वशीकरण खरंच असतं का?

उपयोजक's picture
उपयोजक in राजकारण
5 Jul 2023 - 10:27 pm

संदर्भ

आज केरळ स्टोरी ह्या चित्रपटाच्या कथेचा प्रत्यक्ष अनुभव पुणे येथे आला. माहेश्वरी समाजातील एक मुलगी नाव निकिता लोहीया गाव बीड जिल्ह्यातील एका खेड्यातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येते काय आणि 47 वर्षीय विवाहित दोन मुलं असलेल्या मुस्लिम माणसाच्या प्रेमात पडते काय आणि धर्मांतर करून लग्न करते आणि आई वडिलांना ह्याची जराही कल्पना नाही. आई वडिलांनी मुलीला गावा कडे बोलावून घेतले आणि कुणकुण लागली म्हणून परत पाठवली नाही. म्हणून त्या मुलीने त्या मुस्लिम माणसाच्या सांगण्यावरून आई वडिलांकडून जीवाला धोका आहे आणि इस्लाम धर्म मी माझ्या मर्जीने स्वीकारलेला आहे असा व्हिडीओ पाठवला. त्या मुस्लिम माणसाने त्या विडिओ चा आधार घेत पुणे कोर्टात Crpc Sec. 97 खाली अर्ज केला, आणि तिला हजर करण्याबाबत आदेश मिळवला. तदनंतर आज दि.01/07/2023 रोजी तिला पुणे कोर्टात हजर करण्यात आले, त्या वेळी आपल्या हिंदू वकील बांधवाना कळताच सगळ्यांनी कोर्टात धाव घेतली, व जोरदार हरकत नोंदवत युक्तिवाद केला. परंतु मुलगी सज्ञान असल्याने कोर्टाने हरकत नामंजूर करत मुलीला तिच्या मुस्लिम पतीच्या घरात जायचे असल्यास जाऊ शकते, असा आदेश केला. त्यावेळी मुलीचे आईवडील अक्षरश रडत होते, परंतु त्या मुलीवर काहीएक परिणाम झाला नाही व ती तिच्या मुस्लिम पतीच्या घरी निघून गेली, आणि हतबल आईबाबा तिला बघत राहिले. त्या वेळी माहेश्वरी समाज चे वकील बंधू आणि भगिनी सर्व ऍडवोकेट
सूचित मुंदडा, केदारनाथ मणियार, अमित राठी, शीतल भुतडा, पियुष राठी, प्रवीण चांडक, मयुरी कासट, पूजा झंवर याना बातमी कळताच ताबडतोब कोर्टात आले व सर्वानी *त्या मुलीला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याचा देखील काही एक परिणाम झाला नाही.* काय होत आहे समाजात आपली मुलं मुली काय करत आहेत कुठे आहेत कोणासोबत आहेत ह्याची विचारपूस करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे व त्यांना भरकटण्यापासून रोखणे हे आपल्या हातात आहे. आज एक घटना समोर आली उद्या या सारख्या आणखी घटना घडू नयेत ह्या बाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
त्या मुस्लिम माणसाची पहिली पत्नी gate no. 4 बाहेर हिला सोडवण्याकरीता थांबून होती.
2 मुस्लिम स्त्रिया ह्या मारवाडी पोरीला सासरी नांदायला घेऊन गेल्या.
Don't treat it as something like SECULARISM or else...
Be Serious and Cautious
या पोस्ट मधील काही नाव मुद्दाम डिलीट केली आहेत.
--फेसबुक वरून--
------------------------------------------------------------------
ही बातमी बर्याचजणांनी वाचली असेल. हे इतके ब्रेनवॉशिंग कसे होऊ शकते? ते सुद्धा शिकलेल्या प्रौढ मुलीबाबत? हा वशीकरणाचा प्रकार असावा का? वशीकरण खरंच असतं का? हा या मुलीचा स्वत:चा निर्णय आहे असे तिने सांगितले असले तरी असा निर्णय तिने भानावर राहुन घेतला असावा का? ताईत बांधून वशीकरण केले जाते असे म्हणतात. जोपर्यंत तो अंगावर बांधलेला असेल तोपर्यंत ती वश झालेली असते म्हणे. हे खरे असावे का? विज्ञान याबाबत काय म्हणते?

