श्रीमंतीचे नियम??

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
20 Mar 2021 - 8:56 am
गाभा: 

भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.

चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.

आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.

धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_

विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.

१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?

२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?

३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?

४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?

१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

24 Mar 2021 - 6:59 am | चौकस२१२

"धडधाकट गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती" यासारखे साफ खोटे, दिशाभूल करणारे आणि अवसानघातकी विधान दुसरे नसेल.
सहमत

उपयोजक's picture

24 Mar 2021 - 8:10 am | उपयोजक

मस्त!! सहमत
+११११११११११११

सुबोध खरे's picture

24 Mar 2021 - 10:37 am | सुबोध खरे

मर्सिडीझ मधील माणूस सुद्धा दुःखी असतो -दळभद्री समाजवादी दृष्टिकोन

पण रस्त्यावर बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझ मध्ये बसून रडणे जास्त सुखकर असते.- चंगळवादी भांडवली दृष्टिकोन.

मर्सिडीझ मध्ये बसून रडण्यापेक्षा तीच मर्सिडीज विकून जर दु:ख दूर होणार असेल, तर बेशक तसं करावं. नंतर अजून एक मर्सिडीझ टिच्चून विकत घ्यावी, अन् त्यात बसून मजा करावी. उस में क्या है! - लाल्या दृष्टीकोन.

कशाला मागणी आहे न बघता एकच सरळ थोपट मार्ग स्वीकरलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे.
म्हणजे नोकरी चांगली लागेल म्हणून इंजिनियर कडे जाणे.
त्या मुळे ह्यांची कॉलेज आणि विद्यार्थी वाढले आणि त्या क्षेत्राचा दर्जा खालावत जावून तीच लोक जास्त बेकार दिसू लागली.
आता अशी अवस्था आहे की इंजिनिअर खूप आहेत आणि चांगले प्लंबर,सुतार, ह्यांची कमतरता आहे.
शेतकरी सोयाबीन तर सर्वच सोयाबीन चे उत्पादन घेतात त्या मुळे भाव पडून नुकसान होते.
आमच्या सातारा भागात एकाच्या पण बांधावर.
आंबे,चिक्कू,शेवगा, आवळा,डाळिंब ह्यांची चार झाड पण दिसत नाहीत.

दहा एकर जमीन आणि आंबे खरेदी करायला बाजारात.चार शेवग्याच्या शेंगा ह्यांच्या शेतात होत नाहीत.
सांगायचा उद्देश हाच .
कोणत्या गोष्टी ला ,कोणत्या स्किल ला बाजारात मागणी आहे हे ओळखता आले पाहिजे.संधी शोधता आली पाहिजे.
हे ज्याला जमत तो यशस्वी होतो.
पण हे सर्वांना जमत नाही.

सुक्या's picture

24 Mar 2021 - 6:04 am | सुक्या

श्रीमंती ची व्याख्या ही व्यक्तीसापेक्ष आहे त्यामुळे त्यात बर्‍यापैकी ग्रे एरिया आहे. आर्थिक सुबत्ता येताना बर्‍याच गोष्टी घेउन येते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जगण्याचे दडपण कमी करते. पैशाचे सोंग घेता येत नाही म्हणुन उद्या काय करु? या महिण्याचा खर्च कसा भागेल वगेरे ताण गाठीला थोडा पैसा असला की कमी होतो.

यासाठी
१. प्रथम आपली कुवत ओळखावी. कुठलीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी टप्प्या टप्प्याने प्रगती करावी. अगदी चावता येणार नाही इतका मोठा घास घेउ नये.
२. आपल्या कौशल्याला जास्त स्कोप नसेल तर दुसरे कौशल्य आत्मसात करावे. आजकाल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हे अगदी रुटीन सारखे झाले आहे.
३. गुंतवणुक जरुर करावी. शेयर मार्केट / स्थावर मालमत्ता / सोने काहीही ...
४. पैसा नाही म्हणुन जीवनातल्या काही महत्वाच्या गोष्टी टाळु नये. म्हणजे लग्नात काही हौस करायची असेल तर जरुर करावी. हनीमून ला जरुर फिरायला जावे. कौटुंबीक गेट टुगेदर / एखादी बिदेश यात्रा जरुर करावी. नंतर च्या आयुष्यात त्या गोष्टी होत नाहीत किंवा वेळ निघुन गेलेली असते.
५. कधी कधी कर्ज काढुन चैनीची वस्तु घेउ शकता. म्हणजे गाणी ऐकायला २००० रुपयाचा रेडियो पण मिळतो पण शौक असेल तर २ लाखाची सिस्टीम घेउन आनंद घेउ शकता. फक्त तारतम्य बाळगावे. कधी कधी ईएमआय हा बचतीचा उपाय असु शकतो.
कधीही हताश होउ नये. एक रस्ता बंद झाला तर बाकीचे शोधता येतात ... आणी सापडतातही . .

