ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ५)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
27 Jun 2022 - 10:42 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको.

काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत.

२०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे.

उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते.

रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली.

विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Jun 2022 - 12:18 pm | विजुभाऊ

बंड अयशस्वी झाले तर राऊत हे सेनेचे सर्वेसर्वा बनतील.
आणि काळाच्या ओघात लुप्त होतील. राउतांनी आजवर कधीच जनमताला सामोरे गेलेले नाहीत. निवडणूक म्हणजे अग्रलेख लिहीणे नव्हे.
आदित्य ठाकरे यांच्या बद्दल काय बोलावे. सेनेत जमिनीशी संपर्क असणारे फार कमी लोक उरलेत. नवे कोणी जोडले गेले तरच काही आशा असतील

मोहम्मद झुबेरला अटक केली. भंपकपणा.

नुपूर शर्मा बद्दलचा सूड असणार.

प्रदीप's picture

28 Jun 2022 - 10:21 am | प्रदीप

ज्या एका केसवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे व अटक झालेली आहे, ती थोडीशी फ्रिव्हलस आहे, असे वाटते.

नुपूर शर्माबद्दलचा सूड वगैरेबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण ह्यापूर्वी ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी*) हिंदू देवदेवतांविषयी गलिच्छ टिपण्णी सोशल मीडियावरून केली आहे. त्याने अलिकडेच त्याचे ते सर्व ट्वीट्स काढून टाकले, पण अर्थात अनेकांनी त्याचे समयोचित स्क्रीन्शॉट्स घेऊन ठेवलेले आहेत. त्यांतील एका किंवा अनेकांविषयी त्याला कायद्याच्या दृष्टीने जबाबदार धरता आले असते. पण मोदी सरकार (आणि/ अथवा त्यांच्यासाठी काम करणारे दिल्ली-बाबू) नेहमीच उशीरा जागे होतात.

* ह्यांतील एक म्हणजे साबा नक्वी. आपली चूक झाल्याचे लक्षांत येताच तिने 'आता झाले गेले विसरूयांत, व पुढे जाऊयांत' वगैरे मखलाशी केली. तरीही तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला (हुश्श). मग तिने कुठल्यातरी कोपर्‍यातल्या स्त्री-पत्रकार- संघटनेतर्फे, एका स्त्री सदस्यावर अन्याय होतो आहे, अशी बोंब ठोकली. (त्या संघटनेचे एक पत्रक सोशल मीडियावर प्रस्तृत केले. नंतर अनेक सदस्यांनी, ह्या पत्रकावर आपण सही केलीच नव्हती, असे पुढे येऊन सांगितले).

ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी*) हिंदू देवदेवतांविषयी गलिच्छ टिपण्णी सोशल

मी काही स्क्रीनशॉट्स पहिले त्यात कसलीही गलिच्छ टिप्पणी झुबेरने केली नाहीये. त्याने पूना ओकीयन पोष्टींची थट्टा उडवली आहे.

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 11:15 am | सुबोध खरे

मी काही स्क्रीनशॉट्स पहिले त्यात नबाब मलिकांनी कोणताही गुन्हा केल्याचे दिसले नाही.

उगाचच त्यांना तुरुंगात टाकले आहे.

कॉमी's picture

28 Jun 2022 - 12:11 pm | कॉमी

????

नवाब मालिकांना ट्विटरवर किंवा अन्य सोशल माध्यमांवर लिहिण्यासाठी अटक झालीये काय ? का उगाच काहीही बोलायचे म्हणून बोलताय ?

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 12:15 pm | सुबोध खरे

तुम्ही पाहिलेल्या स्क्रीनशॉट्स मध्ये काही आक्षेपार्ह नाही म्हणून इतर स्क्रीनशॉट्स मध्ये काही आक्षेपार्ह नसू शकतं का?

इतर स्क्रीनशॉट असले तर दाखवा कि, कोणी थांबवलं आहे काय ?

डँबिस००७'s picture

28 Jun 2022 - 7:24 pm | डँबिस००७

म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स "बघणार" , " तपासणार ", मग सरकारने त्याच्या विरुद्द कारवाई करावी अस काही आहे का ?

