पुन्हा भटकी कुत्री.....

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
23 Oct 2023 - 12:25 pm
गाभा: 

आज हे वृत्त वाचले.

https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pas...

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात. अगदी न्यायालयापर्यंत लढत राहतात भटक्या कुत्र्यांसाठी. माणसांमधे बलात्कारी , मनोरुग्ण , सणकी अशा स्वभावाचे लोक असू शकतात मग भटक्या कुत्र्यांनी असं वागलं तर त्यांना ठार का मारता? वगैरे विचारणा प्राणीमित्र करतात.भटकी कुत्री रात्रीबेरात्री भुंकतात त्याचा त्रास होत असेल तर सणासुदीला मोठमोठ्यानं डॉल्बी लावले जातात ते कसे चालतात अशीही विचारणा होते.
भटक्या कुत्र्यांची पैदास शून्यावर आणण्यात खरा अडथळा हे प्राणीमित्रच आहेत. एखाद्यादिवशी या प्राणीमित्रांचाच बळी भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानं गेल्याशिवाय यांना त्या विषयाचे गांभीर्य समजणार नाहीये.
प्राणीमित्रांच्या या अतिरेकी प्राणीप्रेमाला पायबंद घालू शकेल असा एखादा नियम , कायदा भारतात का असू नये?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

23 Oct 2023 - 6:00 pm | मुक्त विहारि

मी पण श्वान प्रेमी आहे..

पण, भटके कुत्रे नकोतच...

परवा माझा असाच एका भटक्या कुत्र्याना खाऊ घालणाऱ्या स्वयंसेविकेबरोबर वाद झाला. त्या रोज रात्री गाडीवर येऊन खायला घालून जात असतात म्हणून त्यांना विचारला कि तुमच्याकडे महापालिकेने काही ओळखपत्र दिले आहे का किंवा तुमची स्वयंसेवी संस्था आहे का तर त्या अंगावरच आल्या. त्यांना सांगायला गेलो की अहो कुत्री रात्री अपरात्री पार कुत्र्यागत भुंकतात, झोपमोड झाली की घरातल्या वयस्कर लोकांना परत झोप लागत नाही आणि संध्याकाळी, रात्री चालताना मागे मागे येतात त्याची पण त्यांना भीती वाटते तेंव्हा दुसरीकडे सुनसान जागेवर खायला घाला किंवा तुमच्या घरापाशी घेऊन जा त्यावर त्यांनी सुनावलं कि सुप्रीम कोर्ट ने निकाल दिला आहे, तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही आणि आमच्या कामात बाधा आणून त्रास दिल्याबद्दल तुमच्यावर पोलीस केस करेन. वर महापालिकेनं ओळखपत्र दिला आहे असं सांगून इंग्रजीमध्ये दोन मोरालिटी च्या गोष्टी सांगून ऍक्टिवावर पायाचे पंख करून भुर्रकन निघून गेल्या.
मी गुगल वर कोर्ट ऑर्डर पहिल्या त्यात त्यांना अधिकार आहे असं म्हणालाय आणि त्याचा काहीतरी SOP आणि त्यासंदर्भात नियम करावा अस लिहिलंय.
एकतर त्या आसपास कुठेच राहत नाहीत पण रोज गाडीवर येऊन खायला टाकून जातात.
स्थळ- मुलुंड पूर्व, संभाजी उद्यान जवळ.

कपिलमुनी's picture

28 Oct 2023 - 1:47 am | कपिलमुनी

अंगावर गाडी घालावी, तंगडे मोडावे आणि कुत्रे मधी आले म्हणून गाडीचा बॅलन्स गेला असे सांगावे.. सुप्रीम कोर्टामुळे झाले म्हणून रिकामे व्हावे

कंजूस's picture

24 Oct 2023 - 1:34 am | कंजूस

कमी होण्याचा उपाय आहे.

रस्त्यांवर कचरा टाकणे बंद झाले की कमी होतात. त्यांना खाणे मिळत नाही.