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

5 Jul 2023 - 11:23 pm | सौन्दर्य

वशीकरण वगैरे हे सगळे कमकुवत मनाचे खेळ आहेत. वशीकरणाने सर्व काही साध्य होत असते तर शस्त्रास्त्रांची गरज भासलीच नसती.

तुमच्या पोस्टवरून तरी हे प्रेमप्रकरण वाटते आहे. आता हिंदू मुली, मुस्लिम मुलांच्या प्रेमात का व कशा पडतात हा अभ्यासाचा मुद्दा आहे. तसेच ह्याच्या विरुद्धही समाजात कदाचित घडत असावे जे तेव्हढे हायलाईट केले जात नसावे.

आजपासून ५० किंवा त्याहूनही जास्त वर्षे आधी असे आंतरधर्मीय विवाह होत होते व आजही ते होत आहेत. आता हे एक मोठया प्रमाणावरचे कारस्थान आहे की समाजात घडणारी एक घटना आहे हे मी सांगू शकत नाही कारण माझा तेव्हढा ह्या विषयावरचा अभ्यास नाही.

अश्या अनेक कथा सोशल मीडिया वर येत असतात पण पोस्ट टाकणाऱ्या व्यक्ती बहुतेक वेळी अत्यंत पूर्वग्रहदूषित असल्याने संपूर्ण सत्य मांडत नाहीत. त्यामुळे प्रत्येक घटनेवर कितीपत विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे.

इथे मुलीला मुल्लाच्या वयाची, धर्माची आणि इतर पत्नींची संपूर्ण माहिती होती. गरज पडल्यास संपूर्ण समाज तिच्या मागे राहण्यासाठी तयार होता त्यामुळे दबाव वगैरे होता असे दिसत नाही. त्याशिवाय कोर्टांत तिने येऊन हे सर्व आपण स्वखुशीने करत आहोत अशी सुद्धा ग्वाही दिली आहे त्यामुळे इथे लव्ह जिहाद चा अँगल अजिबात वाटत नाही. साधा सरळ आंतरधर्मीय विवाह वाटतो.

> ताईत बांधून वशीकरण केले जाते असे म्हणतात. जोपर्यंत तो अंगावर बांधलेला असेल तोपर्यंत ती वश झालेली असते म्हणे. हे खरे असावे का?

जेंव्हा माणूस हतबल होतो तेंव्हा असल्या गोष्टींच्या नादी लागतो. त्यामुळे हिंदू समाज जर असली एक्सप्लेनेशन शोधू लागला असेल तर हि हिंदू समाजाची हार आहे.

शांतीप्रिय धर्म हा अत्यंत प्रायमल (प्राथमिक गरजांचा) आहे त्यामुळे अनेक पत्नी, गरोदर करून सोडून देणे, स्त्रीला जनावरा प्रमाणे पाहणे इत्यादी गोष्टी ह्या त्यांच्या साठी सामान्य बाब आहे. २० वर्षांची मुलगी ५० वर्षांच्या विवाहित माणसाच्या प्रेमात कशी पडू शकते हा जो प्रश्न आम्हाला पडतो तो त्यांना अजिबात पडत नाही. त्यांच्यासाठी हि अत्यंत सामान्य बाब आहे. विवाहित असून सुद्धा इतर मुलींवर आणि आपल्या वयाच्या अर्ध्या वयाच्या मुलींवर लाईन मारणे, अश्लील टिप्पणी करणे इत्यादी त्यांच्यासाठी walk in the गार्डन आहे.

शांतताप्रिय समाजांत शिक्षणाचा आधीच अभाव त्यामुळे जिम इन्स्ट्रक्टर, भाजी विक्रेते, पंचर वाले असले लोकाभिमुख धंद्यांत ह्यांचा वावर जास्त त्यामुळे साहजिक लोकांशी कसे लाघवी बोलावे, विश्वास कसा निर्माण करावा हे स्किल आहे. त्यामुळे ह्यांना मुली पटतात ह्यांत मला आश्चर्य वाटत नाही. शिक्षण आहे म्हणून हि व्यक्ती सुधारेल असे सुद्धा नाही फक्त शिक्षणाने भोवतालचे वातावरण सुधारते.

आता हिंदू मुली चांगला शिकला सवरलेला मुलगा सोडून असल्याच्या नादी लागतात हे पाहून आम्हाला वाईट वाटते पण करणार काय ? हा प्रश्न आहे. प्रौढ आणि सज्ञान मुलगी आपणहून असे निर्णय घेत असेल तर इथे काहीच आपल्या हातात नाही.