Zubair Screenshots

डँबिस००७'s picture

28 Jun 2022 - 7:30 pm | डँबिस००७

"तिस्ता सिटलवाडला" अटक झाल्याने "महमुबा मुफ्तीच्या " पोटात सुद्धा खड्डा पडला. मिडीयात येऊन बरीच कळवळली !!

डांबिस आणि बाहुबली, थोडा अकलेचा भाग असेल तर वाचा. प्रदीप वर म्हणतात झुबेरने गलिच्छ टिप्पणी केलेले स्क्रीनशॉट फिरत आहेत. त्यात डॉकटर खऱ्यांनी मध्ये उडी मारली. आणि मग तुम्ही दोघे तडमडलात.

आणि होय. सरकारने सुद्धा नक्की काय बोलला म्हणून कारवाई केली सांगायला पाहिजेच.

श्रीगुरुजी's picture

29 Jun 2022 - 9:58 am | श्रीगुरुजी

याविषयी काही माहिती -

https://www.google.com/amp/s/www.firstpost.com/india/explained-the-two-c...

डँबिस००७'s picture

28 Jun 2022 - 7:25 pm | डँबिस००७

म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स "बघणार" , " तपासणार ", मग सरकारने त्याच्या विरुद्द कारवाई करावी अस काही आहे का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Jun 2022 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली

मी काही स्क्रीनशॉट्स पहिले त्यात कसलीही गलिच्छ टिप्पणी झुबेरने केली नाहीये. त्याने पूना ओकीयन पोष्टींची थट्टा उडवली आहे.
काॅमी ह्यांनी पाहीलेल्या ”काही” स्क्रिनशाॅट मध्ये त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. हे लक्षात घेऊन भारत सरकारने त्वरित झुबेरला सोडावे. तसेच त्याला अटक करनार्या पोलीस अधीकार्यांना सज्जड दम भरावा. ह्यापुढे कुणालाही अटक करायची असल्यास काॅमी ह्यांच्या कडून स्क्रिनशाॅट तपासून घ्यावे. झूबेर ह्याने नुपूर शर्मा प्रकरण सुरू केले असा आरोप त्याच्यावर आहे पण काॅमी ह्यांना तो भंपकपणा वाटत असल्याने युपी सरकारने त्वरीत दंगल करनार्यांना सोडून द्यावे. ज्या कुणाचे घर बूलडोझर लावून योगींनी तोडलेय ते घर त्वरीत सरकारी खर्चाने (अतिक्रमीत जागेतच) बांधून द्यावे व घराच्या ऊद्घाटनाला काॅमी ह्यांना आमंत्रीत करावे. येण्याजाण्यासाठी चार्टर्ड प्लेन तसेच हजार रूपये दिवसाला भत्ता हा देखील सरकारी खर्चातूनच करन्यात यावा.

बाहुबली, तुम्हाला ब्रेनडेड असल्यासारखं बोलायला आवडतं पण धड वाचायला पण येत नाही म्हणजे अवघड आहे. प्रदीप म्हणाले की त्यांनी झुबेर "गलिच्छ" बोलताना स्क्रीनशॉट पहिले आहेत. माझा प्रतिसाद त्यांना होता. उगाच तुम्ही बाष्कळ प्रतिसाद लिहीत आहात.

बरं उद्या चुकून फडणवीस मामु झाले की तुम्हाला उचलायला पाहिजे त्यांनी पण. माझ्या कडे स्क्रीनशॉट आहेत मिलॉर्ड, असे म्हणत.

निनाद's picture

29 Jun 2022 - 5:38 am | निनाद

मोहम्मद झुबेरला अटक केली.

खूप छान बातमी आहे. पण खूप उशीर केला गेला आहे.
आता अय्युब आणि इतर ग्यांगला पण घ्या आत. ते पण असेच विष पसरवतात.
लक्षात ठेवा यानेच नूपोर प्रकरणात आगीत तेल ओतले. काही लोक भडकले. पण उदयपूरच्या कन्हैय्या लाल नावाच्या शिंप्याने म्हंटले की तो नूपूरच्या बाजूने आहे.
यावर प्रतिक्रिया म्हणून या शिंप्याचा खून केला गेला आहे.
त्या शिंप्याला विचार स्वातंत्र्य नव्हते!! पण तेच स्वातंत्र्य जुबे ला असते!!!

