ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
19 Jan 2022 - 8:43 pm
गाभा: 

गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्‍यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

31 Jan 2022 - 8:20 pm | चंद्रसूर्यकुमार

हे राहिले.

---------
काय बोलावं, ते सुचेना....
------

:) ह. घ्या.

राघवेंद्र's picture

31 Jan 2022 - 8:33 pm | राघवेंद्र

काय राव असे का :)

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 1:44 pm | मुक्त विहारि

ह्या सरकारच्या राजवटीत, खूप लोकांना, काय बोलावं, ते सुचत नाही ...

राजवटीच्या निर्णयांची, री ओढावी तर, परमपूज्य राहुल गांधी आणि पर्यायाने गांधी घराण्याचे, चेले असल्याचा, दाखला मिळतो.

आणि निर्णयांना विरोध केला तर, उत्तरपुजा होण्याची शक्यता वाढते...

त्यामुळे, बरीचशी जनता म्हणजे, मुकी बिचारी गरीब मंडळी...

sunil kachure's picture

1 Feb 2022 - 1:53 pm | sunil kachure

कोणत्या ही पक्षाचे सरकार असू ध्या ते चुकीचे काय निर्णय घेत आहेत का?
त्यावर लक्ष ठेवा.
Bjp चे सरकार उत्तम आणि काँग्रेस चे सरकार वाईट.
हा फालतू विचार करू नका..
सर्वच पक्षांची सरकार ही मित्र,नातेवाईक, पाठीराखे ह्यांना खुश करण्यासाठी देशाला चुना लावतात.
लोकांना गुलाम म्हणून वागणूक देण्याची सर्वांची वृती सारखीच असते.
जनता सावध असली पाहिजे

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 4:27 pm | मुक्त विहारि

सेम टू यू....

बाय द वे,

सध्या काय वाचत आहात? नविन रामायण येणार आहे का? संजीवनी विद्या द्रोणाचार्य यांनी आणली, असे काही तरी ऐकले होते...

धर्मराजमुटके's picture

31 Jan 2022 - 8:44 pm | धर्मराजमुटके

डियर मुवी ! तुम्ही आता तिघाडी सरकारचा कार्यकाळ पुर्ण होईपर्यंत थंड घ्या! अजून बरेच दिवस जायचे आहेत. नाहीतर ऐनवेळी खरोखरीच काय बोलावे ते सुचणार नाही :)

हो ना

सध्या तरी, दर शनिवारी तेच चालू आहे...

दर आठवड्यात काही तरी घडामोडी होतातच.... त्याला आपण तरी काय करणार?