हिंदू समाजाला ज्या ह्या समस्या भेडसावत आहेत त्या हायर ऑर्डर इफेक्ट आहेत, त्या समस्यांचे कारण अत्यंत मूलभूत स्वरूपाच्या अपयशांत आहे आणि त्यावर मी विपुल लेखन विविध माध्यमांत केले आहे.

स्वातंत्र्यापासून आज पर्यंत हिंदू समाजाकडून त्यांच्या संस्था निर्माण करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. शाळा असो वा मंदिर, फक्त हिंदूंच्याच संस्था सरकारी तावडीत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे उत्तर सुद्धा महामानवांनी कृपादृष्टी दाखवून काही तरी करावे अश्या अगतिकेत होते. त्यातून मग त्यानी जे काही केले तो मास्टरस्ट्रोक अश्यां विचारसरणीत होते. समस्या आणि महामानव बदलत राहतात.

हे मी द्वेषभावनेने लिहीत नाही. समस्या त्या समाजातील लोकांची नाही. विचारसरणीची आहे. हि विचारसरणी त्या समाजाच्या अंतर्गत प्रक्रियांमुळे आणि त्यासंबंधित सरकारी कायद्यामुळे निर्माण होते. अमेरिकेत शांतताप्रिय समाजाचे वागणे वेगळे आणि इंग्लंड मध्ये वेगळे. का ? इराणी, इतर अरब हे लोक माझ्या माहिती प्रमाणे अत्यंत सुसंस्कृत असतात. त्यांच्या तुलनेत आपले देशी शांतताप्रिय लोक वेडे वाटतात. कारण काय ?
शांतताप्रिय समाजाचे लोक हे त्या विचारसरणीचे बळी आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढणे देशबंधू म्हणून आपले कर्तव्य होते. त्यांत आम्ही आधीच अपयशी ठरलो आहोत. देशाचे किमान २०% पॉप्युलेशन ह्या पद्धतीने पूर्णतः निरुपयोगी ठरले आहे. प्रजनन आणि भाजी पाला विकणे हे सोडून देशाला त्यांचा विशेष फायदा नाही. क्वचितच एखादा डॉक्टर किंवा रॉकेट वैज्ञानिक होतो.

त्याशिवाय हिंदू समाजव्यवस्थेवर काम करणाऱ्या संस्थांची देशांत वानवा आहे. एके काळी सीताराम गोयल, राम स्वरूप, अरुण शौरी इत्यादींनी पदरमोड करून ह्या विषयावर गंभीर काम केले. त्यांना कुणीही संस्थात्मक मदत केली नाही. पण आजच्या काळांत कुणी अभ्यासकाने ह्या प्रश्नांना वाहवून घेऊन जीवन अर्पण करायचे ठरवले तर त्याच्या किमान उदरनिर्वाहाची काळजी कोण घेईल ? ह्या विषयावर पुस्तके, शोध प्रबंध कोण लिहिल ?

आपली मुलगी अब्दुलच्या मागे गेली ह्यांत आपले संस्कार कमी पडले असे पालकांना वाटणे साहजिक आहे पण ह्याचा अर्थ शांतता प्रिय समाजाने पालकत्वात काय शिखर गाठले आहे काय ? बहुतेक अब्दुल हे कुठल्या तरी झोपडपट्टीत सहावे बालक म्हणून जन्माला येते. त्यांच्या मुली आपल्या राहुल च्या मागे लागल्या तर त्यांना चांगले भविष्य मिळू शकते. त्या का राहुल च्या मागे जात नाहीत ? शांतताप्रिय समाजाचे पालक हे आदर्श पालक आहेत म्हणून कि प्रसंगी त्या मुलीचा गळा घोटण्यास मागे पुढे पाहणार नाहीत म्हणून ? तेच करण्याची क्षमता आपल्या हिंदू पालकांत आली तर आम्हाला आनंद होईल का ?

