तीळाचे लाडू

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
20 Jun 2024 - 12:34 pm

लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात.

तीळाचे लाडू
१५० ग्रैम अर्धवट भाजलेले तीळ
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे
अर्धी वाटी सुके खोबरे
अर्धी वाटी गुळ
आठ- दहा खजूर
दहा बारा बदाम
इलायची
A
सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे.यात खोबरं,तीळ असल्यामुळे याला सहज तेलही सुटते वळायला सोपे जातात.अगदी स्निग्ध पूर्ण लाडू होतात.
हे लाडू मऊ असल्याने खायलाही कष्ट ह़ोत नाही,पाक वगैरे करावा लागत नसल्याने चिकटही होत नाही.
A
टीप- तीळ अनपौलिश असतील तर चव उत्तम होते.

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

20 Jun 2024 - 1:02 pm | टर्मीनेटर

जब्राट दिसत आहेत लाडु!
मस्तच 👍

कांदा लिंबू's picture

20 Jun 2024 - 2:58 pm | कांदा लिंबू

तूप न घालताही लाडू करता येतात हे तिळाच्या लाडूंच्या बाबतीत खरे आहे.

झटपट कृती आणि फोटो आवडले. अजून येऊ द्या.

सोलापूर-पुणे साईडला कधी आलो तर खायला मिळतील का?

;-)

मिळतील की पार्सलपण मिळेल, नवर्याने गावाकडून ३-४ किलो गावरान तीळ आलेत,संपूपर्यंत घोर नाही.सगळ्यांना लाडू खाऊ घालण्याचा चंगच बांधलाय.आजच मैत्रिणीला दिलै अजून खूप जण वेटिंगला आहेत ;)
टर्मिनेटर आणि तुमचे आभार!

कर्नलतपस्वी's picture

20 Jun 2024 - 8:43 pm | कर्नलतपस्वी

लादु मस्त.