AIचा घो(र)
~~~~~~~~~~~
चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो
चौसष्ट कलांच्या कलानिधींनो
गानगंधर्वांनो, भसाड्यांनो
चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो
सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो
कवींनो, कवड्यांनो
वैद्यराजांनो, वैदूंनो
नटवर्यांनो, साजिंद्यानो
विचारवंतांनो, प्रचारवंतांनो
कोतवालांनो, ठकसेनांनो
वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो
बेलकर्व्हवरील डाव्या-उजव्यांनो
बेलकर्व्हच्या मध्यावरील बेसुमार सुमारांनो
शुभ्रधवलांनो, काळ्याकुट्टांनो, अधल्यामधल्या कृष्णधवलांनो
सावध! AIका AIच्या हाका
जुनी चंगळ संपली बर्का!
Plan B तय्यार ठेवा पक्का
नैतर वर्मी बसेल धक्का
:)
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 11:12 am | सुक्या
हा हा हा ..
एआय चा धसका सगळ्यांनी घेतला आहे हे मात्र खरे !!
21 Oct 2025 - 1:16 pm | चौथा कोनाडा
खरंय .... एआय ने घोर लावलाय खरं .... आण़़खीन काय काय कोसळेल सांगता येत नाही !
भारी सावधकविता... आवडली ! शब्द रचना त र विशेष आवडली !