ऊर्जा संवर्धन दिवस १४ डिसेम्बर

अमोल नागपूरकर's picture
अमोल नागपूरकर in काथ्याकूट
20 Dec 2008 - 1:08 pm
गाभा: 

१४ डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही बहुतेक करुन लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोतान्पासून निर्माण होते. ज्या इन्धनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली त्याच ६० टक्के भाग आपण गेल्या २०० वर्षातच खर्च केला आहे. आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते.
शिवाय अशाप्रकारे होणारया ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे. इ स १८६० पेक्षा आजचे जागतिक ताप्मान जवळ पास ०.७५ अंशाने वाढले आहे. ते ह्या शतकाच्या शेवटि ६ अंशानी वाढण्याची शक्यता आहे.
ह्या सर्वान्वर ऊर्जा संवर्धन हा एकच उपाय आहे.
ऊर्जा संवर्धन म्हणजे परिणामात फरक न करता ऊर्जेचा न्याय्य उपयोग आणि ऊर्जेच्या वापराचे प्रमाण कमी करणे. ऊर्ज वाचवणे हे ऊर्ज निर्माण करण्यापेक्षा खूप सोपे आणि बिनखर्चाचे आहे. त्याचे काहि उपाय खालिलपैकी आहेत.
१) तुम्हाला काम नसेल तेव्हा तुमचा पीसी /लैपटोप शट डाऊन करा. तसेच गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे आनि इतर विजेची उपकरणे बन्द ठेवा.
२)तुमच्या एसी चे टेम्प सेटिन्ग २५ अंशान्वर ठेवा.
३) औफिसला जाताना कार पूलीन्ग चा उपयोग करा.
४) सी एफल दिव्यान्चा उपयोग करा.
आपण आपल्या दैनन्दिन आयुष्यात वीज आणि ऊर्जा वाचवून आपला आणि देशाचा विकास करू या.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

20 Dec 2008 - 1:36 pm | विनायक प्रभू

लय भारी. आण्खी कुठे कुठे उर्जा वाचवता येईल बॉ??????

अमोल नागपूरकर's picture

20 Dec 2008 - 1:55 pm | अमोल नागपूरकर

जवळ्पास सगळ्या ठिकाणी. घरगूती वापर, दुकान,उद्योग, शेती, वाह्तूक हया सर्व क्षेत्रान्मध्ये ऊर्जा वाचवीता येइल. ऊर्ज बचतीचे अनेक उपाय Buerau of Energy Efficiency च्या तसेच इतरही साइट्सवर दिलेले आहेत. भारतात सध्या ऊर्जेचा एकूण तुटवडा ८ टक्के आहे . हाच तुटवडा कमाल मागणीच्या काळात (Peak Demand) १३ टक्क्यान्वर जातो. ट्यमुळे आपल्याला भारनियमनाला (Load Shedding) तोन्ड द्यवे लागते. तर एका अन्दाजानुसार , वरील सर्व क्षेत्र मिळून, २० टक्के वीज वाचवीता येइल. हे आपण केले तर भारनियमन करावेच लागणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या सुचलेले आणखी काही उपाय:
१. फ्रिजमधून एकदम गॅस (का गैस?)वर किंवा गॅसवरुन फ्रिजमधे असं करु नका. पदार्थ रूम टेंपरेचर(मराठी शब्द?)ला आल्यावर मग गॅसवर किंवा फ्रिजमधे ठेवा.
२. मायक्रोवेव्ह अव्हनमधे पदार्थ गरम करण्यापेक्षा गॅस वापरा.
३. लाद्या पुसण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, इ. वापरलेलं पाणी संडास फ्लश करण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे पाण्याची बचत होईलच, शिवाय ते पाणी वरच्या टाकीत चढवण्यासाठी लागणारी वीजही वाचेल.
४. लिफ्टऐवजी शक्यतो जिनेच वापरा. शरीरासाठीही ते चांगलंच.
५. साध्या बल्ब आणि ट्यूब्जच्याऐवजी सी.एफ.एल. किंवा एल.ई.डी.वाले दिवे वापरा.

अमोल नागपूरकर's picture

20 Dec 2008 - 2:30 pm | अमोल नागपूरकर

उत्तम उपाय. धन्यवाद, अदिती. पाणी सुदधा वचवीले पाहिजे.

लिखाळ's picture

20 Dec 2008 - 3:58 pm | लिखाळ

छान चर्चा. आपल्या गरजा ओळखणे आणि त्या मर्यादित करणे हा उर्जासंवर्धानाचा पाया वाटतो. ते कसे करावे याबद्दलसुद्धा चर्चा झाली पाहिजे.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विनायक प्रभू's picture

20 Dec 2008 - 4:26 pm | विनायक प्रभू

खी खी खी पूर्ण प्रतिसादासाठी लिखाळभौ

वृंदा's picture

21 Dec 2008 - 12:08 am | वृंदा

१. टी. व्ही. रिमोट्ने बंद न करता उठून बंद करणे अथवा चॅनल बदलणे.
२. सूर्यचूलीचा वापर करणे.
३. घराच्या गच्चीवर सोलार पॅनल बसवून त्याचा उपयोग पाणी तापवण्यासाठी करणे आणि सर्वात महत्त्वाचे
४. मिपावर फार अवांतर न लिहिणे.

अमोल नागपूरकर's picture

23 Dec 2008 - 10:31 am | अमोल नागपूरकर

१) आपल्या कार्/बाईकची वेळोवेळी servicing करून घेणे.
२) गाडी चालवताना क्लच चा वापर कमीत कमी करणे.
३) गाडी स्पीड लिमिट मध्येच चालवणे.
४) टायर मध्ये एअर प्रे शर योग्य ठेवणे.
५) traffic signal वर थाम्बले असताना गाडी बन्द करणे.