परंतू आपलेच काही लोक कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर गाडी येण्याच्या वेळेवर कचरा देत नाहीत. सकाळी कामावर जाताना रस्त्यात फेकतात. दुसरे म्हणजे पार्टीवाले,बर्थडे पार्टिवाले. रात्री उशिरा पार्टी संपते तेव्हा प्लास्टीक ताटल्यांसह उरलेले अन्न बाहेर रस्त्यावर टाकतात. ते सकाळी कचरा कर्मचाऱ्यांनी उचले पर्यंत कुत्र्यांना मिळते. प्रजा वाढते. हे शहरांत फार आहे. गावांकडे वस्ती विरळ, गावाबाहेर मोकळी जागा, शेते यांमुळे कुत्रे एकाच ठिकाणी जमा होत नाहीत,त्रास जाणवत नाही.

उपयोजक's picture

24 Oct 2023 - 1:38 pm | उपयोजक

का सक्षमपणे राबवत नाहीत?

प्राणीमात्रांना प्राण्यांना पकडण्याविरुद्ध किंवा निर्बीजीकरण करण्याविरुद्ध काही कायदा पास होणे थांबवले असे काही उदाहरण आहे का तुमच्याकडे ? किंवा असलेले कायदे एन्फॉर्स करण्यात खूप मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले असे काही ? मला तर शासन व्यवस्थेचा आळशीपणा दिसतो. जर प्राणीमित्र लोकांनी शासनाला मोकळीक दिली तर विश्व भटक्या कुत्र्यांपासून मुक्त नंदनवन होईल असा लेखाचा सूर आहे. शासनाला कचऱ्याचे कंटेनर वेळेवर उचलण्याची मोकळीक आहे ना ? उचलतात का ? नाही. भटके कुत्रे अश्या कचऱ्यावरच जगतात, हवेवर नाही.

रात्रीचे चांदणे's picture

24 Oct 2023 - 10:15 am | रात्रीचे चांदणे

प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांना खायला घालून त्यांना धष्टपुष्ट बनवत आहेत. Palre g चे पुडेच्या पुडे रस्त्यांवर दिसतात. पण कुत्र्यांना घायला घालणारा प्रत्येक प्राणीमित्र असेलच असेही नाही. उरलेल जेवण फेकून देण्यात अनेकांना आवडत नाही. मग ते भटक्या कुत्र्यांना देऊन थोड पुण्य तरी पदरात पडेल हा विचार असेल. पुण्यातली कुत्री तर भाकरी कडे बघतही नाहीत.
कुत्रा निर्बिजी करण्याची मोहीम अनेक महापालिका राबवत आहेत पण एकाच निर्बीजीकरण करून १० कुत्र्यांचे पैसे लाटत असंनार.

खूप वर्षे आधी पवई परिसरांत कुत्रा निर्बिजीकरण मोहिम मध्ये मी आर्थिक मदत करून भाग घेतला होता. मुंबईत साधारण २ लाख किमान भटकी कुत्री आहेत. आणि नगरपालिका कागदावर तरी किमान ५०,००० कुत्रांचे निर्बिजीकरण वर्षाला केले असे दाखवते. त्यामुळे खरे तर २-३ वर्षांत हा आकडा कमी झाला पाहिजे होता तो ७ वर्षांत दुप्पट होतो. ह्याचे मूळ कारण जिथे खरे निर्बीजीकरण केले पाहिजे तिथे ते होत नाही कारण हे भाग इतके गलिच्छ आहेत कि कुठलाही कर्मचारी तिथे जाऊ इच्छित नाही. गेला तरी त्या झोपडपट्टीत कुत्र्यांना पकडणे कठीण आहे कारण ह्या वस्ती अत्यंत छोट्या आणि बारीक वाटा असलेल्या आहेत आणि येथील लोकांना सुद्धा हि कुत्री प्रिय आहेत. बहुतेक कुत्र्यांचे प्रजनन ह्या भागांत होते. ते थांबवणे गरजेचे आहे.

कुत्र्यांना घाबरावता येईल असे कुठले ऍप्प नाही का? म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या परिसरातून जाताना ऍप्प सुरु करायचे जेणेकरून भटकी कुत्री जवळपास येणार नाहीत :)

कंजूस's picture

24 Oct 2023 - 1:06 pm | कंजूस

App?

