माझिया घरा
दीपावली आली ही सोनपाऊली
आली माझिया घरा
पर्जन्याने न्हाली ही वसुंधरा
पल्लवित झाली
उल्हासित सुमने नटली
चला सुगंधाने स्वागत करा
दीपावली आली ही सोनपाऊली
आली माझिया घरा
गाई-वासरांच्या पाऊली
आले तेहतीस कोटी घरा
या, चला, दीपावलीचे स्वागत करा
धन्वंतरी ही लेवून आली
सोन्याच्या पाऊली धरा
धनधान्याने प्रसन्न मुद्रा
आशीर्वच करा
चला हो दीपावलीचे स्वागत करा
करंज्या, अनारसे, लाडू नैवेद्याला
आनंद ओसंडत असाच राहिला
प्रभातसमयी उठा लवकरी
लगबग ही करा
लक्ष्मीपूजनाला सारे आतुरलेले
सारे काही नवे नवे
नव्या पणत्या उजळा
दिव्य प्रकाशाने उजळून टाकू
ही वसुंधरा
हिरवा शालू लेवून आली
लक्ष्मी माझ्या घरा
दीपावली आली ही सोनपाऊली
आली माझीया घरा....
- सीमा अविनाश कुलकर्णी
प्रतिक्रिया
21 Oct 2025 - 1:19 pm | चौथा कोनाडा
दिवाळीचं स्वागत करणारी यथार्थ सुंदर कविता.
आवडली. लिहित रहा या सदिच्छा !
28 Oct 2025 - 7:04 pm | समाधान राऊत
ते गीत आठवले ,
आली माझ्या घरी ही दिवळी ....