मुलांचे "प्रबोधन" किंवा "संस्कार" हे अंशतः पालकांकडून येत असले तरी बहुतेक संस्कार हे शेवटी बाहेरील वातावरणातून येतात. हे वातावरण शाळा, महाविद्यालये, चित्रपट, मीडिया, इत्यादींद्वारे निर्माण होते. मुलीला घरी बसवून "अब्दुल वाईट" म्हणून सांगितले तर तिच्यावर प्रभाव पडत नाही. पण शांतता प्रिय समाज, त्यातील समस्या, धोके, बुरसटलेली मानसिकता, स्त्रियांचे त्यांतील स्थान ह्यावर इतर सर्व माध्यमांत सार्वजनिक पद्धतीने चर्चा होते नाही तो पर्यंत आपल्या मुलांचे योग्य प्रबोधन होणार नाही. आणि अशी चर्चा घडून यायला पाहिजे तर त्यासाठी हिंदू समाजाच्या मालकीच्या संस्था असणे गरजेचे आहे. जर भारतीय मंदिरे सरकारी तावडीत नसती आणि हिंदूंना स्वतःच्या युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचे स्वातंत्र्य असते तर ह्या संस्था आम्ही कधीच उभारल्या असत्या. आणि आज लव्ह जिहाद चा प्रश्न आला सुद्धा नसता.

लव्ह जिहाद हे लक्षावधी तोंड असलेल्या राक्षसाचे एक तोंड आहे. त्याला काटून राक्षस संपणार नाही. त्याला संपवायचे असेल तर त्याच्या जीव ज्या पुस्तक रुपी पोपटांत आहे त्याच पोपटावर पूर्ण शक्तीनिशी हल्ला केला पाहिजे. एकदा मूलभूत तत्वेच बुरसटलेली, मूर्खपणाची आहेत हे स्पष्ट झाले की आपोआप आ राक्षस कोलमडेल. आणि ते त्यांना सुद्धा ठाऊक आहे त्यामुळे पोपटाच्या दिशेने डोळे वर काढून सुद्धा पाहिल्यास थेट सर तन से जुदा ची खरीखुरी धमकी प्राप्त होते.

हिंदू समाजांत कुणी आहे का हे शिवधनुष्य पेलणारा ? माझ्या मते असला तरी भारत देशांत नाही. हे युद्ध भारताच्या बाहेर जास्त प्रगत आणि सुसंस्कृत देशांत होईल.

श्री साहना यांच्या प्रतिसादाबरोबर बहुतांशी सहमत.

हिंदुसमाजाच्या अधिगतीची कारणे.
१. सर्व पंथ, धर्म एक समान आहे ही शिकवण: ह्या शिकवणीत मुळातच धांदात चुकीची आहे. त्याच्यामुळे हिंदु मुले / मुलींना हिंदु धर्म आणि इतरांमधील फरक कळत नाही.
२. स्पष्टता: "शांतता प्रिय" आणि "प्रेमप्रिय" पंथात त्यांना काय करायचे आहे, त्यांची उध्दीष्टे अतिशय स्पष्ट आहेत. आणि त्यांना त्याच्याबद्दल कोणतीही लज्जा वाटत नाही. हिंदुना 'मी हिंदु आहे' म्हणायची लाज वाटते.
३. चुकीचा ईशनिंदा कायदा: भारतात "शांतता प्रिय" आणि "प्रेमप्रिय" पंथांबद्दल कोणतेही टिकात्मक विधान केल्यास त्याचे परिणाम चांगले होत नाहीत.
४: सनातनी : जन्माधारीत जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था माननारे सनातनी, परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याने आता सगळे शुद्र (सगळे छत्रपती सुध्दा) असे नालायक लोक यांच्यामुळे सगळ्या हिंदुना हिंदु धर्म आपला वाटत नाही. जितके यवनी त्रासदायक आहेत तितकेच सनातनी घाणेरडे आहेत.

सुरिया's picture

6 Jul 2023 - 1:46 pm | सुरिया

लोकाभिमुख धंद्यांत ह्यांचा वावर जास्त त्यामुळे साहजिक लोकांशी कसे लाघवी बोलावे, विश्वास कसा निर्माण करावा हे स्किल आहे.

प्रस्तुत मुलगी माहेश्वरी समाजातली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहेश्वरी समाजातही ज्या स्कीलची वानवा नाही. किंबहुना ते त्यांच्यात जन्मजात असते. रुप, पैसा, प्रतिष्ठा आदी सामाजिक निकषांवरही ते जास्तच गुण घेऊन असताना ह्या मुलीने असा निर्णय घ्यावा ह्याचा अर्थ साहनांजीचा निष्कर्ष चुकीचा आहे .

बहुतेक अब्दुल हे कुठल्या तरी झोपडपट्टीत सहावे बालक म्हणून जन्माला येते.

