जुमेरात @ अमेरात

सरनौबत's picture
सरनौबत in भटकंती
16 Mar 2022 - 11:47 pm

भारतातून ओमान देशात येतो तेव्हा सर्वप्रथम नजरेत भरतात ते येथील सुबक आणि गुळगुळीत रस्ते. आपल्याइथे
एका किलोमीटरमध्ये शेकडो खड्डे असताना इकडे शेकडो किलोमीटर एकही खड्डा नाही. अर्थात कमी वाहने आणि
पाऊस जवळजवळ नाही; ह्यामुळे देखील रस्ते पटकन खराब होत नसावेत. कुठेही जा, फोटो काढावेत इतके सुरेख
रस्ते. काही वर्षांपूर्वी मस्कतमधील 'अमेरात' ह्या उंच डोंगरावर असलेल्या गावात जाण्यासाठी छान नागमोडी घाट
बांधला. घाट चढून वर गेल्यावर खालचे शहर फार सुंदर दिसते. विमानातून दिसतात तशी छोटी घरे आणि
इमारती. विशेषतः रात्री दिव्यांच्या झगमगाटात तर डोळ्याचे पारणे फिटते. घाटात दोन ठिकाणी वाहने पार्क
करण्याची थोडी सोय आहे. तिकडे थांबून अनेक जण फोटो आणि सेल्फी काढताना दिसतात. मात्र रात्रीच्या अपुऱ्या
प्रकाशात मोबाईल कॅमेऱ्यात हे प्रकरण मनासारखे जमत नाही.

अख्खा घाट लखलखलेला दिसेल असा फोटो काढायचा म्हणून एकदा DSLR कॅमेरा घेऊन त्या डोंगरावर गेलो.
जिथून पूर्ण रस्ता छान दिसतो अशी जागा निवडली. तेव्हा मोबाइलपेक्षा बरे फोटो आले. परंतु एका फोटोग्राफर
मित्राने माझे फोटो पाहून ही एक वेगळी जागा सुचवली; जिथून अधिक जवळून फोटो काढता येईल. मात्र तिकडे
पोचण्यासाठी बरीच कसरत होती. जवळपास २०-२५ मिनिटे अतिशय निसरड्या आणि धोकादायक ठिकाणी
उतरायचे. तिकडे जेमतेम दोन जणांना उभे राहता येईल इतकी कमी जागा. जरा तोल गेला तर कॅमेऱ्यासकट खाली!
इतकं सगळं जमून आलं तरी येताना अंधारात सगळं सामान घेऊन वर चढून यायचे. परंतु ह्या स्पॉटवरून घाट
शंकराच्या पिंडीसारखा दिसतो. सध्या फारसं गरम होत नाही आणि बरी हवा आहे तेवढ्यात हा प्रकार एकदा
करायचा ठरवले.

मागच्या शुक्रवारी कॅमेरा, ट्रायपॉड, टॉर्च असा सगळा जामानिमा करून इच्छित स्थळी कसेबसे पोचलो.
सूर्यास्तापूर्वी अर्धा तास पोचून कॅमेरा ट्रायपॉडवर स्थानापन्न केला. अपुऱ्या प्रकाशातील फोटोग्राफी साठी योग्य
ISO, शटर स्पीड वगैरे गोष्टी चेक करून झाल्या. मधल्या डोंगरावर सूर्यास्ताच्या वेळचा नैसर्गिक प्रकाश आणि
रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा पिवळा प्रकाश हवा होता. घाटातल्या गाड्यांचे लाईट ट्रेल्स (लॉन्ग एक्स्पोजर) हवे होते.
त्यानुसार रस्ता पार करण्यास गाडीला साधारण किती वेळ लागतोय आणि त्यानुसार शटर स्पीड मॅच होतोय का हे
बघितलं. पूर्ण अंधार होण्यापूर्वीच हा सगळा खेळ उरकायचा होता.

ठरवल्याप्रमाणे सगळं शंकराच्या कृपेने घडून आलं. केवळ भारीचा कॅमेरा आणि लेन्स असून फोटो छान येतीलच असं
नाही. समोर सुंदर लँडस्केप दिसत असताना नक्की कुठे उभे राहायचे आणि कॅमेऱ्याचा अँगल कसा ठेवावा हे अतिशय
महत्वाचं आहे. The best zoom lens is your legs हे मनोमन पटलं. एक अविस्मरणीय अनुभव आला.

Amerat_0

Amerat

~ सरनौबत

Sunset

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Mar 2022 - 6:59 am | कंजूस

ट्राइपॉड हलका असला तर वारा वाहण्याच्या जागी हलतो.

------------
ओमानचा एक विडिओ
https://youtu.be/uoGGKWbKPW8

भारीच!परफेक्ट पिक्चर्स.

कर्नलतपस्वी's picture

17 Mar 2022 - 8:51 am | कर्नलतपस्वी

छानच फोटो आलेत.कष्टाचे फुटतील मिळालं.आवडले

टर्मीनेटर's picture

17 Mar 2022 - 11:19 am | टर्मीनेटर

झकास आलेत फोटोज 👍

त्यासाठी घेतलेले कष्ट जाणवले आणि शीर्षक पण आवडले!
'जुमेरात @' वाचून तुम्ही गुरुवारी तिथे गेला असाल असे वाटले होते... पण यमक चांगले जुळले आहे 🙂

सरनौबत's picture

17 Mar 2022 - 12:12 pm | सरनौबत

धन्यवाद कंजूस, कर्नल, भक्ती.

@टर्मिनेटर - दिवसापेक्षा रात्री सुंदर दिसतं म्हणून नाव कदाचित अमे 'रात" ठेवलं असावं

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

17 Mar 2022 - 12:58 pm | ॲबसेंट माइंडेड ...

फोटो आवडले.

मुक्त विहारि's picture

17 Mar 2022 - 7:35 pm | मुक्त विहारि

आवडले

अनिंद्य's picture

17 Mar 2022 - 8:21 pm | अनिंद्य

वॉव आलेत फोटो.

Your pics shine like stars !!

Nitin Palkar's picture

18 Mar 2022 - 6:27 pm | Nitin Palkar

प्रची आणि वर्णन दोन्हीही सुंदर.

गोरगावलेकर's picture

19 Mar 2022 - 2:20 pm | गोरगावलेकर

खूपच सुंदर फोटो

सरनौबत's picture

22 Mar 2022 - 1:36 pm | सरनौबत

आभारी आहे अबसेन्ट माईंडेड, मुवि, अनिंद्य, नितीन, गोरगावलेकर

चौथा कोनाडा's picture

22 Mar 2022 - 9:04 pm | चौथा कोनाडा

वॉव, खुप सुंदर !!!
क्या बात हैं !
💖

लिहिलं देखिल भारी आहे !