महिला CRICKET खेळाडू

ज्ञानदा कुलकर्णी's picture
ज्ञानदा कुलकर्णी in काथ्याकूट
6 Jan 2009 - 7:41 pm
गाभा: 

आपल्या देशामध्ये CRICKET ह्या खेळास खूप GLAMOUR लाभले आहे. आज प्रत्येक खेळाडूला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते आहे.
परंतु हे सारे फक्त पुरुष खेळाडूनाच लाभते. महिला खेळाडू मात्र ह्या सर्वापासून वंचित राहतात.
ह्या मागे काय कारण असेल असे तुम्हाला वाटते?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Jan 2009 - 7:42 pm | अवलिया

नशीब

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

6 Jan 2009 - 8:01 pm | विनायक प्रभू

महिलांना मिथाली राज पेक्षा धोनी मधे जास्त इंटरेस्ट असतो म्हणुन्.(ऍज पर चॅनेल रेपोर्टींग)

पक्या's picture

6 Jan 2009 - 10:51 pm | पक्या

>>महिलांना मिथाली राज पेक्षा धोनी मधे जास्त इंटरेस्ट असतो म्हणुन्.(ऍज पर चॅनेल रेपोर्टींग)
महिलांना असणारच हो. पण पुरषांना मिथाली राज मध्ये का इंटरेस्ट वाटत नाही? वाटला असता तर महिला क्रिकेट ला ही चांगले दिवस आले असते. (ह. घ्या.)

मयुरा गुप्ते's picture

6 Jan 2009 - 11:04 pm | मयुरा गुप्ते

अजुनही महिलानी क्रिकेट खेळण्यापेक्शा घर सन्सार सामभाळावेत अशीच अपेक्शा. एका ठरावीक वयापर्यन्त घरचे ही साथ देतात पण मग मात्र टीपिकल विचार घरोघरी.

बट्टू's picture

6 Jan 2009 - 11:12 pm | बट्टू

अजुनही महिलानी क्रिकेट खेळण्यापेक्शा घर सन्सार सामभाळावेत अशीच अपेक्शा. एका ठरावीक वयापर्यन्त घरचे ही साथ देतात पण मग मात्र टीपिकल विचार घरोघरी.

काल चक दे! पाहीलेला दीसतोय. ;)

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:19 am | विसोबा खेचर

माझ्या माहितीप्रमाणे महिला खेळाडूंचाही संघ आहे आणि त्यांचे सामने होत असतात..

आपला,
तात्या किरमाणी.

पिवळा डांबिस's picture

7 Jan 2009 - 1:07 am | पिवळा डांबिस

त्यांचे सामने होत असतात..
तसा एक सामना (टीव्हीवर!) बघितला आहे...
मला वाटतं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील!
पण काही जोष नाही हो.....
बोअर होतं बघायला....

आपला,
पीतेंद्र हिरवाणी

ऍडीजोशी's picture

7 Jan 2009 - 12:44 am | ऍडीजोशी (not verified)

बायका पण खेळतात हो क्रिकेट पण त्यात काहीच मजा येत नाही. सचिन नी फटका मारला की बॉल बॅट वर आपटल्याचा जो खणखणीत आजाव येतो तो महिला क्रिकेट मधे येत नाही. बॅट नी बॉल तडकावण्यापेक्षा तो तटवतात किंवा नुस्ता ढकलतात. शोएब चे १०० माईल्स वेगाने येणारे बॉल टिवी वर बघणं पण थ्रिलींग वाटतं. महिलांची बॉलींग पण अगदीच बुळबुळीत असते. तसंच फिल्डींग मधेही जोश नाही. सगळ्या आपल्या लोकल पकडायला धावावं तशा धावतात. त्यामुळे क्रिकेट मधला थरार महिला क्रिकेट मधे आढळत नाही. कोण बघणार असलं पुचाट क्रिकेट?

विनायक प्रभू's picture

7 Jan 2009 - 1:48 pm | विनायक प्रभू

लोकल पकडायल धावणे त्यापेक्षा लय भारी आणि कठीण काम अस्ते हो.

सिद्धू's picture

7 Jan 2009 - 1:22 pm | सिद्धू

ऍडीजोशी च्या प्रतिक्रियेशी सहमत.
महिलांचे क्रिकेट सामने बघायला फार रटाळ वाटतं.

सुनील's picture

7 Jan 2009 - 1:54 pm | सुनील

अद्याप एकही महिला क्रिकेट सामना पाहिलेला नसल्यामुळे +१ किंवा -१ देणे अयोग्य ठरेल. म्हणून ० (शून्य) असा प्रतिसाद दिला आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शैलेन्द्र's picture

7 Jan 2009 - 11:10 pm | शैलेन्द्र

महीला क्रिकेट आणि पुरुष जिम्नेशीयम जाम रटाळ असत हो...