मराठीची थोरवी
मराठी भाषा अभिजात जाहली
गौरविली, भूषविली, भावली जनमनाला
मानाचा तू बिंदू जगज्जेती दीनबंधू
गरिबाची माय श्रीमंतांची साय
सकल महाराष्ट्र तारला जिने
बांधली घट्ट साखळी मनामनाची
अभिमान किती जगात मिरवू
फिरवू पताका भगव्याची.
शब्द पाट किती अन घाट किती
पाहिले तू मराठी
कधी भेद ना धरला किंतु ना उरला मनात पेरला भाव आपुलकीचा
तुझ्या माझ्या याच्या त्याच्या
मनामनात रुजली मराठी.
कधी गळाभेट घेतली, कधी लढली
कधी रुसली, कधी हसली, कधी फुगली, सदाफुली महाराष्ट्रात बहरली
कोंकणी वऱ्हाडी खानदेशी वैदर्भी पुणेरी कोल्हापुरी सोलापुरी मराठवाड्यातील असे विविध प्रांतांची.
मान-पान ना थोर सान ना
आहे ती या आबालवृद्धांची
जात-पात अन धर्म-गोत्राचे
फोडले घडे अंधकाराचे
आजवर जे बोलले झाले गेले विरले
शब्द होते ते मराठी.
भोगले अनन्वित अत्याचार
सहन केला किती मार संपविण्यासाठीचा
मानही कापली होती थेट
तरीही न सोडला प्राण
तरी सर्वदूर दरवळला
होती ती अभिजात मराठी
टिकून राहिली ती
मूळ धरून हजारो वर्षांपासून
केले पुनरुज्जीवन कणाकणात.
आता झाला उद्धार विदेशात जागर साहित्य मंडळे परिषदा संमेलने जाहली उदंड
मराठी कविता लेख कथा कादंबरी चारोळी वात्रटिका एकांकिका नाटक सिनेमा अभंग संपादकीय
अनेक प्रकार विस्तार झाला
अखिल भारतीय साहित्य संमेलने बालसाहित्य स्त्रीसाहित्य दलित साहित्य विद्रोही साहित्य वारकरी साहित्य संमेलने असे पाहुणचार पुस्तकांचा
छान मेळा मराठीच्या वाचकांचा.
कुणा हसविते, रडविते, कुरवाळिते भावभावनांचा आविष्कार इंद्रधनूपरी
कधी नाजूक तरल प्रेमभावना
कधी चित्तथरारक भयकथा
कधी भक्तिरस
कधी कल्पनाविस्तार स्वप्नपरी
कधी आनंद, कधी दुःख सरता सरेना.
अलंकार समास विग्रह संधी छंद व्याकरण असे
किती किती अन काय काय
नाचली मराठी दिगंतात.
लंगडी खोखो कबड्डी सापशिडी विटीदांडू गोट्या पतंग काचाकवड्या भोंडला भातुकली खेळ हे मराठी
चिखलातून उमलले फूल
राखेतून उडाली मराठी फिनिक्स पक्ष्यापरी.
काय ती भावगीते
काय ती बडबडगीते
काय भक्तिगीते
काय विरहगीते
काय ती प्रेमगीते
काय ती वारकऱ्यांची भजने
पंढरपुरात भरतो मेळा चंद्रभागेच्या वाळवंटात
फुलतो मळा विठुरायाचा
संतजनांचा सोहळा भरविते मराठी.
मधुरमवाळ कोंकणी घराघराची
पुणेरी ताठ चौकटीची
रांगडी कोल्हापुरी मातीची
तिखट मिरची सोलापूरची
विदर्भाचा नागपुरी तडका कडक खान्देशी अहिराणी प्रेमाची
चव मराठीची
लय भारी रेंगाळते जिभेवरी.
प्रेमळ मधुर लडिवाळ तीक्ष्ण धारदार धीरगंभीर भयकारी व्यवहारी
रस किती छटा किती कंगोरे किती.
शब्दसंपत्ती अमाप श्रीमंती
शब्द नसतील एवढे कोणत्या इतर भाषेत सापडतील मोती येथे मराठीत
नवरत्न होते कोणते
आठ अजूबे कोणते
मराठी आमुची सर्व काही
जीवनात वाहे रसगंगा.
भेटता माणूस जगती मराठी बोलणारा वाटतो एक जिव्हाळा आपलेपणाचा फूटतो उम्हाळा मायेचा
बोलू लागतो मनापासून
होते मग चर्चा महाराष्ट्रातील घराची.
अमेरिकेत गणपती, ऑस्ट्रेलियात दिवाळी, आफ्रिकेत होळी, युरोपात रंग उधळते मराठी
दुबईला घडविते
दिल्लीचेही तख्त राखते मराठी लिहिण्यास सोपी बोलण्यास ओठी नांदते मराठी
जगातील उत्तमोत्तम साहित्य अनुवादिते मराठी
जीवनाचा खरा आस्वाद मराठी प्रत्येकाचा श्वास मराठी
भारताच्या संस्कृतीचा दोर एकसंध बांधते मराठी
नाही नुसती भाषा, नाही औपचार
खरा तो संवाद जिवांचा-
मराठी.
- प्रा. रुपेश रमेश पोटभरे एसएचएम महाविद्यालय
कल्याण
प्रतिक्रिया
24 Oct 2025 - 7:26 pm | अभ्या..
काही वृत्त, छंद, यमक, गेयता वगैरे तर सोडा,
निदान एका लयीत तरी आहे का ही कविता?
भले विषयाबद्दलचा जिव्हाळा आहे पण काहीही, कसेही आणि परत तेच तेच तेच.
सुवर्णकलशापासून आजपर्यंत तेच पताका अन ध्वजा, विठू आणि माऊली, राकटापासून तलमतेपर्यंत आणि तिखटापासून मधुरतेपर्यंत तेच तेच. ढिगभर विषेषणे आणि यच्च्यावत सगळा महाराष्ट्र.
प्राध्यापक आहेत म्हणे कविराज. धन्य धन्य. आणि कविता म्हणून एंटर एंटर करत गेलेला निबंध प्रसिध्द करणारेही धन्य.......