ह्या अब्दुलला पुढे मताधिकार मिळातो त्याचे वाईट वाटते. १९४७ मध्ये पुर्णपणे घालवुन द्यायची संधी होती. ती गमावल्याचे वाईट वाटते.

तीन वेळा प्रतिसाद उडल्या कारणाने आत्यंतिक काळ्जी 3रया प्रतिसादाला घेउनही ज्ञ सहनशक्ती संपल्यामुळे इच्छा असून. प्रतिसाद 4थया वेळेस लिहू शकत नाही माझ्या मोबाईलवर.

तो इकडे कॉपी पेस्ट करणे हा उपाय आहे.

मोबाईलवर प्रतिसाद लाॅक करता येतात का? सोप्या भाषेत कोणी शिकवेल का? मोबाईलवर लाॅक कसे करता येइल? कारण मला संगणक विशेष वापरता येत नाही

चौसष्ट कलांतील. बाकी चालू द्या.

समाजाने कुणाच्या परिवारात किती हस्तक्षेप करावा यावर काही बंधने असली पाहिजेत.
जोपर्यंत कुणी पिडीत, समाजाकडून मदतीची अपेक्षा/मागणी करत नाही तोपर्यंत समाजाने आपले हात आपापल्या कामात व्यस्त ठेवावेत आणि उगाच मॉरल पोलिसींग करायला जावू नये.
राहीला प्रश्न सज्ञान हिंदू मुलीने मुस्लिम माणसाशी विवाह करण्याचा, तर तो तिचा वैयक्तीक प्रश्न आहे.
हेच जर उलट झालं असतं तर किती लोकांनी येथे आक्षेप नोंदवला असता? अर्थात त्या बाबतीतही समाजाचा काही एक अधिकार नाहीये.

सालदार's picture

6 Jul 2023 - 10:58 am | सालदार

वशीकरण थोतांड आहे

इपित्तर इतिहासकार's picture

6 Jul 2023 - 11:04 am | इपित्तर इतिहासकार

पोरगी त्या बुआच्या प्रेमात पडली/ नादाला लागली ह्यात ती पोरगी अन् तिचे आप्तस्वकीय पाहूनच घेतील काय ते. त्यात आपण काय बोलायचं ?

दुसरे म्हणजे सामाजिकदृष्ट्या अशक्य पातळीवर काहीही (म्हणजे उच्चशिक्षित अविवाहित सवर्ण हिंदू मारवाडी महेश्वरी मुलीने मुसलमान द्विभार्यापालक माणसाच्या प्रेमात पडणे) दिसले की ते जादूटोणा, वशीकरण वगैरे बेस्ट अवेलेबल लॉजिक असते इतकेच.

बाकी :- तुम्ही पोरीचे नाव वगैरे बदलून मांडले असेल अशी अपेक्षा, मूळ नाव घेत असल्यास आपणाकडे मुलीच्या कुटुंबीय अन् दस्तुरखुद्द मुलीची परवानगी असेल असे गृहीत धरतो आहे. नसल्यास ते तसे वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर अन् घटनात्मक मूलभूत हक्काच्या विरोधात असेल इतकेच म्हणतो.

वामन देशमुख's picture

6 Jul 2023 - 11:46 am | वामन देशमुख

धाग्याला प्रतिसाद:

वशीकरण असते.

अनेक गोष्टी असतात, ज्यांचा प्रचलित, प्रस्थापित विज्ञानद्वारे पुरावा दिसत नाही. वशीकरण, हिप्नॉटिझम हे त्यांपैकी एक. ज्यांना ते शास्त्र समजते ते त्याचा उपयोग करतात.

---

अवांतर:

लव्ह जिहाद आणि काफ़िरांना१ भेडसावणाऱ्या इतर अनेक समस्या यांची मुळे काफ़िर लोक त्या समस्यांवर पुरेसा प्रभावी उपाय शोधत नाहीत यात आहेत.

भारतीय काफ़िरांपैकी सर्वात मोठा जनसमुदाय हा हिंदू आहे.

  • हिंदूंचे धार्मिक नेते - शंकराचार्य -

ते कोण आहेत, कुठे असतात, काय करतात, त्यांचं म्हणणं कोण ऐकतं... कुणाला माहित?