खरे तर या घाणीला मनुष्यवधाच्या खूनात पण आरोपी केले गेले पाहिजे.

अविश्वासाची नोटीसीची तारिख आणी माध्यम ,हे कळीचा मुद्दा ठरतील असे वाटते,

विधानसभेचे उपसभापती च्या विरोधात अविश्वासाची नोटीस २१ जूनला दिली आहे ,आणी मविआच्या वकीलांनी सांगितले की ते अधिकृत माध्यमातून ( संबधित पात्र व्यक्ति कडुन पत्र / संबधित व्यक्तिच्या अधिकृत इ मेल ) आलेले नाही.

विधानसभेच्या उपसभापतीना सुप्रीम कोर्टात ह्या वर उत्तर द्यावे लागेल .

नि३.

कंजूस's picture

28 Jun 2022 - 6:15 pm | कंजूस

अधिकृत माध्यमातून ( संबधित पात्र व्यक्ति कडुन पत्र / संबधित व्यक्तिच्या अधिकृत इ मेल ) आलेले नाही.
हे ठरवण्यासाठी काय काय तपासले हे विचारलं आहे.

शाम भागवत's picture

28 Jun 2022 - 6:55 pm | शाम भागवत

माझ्या समजूतीप्रमाणे दोन प्रस्ताव आलेले आहेत.
पहिला प्रस्ताव दोन भाजप समर्थक आमदारांकडून आलेला आहे. यात कोणतीही तांत्रीक त्रूटी नाही आहे.
दुसरा शिंदे गटातील काही आमदारांकडून आलेला आहे. मात्र हा पाठवताना वकिलाने पाठवल्याने तो इमेल पत्ता वकिलाचा आहे. त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव अधिकृत नाही अशी तांत्रीक त्रूटी काढण्यात आलेली आहे.
खरे खोटे उपसभापतीच जाणे.

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 10:27 am | सुबोध खरे

११ जुलै च्या आत अविश्वासाचा ठराव आला आणि हे सरकार पडलं तर हि संपूर्ण केस निरर्थक आणि अनावश्यक (infructuous) होऊन जाईल.

तेंव्हा पुढच्या आठवड्यात काय होतंय ते पहा

नि३सोलपुरकर's picture

28 Jun 2022 - 10:35 am | नि३सोलपुरकर

हीच इच्छा ( सुज्ञ मतदारांची) आहे .

नि३

रात्रीचे चांदणे's picture

28 Jun 2022 - 11:41 am | रात्रीचे चांदणे

सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होऊ शकतो का? काही तज्ज्ञांच्या मते नाही होऊ शकत कारण काही आमदारांवरची बडतर्फीच्या केस वर stay दिला आहे म्हणून.

समजा आमदार एखाद्या पक्ष मिटींगला हजर नाही राहिले म्हणूण त्यांची आमदारकी काढण्याचा पक्षाला अधिकार आहे का? म्हणजे सेनेनं नक्की कोणतं कारण देऊन त्या १६ आमदारांवर कारवाई करायला सांगितले आहे? असा अधिकार खरंच पक्षा कडे असेल तर बाकीचे आमदार घाबरून परत सेनेकडे येण्याची शक्यता आहे.
कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

बाकीचे आमदार घाबरून परत सेनेकडे येण्याची शक्यता आहे.

मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे महाभकास आधाडी सरकार पडले तर चांगले आणि पडले नाही तर अजून चांगले. सगळे आमदार जरी स्वगृही परत गेले तरी या प्रकारामुळे निर्माण झालेली कटुता जाऊन मने थोडीच सांधली जाणार आहेत? १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेला भाजपत परतल्यावर सगळे काही आलबेल थोडीच राहिले होते?तीच- खरं तर त्यापेक्षा कितीतरी भयंकर परिस्थिती शिवसेनेत निर्माण होईल. सगळे आमदार परत आले तरी दोन गट एकमेकांकडे संशयानेच बघणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. विधानसभेत मतदान करायचे अनेक प्रसंग येतात. अशा प्रत्येक वेळी ठाकरेंच्या मनात धाकधूक राहायला हवी की आता काय होणार. त्यातून ही सुंदोपसुंदी अजून वाढेल. त्यात काका पडद्याआडून सूत्रे हलवतील ती वेगळीच. अशा परिस्थितीत ठाकरेंचे सरकार शेतात लावलेल्या बुजगावण्यासारखे होईल.