एखादा छंद जरुर असावा. धकाधकीत शांतीचा तो सुंदर मार्ग आहे. माझे म्हणाल तर घरच्या बेताच्या परीस्थीतीमुळे बर्‍याच गोष्टी करता आल्या नाही. सारे शिक्षण शिष्यव्रुत्तीवर झाले. जी मिळाली ती नोकरी घ्यावी लागली कारण बेकार राहुन दुसरी नोकरी शोधणे शक्य नव्हते. बासरी चे शास्त्रीय शिक्षण ईच्छा असुनही घेता आले नाही. त्याला वयाची ४०शी उजाडावी लागली ...

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 6:34 am | मुक्त विहारि

श्रीमंती ची व्याख्या ही व्यक्तीसापेक्ष आहे त्यामुळे त्यात बर्‍यापैकी ग्रे एरिया आहे.

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात.....

चौकस२१२'s picture

24 Mar 2021 - 7:10 am | चौकस२१२

धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा
यात विषयांतराचा गुन्हा माझ्य कडून हि झाला असावा .. क्षमा

चौकस२१२'s picture

24 Mar 2021 - 7:13 am | चौकस२१२

शिरीमंतीची व्याख्य्या
- सकाळी आपल्याला पाहिजे तेवहा उठता यावे आणि दिवस पाहिजे तसा घालवता यावा ...( "एक उनाड दिवस" चित्रपट पहा )
आत हे पॅसीए कमावून हि करता येईल आणि फारसे नाही कमवता हिची
फरक एवढाच कि अडचणीचं वेळीस पैसा कामी येतो आणि मिंधेपणा पत्करावा लागत नाही

सध्याच्या माणुसकी कमी असणार्‍या काळात हेफार महत्वाचे आहे. +११११११११

उपयोजक's picture

24 Mar 2021 - 8:26 am | उपयोजक

१. घरांच्या किंमती किंवा घरांची भाडी
२. पेट्रोल/डिझेल किंवा सार्वजनिक वाहतूक सेवेचे दर
३. मुलांच्या शिक्षणावरचा खर्च
४. दूध
५. वैद्यकीय उपचारांवरील खर्च

या पाच गोष्टींच्या किंमती भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कधी बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत का? या पाचही गोष्टी गरीब असो की श्रीमंत अटळ आहेत. यातल्या शिक्षण वगळता अन्य गोष्टींना स्वस्त पर्याय आजतागायत उपलब्ध नाहीये.

त्यातल्यात्यात काही गावांमधे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पाल्याला काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा उलटा चमत्कार घडतो आहे. याचे कारण माहित नाही. बहुधा पालक मुलाच्या भवितव्याबद्दल चिंता करत नसावेत. ;) मराठी माध्यमाच्या शाळेचा खर्च इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा कमी असतो.

अजून एक प्रकार म्हणजे महानगरांमधे सुशिक्षित+बर्‍यापैकी पैसे मिळवणारे लोक जिथे राहतात तिथून जवळच्या अंतरावर चांगल्या मराठी शाळाच नाहीयेत. इंग्रजी माध्यमाच्या मात्र मुबलक आहेत. म्हणजे हे सुशिक्षित पालक स्वत:हून मराठी शाळेत घालायला तयार असले तरी ते त्रासाचे व्हावे आणि त्यांनी जवळच्या पण महागड्या इंग्रजी शाळेतच पाल्याला घालावे यासाठी अशा बर्‍यापैकी कमावत्यांच्या वस्तीतून मराठी शाळा घालवण्याचा 'लुटारु शिक्षणसम्राटांचा' कुटील डाव असावा की काय अशी शंका येते.

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 8:38 am | मुक्त विहारि

जोशी हायस्कूल, ही मराठी माध्यमाची शाळा होती.

आता, माध्यम बदलणार आहेत, असे ऐकीवात आहे.

कारणे माहिती नाहीत.