  • हिंदूंचे सामाजिक नेते - सरसंघचालक -

आपत्तीत मदतकार्य याव्यतिरिक्त, हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहण्यात त्यांची खरोखरच काही मदत झालीय का?
धाग्यातील मुलीने त्यांच्या डीएनए संबंधित वक्तव्यावरून प्रेरणा घेतली असेल का?

  • हिंदूंचे राजकीय नेते - पंतप्रधान -

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क हिंदूंचा आहे" असं काही त्यांनी बोललेलं कुणी ऐकलंय का?

हिंदूंची अशी परिस्थिती असताना त्यांच्या समस्यांवर इतरांनी उपाय शोधून ते अमलात आणावेत अशी अपेक्षा ते ठेवतात.

---

टीपा

१ अ.: काफ़िर हा शब्द या संदर्भात अस्थानी, अप्रस्तुत, अप्रिय वाटत असेल तर त्याला इलाज नाही. जगातील एक मोठी लोकसंख्या इतरांना जाहीरपणे काफ़िर म्हणते आणि त्यांना त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वागणूक देते. भारतीय कायद्यानुसार त्यांना तसे स्वातंत्र्य आहे.

१ ब.: गज़वा-ए-हिंद-२०४७ साध्य होईपर्यंत काफ़िरांनी स्वतःला काफ़िर म्हणवून घ्यायची सवय करून घ्यावी. नंतर ते काफिर म्हणून शिल्लक राहणार नाहीत.

* वरील हिंदूंचे नेते हे केवळ प्लेसहोल्डर म्हणून वापरलेले आहेत. त्यांच्या जागी इतर कुणीही असू शकेल.

इपित्तर इतिहासकार's picture

6 Jul 2023 - 12:14 pm | इपित्तर इतिहासकार

हिंदूंचे सामाजिक नेते - सरसंघचालक

हे कधी घोषित झालं ??

अहिरावण's picture

6 Jul 2023 - 2:58 pm | अहिरावण

>>>हिंदूंचे धार्मिक नेते - शंकराचार्य -
>>>हिंदूंचे सामाजिक नेते - सरसंघचालक -
>>.हिंदूंचे राजकीय नेते - पंतप्रधान -

कधी ठरल?

बाकी लेखबद्द्ल

अहिरावण's picture

6 Jul 2023 - 2:59 pm | अहिरावण

dfs

अनेक गोष्टी असतात, ज्यांचा प्रचलित, प्रस्थापित विज्ञानद्वारे पुरावा दिसत नाही. वशीकरण, हिप्नॉटिझम हे त्यांपैकी एक. ज्यांना ते शास्त्र समजते ते त्याचा उपयोग करतात.

"वैज्ञानिक" पुरावा म्हणजे वैज्ञानिक कारणीमिमांसा म्हणायचे असेल तर ते बाजूला ठेवा. ते रिलेव्हंट नाही. तर, कोणी आजपर्यंत वशीकरण करून दाखवले आहे का ? पुन्हा करून दाखवू शकतात का ? किमान टेस्ट करण्याजोगा तरी दावा आहे का ? का ऐकले आणि विश्वास बसला ?!

जेम्स रॅन्डी फाऊंडेशन ने एक मिलियन अमेरिकन डॉलर चे चॅलेंज १९६४ पासून ठेवले आहे. कोणताही paranormal दावा घेऊन या, आणि त्या दाव्याच्या तपासणीसाठी रचलेले प्रयोग पूर्ण करून दाखवा. आजवर एकदाही कोणालाही जमले नाही.

वामन देशमुख's picture

7 Jul 2023 - 8:55 am | वामन देशमुख

वरील हिंदूंचे नेते हे केवळ प्लेसहोल्डर म्हणून वापरलेले आहेत. त्यांच्या जागी इतर कुणीही असू शकेल.

👆

कॉमी's picture

6 Jul 2023 - 3:56 pm | कॉमी

काहीही !

त्या मुलीच्या वागणुकीचे कारण शोधण्यात "वशीकरण" हे पर्यायी उत्तर असण्यासाठी "वशीकरण" असू शकते हे निरिक्षणातून सिध्द व्हायला हवे. झाले आहे का ?

उगाच काहीही बंडल व्हॉट्सॲप फॉर्वरड देऊन त्यावर तितकाच बंडल प्रश्न विचारून धागा काढला आहे.

उपयोजक's picture

6 Jul 2023 - 4:03 pm | उपयोजक

वशीकरण नसू शकते हे निरिक्षणातून सिद्ध झालंय का?