असे झाल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अजून फायदा होईल. एक तर त्यावेळी महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागा लढता आल्या तर मागच्या वेळेस मिळालेल्या २३ पेक्षा नक्कीच जास्त जागा मिळतील. दुसरे म्हणजे सगळ्या देशातील मतदारांपुढे केवळ मोदीविरोध या अजेंड्यावर कोणत्यातरी कडबोळ्याला मत दिले तर काय होते हे महाराष्ट्रातील उदाहरण आठवणीत ताजे हवे म्हणून अन्यथा मोदींना ज्यांनी मत दिले नसते ते लोकही मत देतील ही शक्यता आहे. सरकार आताच पडले तर तोपर्यंत राज्यात चाललेला सगळा सावळागोंधळ लोक विसरूनही जातील.

तेव्हा काहीही झाले तरी- सरकार पडले तरी किंवा तगले तरी मी पेढे आणणार :)

रात्रीचे चांदणे's picture

28 Jun 2022 - 2:16 pm | रात्रीचे चांदणे

काहीही झालं तरी सेनच नुकसानच होणार आहे ह्या बाबतीत सहमत.

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 11:55 am | सुबोध खरे

सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होऊ शकतो का

होय
अविश्वासाचा ठराव येऊ शकतो

कारण शिवसेनेच्या वकिलांनी त्यावर स्टे देण्याची विनंती केली ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

SC declines to pass order on plea for no floor test in Maharashtra till July 11
https://timesofindia.indiatimes.com/india/sc-declines-to-pass-order-on-p...

कारण असा कोणताही आदेश ते राज्यपालांना देऊ शकत नाहीत.

विधानसभेत ( किंवा लोकसभेत) कोणता ठराव आणायचा यावर न्यायालय बंदी आणू शकत नाही

रात्रीचे चांदणे's picture

28 Jun 2022 - 2:17 pm | रात्रीचे चांदणे

धन्यवाद डॉक्टर साहेब

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 12:02 pm | सुबोध खरे

To a specific query from the bench on why they had not approached the High Court under Article 226 of the Constitution, Kaul referred the bench to statements by Shiv Sena leaders like Sanjay Raut and said the atmosphere in Mumbai is not conducive to their pursuing legal remedies there.

Pointing out that the Shinde camp with 39 MLAs was the majority Shiv Sena, Kaul said “a minority of a legislature party today… is actually subverting the entire state machinery. Our houses are being burnt, we are being physically threatened… a party spokesperson says 40 bodies will arrive from Gauhati, they will be slaughtered like bulls and you wait and see what will happen in days to come, how they will be treated”.
राऊतांनी बेफाट वक्तव्य करून सेल्फ गोल केला तो असा

“The atmosphere and the environment is not at all conducive for us to legitimately pursue our legal and constitutional rights in Bombay at the moment because that is the kind of atmosphere which has been vilified…” he said.

https://indianexpress.com/article/india/relief-rebel-shiv-sena-mlas-supr...

शाम भागवत's picture

28 Jun 2022 - 12:34 pm | शाम भागवत

गुप्त मतदान पध्दतीने विधानसभेच्या सभापतीची निवड पुरेशी आहे. बाकी काही करायला नको.

शेणा आणि काँग्रेस दोन्ही माफिया मॉडेल वर चालतात. इथे डॉन हा सर्वांत शक्तिशाली म्हणून स्वतःला प्रोजेक्त करतो. ह्याने काहीही केले तरी चालते कुणीच त्याला जाब विचारू शकत नाही. त्याच वेळी दोन हा "कमकुवत" दिसला तर जास्त काळ टिकत नाही. त्याची गच्छंती होतेच. डॉन ची पावर त्याच्या इतरांना भीती घालण्यावर अवलंबून असते.