नोकरी करत असला तर फक्त नोकरी वर अवलंबून न राहणे हे सर्वात मोठे शहाणपण आहे.
ज्या दिवशी नोकरी लागेल त्याच दिवशी ती नोकरी कधी ही जावू शकते ह्याची जाणीव हवी.
ह्या वर्षी २ हजार पगार ,पुढल्या वर्षी ३ हजार पगार असले हिशोब करून त्या वर अवलंबून राहू नये.
अनेक मार्गाने पैसे आले पाहिजेत.
नोकरी बरोबर विविध संध्या शोधून पैसे येण्याचे मार्ग निर्माण करा.
आणि ती सर्व वेगवेगळी क्षेत्र असली पाहिजेत.
स्किल develop करणे ह्याचा अर्थ आपण जी नोकरी करत आहोत त्याच क्षेत्रात स्किल develop करणे असा त्याचा अर्थ नाही.
नोकरी आहेच त्या बरोबर शेती पण प्रगत मार्गाने करत आहे.
त्याच बरोबर tourist मध्ये गाड्या पण चालत आहेत.
असे विविध मार्ग असले पाहिजेत.
तुमचा एक पाय नोकरीत असेल तर दुसरा पाय
वेळ आल्यावर ठेवायला जागा असलीच पाहिजे.
दोन दगडावर पाय असेलच पाहिजेत.

मिपाकर ...आपल्या मूळ गाभ्यां बाहेर जाऊन कोणी काही व्यवसाय केला असेल तर त्यावर वाचायला आवडेल ( तो चालला कि नाही हे गौण)
मी:
१) मूळ गाभा = उत्पादन, रचना आणि निर्मिती ( प्रॉडक्ट डिझाईन ) = इतर वयसाय: वारुणी ( वाईन ) विपणन आणि निर्यात
२) व्यवसाय म्हणून न्हाई , छंद म्हणून केला , पण व्यवसायम्हणून करू शकलो असतो असे : भारतातील कलाकारांचे (मराठी) परदेशी दौरे घडवून आणणे

चौकटराजा's picture

25 Mar 2021 - 2:41 pm | चौकटराजा

अगं , तुला काय सांगू .. तिच्याकडे वाशिंग मशीन आहेच पण तिच्याकड़े कपडे गोळाकरून ते मशीनमध्ये टाकायला ,काढायला,,वाळत घालायला रोबो देखील आहे !
( ही नजीकच्या काळातील शक्यता )
अगं . तुला काय सांगू . तिने चक्क एक स्टॅण्डबाय माणूस ठेवलाय ! रोबो बिघडला तर सर्व कामे करतो म्हणे !
( आणखी पन्नास वर्षांनी )

सुबोध खरे's picture

25 Mar 2021 - 7:34 pm | सुबोध खरे

रोबो तिला कोणता ड्रेस घातल्यावर चांगला दिसेल हेही सांगेल. पण तिच्या कडे दुर्लक्ष करायला रोबो शिकेल का?

तिच्या बरोबर फिरायला सुद्धा रोबो उपलब्ध असेल पण तिची त्याच्याबरोबर जायची तयारी असेल का?

हे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र प्रशिक्षण कसे सोडवतील हे पाहणे फार मजेशीर असेल.