उगाच काहीही बंडल कम्युनिस्ट छापाचा प्रतिसाद देऊन कुठलातरी त्रागा मिपावर काढला आहे.

सुरिया's picture

6 Jul 2023 - 4:07 pm | सुरिया

कुठलातरी त्रागा मिपावर काढला आहे.

धागाच त्या टाईपचा आहे म्हणल्यावर काय होणार?

बिनडोक प्रतिसाद. वशीकरण हा पर्याय आहे असे सिद्ध करणे पर्याय पुढे करणाऱ्यांची जबाबदारी आहे. तुमचा भमता पर्याय पुढे करून "मी चूक कसा हे सिद्ध करा" म्हणजे अतार्किक पणाचा कळस झाला. येवढे तार्किक विचारांवर धागे बिगे काढले काय उपयोग झालेला दिसत नाही.

चला मी पण. एक पर्याय देतो. त्या मुलीला स्वप्नात साक्षात [<हव्या त्या शक्तीचे/देवाचे/दानवाचे/पात्राचे नाव घाला>]ने दर्शन दिले आणि त्या मुलाशी लग्न कर, तुम्हा दोघांवर धनसंपत्तीचा वर्षाव करेन असे सांगितले. मुलीने ते ऐकले व त्याप्रमाणे केले.

सिद्ध करा बघू मी कसा चूक आहे ते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, सिद्ध तर तुम्ही करायचे आहे मी कसा चुकीचा आहे ते. नाहीतर मी दिलेल्या पर्यायाचा सुद्धा गंभीरतेने विचार होणे गरजेचे आहे.

सुरिया's picture

6 Jul 2023 - 4:04 pm | सुरिया

उगाच काहीही बंडल व्हॉट्सॲप फॉर्वरड देऊन त्यावर तितकाच बंडल प्रश्न विचारून धागा काढला आहे.

कसंय ना, ''त्यांनाच" "आपल्या" पोरी कशा पटतात ह्या साध्या प्रश्नाचे उत्तर तितके साधे नाहीये ना म्हणून.
कदाचित असा प्रश्न खुल्लमखुल्ला विचारायचे डेरींग नाही हेही एक उत्तर असु शकेल ब्वा. ;)

उपयोजक's picture

6 Jul 2023 - 5:32 pm | उपयोजक

त्यांनाच

म्हणजे कुणाला हो? थेट 'त्यांचं' नाव घ्यायचं डेअरिंग नाहीये का? ;)

कंजूस's picture

6 Jul 2023 - 4:23 pm | कंजूस

पोरगी त्या बुआच्या प्रेमात पडली/ नादाला लागली ह्यात ती पोरगी अन् तिचे आप्तस्वकीय पाहूनच घेतील काय ते. त्यात आपण काय बोलायचं ?

कपिलमुनी's picture

6 Jul 2023 - 4:36 pm | कपिलमुनी

बातमी ची मुख्य प्रसार माध्यमातील लिंक द्या.

उदा - मुख्य पेपर किंवा न्यूज चॅनल

उनाड's picture

6 Jul 2023 - 7:03 pm | उनाड

लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फॅंटसी आहे हे माझे गृहितक पुन्हा एकदा सिद्ध झाले !

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2023 - 8:11 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/islam/arabic-symbol-hand-of-god-smiley-emoticon.gif

इपित्तर इतिहासकार's picture

7 Jul 2023 - 9:08 am | इपित्तर इतिहासकार

वशीकरण खरंच असतं का?

नाही

सुबोध खरे's picture

8 Jul 2023 - 10:15 am | सुबोध खरे

सोळावं वरीस धोक्याचं हे का म्हणतात.

मुलगी वयात येते तेंव्हा तिच्या हृदयाची मेंदूवर पूर्ण पकड येते यामुळे असंख्य वेळेस सारासार विचार करण्याची शक्ती धूसर होते अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकेन.

१ ) हि ३०-३५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. स्थळ संभाजी नगर. तेथे एम बी बी एस करत असलेली मुलगी तेथल्याचं पानवाल्याबरोबर पळून गेली आणि लग्न केले. यात प्रेम वगैरे असतं हे सिनेमाचे तत्वज्ञान ठीक आहे.

