दिवाळी अंक २०२५ - सूर्यकमळ - कविता

सुनील खोडके's picture
सुनील खोडके in दिवाळी अंक
21 Oct 2025 - 12:00 am

सूर्यकमळ

सखे, तुझ्या अंतरीची मी तळमळ झालो
तुझ्या कोमल हृदयाची अस्वस्थ कळ झालो

नजर तुझी सैरभैर शोधत राहते मला
मी देहातून तुझ्या वाहणारी रक्त सळसळ झालो

तू पिऊन नजरेने मला होतेस तृप्त तृप्त
मी प्रीतफुलोरी जगण्याचे तुझ्या बळ झालो

तू नित्य करतेस आराधना प्रीतीची माझ्या
मी काळजाचा तुझ्या नितळ तळ झालो

तुझ्या निखारल्या चेहऱ्यावर माझ्या आठवांचे मधुर भाव
मी तुझ्यात वाहणाऱ्या प्रीतझऱ्याची खळखळ झालो

फुलोर हसते भाळी तुझ्या माझ्या नावाचे कुमकुम लाल
मी कपाळीचे तुझ्या सूर्यकमळ झालो

- सुनील दौलत खोडके

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

22 Oct 2025 - 9:27 pm | श्वेता२४

कविता आवडली...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2025 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

24 Oct 2025 - 8:21 am | कर्नलतपस्वी

पहिले आपत्य आणी ते ही कवीता म्हणून धाडसी अहात म्हणले. बरेच चांगले कवी कवयित्री मुक झाले आहेत. रणांगणात आता काहीच बाजीप्रभुच्या बादलां सारखे नेटाने टिकून आहेत. त्यात अनंत यात्री,संदिप चांदणे,कानडाऊ इत्यादी.

आता तुम्ही ताज्या दमाचे धारकरी, लिहीत रहा आम्ही प्रतिसाद देत राहू.

कवीता आवडली हे वेगळे सांगावयास नकोच.

चांगल्या,वाईट असा भेदभाव न करणारा "कवितेचा" फॅन.