२०२४ लोकसभा निवडणूक.

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in राजकारण
22 Apr 2024 - 11:02 pm

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

मिळाला का?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2024 - 1:37 pm | अमरेंद्र बाहुबली

कुणालाही मत द्या. भाजपला नको. - विचारवंत श्री.विश्वंभर चौधरी.

सुबोध खरे's picture

26 Apr 2024 - 10:12 am | सुबोध खरे

एम आय एम ला किंवा मुस्लिम लीगला सुद्धा मत दिले तर चालेल म्हणा कि

काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 10:34 am | अमरेंद्र बाहुबली

काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात असेच लोक भाजपला सपोर्ट करतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 10:34 am | अमरेंद्र बाहुबली

काही लोक खायला काळ आणि भुईला (विश्वाला) भार असतात असेच लोक भाजपला सपोर्ट करतात.

उग्रसेन's picture

27 Apr 2024 - 12:03 am | उग्रसेन

कुणालाही मत द्या. भाजपला नको

बरोबर. दहा वर्षातल्या विकासाच्या मुद्द्यावर लढण्याऐवजी हे,
गाय,गोबर, हिंदु-मुस्लिम याच्या पलीकडे यांच्याकडे मुद्देच नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 1:40 pm | अमरेंद्र बाहुबली

श्री ध्रुव राठी ह्यांचा हा व्हिडीओ पहिला. भारतीय मीडिया गोदी मीडिया झाल्यामुळे खरं आपल्या पर्यंत पोहोचत नाहिये. श्री. ध्रुव राठी मोदींचे अनेकक घोटाळे तसेचक मोदिनी बोललेलं खोटं बाहेर काढत असतात. ध्रुव राठी नसते तर्क कदाचित आपल्याला मोदींचे आर्थिक घोटाळे कधीही कळाले नसते.
https://youtu.be/9Gmp2BAB3VA?si=zhy1K3qZTq9JNlmu

आग्या१९९०'s picture

26 Apr 2024 - 2:01 pm | आग्या१९९०

ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप चॅनेलला शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का?

आग्या१९९०'s picture

26 Apr 2024 - 2:55 pm | आग्या१९९०

शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क जरी नसला तरीही योग्य वयात विषारी , विखारी आणि खोट्या प्रचारापासून दूर राहतील. भविष्यात विचार करून मतदान करतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 4:18 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ भाजपा आणी संघाच्या कॅच देम यंग हया षडयंत्रातून वाचतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली

हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही खूप वाढले आहे नी व्हिडीओचे व्हायव्ह कोटींमध्ये गेलेत. शलाक आणिर कॉलेजच्या मुलात ध्रुव खूप प्रसिद्ध झालाय. गोदी मीडियामुळे खरी माहिती मिळवायला ध्रुव राठीचे व्हिडीओस लोक पाहताहेत. टॉप चे भारतीय युट्यूबर्सही ध्रुव राठीचा रिफरन्स देताहेत. उदा. lallantop.

चौकस२१२'s picture

30 Apr 2024 - 10:04 am | चौकस२१२
चौकस२१२'s picture

30 Apr 2024 - 3:35 pm | चौकस२१२
अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली

काँग्रेसच्या मेनिफिस्टोत कुठेही वेल्थ डिस्ट्रीबुशन शब्द नाही. भाजपचे अंधभक्तगण नी काही खोटारडे “फेकू” नेते खोटं पसरवताहेत. सावध राहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 2:30 pm | अमरेंद्र बाहुबली

रिकाम्या खुर्च्या पाहून फडणवीसांची सभेला दांडी. :)
कोण एकायला जाणार रटाळ टेप?

https://www.saamana.com/devendra-fadanvis-not-came-for-rally-because-of-...

आग्या१९९०'s picture

26 Apr 2024 - 4:25 pm | आग्या१९९०

मंडपवाल्याने खुर्च्यांना खाजकुयली लावल्याचे सांगितले जाईल

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 4:25 pm | अमरेंद्र बाहुबली

हाहाहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2024 - 5:25 pm | अमरेंद्र बाहुबली

शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण, असे अनेक लोक घेऊनही आणी शिवसेना, राष्ट्रवादीचे चिन्ह चोरूनही भाजप महाराष्ट्रात जिंकेल ह्याची शक्यता नसल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात आखली म्हणजे नरेंद्र मोदीना व्यवस्थित फिरता येईल. किती ती भीती?? ८० वर्षाच्या योध्याची नी बाळासाहेबांच्या सुपुत्राची?

विवेकपटाईत's picture

27 Apr 2024 - 9:00 am | विवेकपटाईत

नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही जागा भाजपा हरणार. असेच ४५ ते ५५% मतदान होत राहिले तर भाजपा उत्तर प्रदेशात दहा जागा ही जिंकणार नाही. उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान राज्यात भाजपाच्या जागा निम्म्याहून कमी होणार. १६४ पैकी फक्त ५० जागा मिळतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे मोदीसाठी काम करतंय तर मतमोजणी निपक्षपातीपणे करत असेल का??

सुबोध खरे's picture

27 Apr 2024 - 12:23 pm | सुबोध खरे

नाही ना?

मग आता मोदी येणारच!

काय रडारड करायची त्याला सुरुवात आताच करा.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली

ंम्हणजे तुम्हाला माहितीय तर

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली

अहद पेशावर तहद तंजावर??? मोदीना अभ्यासाची खूप गरज आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 6:50 pm | अमरेंद्र बाहुबली

सर तुमचे लाडके शेठ उलट बोलले.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 7:47 pm | मुक्त विहारि

मला लिंक मिळाली नाही...