गॉडफादर चित्रपटांत डॉन कोरेलियॉन आपल्या पुत्राला सांगतात कि माझ्या मृत्यूनंतर तुला सपोर्ट देण्यासाठी जी व्यक्ती तुला जेवणाला बोलावेल तीच व्यक्ती तुझा गळा घोटण्याचा प्रयत्न करील. पुढे तसेच होते. फवाऱ्यानी छोट्या डॉन ला प्रीतिभोजन दिले आणि सपोर्ट दिला. आता त्यांनीच हे रेड वेडिंग प्लॅन सुद्धा केले असेल.

शेणेतील आताची बंडखोरी मात्र ह्या माफिया घराण्याचा अंत आहे. ३०+ आमदारांनी एखाद्या दुय्यम नेत्याच्या नेतृत्वाखाली फक्त महा वसुली आघाडीला आव्हान नाही दिले आहे तर माफ़ीया फॅमिलीचा डॉन ह्याला आव्हान दिले आहे. डॉन हा वाघ नसून वाघाचे कातडे घातलेला कोल्हा आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे.

डॉन ह्यातून एकाच पद्धतीने सुखरूप बाहेर येऊ शकतात ते म्हणजे असे काही तरी करणे कि ह्या सर्व बंडखोरांना अतिशय मोठी आणि सार्वजनिक पद्धतीची अद्दल घडेल. तसे झाले तर आपोपाप राहिल्याना जरब बसेल आणि सामान्य कार्यकर्त्याला कोण डॉन आहे हे समजेल. वाचा ब्रहस्पती वरून मूर्ख असले तरी त्यांना हे समजते म्हणूनच ते "मढी, शवे, बापाची औलाद" असल्या हिंसक धमक्या देत आहेत. हे आमदार उद्या महाराष्ट्रांत आले तरी त्यातील काहींना प्रत्यक्ष हिंसेला सामोरे जावे लागेलच. बंडखोरांना सुद्धा हे चांगलेच ठाऊक असल्याने ते आसाम मध्ये जाऊन बसले आहेत. जो पर्यंत हि मंडळी तिथे आहे तो पर्यंत डॉन फक्त भुंकू शकतो पण चावा घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे दिवसेंदिवस डॉन चे दौर्बल्य पुढे येत आहे.

माझ्या मते सरकार टिकेल कि नाही, भाजप काय करत आहे, हे सर्व मुद्दे नगण्य आहेत.

डॉन ची शेनेवरील सत्ता संपली. आता अंधारात अनेक खंजर बाहेर येतील. डॉन आता किती काळ टिकतो हे पाहावे लागेल.

विजुभाऊ's picture

28 Jun 2022 - 3:37 pm | विजुभाऊ

मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे समजतात का तेच समजत नाही
ते आमदारांना भावनीक आवाहन करताहेत. तुम्ही इकडे या , मी कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला सांगतो. समोर येवून बोला आपण मार्ग काढु. मी आपल्या भावनांचा आदर करतो.

आणि इकडे संजय राऊत आणि आदित्य घाण गेली , मढी येतील , रेडे , डुक्करे बळी जातील वगैरे बोलत आहेत.
उठा मात्र त्यांच्या या बोलण्याला कोणताच आक्षेप घेत नाहीत.
हे सर्वसामान्य लोकांना दिसतेय. पण ऊ.ठा. ना दिसत नाही हे खरे वाटत नाही

क्लिंटन's picture

28 Jun 2022 - 3:41 pm | क्लिंटन

दुसरे म्हणजे आमदार स्वखुषीने गुवाहाटीला गेले नाहीत, त्यांना जबरदस्तीने तिथे नेले गेले आहे असे आरोपही होत आहेत. एकीकडे म्हणायचे आमदारांना जबरदस्तीने त्यांची इच्छा नसताना नेले आणि दुसरीकडे त्यांनाच डुक्कर, घाण, कामाख्या देवीला बळी द्यायला पाठवलेले रेडे वगैरे म्हणायचे याची संगती कशी लावायची? जर त्यांना जबरदस्तीने नेले असेल तर मग 'आमच्या लोकांना जबरदस्तीने तिथे नेले' म्हणून हाकाटी व्हायला हवी ना? परत त्यांनाच शिव्या घालण्यात काय हशील आहे?

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2022 - 4:10 pm | श्रीगुरुजी

तडजोड करण्यासाठी उठांनी अजून एक फट उघडी ठेवली आहे. परंतु ही फट बंद करण्याचा राऊत जिवापाड प्रयत्न करीत आहेत. राऊतच्या प्रयत्नांना अपरिपक्व आदित्यच्या चिथावणीखोर वक्तव्यांनी मदत होत आहे.