२) काही महिन्यापूर्वी माझ्याकडे एक १९ आठवडे गरोदर असलेली मुलगी आली होती. तिचॆ आई अक्षरशः ओक्सबोकसी रडत होती. या मुलीला एका ३५ वर्षाच्या माणसाने फूस लावली होती. या माणसाचे लग्न झालेले होते आणि दोन मुले होती. मी आईला विचारले कि इतके दिवस काय करत होता? त्या वेळेस आईने सांगितले कि दीड महिन्यापासून आम्ही तिच्या मागे लागलो आहोत गर्भपात करून घे म्हणून तिला कोंडून ठेवलं मारहाण पण केली पण मुलगी मुळीच तयार होत नव्हती कारण तो माणूस हिला सांगत होता कि गर्भपात करायची काही गरज नाही मी तुला आणि मुलाला पोसेन.

सुदैवाने मुलगी आता तयार झाली आहे डॉक्टर तुम्ही काही तरी करा. अर्थात मी तिला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे (गर्भपातासाठी) पाठवले.

या दोन्ही आणि अशा अनेक परिस्थितीत धर्माचा कोणताही प्रभाव नव्हता. पण हे वयच विचित्र असते.

आता धर्माकडे वळल्यास -- मुसलमान मुली शिकतच नाहीत त्यामुळे मुसलमान मुलगी आणि इतर धर्मीय अशी स्थिती अभावानेच आढळून येते याशिवाय आपण धर्माबाहेर लग्न केले तर आपल्याला जबर मारहाण पासून जीव घेण्यापर्यंत काहीही शिक्षा होऊ शकते हे लहानपणापासून बिंबवले जाते. (इस्लाम सोडून परधर्मात गेल्यास त्या धर्मात देहदंडाची तरतूद आहे.) यामुळे मुसलमान मुलगी नि इतर धर्मीय मुलगा अशी स्थिती फार कमी दिसते.

याउलट हिंदू, बौद्ध किंवा ख्रिश्चन धर्म हे तितके कट्टर नाहीत त्यामुळे मुलींना शिक्षणाच्या जास्त संधी उपलब्ध आहेत. यामुळे मुसलमान मुलगा आणि इतर धर्मीय मुलगी हि स्थिती उलट स्थितीच्या तुलनेत ९:१ अशी दिसून येते.

यातून इतर धर्मीय मुलीशी लग्न करून तिला मुसलमान करणे हे पवित्र धार्मिक कर्तव्य समजले जाते यामुळे या कृत्यास त्या समाजात प्रोत्साहनच मिळते.

याला वहाबी आणि कट्टरपंथीयांनी अधिकच गौरवपूर्ण (glorify) केल्यामुळे त्याला लव्ह जिहादचे स्वरूप मिळाले आहे.

दुर्दैवाने जर मुलीने इस्लाम कबुल केला आणि इस्लामी कायद्याप्रमाणे लग्न केले तर तिला बहुसंख्य कायद्यांचे संरक्षण मिळत नाही. काही दिवसांनी नवऱ्याने तलाक देऊन सोडून दिले तर तिला धड पोटगी मिळण्याची व्यवस्था नाही कि मुलाच्या पालन पोषणासाठी काही मिळण्याची शक्यता नसते.

(अशी स्थिती बॉलिवूड किंवा श्रीमंत वर्गात दिसत नाही कारण पैसा हे न्याय मिळण्याचे आद्य साधन आहे. त्यामुळे या वर्गाला उच्च वैचारिक भूमिका घेणे सोपे असते)

समान नागरी कायदा आला तर इतर पीडित मुसलमान स्त्रियांना सुद्धा हे हक्क प्राप्त होतील.

परंतु मुल्ला मौलवींच्या पगड्याखाली असलेल्या मुसलमान पुरुषांना स्वार्थासाठी हे नकोच आहे. आणि याला तथाकथित पुरोगामी विरोध करतात यामुळेच घटनेतील मूलभूत तत्व असूनही आज समान नागरी कायदा होऊ शकलेला नाही.

उपयोजक's picture

12 Jul 2023 - 10:23 pm | उपयोजक

@सुबोध खरे

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2023 - 12:59 pm | चौथा कोनाडा

वशीकरण खरंच असतं का?
असू शकेल. स्वतःला कधी अनुभव आला नाही, मित्र, नातेअवाईकांमध्ये असा प्रकार ऐकला नाही / पाहिला नाही !

संमोहन / मेंदुचा ताबा घेणे हे मात्र नक्कीच असू शकेल !

संमोहन सुद्धा छद्म विज्ञानच आहे.