कुत्र्यांना घाबरावता येईल असे कुठले ऍप्प

कुत्रे भुंकू लागल्यास हात न उगारता काही बोलावे. गप्प होतात.

पाषाणभेद's picture

24 Oct 2023 - 10:30 pm | पाषाणभेद

कुत्री किती प्रेमळ असतात. मानव देखील त्यांचे अनुकरण करतो.

कुत्रीच काय पण घरात मांजर उंदीर ससे मासे कोल्हा सिंव्ह हरीण हत्ती लांडगा मोर खार तरस साळींदर घुबड इत्यादी देखील पाळायला पाहिजे.

पाषाणभेद's picture

24 Oct 2023 - 10:30 pm | पाषाणभेद

कुत्री किती प्रेमळ असतात. मानव देखील त्यांचे अनुकरण करतो.

कुत्रीच काय पण घरात मांजर उंदीर ससे मासे कोल्हा सिंव्ह हरीण हत्ती लांडगा मोर खार तरस साळींदर घुबड इत्यादी देखील पाळायला पाहिजे.

मुक्त विहारि's picture

25 Oct 2023 - 8:39 am | मुक्त विहारि

एक उत्तम विषय दिलात.

धन्यवाद...

पाषाणभेद's picture

26 Oct 2023 - 9:34 pm | पाषाणभेद

मी उपरोधीक पणे बोललो होतो.
मी कुत्राच काय पण कोणताही प्राणी पाळण्याच्या अगदी विरुद्ध आहे.

कुत्रा हा रानटी प्राणी आहे अन तो त्याच्या स्वभावावर कधीही जाऊ शकतो.

तसेच शहरात आहे तेच घर कमी पडत असतांना कुत्रा पाळणे म्हणजे त्यावर अत्याचारच आहे.

तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी कुत्रा पाळता तर त्याचे मनोरंजन कोण करणार? स्वार्थ आहे तुमचा.

कुत्रा हा रानटी प्राणी आहे अन तो त्याच्या स्वभावावर कधीही जाऊ शकतो....
-----

काही जाती तशा असतात...

पण, काही जाती अतिशय प्रेमळ, विश्वासू आणि सोबत करायला उत्तम असतात... विशेषत: Labrador आणि बीगल..

घरात जर म्हातारे मानूस असेल तर, ह्या जाती अतिशय उत्तम... मानसिक थकवा, एकटेपणा दूर करतात, हा स्वानुभव आहे...

अर्थात , रोजचे किमान दोन ते तीन तास तरी तुम्हाला त्यांच्या साठी वेळ काढायला पाहिजे.

माझी दोन्ही कुत्री, त्यांना कंटाळा आला की चादरी किंवा फडकी घेऊन यायची...

उपयोजक यांनी कुत्राप्रेमींचा एक आणि कुत्रा विरोधी एक असे दोन व्हॅटस अप्पा ग्रुप काढावेत,
असे बोलून मी खाली बसतो,

त्यातही, जातीभेद आहे..

बीगल, Labrador, जर्मन शेफर्ड, हस्की असे विविध ग्रुप्स आहेत..

कुत्रा असो किंवा कुठलाही पाळीव प्राणी, तो पाळला की आपण, एकच गोष्ट शिकतो आणि ती म्हणजे....

प्राणी उत्तम, माणूस नको.. निसर्गाचा समतोल, माणसांनी बिघडवला.