गुड कॉप बॅड कॉप स्ट्रॅटेजी !

उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन!
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-political-crisis-live-u...

वामन देशमुख's picture

28 Jun 2022 - 5:33 pm | वामन देशमुख

आता हा एक नवीन अवतार!
देवा, वाचव रे!

श्रीगुरुजी's picture

28 Jun 2022 - 5:47 pm | श्रीगुरुजी

कोणाचा

वामन देशमुख's picture

28 Jun 2022 - 6:09 pm | वामन देशमुख

बोलबच्चनचा!

😉

तेच तर त्यांचे म्हणणे आहे.

गणेशा's picture

28 Jun 2022 - 7:12 pm | गणेशा

वरची बरीच मते वाचली..
त्यात सदैव भाजप भक्तीत वाहिलेले लोक उद्धव, राऊत, सेना कशी संपेल हेच बोलत आहेत..

पण शिंदे गटा मुळे भाजपाची सत्ता स्थापन झाली तर भाजपाची आणि फडणवीस यांची कपटी नितीच या मागे होती असे समजुन समाजात जी थोडीफार राहिली ती पण जाईल..

आणि जर भाजपा चे सरकार नाही बनले, तर मुख्यमंत्री पदासाठी सतत कायम भुकेला असलेला माणुस मागील ३ दिवसासारखाच तोंडावर पडेल..

सत्तेच्या हव्यासासाठी भाजप कायम कुठल्याही थराला जाते हे देशात नविन नाही..
अलीकडचेच कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश हि त्याचीच उदाहरणं आहेत..
लोकं फोडायची आणि आपले सरकार बनवायचे...

कुठे ते अटलबिहारी वाजपेयी आणि कुठे हि गुंडगिरी..
आणि यांना दुसऱ्यांच्यात गुंड दिसतात...

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 7:51 pm | सुबोध खरे

@ गणेशा

जाऊ द्या हो

मुळात युतीसाठी मते दिलेली असताना भाजप ला बाजूला टाकून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी श्री उद्धव ठाकरे यांनी किती तडजोडी केल्या आहेत ते जनतेला माहिती आहे.

एवढे मोठे मोठे शब्द वापरून वस्तुस्थिती बदलणार नाहीये.

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या घरावर दगडफेक करणारे त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणारे भाजपचेच भक्त आहेत का?

कि
या आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही हि धमकी देणारे भाजपचे गुंड आहेत.

या आमदारांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण संरक्षण देणे (हे संरक्षण कुणापासून आहे? भाजपच्या गुंडांकडून आहे का?) याची महाराष्ट्र सरकारला जबाबदारी घेण्याचा हुकूम सर्वोच्च न्यायालयाने का दिला आहे?

सर्वोच्च न्यायालय सुद्धा भाजपाला विकले गेले आहे असे एकदाचे सांगून टाका म्हणजे वाचून आमचे डोळे निवतील

शिंदे ह्यांनी देशातील सर्वात मोठी शक्ती त्यांच्या मागे असल्याचे सांगितले होते मग सुप्रीम कोर्टाची, आणि तिथे ठेवलेल्या जजेस ची काय हिम्मत?
रात्री याचिका दाखल तेही सुट्टीच्या दिवशी रविवारी पण सोमवारी सुनावणी ला घेतली गेली पण

बाकी रस्त्यावर उतरणारे पण गुंड..
आणि पडद्यामागून सूत्रे हलवणारे पण पांढरपेशे गुंडच..

आणि सकाळी उठून तडजोड करणाऱ्यांना सगळ्यांच्या तडजोडीच वाटतात..
मग काय पाच वर्षे खिशात राजिनामे घेऊन फडणवीस ची आरतीच करायला पाहिजे होती का?

प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे..
पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही..

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Jun 2022 - 12:08 am | अमरेंद्र बाहुबली

+१

कंजूस's picture

29 Jun 2022 - 5:27 am | कंजूस

प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे..
पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही..

अगदी.

