 - 1:13 pm | नीधप

प्रशिक्षकांची नावे दिलेली नाहीत. त्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करून विचारा.
बाकी प्रश्नांची उत्तरे..
१) ही कार्यशाळा कुणी केली आहे का? अनुभव काय आहे?
नाही केली नाहीये.

२) दोन दिवसांच्या या कार्यशाळेने माझ्या संवाद कौशल्यांत भर पडेल का?
नाही. संवाद कौशल्यात भर पडण्यासाठी काय करायला हवं याचे थोडे वळसे मिळतील. पुढे त्यावर मेहनत तुम्ही केली पाहिजेत तर उपयोग आहे.

३) मागे मी दादर ला कुठे तरी स्वरसंस्कार अशी कार्यशाळा होते असं ऐकलं आहे ज्यात साध्या सोप्या व्यायामांनी (श्वासाच्या) आपल्या आवाजाला हवा तसा टोन देऊ शकतो. त्या कार्यशाळे बद्दल कुणाला काही माहिती आहे का?
दादरचं माहीत नाही पण व्हॉइस कल्चर हे एक शास्त्र आहे आणि ते बहुतांशी श्वासाधारीतच आहे. आवाजाला हवा तसा टोन देता येण्यापेक्षा आपल्या योग्य आवाजात, खर्‍या आवाजात बोलणं जास्त महत्वाचं असतं. अमुक तमुक आवाज काढणे याला काही अर्थ नाही. संवाद साधण्यासाठी तर मुळीच नाही. कुठल्याही चांगल्या कार्यशाळेत हेच सांगतील.

४) संवाद साधने ही एक महत्वाची कला आहे. या विषयावर कुणी अधीक माहिती देऊ शकेल का?
संवाद साधणे म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे ते स्पष्ट होत नाहीये. मुलाखती व कार्यक्रमांचे निवेदन या संदर्भात म्हणायचे असेल तर त्या त्या विषयाचा अभ्यास, उत्तम वाचा, उत्तम आवाज, जड भाषेचा हव्यास टाळणे या काही महत्वाच्या बाबी ठरू शकतील.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

15 Jan 2009 - 3:11 pm | विनायक प्रभू

ह्याला म्हणतात हातात कळसा गावाला वळसा.
बोल कधी भेटतोस. मै हुं ना.

नीलकांत's picture

15 Jan 2009 - 3:54 pm | नीलकांत

हे लक्षात आलं नव्हतं माझ्या. 8>
पुढच्या आठवड्यात येऊन भेटतो.

नीलकांत

रामदास's picture

15 Jan 2009 - 8:05 pm | रामदास

संतोष नायर यांच्या बर्‍याच सीडी पाह्यल्यानंतर मला बराच फायदा झाला.
स्वरसंस्कार यासारखी कार्यशाळा ठाण्यात मंजीरी गोखले मॅडम घेतात.रवी इंडस्ट्रीअल इस्टेटच्या जवळ त्यांचं घर आहे.त्यांच्याकडे मी गेलो होतो.एक दिवस त्यांच्याकडे शिकलो .मग काहीतरी काम निघालं आणि शिक्षण राहूनच गेलं.असो. चौदा विद्या... च्या साईटवर त्यांची जाहीरात बर्‍याच वेळा वाचतो.

चतुरंग's picture

15 Jan 2009 - 8:18 pm | चतुरंग

संवाद कौशल्य महत्त्वाचे आहेच. तू ह्यावर काम करतो आहेस हे बघून आनंद वाटला.
स्टीफन कवीच्या वेबसाईटवर जा. भरपूर माहिती उपलब्ध आहे. तिथे त्याचे विडिओज सुद्धा आहेत. तिथूनही बरेच शिकता येईल.

चतुरंग

चित्रा's picture

15 Jan 2009 - 8:25 pm | चित्रा

मुंबईत एक नाझरेथ अकॅडमी म्हणून आहे. तेथे अनेक वर्षांपूर्वी उच्चपदावरील अधिकार्‍यांसाठी संवादकलेचे वर्ग घेतले जात असत असे आठवते. त्याचा फायदा झाल्याचे ऐकल्याचेही आठवते (मला नव्हे, घरातील ज्येष्ठ व्यक्तीला). त्यात मुख्यत्वे भाषेचा चढ उतार कसा करावा, बोलताना हातवारे कसे असावेत, आणि असे बरेच काही शिकवले जायचे. स्वत:कडे आपण समिक्षकाच्या दृष्टीने पाहत नसतो. त्यामुळे असे इतर कोणी पाहिले तर थोडा फायदाच होतो असे वाटते.

सखाराम_गटणे™'s picture

15 Jan 2009 - 8:29 pm | सखाराम_गटणे™

चांगली माहीती आहे.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.