विवेकपटाईत's picture

26 Oct 2023 - 10:07 am | विवेकपटाईत

कुत्र्या बाबतीत लक्षात ठेवण्या योग्य काही बाबी. ( ॲनिमल, हिस्ट्री चॅनल माहिती आधारावर). य
१. कुत्रा जंगली जनावर आहे. तो पाळीव प्राणी आहे हा एक भ्रम आहे.
२. कुत्रा हा समूह मध्ये राहतो आणि फक्त आपल्या समूह प्रति निष्ठावंत असतो. (माणूस ही त्या समूहाचा एक सदस्य होऊ शकतो).
३. समूह मध्ये प्रत्येकाचा दर्जा ठरलेला असतो उच्च दर्जाचा कुत्रा निम्न दर्जाच्या कुत्र्याला दंड ही देतो. लखनऊ मध्ये कुत्र्याने मालकाच्या आईला दंड तिला आणि कारण आईचा दर्जा त्या समूहामध्ये सर्वात निम्न होता. पण माणसाची कातडी आणि शरीर कुत्र्यासारखे नसते. ती मेली. पण आपल्या कायद्यानुसार कोणालाही त्यासाठी दंड देता आला नाही.
४. कुत्रा हा दुसऱ्या मेलेल्या कुत्र्यालाही खातो. माणसांवर हल्ला करून त्यांनाही तो खाऊ शकतो.
५. कुत्र्यांचा भावना माणसासारख्या नसतात. त्यामुळे कुत्रा पाळण्या आधी कुत्रा पाळण्याचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुत्र्याचा घरभर संचार नसावा. काही जागा उदा. स्वैपाक घर बेड रूम प्रतिबंधित पाहिजे. कुत्र्याला जाणीव करून दिली पाहिजे की त्याचा दर्जा करा सर्वात खालचा आहे. असा कुत्रा तुमचा उत्तम सेवक बनेल.
६. छोट्या फ्लॅटमध्ये मोठे कुत्रे पाळू नये. त्यांना मोठी जागा पाहिजे असते.
७. शेवटी कुत्र्याला माणूस समजण्याची चूक महागात पडते.

भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या पाच ते सात कोटी आहे. मोठ्या शहरात सर्वांची नसबंदी करणे शक्य नाही. कुत्रा परिवार नियोजन पाळत नाही. गेल्या वर्षी 50 हजार हून जास्त लोकांचे हत्या कुत्र्यांनी केली आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याचा एकमेव उपाय काही कोटी कुत्र्यांची हत्या करणे आहे.

या प्रतिसादात बरेच तथ्य असल्याचे जाणवले. विशेषतः कुत्रा जर नर असेल आणि मुळात काहीसा आक्रमक अनुवंशाचा असेल तर तो स्वतःला नायक समजून इतरांना दुय्यम समजून आक्रमक वागणूक देऊ शकतो हे पटते आहे. अपवाद असतील पण सामान्यतः पटण्यासारखे.

तो विडिओ मी पाहिला आहे. पण बरोबर नाही. कारण सर्वच कुत्रे रानटी किंवा सर्वच पाळीव नाहीत. कुत्रा हा कित्येक वर्षे रान सोडून मनुष्याबरोबर राहात आहे. तो रानात एकटा आता राहू शकत नाही. शिवाय तो भित्रा झाला आहे. मालकाच्या जागेतच तो शूरपणा दाखवतो. इतर अपरिचित ठिकाणी अती भित्रेपणाने अर्धमेला होतो. त्यास स्वतंत्रपणे आयुष्य जगता येत नाही.(-केनेथ अँडरसन)

अहिरावण's picture

27 Oct 2023 - 10:58 am | अहिरावण

एकवेळ कुत्रा परवडतो पण कुत्तरडी माणसे नाही परवडत.

मुक्त विहारि's picture

27 Oct 2023 - 4:57 pm | मुक्त विहारि

माणूस नावाच्या प्राण्यानेच, पृथ्वीचा विनाश केला आहे...

चौथा कोनाडा's picture

27 Oct 2023 - 8:56 pm | चौथा कोनाडा

श्वान. मग तो पाळीव असो अथवा भटका... हा अति महत्वाचा व्हीआयपी प्राणी झाला आहे.

आता श्वानाचा अतिमोठ्ठा पुतळा आता एखाद्या महत्वाच्या वास्तू वर उभा करुन त्यातुन टूरिझम संधी निरमाण गरजेचे आहे !

रंगीला रतन's picture

27 Oct 2023 - 11:11 pm | रंगीला रतन

सगळी भटकी कुत्री मनेका गांधीच्या बंगल्यावर नेउन बांधावीत.
नेहमीप्रमाणेच फाल्तु धागा.