Bhakti's picture

29 Jun 2022 - 9:10 am | Bhakti

प्रथमता हिंदुत्व फलाना हे सगळे सर्व पक्षांच ढोंग आहे..
पण आपण आपल्याला पाहिजे तो योग्य म्हणतो.. आपली तरी अशी काय लाचारी असेल माहित नाही..

सुबोध खरे's picture

29 Jun 2022 - 10:03 am | सुबोध खरे

द्वेषांध झालं कि असं होतं.

विरोधी आमदारांना नोटीस शनिवारी संध्याकाळी दिली आणि सोमवारी साडेपाच पर्यंत त्या आमदारांना वेळ दिला होता.

वास्तविकतः या नोटीसला उत्तर देण्यासहीत ७ दिवस वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सकृतदर्शनी तरी विधानसभा उपाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजकीय फायद्यासाठी संपूर्ण्पणे गैरवापर केलेला दिसतो आहे.

मग ते काय सर्वोच्च न्यायालयात नोटीस मिळायच्या अगोदरच गुरुवारी किंवा शुक्रवारी जाणार होते का?

शनिवारी नोटीस घेऊन वकिलांना भेटून सर्वोच्च न्यायालयात आपले अपील, वकालतनामा इ दाखल करण्यासाठी काही तरी वेळ लागतो कि नाही

सदनात झालेल्या कार्यवाही वर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण असत नाही.

त्यामुळेच ही सुनावणी तातडीने सोमवारीच घेतली गेली त्यातूनही हे खंडपीठ केवळ उन्हाळी सुटीचे खंडपीठ आहे त्यामुळे तातडीचा म्हटलं तरी यांचा क्रमांक ३२ आणि ३३ लागला होता

जर देशातील सर्वात मोठी शक्ती त्यांच्या मागे असल्याचे सांगितले होते मग सुप्रीम कोर्टाची, आणि तिथे ठेवलेल्या जजेस ची काय हिम्मत?

हि शक्ती जर सर्वोच्च असती तर गेली अडीच वर्षे म वि आ सत्तेत न बसता विरोधातच बसली असती एवढा साधा विचार आपल्या डोक्यात येत नाही

आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेची काहीही माहिती नसावी आणि वस्तुस्थिती माहिती करण्यापेक्षा भाजप वर गरळ ओकण्यात आपला द्वेषच दिसून येतो आहे.

सुबोध खरे's picture

29 Jun 2022 - 12:50 pm | सुबोध खरे

रात्री याचिका दाखल तेही सुट्टीच्या दिवशी रविवारी पण सोमवारी सुनावणी ला घेतली गेली पण

शिवसेनेने आजच दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने आजच संध्याकाळी पाच वाजता सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.

The Supreme Court on Wednesday agreed to hear at 5 pm the plea of Shiv Sena chief whip Sunil Prabhu, challenging Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari's directive to Chief Minister Uddhav Thackeray to prove his majority support on the floor of the House tomorrow (June 30).

https://www.freepressjournal.in/mumbai/shiv-sena-to-move-supreme-court-s...

गणेशा's picture

29 Jun 2022 - 9:17 pm | गणेशा

निकाल मात्र भाजपा च्या म्हणण्यानेच असणार... मग कोण विकले गेले.. का विकले गेले.. कोणाच्या हातात काय हे ज्याने त्याने ठरवायचे असते..

बाकी घोटाळ्याचे पुरावे.. ED फलाना भाजप च्या म्हणण्याने पाठींबा दिल्यास पुढे चालू राहतील का नाही ते येणार काळ ठरवेल..
आणि ED बाबत जो संदर्भ आता लोक घेतात तोच खरा होईल

सुक्या's picture

29 Jun 2022 - 10:05 pm | सुक्या

निकाल मात्र भाजपा च्या म्हणण्यानेच असणार...
जर सुप्रीम कोर्टावर पण संशय घेत असाल तर मग कठीण आहे. कावीळ झाली की सगळे पिवळे दिसते असे म्हणतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 5:43 pm | अमरेंद्र बाहुबली

गणेश भाऊ मुख्यमंत्रीपद गेल्याने आता कोर्टात वेगळे न्काल लागू शकतात पहा. आता शिवसेनेच्या याचीका धूडकावण्या एवजी अचानक आमदारांचे निलंबन वगैरे होईल.