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. पण केजरीवाल तुरुंगात हे लोकांना खपले नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 6:51 pm | अमरेंद्र बाहुबली

दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी फुकट यामुळे आआप पार्टी लाडकी झाली आहे. जनतेचा टैक्स चा पैसा फिरून पुन्हा जनतेकडे येतोय म्हणून जनता खुश आहे. भाजपशासित राज्यात अदानी, अंबानी, नी भाजप नेत्यांकडे जातो.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 7:51 pm | मुक्त विहारि

"व्हेनेझुएला" आठवले...

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 7:25 pm | अमरेंद्र बाहुबली

आजच्या कोल्हापूर सबेत मोदी धडधडीत खोटं बोलत होते.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 7:47 pm | मुक्त विहारि

लिंक देता का?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

मी लाइव्ह पाहिली टीव्ही वर

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 8:18 pm | मुक्त विहारि

लिंक मिळाली की पाठवा...

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 11:08 pm | मुक्त विहारि

छापील लिंक कधी देत आहात?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 10:47 pm | अमरेंद्र बाहुबली

पत्रकार नेहा पुरव यांना अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमकीचा मुंबई प्रेस क्लब निषेध करतो.

मुंबई उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्याबद्दल बातम्या दिल्याबद्दल पत्रकाराला दिलेल्या धमकीच्या घटनेचा मुंबई प्रेस क्लब तीव्र निषेध करतो. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी पत्रकार नेहा पुरव यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आणि त्यांना पीयूष गोयल यांच्यावर टीका करणारी बातमी प्रकाशित न करण्याचा इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी, नवाकाळ सोबत काम करणाऱ्या पूरवने बातमी दिली होती की, गोयल यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान उत्तर मुंबईतील मासळी मार्केटला भेट देताना माशांच्या वासाने अस्वस्थता व चिंता व्यक्त केली, नाक मुरडले होते..

पत्रकार नेहा पुरव यांना धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मुंबई पोलिसांना विनंती आहे.

ये बात कुछ हजम नही हुई...

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2024 - 11:16 pm | अमरेंद्र बाहुबली

“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान.
https://politicalmaharashtra.in/sharad-pawars-big-statement-is-that-givi...

मुक्त विहारि's picture

27 Apr 2024 - 11:40 pm | मुक्त विहारि

काय बोलणार?

अहिरावण's picture

28 Apr 2024 - 10:34 am | अहिरावण

शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुध्द खरे असते.

आजवरचा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोंदींची घणाघाती टीका, “उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..”

https://www.loksatta.com/elections/uddhav-thackeray-is-sitting-with-thos...

----

आमची तर लिंक आली बाबा...

---

डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील.

काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे

----

दीवार, सिनेमा आठवला....

कांग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षाना, मी कधीच मत देणार नाही...

हुप्प्या's picture

28 Apr 2024 - 4:28 am | हुप्प्या

भाजपमधेही घराणेशाही चालते म्हणणार्या लोकांसाठी एक नव्याने घडलेली घटना. भाजपने पूनम महाजन, प्रमोद महाजन यांच्या कन्येचे तिकिट बिनदिक्कत कापून त्याजागी उज्वल निकम या गाजलेल्या वकिलांना तिकिट दिले आहे. आता हा निर्णय योग्य की अयोग्य ते काळच सांगेल. पण भाजपच्या गणितानुसार पूनम महाजन यांच्यापेक्षा निकम यांचे पारडे जड आहे. म्हणून पूनम महाजन यांची पूर्वपुण्याई किंवा वारसाहक्क याचा विचार न करता सरळ त्यांचे तिकिट कापले. तसेही पक्षात पूनम महाजन ह्या मोठ्या वाटाघाटी, राजकीय समीकरणे, तिकिट वाटप अशा महत्त्वाच्या कामात सहभागी होताना दिसत नाही. त्यांचे वडिल एक उच्चपदस्थ भाजप अधिकारी होते आणि ते अशा गोष्टी करत असत. पण असे अधिकार भाजपमधे वंशपरंपरेने हस्तांतरित होत नाहीत ही बाब येथे अधोरेखित होताना दिसते.

या पार्श्वभूमीवर हे आठवा की आदित्य ठाकरे यांना वरळीतून निवडून येता यावे म्हणून शिवसेनेने आपल्या एक दोन सिटा बळी म्हणून राष्ट्रवादीला देऊन टाकल्या होत्या.

रामचंद्र's picture

28 Apr 2024 - 5:13 am | रामचंद्र

व्यवहार्य निर्णय. तसंही पूनम महाजनांमागे भाजपमध्येही फारसं पाठबळ असेल असं वाटत नाही.

गणेशा's picture

28 Apr 2024 - 9:35 am | गणेशा

एक दोन प्रतिसाद सोडता, विश्लेषणात्मक, आकडेवारी पुर्ण लिखान मिळाले नाही..

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2024 - 7:48 pm | अमरेंद्र बाहुबली

विश्लेषणात्मक, आकडेवारी पुर्ण लिखान मिळाले नाही.. अस काही लिहिलं तर “अंधभक्त” हे स्टेट्स जाईल ना?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2024 - 10:47 am | अमरेंद्र बाहुबली

ऊज्वल निकम ह्यानी घेतलेल्या निर्णयामुळे समाजमाध्यमात टीकेची झोड उठलीय.

रामचंद्र's picture

28 Apr 2024 - 12:22 pm | रामचंद्र

त्यात काय, महाविकास आघाडीला फायद्याचंच की मग?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2024 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

पूनम महाजन ह्याच तिकीट कापून भाजपला अक्कल आली असे म्हणावे लागेल. अश्याच प्रकारे घराणेशहीतून आलेल्या देवेंद्र फडणवीस, दानवे, गणेश नाईक कुटुंब , राणे कुटुंब ह्यांचे तिकीट विधानसभेला कापावे. :)