चौकटराजा's picture

27 Mar 2021 - 2:59 pm | चौकटराजा

भावना कृत्रिम पणे यन्त्रात आणण्याचे प्रयोग चालू आहेत असे ऐकिवात आहे ! पण त्याचा मानवी जीवनाला उपयोग काय ? सर्व शोध ,सोयी ,प्रगति यान्चा केन्द्रबिन्दू हा माणूसच असणार आहे कारण त्यालाच गणित वापरून संशोधन करण्याची करण्याची क्षमता आहे असे वरवर तरी आपण म्हणतो. कोळी त्याच्या जाळ्याच्या नकाशाचा ब्लू प्रिन्ट कोणत्या कपाटात ठेवतो हे आज तरी आश्चर्यच आहे. यंत्र देखील जे जे करतील ती माणसाने दिलेल्या सूचनांवरूनच ! आज गुगल अर्थ ने मोजलेले अन्तर व प्रत्यक्श मोजलेले अंतर यात फरक पडतोच पण त्यात उपयोजन पातळीवर चूक चालू शकते. काही २० वर्शापूर्वी के ई एम मधे माझा एक नातेवाईक पोटच्या कर्काने आजारी होता.
सर्जन बाहेर आल्यावर म्हणाले " बराचसा कापला आहे ,काही शेजारचे ही नाईलाजाने कापावे लागले. " आज हे वाक्य सर्जन सांगणार नाहीत. पण आजही सर्जनची गरज आहेच कारण रोबोने आपण हून कपाकापी करण्याचे निर्णय घ्यावेत इतके प्रगत सेन्सर मानवाला सापडलेले नाहीत. आशा भोसले यानी एका मुलाखतीत सांगितले की आज मी बेसूर गायले तरी " टेक" परत घ्यावा लागत नाही. तो इन्जिनिअर म्हणतो मी बेसूराला सुरात आणतो! कारण बेसूर आज कानापेक्शाही यंत्राने अधिक सूक्ष्म पातळीवर मोजता येतो .दुरुस्त करता येतो. डोम्बिवलीतील डॉ. विद्याधर ओक यांनी अशा यांत्रिक सोयींचा फायदा घेऊन श्रुतींची हार्मोनियम तयार केली आहे. या पेटीत एक बटण ओढले तर हार्मोनियम अकोर्डीयन या वाद्याचा आवाज काढू लागते. रोमान्स , कृतज्ञता अशा भावना यंत्रे पूर्णपणे कधीच हाताळू शकणार नाहीत. वर एका ठिकाणी म्हटले आहे की यंत्र भाषा शिकेल कथा लिहिल का ? मी स्वत: असा अनुभव घेतला आहे की मी एखाद्या कथेचे मूळ लेखाकाच्या पेक्षा चांगल्या भाषेत पुरर्लेखन करू शकतो. पण कथेचा प्लॉट ? तो केवळ प्रतिभेने सुचू शकतो. तो लेखक मला म्हणत असे " तुम्ही का लिहीत नाही .... ? " मी म्हणे " तुम्ही आई होण्याच्या लायकीचे लायकीचे आहात मी दाई होऊ शकतो." मानवी मेंदूचे महत्व नवनिर्मिती त व गुंतागुंतीच्या हालचालीत राहाणार आहेच ! अशा किती गुंतागुंतीच्या हालचाली माणूस करीत राहील यावर माणूस व यंत्र राज्य कोणाचे हे अवलम्बून राहील.

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2021 - 7:11 pm | टवाळ कार्टा

पुर्वीच्या पीढीकडे बरेच काही चांगले होते असे वाटू लागले आहे फक्त "मुले कमी जन्माला घालावी" हा सारासार विचार सोडून :)

Rajesh188's picture

27 Mar 2021 - 3:11 pm | Rajesh188

जगाची लोकसंख्या आता १०० वर्षापासून प्रचंड वाढत आहे.
पूर्वी लोकांना मुल जास्त असायची पण ती जगायची नाहीत हे एक कारण असेल नाहीतर कमी वयात माणसांना रोगराई मुळे मृत्यू येत असावा.
त्या मुळे लोकसंख्या balance होती.ती तेव्हा प्रचंड वाढली नाही.
ह्या १०० वर्षात लोकसंख्या वाढली आहे.

Rajesh188's picture

27 Mar 2021 - 3:12 pm | Rajesh188

जगाची लोकसंख्या आता १०० वर्षापासून प्रचंड वाढत आहे.
पूर्वी लोकांना मुल जास्त असायची पण ती जगायची नाहीत हे एक कारण असेल नाहीतर कमी वयात माणसांना रोगराई मुळे मृत्यू येत असावा.
त्या मुळे लोकसंख्या balance होती.ती तेव्हा प्रचंड वाढली नाही.
ह्या १०० वर्षात लोकसंख्या वाढली आहे.

चौकटराजा's picture

27 Mar 2021 - 6:29 pm | चौकटराजा

माझे आजोबा ( आईचे वडील ) विनोदाचा जबर सेन्स असलेले होते इतके की त्यांना ९ मुलगे व १ मुलगी झाली ! पाच लहानपणीच गेले ! ब्राह्मणातला दलित कसा असतो त्याचे ते उदाहरण होते.

Rajesh188's picture

27 Mar 2021 - 3:15 pm | Rajesh188

जगाची लोकसंख्या आता १०० वर्षापासून प्रचंड वाढत आहे.
पूर्वी लोकांना मुल जास्त असायची पण ती जगायची नाहीत हे एक कारण असेल नाहीतर कमी वयात माणसांना रोगराई मुळे मृत्यू येत असावा.
त्या मुळे लोकसंख्या balance होती.ती तेव्हा प्रचंड वाढली नाही.
ह्या १०० वर्षात लोकसंख्या वाढली आहे.
खरे तर निसर्गाच्या नियम नुसार पूनारुत्तपदन चे कार्य संपले की त्या जीवाचा अंत होणे अपेक्षित आहे.
आणि तोच निसर्ग नियम माणसाला पण लागू होता.
जंगलात खूप कमी प्राणी त्यांचे lifespan पूर्ण करत असतील.
त्या अगोदर च ते कोणाचे तरी खाद्य बनतात.
रोज धोका असतो.

