टोक्यो हानेडा विमानतळ अपघात - a textbook evacuation !

बोका's picture
बोका in काथ्याकूट
3 Jan 2024 - 4:10 pm
गाभा: 

दि. ०२/०२/२०२४ रोजी टोक्यो हानेडा विमानतळावर अपघात झाला.
विमानतळावर उतरताना एअरबस A३५० -९०० विमान, धावपट्टीवर उड्डाणाच्या तयारीत असणाऱ्या Dash 8 या तटरक्षक दलाच्या छोट्या विमानाला धडकले.
असे का झाले याबाबत अधिक माहीती येत आहे, चौकशी चालू आहे.

एअरबस A३५० -९०० हे एक मोठे प्रवासी विमान आहे. अपघातग्रस्त विमानात प्रवासी व कर्मचारी मिळून ३७९ जण होते. धडकेनंतर मोठा आगीचा लोळ उठला व विमान धावपट्टीवर अनेक मीटर फरफटत पुढे गेले.

विमान थांबल्यावर मागच्या बाजूला आग लागली होती, इंजिनातून ठिणग्या उडत होत्या, धूर पसरला होता.
अशा कठीण परिस्थितीत सर्व ३७९ जण सुखरूप बाहेर आले. त्यानंतर संपूर्ण विमानाने पेट घेतला.
aaa

ब्ब्ब

हे एक आश्चर्यकारक evacuation (मराठी ?) आहे. - a textbook evacuation !
1. अपघात / आणीबाणी आहे हे अगदी शेवटच्या काहि मिनिटात कर्मचारी आणि प्रवाश्याना कळले. आणीबाणीची अजिबात तयारी नव्हती.
२. विमान पुढे झुकलेले होते. आगीमुळे फक्त पुढील दोन आणि मागील एक दरवाजा / घसरगुंडी उघडण्यात आली होती. एकूण आठापैकी तीन फक्त.
३. अंदाजे फक्त अडीच मिनिटात ३७९ जण सुखरूप बाहेर पडले. हे विमान ४ दरवाजे वापरून ९० सेकंदात रिकामे करण्यासाठी प्रमाणित आहे.
४. कर्मचायांचे ट्रेनिंग उत्कृष्ठ झाले असावे व त्यांनी त्या ट्रेनिंगचा पुरेपूर यथोचित उपयोग केला.
५. अधिकतर प्रवाशी जपानी असल्याचा काही फायदा असावा. इंटरनेट वर अनेक जण जपानी संस्कृतीला श्रेय देत आहेत. जपानी लोक दिलेल्या आज्ञा काटेकोरपणे पाळतात. त्यामुळे घाईगडबड न करता , सामान न घेता लोक शिस्तीत बाहेर आले.

आपणही यातून काही शिकू शकतो. ज्या सूचना कर्मचारी वर्ग आपल्याला देतो त्या पाळाव्यात. त्या सूचना अश्या आणीबाणीच्या प्रसंगांसाठी केलेली तयारी असतात.
उदा. विमान उतरताना ट्रे बंद करवा , सामान रस्त्यात ठेवू नये, खिडकी ऊघडी ठेवावी वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आणीबाणीत अनमोल सेकंद वाचू शकतात.

प्रतिक्रिया

१)आमच्याकडे भाषेची अडचण. कोणत्या भाषेत सूचना द्यायच्या? एरपओर्ट अथवा स्टेशनचे जे अस्मितादर्शक लांबलचक नाव असेल ते घ्यावे लागते अन्यथा अपमान होतो.
२)वेगवेगळ्या खात्यांत समन्वय नसतो. कोणी सूत्रे हातात घ्यायची.कोणी पालन करायचे.
३) वस्तूंची नावे सांगितल्यावर त्याच वस्तूकडे निर्देश झाला पाहिजे. त्यात पुन्हा घोळ नसावा.
४) आग लागल्यावर काय करायचे हे प्रत्येकास माहीत हवे.
------------
दुर्घटनेनंतर समिती नेमणे हे मुख्य काम.

धर्मराजमुटके's picture

3 Jan 2024 - 6:33 pm | धर्मराजमुटके

आपल्याकडे असा काही प्रसंग झाला असता तर आगीने नाही पण चेंगराचेंगरीत दोन चार जीव गेले असते आणी काही जखमी झाले असते. नियम कशाशी खातात हे इथल्या जनतेला माहित नाही.

