'तिची' उन्हाळी शिकार !

कुमार१'s picture
कुमार१ in मिपा कलादालन
3 May 2023 - 8:39 pm

मिपाच्या तांत्रिक पुनरुज्जीवनादरम्यान माझा हा पूर्वप्रकाशित धागा उडाला आहे. प्रशासकांच्या सूचनेनुसार तो पुन्हा प्रकाशित करतोय.
...................................................................................................................................
उन्हाची काहीली वाढते आहे आणि तापमान दिवसागणिक चढते आहे..

आपली घरे बाहेरून तापल्यानंतर आपल्याला नको असणारी ‘ती’ घरात कुठल्या ना कुठल्या फटीतून शिरकाव करतेच..
‘तिला’ पाहिले रे पाहिले की,

“इss .. नको, शी !”
असा आवाज कुटुंबातून येणारच !

तर ही आपली पाहुणी ! बघा इथे कशी तिची शिकार करते आहे आणि आपल्याला नको असलेल्या एका जीवाचा खात्मा करणार आहे…..
..
..
सरपटणारी 'ती' आवडत नसेल तर इथेच थांबा !
..
..
ok

((एका उन्हाळी शिबिराला गेलो असताना मोबाईल कॅमेऱ्याने टिपलेला हा क्षण).)