चौकटराजा's picture

27 Mar 2021 - 3:32 pm | चौकटराजा

मी माझ्या मुलीला नेहमी असे म्हणतो की " निसर्गाने अशी काहीतरी योजना करावी की सुनेला दिवस गेले की सासऱ्याचा कारभार आटोपला पाहिजे ! दुसरे मूल झाले की सासूचा ! म्हंजे फ्लोटिंग लोकसंख्या राहील पण कमी ! निसर्गात माणसाप्रमाणे इतरांनाही जगायचा अधिकार आहे तत्वतः: ! सर्व नैसर्गिक साधन संपत्ती निदान थोडी तरी व्यवस्थित वापरता येईल .माझ्या मते सध्या निसर्गाची पॉलिसी अशी आहे की आई वडिलांनी दिलेला वारसा व तुम्ही केलेल्या चुका यांच्या संकराने तुम्हाला मरणयेईल यालाच त्रिविध ताप अध्यात्मिक ,आधिदैविक,,अधिभौतिक असे म्हणत असावेत.

या विचारांमागचा विचार चांगला आहे,

निसर्ग ता असे काही प्राणी आहेत, जसे कि spacific salmon हा fish प्रजनन काळा नंतर मरतो..
ऑक्टोपस मादी तर प्रजनना नंतर starvetion करून मरते असे ऐकले आहे..

मनुष्य हा अतिशय धूर्त प्राणी आहे, त्याने मग मुलांना जन्म देणेच नाकरले असते.. मनुष्याकडे निसर्गता प्रगत मेंदू असल्याने तो विचारांच्या जोरावर काही हि करू शकतो..

पण सूनेला मुल झाले कि अश्या ऐवजी, माणसांची आयुमर्यादा कमी हवी होती असे वाक्य जास्त सोईस्कर झाले असते असे वाटते..
समजा max ४०-५० वर्षे आयु मर्यादा माणसांची असेल असे.
भविष्याची चिंता कमी असती.. लोकसंख्या कमी फलाना..माणुस कदाचीत आपल्या पुरते जगून श्रीमंत होऊन काय झक मारायची आहे असले विचार हि करत बसला असतानाच मेला पण असता..

असो..मजेने..
पण तुम्ही म्हणता तसे असते, तर तुम्ही हे विचार मांडण्यासाठी येथे नसता.

चौकटराजा's picture

27 Mar 2021 - 6:24 pm | चौकटराजा

तसा मी इन्डायरेकट पणजोबा देखील झालो आहे ! ))))

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2021 - 2:54 pm | प्रकाश घाटपांडे

पुर्वीच्या पिढ्यात आजा मेला नातू झाला असा वाक्र्पयोग असायचा. अशी संक्रमणे त्याकाळी असायचीच ( सरासरी)

४५ च्या पुढे स्त्री ची मासिक पाळी बंद होते आणि म्हणजे पुरुषाचे पण तेच वय प्रजनन शम वय म्हणून गृहीत धरावे लागेल.
त्या पुढे निसर्ग नियमानुसार तो प्राणी बिन कामाचा होतो.
माणसाचे वय पन्नास वर्ष च असते तर जगातील बहुसंख्य प्रश्न संपले असते.
१) गंभीर आजार होण्याचे प्रमाण खूप खाली आले असते.
२) म्हातारपण साठी आता जी आर्थिक तरदुत करावी लागत आहे ती करावी लागली नसती.
३) मुलांवर कसलाच अतिरिक्त बोजा पडला नसता.
६) माणसाला जास्त श्रीमंत होण्यास वेळ च मिळाला नसता.
७) जरा कुठे सेटल होत आहे तो पर्यंत जायची वेळ आली असती
८) अगदी आर्थिक विषमता पण कमी झाली असती..
एकूणच निरोगी उत्तम समाज अस्तित्वात आला असता.

NiluMP's picture

27 Mar 2021 - 8:50 pm | NiluMP

Please watch "Undercover Billionaire" on Discovery channel on Tuesday or Wednesdays 8 PM