वामन देशमुख's picture

3 Jan 2024 - 7:22 pm | वामन देशमुख

Calling गवि

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jan 2024 - 7:31 pm | अमरेंद्र बाहुबली

तासाभराच्या प्रवासानंतर लाॅबीत ऊभे राहून लोक गर्दी का करतात हे अजून कळाले नाही. बॅग बेल्टवर यायची तेव्हाच येणार असते. लाॅबीत ऊभे राहीलो तर आपली बॅग बेल्टवर लवकर येईल असं त्यांना वाटत असावे. एअर होस्टेस नी कॅप्टन बोंबलत असतो की सूचना मिळेपर्यंत जागेवरून ऊठू नका. ह्यात वयस्कर लोकच जास्त असतात. निम्म वय सरलेलं पण शरीर नियम तोडायला सरावलेलं.

काल एवढी मोठी दुर्घटना घडली पण जास्त जीवित हानी झाली नाही,पाच क्रू मेंबर बळी गेले.जपानींने आणीबाणीचे नियोजन चांगले केले.खरोखर जपान ,चीन यांच्याकडील शिस्तबद्धता शिकण्यासारखी आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jan 2024 - 9:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

दि. ०२/०२/२०२४?? ही तारीख वाचुन काहीतरी कल्पनाविलास आहे असे वाटले. मग कळले टायपो आहे.

शिस्तीबद्दल जपानी लोकांचे कौतुक आहेच. आपल्याकडे २ वर्षे मिलिटरी शिक्षण सक्तीचे केले पाहीजे(एकतर लोकांना शिस्त लागेल किवा आर्मीची शिस्त जाईल :) )

साधे उदाहरण देतो- ईमारतीच्या चारी बाजुने आगीचा बंब फिरेल ईतकी जागा असावी/सोडावी असा नियम आहे. आमच्या सोसायटीत त्या जागेला मोकळी समजून गाड्या लावतात. एक गाडी स्वतःच्या पार्किंग मधे आणि अजुन एक तिकडे. आग लागेल तेव्हा बघु. आता बोला.

कौतुक करण्याआधी थोडे थांबा. विमान ९० सेकंदात रिकामे केलेलं नसून, त्याला एकूण १८ मिनिटे लागली आहेत. हा कालावधी खूप जास्त असून जुन्या अल्युमिनियमच्या विमानात प्राणघातक ठरला असता. पहिली पाच सात मिनिटे केवळ काय करावे, कोणती दारे उघडावी या गोंधळात गेली आहेत. आत धूर भरू लागल्यानंतर मात्र सर्व पटापट बाहेर पडले. त्यामुळे माझ्या मते तयारीपेक्षा नशीबाची फार मोठी साथ त्यांना मिळालेली आहे.

गवि's picture

6 Jan 2024 - 12:29 pm | गवि

एका विमानाचा (single aircraft) अपघात, या प्रकारात जगातील सर्वाधिक बळी घेणारा अपघात जपान एअरलाइन्सच्याच नावावर आहे. JAL १२३ या क्रमांकाची फ्लाईट १९८५ मध्ये याच हनेडा विमानतळावर येत असताना पर्वतात कोसळली तेव्हा ५२४ पैकी ५२० लोक मारले गेले. त्यात दुर्दैव असे की वेळेत रेस्क्यू न झाल्याने त्यातील क्रॅश मधून वाचलेले पण जखमी असे खूप लोक रात्रभरात मृत झाले. रेस्क्यू टीम रात्रभर तिथे गेलीच नाही. सकाळी उजाडल्यावर प्रत्यक्ष मोहीम सुरू केली.

त्या वेळचे नुकसान इतके होते की नंतर रेस्क्यू आणि evacuation प्रोसेस अधिक सुधारणे अत्यावश्यक ठरले. "रुल्स रिटन इन ब्लड" हा वाक्प्रयोग याच संदर्भात केला जातो.

मुक्त विहारि's picture

6 Jan 2024 - 2:29 pm | मुक्त विहारि

सहमत आहे.

आणि

माहिती बद्दल धन्यवाद....

रुल्स रिटन इन ब्लड (ऑफ दोज हू डाईड इन JAL १२३ क्रॅश).. असे.